दसर्याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.
गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.
मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.
अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !
बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !
ऋन्मेष
ऋन्मेष
तुला ह्या विषयात नक्की सखोल ज्ञान
आहे का.
स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हे पहिले सांग?
आता समाजात स्त्री पुरुष समानता कोठे नाही हे पण सांग.
स्त्री स्त्री चीच दुश्मन असते त्या. विषयी पण सांग.
सून नणंद,
सून सासू
सून भावजय
हा स्त्री मधीलच संघर्ष आहे इथे पुरुषाचा संबंध काय.
खऱ्या आयुष्यात स्त्री िचा स्त्री शी च संघर्ष तीव्र आहे.
पण जोडीने बसलेले असताना
पण जोडीने बसलेले असताना महिलेने पुढाकार घेतला जातो का? अशी उदाहरणे दिसतात का..
>>>>
माझे सासरे कुठल्याच पूजेला बसत नाहीत (कंटाळा) सगळं माझ्या साबा करतात. जोडीने बसायचा मुद्दा तर सोडाच. ते म्हणतात तुम्ही पूजा करा मी स्वयंपाक करतो. उगाच हा हु करत मला बसवू नका.
पूजेचा स्वयंपाक ताजा, आंघोळ
पूजेचा स्वयंपाक ताजा, आंघोळ करून, कांदा लसूण न घालता शक्यतो स्वतःच्या हाताने घडावा(देवाच्या नैवेद्याला स्वतः हातभार लागावा) असे असते.मोठे प्रमाण असल्यास किंवा वय, तब्येतीमुळे होत नसल्यास यात आपण अपवाद करतोच.
पण तरी रुन्मेष, घरी पूजा असल्यास सौ रुन्मेष पूजेला बसून तुम्ही वरण भात, कांदा लसूण नसलेली 1 भाजी, चटणी, कोशिंबीर, खीर, पुरी,कुरडई तळण इतके मिनीमम साधासा स्वयंपाक सकाळी लवकर उठून आंघोळ आवरून घरी बनवायला हरकत नाही
तुला सल्ला दिला हीच चूक झाली.
तुला सल्ला दिला हीच चूक झाली. नैवेद्य हा घरी करावा असा संकेत आहे म्हणून दिलेला सल्ला होता. तुम्ही हॉटेलातून मागवू शकता जर स्वयंपाकाचा इतकाच तिटकारा असेल तर. पण अशावेळी जी श्रद्धा असलेली व्यक्ती असेल ती म्हणेल नको मी करेन स्वयंपाक. मग ना तुझ्यावर पूजेची जबाबदारी ना स्वयंपाकाची. फारच छान!
mi anu ताई +1234
mi anu ताई +100
तुला सल्ला दिला हीच चूक झाली.
तुला सल्ला दिला हीच चूक झाली. >>>>
खूप जणांनी केली आहे ही चूक
त्याला अजूनही लोकं सिरीयस प्रतिसाद देतात हे वाचून गंमत वाटते
तो ठरवून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळणारे धागे काढतो आणि मायबोलकर त्याला बळी पडतात
वर्षानुवर्षे चाललेला हा खेळ आहे
धागे काढतो आणि मायबोलकर
धागे काढतो आणि मायबोलकर त्याला बळी पडतात
वर्षानुवर्षे चाललेला हा खेळ आहे Happy
Submitted by आशुचँप on 30 October, 2020 - 09:04
Pages
सहमत
ज्या विषयावर हा धागा काढतो त्या विषयातील ह्याला काहीच कळत नसते.
ना त्या विषयातील समस्ये विषयी ह्याला अस्था असते.
फक्त trp खेचणारा विषय घेतो.
मायबोली च अर्णव आहे तो.
अगदी अचूक वर्णन
अगदी अचूक वर्णन
कांदा लसूण ने काय घोडं मारलंय
कांदा लसूण ने काय घोडं मारलंय? आधी भाज्यांचे discrimination थांबवा, मग स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारा!
ऋ अरे तु स्वत: च शिर्षकात
ऋ अरे तु स्वत: च शिर्षकात लिहितोस आता करून दाखवायचे आणि मोजून एक दिवस स्वयंपाक करायला का कू करतोस ?, Is this what you cll equality? This is not fair ha.
तो ठरवून जास्तीत जास्त
तो ठरवून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळणारे धागे काढतो आणि मायबोलकर त्याला बळी पडतात
वर्षानुवर्षे चाललेला हा खेळ आहे
+100
किती ती जज करायची घाई असे
किती ती जज करायची घाई असे नाही वाटत का? >>
आलं का ते 'जज' !!! जसा तुला सैपाक करणार नाही लिहायचा हक्क आहे तसा त्यांना सैपाक करावा असं लिहायचे स्वातंत्र्य आहे. जो दुसर्याला जजमेंटल म्हणतो तोच खरं तर महाजजमेंटल असतो कारण तो जजमेंटलला जज करतो असं नाही वाटतं??

यावरून लहानपणीचं "जो म्हणतो
यावरून लहानपणीचं "जो म्हणतो तोच असतो " आठवलं
@सीमंतिनी इतकं रिचर्सिव
@सीमंतिनी इतकं रिकर्सिव लॉजिक कळेल असं वाटतं का इथल्या लेखका ला?
Kardashians अतरंगी आहेत पण लई भन्नाट बिझनेसवीमेन आहेत...>> I agree! They know what they are doing! उगीच नाही पुढल्या काही पिढ्यांची सोय केली आयलँड पार्टीज करायला.
त्याला अजूनही लोकं सिरीयस
त्याला अजूनही लोकं सिरीयस प्रतिसाद देतात हे वाचून गंमत वाटते
तो ठरवून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळणारे धागे काढतो आणि मायबोलकर त्याला बळी पडतात
वर्षानुवर्षे चाललेला हा खेळ आहे>>+१ शिवाय कमी प्रतिसाद असलेले धागे जसे विषय निघतील तसे वर काढून प्रतिसाद वाढवायचा प्रयत्न केला जातो.
स्त्रीपुरुष समानता हे शब्द टाकून पीन मारली/पूडी सोडली आहे. पण चर्चा स्वत: काय करतो त्यावर कायम ठेवली आहे

१ प्रतिसाद वाढवून माझा ईथे पास
काय हे order order खेळताय सी
काय हे order order खेळताय सी
फार भारी रेंज आहे प्रतिसादांची.

Kardashians काय, शिबी राजा हाफ फ्राय, अर्णव, जज काय
जज वरून आठवले एक सरदार क्लासमेटचे आडनाव जज होते तो Judge लिहायचा पण सगळे पहिल्यांदा जुडगेच वाचायचे/म्हणायचे. दरवेळी सांगावे लागायचे जज आहे जुडगे नाही
मनामनाचे ओझे तसं मनामनाचे जुडगे... म्हणायचे मी
ऋ अभिनंदन , तब्येतीची काळजी घेणे , शुभेच्छा.
@ जिज्ञासा, नैवेद्य घरीच
@ जिज्ञासा, नैवेद्य घरीच करावा असा संकेत असला तर मी माझ्या पोस्टमध्ये स्वयंपाकी बोलावता येईल हा पर्यायही सुचवला आहेच. तुम्ही फक्त हॉटेलमधून ऑर्डर करायचा पर्याय टारगेट केला.
तसेही जास्त लोकांचे जेवण असले की आचारी बोलावतात आमच्याकडे. आणि प्रसादाचा शिरा तर स्वत: गुरुजी बनवतात.
आणि जर देव खरेच असेल तर त्याला नक्कीच माझ्या हातचे खाण्याऐवजी चांगलेचुंगलेच खायला आवडेल
असो मुद्दा तो नाहीये
तर @ सिमंतीनी, मला जेवण बनवायचा सल्ला दिल्याबद्दल मला जराही आक्षेप नाहीये. फक्त मला ते जमणार नाही असे मी कबूल करताच त्याचा संबंध स्त्री पुरुष समानतेशी जोडला गेला आणि मग याला स्वयंपाक जमत नाही तर हा काय समानतेच्या गप्पा मारतोय असा जो मुद्दा पुढे आला तो मला चुकीचा वाटत आहे. याला मी जज करणे बोलत आहे.
काय झाले एकदा स्वयंपाक केलास तर असा जो टोन दिसला त्यावर सहज आजच घडलेले सांगतो.
ऑफिसातून दमून भागून घरी आलो तर पोरगी पास्ता कर म्हणून मागे लागली. आंघोळ उरकली आणि तडक किचनमध्ये शिरलो. पाणी उकळायला ठेवले तर बेडरूममध्ये झोपलेला मुलगा रडत बाहेर आला आणि तो सुद्धा मला बघून तडक माझ्याकडे आला. कारण त्याला कितीही हाडे टोचली तरी माझाच खांदा झोपायला आवडतो. मग त्याला तसेच खांद्यावर झोपवून उभ्या उभ्याच पास्ता केला. तेव्हा सहज हा धागा आठवला आणि मग कोणाला हा बनवलेला किस्सा वाटलाच तर पुरावा म्हणून एक सेल्फीही काढला -
चूल आणि मूल एकत्र सांभाळताना
छान आहे फोटो. खूप करतोस
स्वयंपाक करायला कोणा
स्वयंपाक करायला कोणा बाहेरच्या व्यक्तीला बोलावणे आणि तयार अन्न बाहेरून मागवणे यात फारसा फरक नाही - दोन्ही परान्नच असतं शास्त्राच्या दृष्टीने.
मला स्वयंपाक जमत नाही हा इतका लंगडा बहाणा आहे की तो हास्यास्पद आहे. स्वतःच्या प्रतिसादातील विसंगती तुझ्या ध्यानात येत नसेल असे वाटत नाही पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. असो, बेगडी समानता दाखवायला लोक कोणत्या थराला जातात हे तू दाखवून देतो आहेस.
मला स्वयंपाक जमणार नाही हा
मला स्वयंपाक जमणार नाही हा लंगडा बहाणा पेक्षा socially tone deaf statement आहे. सामान्यपणे पूजा इ च्या सैपाकातून स्त्रीला मुभा मिळत नाही म्हणून "एकदा करून बघ" चे सल्ले येत आहेत.
थोडं टोकाचे उदाहरण देते म्हणजे socially tone deaf statement म्हणजे काय ते स्पष्ट होईल - नट्यांच्या "मी टू" विषयीच्या संभाषणात नोकरी असलेल्याने "प्रोड्यूसर बरोबर झोपणे जमणार नाही." किंवा एखाद्याने "मी स्वखुषीने प्रोड्यूसरबरोबर जाते" म्हणणे. ही अतिशय tone deaf statements आहेत कारण परिस्थितीचे nuanced understanding, empathy for underlying emotional distress etc. नाही. जिला मुभा नाही अशा व्यक्तीचा विषय चालू असताना 'बीच मे मेरा चांदभाई' चालू आहे.
पण हल्ली हा प्रकार सगळीकडेच वाढला आहे, त्यामुळे रून्मेषबद्दल तक्रार नाही....
जमणार नाही कोण म्हणतेय...
जमणार नाही कोण म्हणतेय... जमवायला मी सेक्स चेंज ऑपरेशन करून स्वताही स्त्री बनू शकतो
प्रश्न आहे का जमवावे? आणि न जमवल्यास काय?
म्हणजे किचनमधील जी लुडबूड मला करता येते ती मी करतोच. आणि ते देखील माझ्या सोयीने वा माझ्या मर्जीने नाही तर वर उल्लेखल्या प्रमाणे जे मला जमते ते मग ईतरांना जमत असले तरी माझ्याच वाटणीचे काम असते. उदहरणार्थ मॅगी, पास्ता, हाफफ्राय, कॉफी, ताक, रायता वगैरे बनवणे, जेवण गरम करणे आणि सर्व्ह करणे, या गोष्टी ज्या मला जमतात त्या घरच्यांनाही अर्थातच जमतात. पण तरीही त्या मीच करतो. कारण जे थोडेफार मला जमतेय ते मीच केल्याने स्वयंपाकात माझा कमी असलेला वाटा निदान आणखी कमी होत नाही.
आता प्रश्न आहे की मी भात भाजी डाळ चपाती बनवणे शिकण्यास उत्सुक नाही. तर माझ्यावर शिक्का काय मारायचा...?
आता तुम्ही याबद्दल मला नवीन काही शिकण्यास तयार नाही म्हणून आळशी. अरसिक, अगदी कामचुकारही म्हणू शकता.. पण तुम्हाला यात पुरुषी अहंकारच शोधायचाय, स्त्री पुरुष असमानतेचाच शिक्का मारायचाय..
म्हणजे ते राजकारणी करतात बघा,
दोन व्यक्तींमध्ये वैयक्तिक वादातून भांडण झाले आणि एकाने दुसरयाला बेदम चोप दिला. हे कृत्य समर्थनीय नाहीच. पण बातमी अशी द्यायची की अमुकतमुक जातीच्या युवकाने तमुकामुक जातीच्या युवकाला मारहाण केली. आणि या प्रकरणाला वेगळाच रंग द्यायचा.
आणि मग ईथे त्या अमुकतमुक जातीकडून त्या दुसरया जातीतील लोकांवरच्या अत्याचाराचा ईतिहास असेल तर लोकंही चटकन अश्या बातमीवर विश्वास ठेवणार.
आपलीही यात चूक अशी नाही. कदाचित आपल्याला कुठल्याही पुरुषाला बेनेफिट ऑफ डाऊट द्यायचा नाहीये.
अर्थात मला यात कुठलाही बेनेफिट ऑफ डाऊट नकोय. लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात वा आपल्या ईमेजचा विचार मी सोशलसाईटवर तरी नक्कीच करत नाही. पण हा प्रश्न माझाच नाही तर समस्त पुरुषजातीचाही आहे. हल्लीचे फेमिनिजम दुर्दैवाने असे झालेय की तलवार उचलायची आणि ओले सुके न पाहता सपसप कापत सुटायचे..
ऋ - तू ओला की सुका
ऋ - तू ओला की सुका
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/61243
या धाग्यातील.चर्चेतून काय निष्कर्ष निघाले होते?
सी, खरं आहे! टोन डेफनेसचे
सी, खरं आहे! टोन डेफनेसचे उदाहरण आहे हा धागा म्हणजे.
मी असे ठरवले आहे की स्त्री पुरुष समानता म्हणून माझ्या ऐवजी माझ्या बायकोला पूजेला बसवायचे. हे मीच ठरवले आहे. दिल धडकने दो मध्ये राहुल बोस म्हणतो ना फिर मैने परमिशन दी आयेशा को बिझनेस करने की! तसं काहीसं वाटलं धागा वाचून. ज्यांनी त्यातूनही त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना तितकीच टोन डेफ उत्तरं मिळाली.
आशुचँप म्हणतात, त्याच्या धाग्यांकडे लक्ष देऊ नका. तो टिआरपी वाढवायला असे वादग्रस्त धागे काढतो. पण स्त्री पुरुष समानतेच्या चुकीच्या कल्पना जेव्हा योग्य आहेत असे भासवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ते खोडून काढणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीला मायबोलीवर १५० हून अधिक चाहते आहेत ती व्यक्ती जर इतकी टोन डेफ बेजबाबदार विधाने करत असेल तर ते कोणी तरी point out केले पाहिजे.
ऋ - तू ओला की सुका
ऋ - तू ओला की सुका
>>>
थोडा दमट असेल अजून. असण्यात काही वाईट नाही. पण आपला प्रवास नेहमी सुक्याकडेच असावा.
मी असे ठरवले आहे की स्त्री
मी असे ठरवले आहे की स्त्री पुरुष समानता म्हणून माझ्या ऐवजी माझ्या बायकोला पूजेला बसवायचे. हे मीच ठरवले आहे.
>>>
ठरवणे आणि लादणे यात फरक आहे.
.
आता मजा बघा. मी म्हटले की मी ठरवले की आजपासून स्वयंपाकाची पुर्ण जबाबदारी मी घ्यायची. तर तुम्ही म्हणाल अरे तू कोण ठरवणारा. तिलाच करायचा असेल स्वयंपाक तर तिला करू दे की. बईला स्वताची ईच्छा आहे की नाही
सांगायचा मुद्दा हा की ठरवणे आपल्यापुरते आहे दोघांच्या वतीने नाही. ते तसे दाखवायचा अट्टाहास का? आपला मुद्दा सिद्ध करायला? ते राहुल बोसवाले उदाहरण ओढून ताणून याच्याशी जोडले गेलेय ते याच अट्टाहासापायी.
वरील केसमध्ये मी मला एक पुरुष म्हणून परंपरेने जो हक्क जो मान दिलेला त्याचा मी त्याग केलाय तो नाकारलाय ईतकाच त्याचा अर्थ होता.
अरे किती वेळा तोंडावर पडशील
अरे किती वेळा तोंडावर पडशील लेका! गिरे तो भी टांग उपर!
स्वयंपाक घर सोडायला कोणीच
स्वयंपाक घर सोडायला कोणीच तयार नाही.
