गांभीर्य विनोदापेक्षा अधिक फलदायी असते.
Submitted by केअशु on 16 October, 2020 - 02:10
विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात होते. तशाच प्रकारच्या टवाळ अॅप नव्याने भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. असे का असावे बरे?
विषय: