विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात होते. तशाच प्रकारच्या टवाळ अॅप नव्याने भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. असे का असावे बरे? व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो पण तेच जोक्स, मेमे,विनोदी gif, स्टीकर हे मात्र विनाविलंब फॉरवर्ड केले जातात. कारण हॅ हॅ हॅ हू हू हू करायला फार श्रम पडत नाहीत.काय साध्य होतं अशा हॅ हॅ हॅ हू हू हू मधून? खरंतर काही क्षणांची करमणूक ही समजण्यासारखी आहे पण सतत त्याच ट्रान्समधे राहणं हे मात्र नुकसानकारक आहे.विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो.विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे पण कामाबाबत गंभीर नसल्यास किंवा अंडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत. विनोदीपणाचा जीवनात अभाव असेल तर माणूस ताण येऊन अल्पायुष्यातच स्वर्गवासी होईल असे काहीजणांना वाटते.त्याला काही शास्त्रीय आधार आहे का?
गांभीर्य विनोदापेक्षा अधिक फलदायी असते.
Submitted by केअशु on 16 October, 2020 - 02:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गांभीर्य व विनोद या दोनही
गांभीर्य व विनोद या दोनही गोष्टी जीवनावश्यक आहेत .कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो पण त्यामुळे त्या गोष्टी वाईट ठरत नाहीत.
वरती भाऊ नमसकरांनी लिहिलेला
वरती भाऊ नमसकरांनी लिहिलेला 'गांभीर्य' हा शब्द बरोबर आहे. गंभीरता, क्रूरता हे शब्द आजकाल मराठीत हिंदीच्या प्रभावामुळे फार वापरात येऊ लागले आहेत. भाषेला गांभीर्याने न घेतल्याने हे क्रौर्य नकळत घडते आहे.
@भाऊ नमसकर: अगदी आहे.
@भाऊ नमसकर: अगदी सहमत आहे. दोन्हींचा अतिरेक वाईट.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विनोदाचा दर्जा. कशा प्रकारचे विनोद केले जातात व कशा विनोदांना हसले जाते हे पण महत्वाचे. एखाद्याला कसा प्रचंड त्रास झाला, एखाद्याची भांडखोर पत्नी मृत झाली, किंवा वयस्क आजोबा मृत झाले, एखाद्याला तोतरेपण असल्याने नीट बोलता येत नाही या व अशा स्वरूपांच्या गोष्टींवर विनोद करून प्रसृत केले जातात. हे जे विनोद निर्माण करणारे असतात ते त्यातून गेलेले नसतात. मृत्यू काय असतो हे त्यांनी पाहिलेले नसते. त्यामुळे त्यांना मृत्यू हि विनोद करण्याची गोष्ट वाटते. विनोद हा बौद्धिक असावा. उत्तम विनोदाची वैशिष्ट्ये यावर एका प्रख्यात विनोदी लेखक महोदयांचा (अत्रे किंवा चिवी असावेत) एक पाठ होता.
atuldpatil, +१
atuldpatil, +१
आजकाल दुसर्याचा टोकाचा अपमान करणे म्हणजे विनोद अशी पद्धत आहे.
भाऊ, अतुल सहमत आहे.
भाऊ, अतुल सहमत आहे.
विनोद नसते तर आस्वाद घेत कामे करणे कठीण झाले असते आणि गांभीर्य नसते तर कामे झाली नसती.
एकतर अर्ध्या जनतेला विनोद कळत
एकतर अर्ध्या जनतेला विनोद कळत नाही
त्यापुढे स्माईली किंवा दिवा घ्या वगैरे टाकावे लागते.
बाकी विनोदाला
बाकी विनोदाला गांभेर्यापेक्षा जास्त महत्व असते तर ट्रॅजेडी किंग युसुफ, अँग्री यंग मॅन अमिताभ किंवा किंग ऑफ रोमान्स शाहरूख सारखाच कॉमेडीचा बादशाह गोविंदा सुपर्रस्टार झाला असता.
त्यापुढे स्माईली >>
त्यापुढे स्माईली >>
आपण विनोद लिहायचा आणि त्यात आपणच डझनभर स्माईल्या द्यायच्या ही बहुतेक WhatsApp संस्कृती आहे किंवा फेसबुकावर उदयास येऊन WhatsApp मुळे फोफावली. ऑर्कुटवर ही संस्कृती नव्हती. पण WhatsApp सुरू झाल्यानंतर वर्षभरात ती ऑर्कुटवरही डोकावू लागली. तेव्हा मला Whatsapp काय हे ही माहिती नव्हते. आणि माझ्या ऑर्कुट मित्रांना मी चांगला विनोद असला की सांगायचो की अरे छान विनोद आहे पण त्यात एवढ्या स्माईल्या का, त्याने मजा जातेय. हा विनोद आहे हे कळावे म्हणुन स्माईल्या टाकल्या आहेत असे वाटते.
पण तरीही काही विनोद तसेच येत असत. मग ओर्कुट बंद झाल्यावर मी Whatsapp वर पदार्पण केले तेव्हा माझ्या लक्षात आले की ही तर इथली संस्कृतीच आहे.
पण आजही मला Whatsapp वरील एखादा विनोद इतर ग्रुपवर फॉरवर्ड करावासा वाटला तर मी तो कॉपी पेस्ट करून त्या स्माईल्या काढुन पोस्ट करतो.
अवांतराबद्दल क्षमस्व.
>> एकतर अर्ध्या जनतेला विनोद
>> एकतर अर्ध्या जनतेला विनोद कळत नाही त्यापुढे स्माईली किंवा दिवा घ्या वगैरे टाकावे लागते.
हे तुम्ही विनोदाने कि गांभीर्याने लिहिलंय?
*बाकी विनोदाला
*बाकी विनोदाला गांभेर्यापेक्षा जास्त महत्व असते तर ट्रॅजेडी किंग युसुफ, अँग्री यंग मॅन अमिताभ किंवा किंग ऑफ रोमान्स शाहरूख सारखाच कॉमेडीचा बादशाह गोविंदा सुपर्रस्टार झाला असता.* -
ह्यामुळे विनोदाला दुय्यम स्थान मिळतं कीं गोविंदाला सुपरस्टार व्हायचंच होतं तर त्याने चूकीची वाट निवडली, इतकंच सिद्ध होतं. कारण, सुपरस्टार बनण्याची/ बनवण्याची जी मानसिकता असते त्याचं वावडं असणं , हाच तर विनोदाचा गाभा आहे ! लोकनाटयातला राजा- प्रधान हें त्याचं बोलकं उदाहरण. विनोदाला जें मूळातच नकोच असतं, तें त्याला मिळालं नाहीं असं कसं म्हणता येईल ?
आमच्या मराठीत दादा कोंडकेंचे
आमच्या मराठीत दादा कोंडकेंचे सलग सात सिनेमे सुपरहिट होऊन ते कॉमेडीच्या जीवावर सुपरस्टार झाले सुद्धा. लक्षा, सराफ ह्या सुपर्स्टार्सचे कॉमेडी सिनेमे सुपरहिट झाले.
आणि चार्ली चॅपलिनला विसरलात होय. (अर्थात शाहरूखपुढे तुमचे ज्ञान जात नसल्याने तुमची तरी काय चूक म्हणा)
बाकी लेख भारी विनोदी जमला आहे हो...हॅ हॅ हॅ... मजा आली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धागाकर्ते, शीर्षकात आणि लेखात
धागाकर्ते, शीर्षकात आणि लेखात गांभीर्य असा बदल करा
टवाळा आवडे विनोद ।
टवाळा आवडे विनोद ।
उन्मत्तास नाना छंद ।
तामसास अप्रमाद ।
गोड वाटे ॥(दा. 7.9.51)
(याचा अर्थ विनोद करणे वाईट आहे, असे नाही.
विकृत आनंद हा वाईट असतो)
आमच्या मराठीत दादा कोंडकेंचे
आमच्या मराठीत दादा कोंडकेंचे सलग सात सिनेमे सुपरहिट होऊन ते कॉमेडीच्या जीवावर सुपरस्टार झाले सुद्धा. लक्षा, सराफ ह्या सुपर्स्टार्सचे कॉमेडी सिनेमे सुपरहिट झाले.
आणि चार्ली चॅपलिनला विसरलात होय
>>>>
बरं झाले टॉम ॲण्ड जेरी मिकी माऊस नाही जोडलेत.
चार्ली चॅप्लनीच्या विनोदाला कारुण्याचीच झालर असल्याने ते वर्ल्डक्लास झाले.
दादा कोंडकेंबद्दल पुर्ण आदर मनात ठेऊन बोलतो की आमच्याईथे पोरांना दादा कोंडके हे डबल मिनिण्ग चावट विनोद करणारे कलाकार म्हणून जेमतेमच माहीत होते.
बाकी मराठीत सुपर्रस्टार हि प्रथाच नाही. विनोदाचीच कास धरून राहिल्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांना बॉलीवूडमध्ये नोकराच्या भुमिकांवर समाधान मानावे लागले. दादा कोंडके यांचे हिंदी चित्रपटांनीही चला डबल मिनींग विनोद बघूया म्हणून गेलेल्या प्रेक्षकांना निराश केले आणि ते आपटलेच. अंधेरी रात मे दिया तेरे हात मे हे विनोद एका विशिष्त वयातच बरे वाटतात. ते देखील विशिष्ट लोकांनाच.
मी माझ्या पोस्टमध्ये शाहरूख सोबत अमिताभ आणि दिलीपकुमार यांचा उल्लेख करूनही आपली नजर शाहरूखवरच पडणे यातच त्याची महानता सामावली आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी हे तिघेही ऑलटाईम सुपर्रस्टार आहेत हे माझे विधान खोटे असेल तर खोडून दाखवा. त्यासाठी जे तर्क लावाल त्यात नक्कीच विनोद गवसेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋन्मेषचे बाबा, महानता हा पण
ऋन्मेषचे बाबा, महानता हा पण हिंदी शब्द आहे गंभीरता सारखा. महत्त्व हा मराठी शब्द आहे. (महान हे महत् चे रूप आहे, पण मराठीत महान ला ता लागत नाही, त्या ऐवजी मूळ शब्द महत् ला त्व लागते )
*बाकी हे तिघेही ऑलटाईम
*बाकी हे तिघेही ऑलटाईम सुपर्रस्टार आहेत हे माझे विधान खोटे असेल तर खोडून दाखवा. त्यासाठी जे तर्क लावाल त्यात नक्कीच विनोद गवसेल * - मुद्दा हे तिघेही सुपरस्टार आहेत कीं नाहीत हा नसून , तेच फक्त सुपरस्टार आहेत म्हणून गांभीर्य विनोदापेक्षा महत्वाचं ठरतं हा निष्कर्ष निघतो का , हा आहे. जीवनामधे गांभीर्य व विनोद याचं मोजमाप घ्यायला सिनेमातलं यश-अपयश ही अगदींच आंखूड फूटपट्टी ठरते.
*चार्ली चॅप्लनीच्या विनोदाला कारुण्याचीच झालर असल्याने ते वर्ल्डक्लास झाले.* - सहमत. पण तिथंही गांभीर्याला विनेदाचाच आधार घ्यावा लागला, हेंही तितकंच महत्वाचं !
( थोडं विषयांतर -आत्तांच त्याना 'ऑस्कर जीवनगौरव' मिळालं होतं त्या सोहळ्याची क्लिप पाहिली. त्याना बोलणयासाठी 5 मिनीटं दिलीं होती. पण टाळ्याच सतत
वाजतच राहिल्या. ते इतके भारावले होते कीं एक शब्दही बोलूं शकले नाहीत ! सलाम!! )
एखादी व्यक्ती सतत
एखादी व्यक्ती सतत गांभिर्यानं वागत असेल तर ती विनोदाचा विषय ठरू शकते आणि एखादी व्यक्ती सतत विनोदी वागत असेल तर तिचा पत्ता कसा कट करावा याचा इतर सगळे गांभिर्यानं विचार करू लागतात.
वा मामी, एका वाक्यात समर्पक
वा मामी, एका वाक्यात समर्पक विश्लेषण केलंत.
@हरचंद पालव @कमला शीर्षकात
@हरचंद पालव @कमला शीर्षकात बदल केला आहे.
@मामी : छान प्रतिसाद!
दादा कोंडकेंबद्दल पुर्ण आदर
दादा कोंडकेंबद्दल पुर्ण आदर मनात ठेऊन बोलतो की आमच्याईथे पोरांना दादा कोंडके हे डबल मिनिण्ग चावट विनोद करणारे कलाकार म्हणून जेमतेमच माहीत होते>>>>
तुमच्या पोरांनी चित्रपट बघायचे दिवस येईपर्यंत दादांचे सुवर्णयुग ओसरून दव्यर्थी संवाद हीच ओळख शिल्लक राहिलेली त्याला दादा काय करणार??
प्रमाणामधे सर्व काही असावे.
प्रमाणामधे सर्व काही असावे..नवरस हे जीवनाला रंगबिरंगी बनवून जगण्यासाठी आकर्षक बनवत असतात.
चेहरे गंभीर करून बसण्यने प्रश्न सुटतच् नाहीत पण विनोदाने ताण निश्चित हलका होतो... काम करायला उमेद येते.
पण विनोद म्हणजे आपल्या इथे टवाळक्या , अंगविक्षेप , कुणाच्या तरी नैसर्गिक व्यंगाची जाहीर हेटाळणी असा करून टाकला आहे.
ग्रेट उदा.
ग्रेट उदा.
गौतम गंभिर आणि विनोद कांबळी
गौतम गंभिर आणि विनोद कांबळी >
गौतम गंभिर आणि विनोद कांबळी >>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
"एकतर अर्ध्या जनतेला विनोद
"एकतर अर्ध्या जनतेला विनोद कळत नाही त्यापुढे स्माईली किंवा दिवा घ्या वगैरे टाकावे लागते."
'हे तुम्ही विनोदाने कि गांभीर्याने लिहिलंय?' "![Bw](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/bw.gif)
हा एक गंभीर विनोद आहे.
मामी, नीलिमा + 111
मामी, नीलिमा + 111
गौतम गंभिर आणि विनोद कांबळी
गौतम गंभिर आणि विनोद कांबळी >>>
भारीये हे.
थॅन्क्स हीरा/ मामी. मला
थॅन्क्स हीरा/ मामी. मला वाटते आम्हाला १०वीत याच्या एकदम विरुद्ध धडा होता. यात विनोदाचे महत्व सांगताना (अत्रे का कोल्हटकर आठवत नाही) एक किस्सा सांगितला होता. समजा तुम्ही नाटकाला गेलात आणि समोर एखादा फेटेवाला येउन बसला तर त्याच्यावर ऑरडण्यापेक्षा
जर त्याला म्हणालात की "अहो पुढे काय चालु आहे हे अधुन मधुन आम्हाला ही सांगत जा" तर तो स्वतःच सावरुन बसेल.
मी हा लेख चुकीचा आहे असे म्हणत नाही पण मला तो लेख आठवला कारण त्यात विनोदाचे सामर्थ्य सांगितले होते. पण रामदास स्वामींनी लिहिले आहेच "टवाळा आवडे विनोद!"
मायबोलीवर अजुन "टवाळ" आयडी नाही म्हणुनच बर्याच चर्चा गंभीर असतात..
स्मायलि परवडल्या, पण
स्मायलि परवडल्या, पण कार्यक्रमात जबरदस्तीचे हसु विनोदाचि मजाच घालवता. ते कमि कि काय म्हणुन ढँग ढँग करत वाजवलेले ड्रम्स वगैरे वैताग आणतात.