एक काल्पनिक संवाद
एक काल्पनिक संवाद
अ: तुला तर माहितीच आहे आमचा एक क्लायंट आहे त्याचं काम मी आणि क मिळून बघतो. माझ्या असं लक्षात आलं की माझ्या कलिगच्या म्हणजे क च्या आणि माझ्या कामात जरा असमानता आहे. माझं काम क ने केलं पाहिजे खरंतर. त्यामुळे मी ठरवलंय की आता उद्यापासून क माझं काम करेल आणि मी क चं काम करेन.
ब: अरे व्वा! छान आहे कल्पना. तुला माहीत आहे ना की क चं सगळं काम क्लायंट सर्व्हर वर असतं आणि त्या साठी व्हिपीएन करायला लागतं. नाहीतर compliance issues होऊ शकतात. म्हणजे तू व्हिपीएन करशील ना?
अ: ह्या! व्हिपीएनची काय गरज आहे? मी आपलं घरंचच इंटरनेट वापरणार.
ब: ओह! का तुझं इंटरनेट स्लो आहे का? व्हिपीएन ला अडचण येते का?
अ: आजिबातच नाही! मायबोली, शाहरुख खानचे सिनेमे सगळं झपाट्याने लोड होतं. स्पीडचा काही इश्यू नाहीये.
ब: चांगलं आहे की! पण मग तुला व्हिपीएन कसं करायचं ते माहिती नाहीये का?
अ: अरे मला येतं व्हिपीएन करता. गेम्स खेळताना व्हिपीएनच वापरतो की मी! तुला फोटो दाखवतो थांब.
ब: अरे मग तुला अॉफिसच्या कामासाठी व्हिपीएन वापरायला काय अडचण आहे? याला समानता कशी म्हणता येईल? तू क च्या अडचणी वाढवून ठेवशील उलट.
अ: ते तू मला विचारू नकोस! मी एवढी कामात समानता आणायचा विचार करतोय आणि तू सरळ माझ्यावर शिक्के मारतो आहेस.
ब: ओके, पण मग क चं काय म्हणणं आहे याबद्दल. तुझी चर्चा झालीच असेल ना क बरोबर?
अ: ठरवणे आणि लादणे यात फरक आहे. मी ठरवलंय याचा अर्थ मी क वर काही लादणार नाहीये. मी आपल्यापुरतं सांगितलं. मला जो माझ्या कामाचा हक्क होता त्याचा मी त्याग केलाय. दोघांच्या वतीने सांगायची काय गरज आहे?
ब:???
आपण वेगवेगळी विभागणी करून
आपण वेगवेगळी विभागणी करून बघुया समानता कोठे नाही.
1) घर.
नाती
मुलगी - बाप
बहीण - bhavu
सून -सासरा
नवरा ह्या बायको.
ह्या स्त्री पुरुषांच्या घरात असलेल्या नात्यात
स्त्री वर कोणत्या नात्यात जास्त अन्याय केला जातो तिला स्त्री म्हणून वेगळी अन्यायाची वागणूक दिली जाते.
2) सामाजिक जीवनात.
रस्त्यावर चालताना स्त्री आणि पुरुष ह्यांना वेगवेगळे नियम आहेत का.
सार्वजनिक वाहनात स्त्री आणि पुरुष ह्यांना वेगवेगळी वागणूक आहे का.
कोणत्या ही समारंभात स्त्री म्हणून तिच्या वर बंधन आहेत का.
स्त्री आणि पुरुष ह्यांना व्यक्त होण्यावर वेगवेगळी बंधन आहेत का.
वरील सर्व प्रकारच्या जीवनात स्त्री ला कुठे समानतेने वागणूक मिळत नाही.
3) नोकरी आणि व्यवसाय.
नोकरी आणि व्यवसाय मध्ये स्त्री आहे म्हणून तिला संधी नाकारली जाते का.
नोकरी मध्ये मिळणारा पगार आणि बाकी सवलती स्त्री आहे म्हणून फक्त कमी दिल्या जातात का.
Ekadhya पोस्ट साठी स्त्री आणि पुरुष ह्यांना त्यांच्या qualification मध्ये स्त्री आहे म्हणून
वेगळे नियम लावले जातात का?
व्यवसाय करायचा असेल तर त्याचे licence स्त्री आहे म्हणून नाकारले h
जाते का.
मग नोकरी आणि व्यवसाय मध्ये स्त्री ला समानतेची वागणूक दिली जात नाही.
हा आरोप योग्य आहे की अयोग्य.
Pages