आज मुंबईची लाईफ लाईन लोकल मुंबईतील लाईफ लाईन असलेल्या महिलांसाठी सुरू झाली
पण वेळ फार गंडलेली आहे. सकाळी ११ पासून सुरू होणार ते ३ पर्यंत आणि त्यानंतर ३ ते ७ पुन्हा बंद आणि मग ७ नंतर चालू. ऑफिसला जाणार्या महिला या वेळेवर नाराज दिसल्या.
मद्यालये उघडली आहेत पण विद्यालये कधी उघडणार याचा पत्ता नाही.
उघडल्यावरही पालकांनी आपापल्या पाल्याची जबाबदारी घ्यावी असे कानावर आलेय.
राज्यातील मंदिरे कधी उघडणार यावरून तर सोशलसाईटवर फार राजकारण पेटले आहे. मी स्वतः नास्तिक आहे. मला मंदिरे उघडी आहेत की बंद याने फरक पडत नाही. पण तरी रोजगाराचा विचार करता आणि मंदिरात जाण्याने भाविकांना जे मानसिक बळ मिळते ते पाहता मंदिरे लवकर उघडली तर चांगले असे वाटते, अर्थात सारे नियम पाळूनच.
जिम बरेच काळापासून बंद आहेत म्हणून माझे या लाईनीतले बरेच मित्र सतत शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत.
अखेर दसर्याच्या मुहुर्तावर जिम उघडणार आहेत असे कळलेय.
थिएटर कधी उघडणार देव जाणे. शाहरूखचा पिक्चर थिएटरला जाऊन पाहिल्याला काही युगे लोटली असे आता वाटू लागलेय.
अर्थात उघडतील तेव्हा लोकं टणाटण उड्या मारत जातीलच याची खात्री नाही.
कारण सलून आणि पार्लर उघडून जमाना झालाय पण मी तिथलीही पायरी चढलो नाहीये.
लोकांच्या ऑफिसचे माहीत नाही, पण आमचे सप्टेंबर पासून आठवड्यातून २-२-२ दिवस असे तीन गट बनवून उघडले आहे.
अजून काय राहिले बरे.. हा हॉटेल.. तसे स्विगीवरून आता वरचेवर मागवणे सुरू झालेय आमच्याघरी. पण हॉटेलात बसून खायची मजा काही औरच. ती मिस करतोय.
मुलांसाठी गार्डन कधी उघडतील देव जाणे. जेव्हा उघडतील तेव्हा प्लीज लगेच याच धाग्यावर कळवा.
लॉकडाऊन नंतर राज्यात / देशात काय चालू झालेय आणि काय बंद आहे आणि ते कधी उघडणार वा उघडणे गरजेचे आहे की नाही या सर्व प्रकारची चर्चा करायला आणि एकमेकांना माहिती द्यायलाच हा धागा !
करोना ने गाड्याला जी खीळ
करोना ने गाड्याला जी खीळ लावलीय त्यामुळे गाड्याच्या चाकांचेही थोडे नुकसान झालेच आहे. परत चालू करताना पूर्वीसारखा वेग लगेच घेता येणार नाहीये.
हॉटेल्स चालू करायला परवानगी असली तरी अर्ध्या कपॅसिटीने. त्यातही सॅनिटायझेशन चे निर्बंध जास्त आहेत. हे सगळं आणि बंद पिरियड ची भरपाई करायला किंमती वाढवल्या जाणार. थिएटर्स पण चालू झाली तरी एसीमुळे कठीण आहे. हॉटेल वाले इतकं करुन चालवायला घाबरत आहेत. परत लोक येतीलच याची अजून खात्री नाही.
दूर ठिकाणची हॉटेल्स, होम स्टे चालू झालेत. सध्या वर्क व्हेकेशन ची बरीच जाहिरात होतेय. कोणत्या तरी रम्य जागी जाऊन दिवसभर काम करा आणि मग सकाळ्/संध्याकाळ/वीकेंड ला फिरा असे.
थिएटर ला शोले परत लावला तर मला नक्की बघायचाय. अंधाधुन पण थिएटर ला बघायचा राहून गेला.
हॉटेल्स चालू झाले तर सेफ्टी बघून नक्की जाऊ. धंदे चालू व्हायला पाहिजेत, कंझ्युमरीझम वाढायला हवा. मिनीमलीझम वर विश्वास असलेली माणसं असतील, त्यांचे चूक नाही पण ती थोडी असावी.
आमच्या गल्लीच्या टोकाचे चप्पल शिवणारे काका परत आले. ते बघून बरं वाटलं. 'नाऊ ऑर्डर विल बी रिस्टोर्ड इन युनिव्हर्स' असं काहीतरी.
आमच्या घरी तर गेल्या सात आठ
आमच्या घरी तर गेल्या सात आठ महिन्यात कुकरी शोज चे टी आर पी प्रचंड वाढले आहे !
त्यात वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ आणि तसेच घरी बनविण्याचा प्रयत्न करणे यात मजा येते !
पंतप्रधान म्हणतात
पंतप्रधान म्हणतात
कोविडचं संकट टळलं नाही, आणि राज्यपालाला आणि भाजपला मंदिर उघडे पाहिजे.
--
नक्की कुणाची बुद्धी भ्रष्ट आहे ?
नक्की कुणाची बुद्धी भ्रष्ट
नक्की कुणाची बुद्धी भ्रष्ट आहे ?>>>> कुणाची ??? दोघांची.... त्या राज्यपलाला नियुक्त करतांना नमोची झाली होती
आताच सरकारने ५१००० कोटी
wrong number
सगळे धागे भाजप नॉन भाजप च्या
सगळे धागे भाजप नॉन भाजप च्या भाण्डणाला वापरायचे तर वेगळे मुद्दे येणार कसे?
फॉल पिको च्या धाग्यावर पण ही
फॉल पिको च्या धाग्यावर पण ही मंडळी राजकारण राजकारण खेळत बसतील !
वर पुन्हा प्रश्न नक्की कोणाची बुध्दी भ्रष्ट झाली ?
सगळे धागे भाजप नॉन भाजप च्या
सगळे धागे भाजप नॉन भाजप च्या भाण्डणाला वापरायचे तर वेगळे मुद्दे येणार कसे?
>>>
+७८६
ज्या धाग्यात राजकीय वादाचे पोटेंशिअल आहे वा ते नंतर शोधले जाते त्याच्या दोन आवृत्त्या काढायला हव्यात. एक राजकीय वादासाठी व एक ईतर चर्चेसाठी. म्हणजे दोन्ही चर्चा वेगळ्या राहतील.
सध्या सरकार जे चालू करतेय वा जे चालू करत नाही त्या एकूण एक बाबींवर सोशलसाईटवर वाद चालतो. पण सामान्य माणसाला तुर्तास त्या वादाशी काही घेणेदेणे नाही. त्याचा आवाज संबंधितांपर्यंत पोहोचायचा असेल तर चर्चेला राजकीय रंग टाळूनच हे शक्य आहे.
अभिषेक, छान आयड्या,
अभिषेक, छान आयड्या,
दोन्ही धाग्याच्या शिर्षकातच द्यायचे, राजकीय आणि अराजकीय .
हाकानाका, शुभेच्छा!!!
कारण सलून आणि पार्लर उघडून
कारण सलून आणि पार्लर उघडून जमाना झालाय पण मी तिथलीही पायरी चढलो नाहीये. >>
लेकीबरोबरचे पोनीटेलवाले फोटो मस्त होते. कुठे लावले होते ते लक्षात नाही आता. त्यावरूनच अजून केसाची दुकाने उघडली नाही लक्षात आले होते 
तरणतलाव आता सुरू व्हायला हवे,
तरणतलाव आता सुरू व्हायला हवे, तसेही पाण्यात उतरायच्या आधी आणि नंतर शॉवर घ्यायचाच असतो आणि थंडीत कमीच माणसे येत असतात
तरणतलाव आता सुरू व्हायला हवे,
तरणतलाव आता सुरू व्हायला हवे, तसेही पाण्यात उतरायच्या आधी आणि नंतर शॉवर घ्यायचाच असतो
>>>>>
सोसायटीच्या तरणतलावालाही बंदी आहे का?
धन्यवाद सीमंतिनी,
धन्यवाद सीमंतिनी,
तो ईथेच मायबोली डीपीला लावला होतो.
मलाही आवडलेला, पण डीपी कितीही आवडला तरी तो वरचेवर बदलत राहावा जेणेकरून एखाद्या प्रतिमेत जीव अडकत नाही असे आमचे आजोबा म्हणतात
सोसायटी चे पूल तिथल्या
सोसायटी चे पूल तिथल्या बहुतांश लोकांनी स्वतःच बंद केले आहेत
आमची नवीन बिल्डींग आहे.
आमची नवीन बिल्डींग आहे. सोसायटी अजून बनली नाही. बिल्डरच बघतोय सारे. म्हणून चौकशी केली की नियमामुळे बंद आहे की अजून सगळे लोकं राहायला यायची वाट बघतोय.
50 % लोक असले की सोसायटी होते
50 % लोक असले की सोसायटी होते म्हणे
ह्या रुन्मेश च काही कळत नाही.
ह्या रुन्मेश च काही कळत नाही.
धाग्या नुसार त्याचे राहण्याचे ठिकाण पण बदलत.
आता एकदम नवीन बिल्डिंग मध्ये राहायला आला आहे.
हेमंतजी मला एकाच घरात फार काळ
हेमंतजी मला एकाच घरात फार काळ राहणे बोअर होते. घर विकत घ्या वा भाड्याने. पण बदलत राहावे. विचार करा वर्षानुवर्षे ज्या घरात राहिला आहात त्याच घरात लॉकडाऊन काळात अडकल्यावर किती बोअर होत असेल...
५० टक्के सोसायटी असेल नियम पण अजून कोणी पुढाकार घ्यायला तरी नाही आलाय.. आणि एक वर्षाचे मेण्टेनन्स तर बिल्डरनेच पजेशन देताना घेतलेय
एक भाऊ बिरोबाची खोटी शपथ घेतो
एक भाऊ बिरोबाची खोटी शपथ घेतो तर दुसरा मंदिरात पायात चपला घालून गेल्यामुळे गावकऱ्यांचा मार खातो. भाजपचे थोर हिंदूत्व.
https://lokmat.news18.com/crime/bjp-mla-gopichand-padalkars-brother-and-...
**