![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2020/10/10/IMG_20201010_094416.jpg)
लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.
सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते
असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.
*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका
त्याची गाडी अतिशयच कळकट होती>
त्याची गाडी अतिशयच कळकट होती>>> बऱ्याच ठिकाणी कळकट मळकट चवीला बळकट समीकरण असतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेडर फोटो लय भारी.
हेडर फोटो लय भारी.
जेव्हा lockdownमध्ये मला लादीपाव एकदा मिळाले नाहीत, तेव्हा ब्राऊन ब्रेड आणला आणि त्या स्लाईस अमूल बटरवर भाजल्या, चटणी पेरली मग वडा त्यात घालून खाल्ला. कित्ती ते नखरे पण असाच खाऊ नसते शकले.
हो बोकलत ते एकदम मान्य पण ही
हो बोकलत ते एकदम मान्य पण ही जरा फारच ऍडव्हान्स स्टेज म्हणून पास दिला होता
@ देवकी हाटेलचे नाव सांगाल का विचारून? तुम्ही म्हणता ती कवी मिसळ.
बऱ्याच ठिकाणी कळकट मळकट चवीला
बऱ्याच ठिकाणी कळकट मळकट चवीला बळकट समीकरण असतं.
हो. मिसळ, समोसा आणि वडे आणि मुगभजींसाठी.
खरेतर तासनतास उकळत असलेल्या
खरेतर तासनतास उकळत असलेल्या तेलामुळे वड्याला जी चव येते ती घरी केलेल्या वड्याला कधीच येत नाही.
आता पळते मी इथून(धूम ठोकणारी बाहुली)
खरेतर तासनतास उकळत असलेल्या
खरेतर तासनतास उकळत असलेल्या तेलामुळे वड्याला जी चव येते ती घरी केलेल्या वड्याला कधीच येत नाही>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पहिला घाणा बोंबील तळून काढतात मग चवच चव! (हे शाकाहारी लोकांसाठी)
(No subject)
मिसळ मागितली असताना सोबत
मिसळ मागितली असताना सोबत दिलेला पाव मी नम्रपणे परत करायचो सुरवातीला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>
आणि मी मिसळ उरली तर एक्स्ट्रा पाव घेतो.
नुसती मिसळ जातच नाही.
पाव नस्स्ल तर मग त्यात भात कालवतो
माझी आवड, झणझणीत बटाटेवडे.
माझी आवड, झणझणीत बटाटेवडे.
आतले सारण सणसणीत आले मिरचीचे, पातळ कवच. असा वडा आता दुर्मिळ झाला आहे.
लॉकडाऊन पुर्वी मुरबाड गावात -मुरबाड एमआयडीसी रस्त्याच्या कॉर्नर ला खाल्ला आहे. त्याच्या सोबत भजी/ बटाटेवड्यांच्या पिल्लांची चटणी. ताजा ताजा भुगा तिखट मीठ खलबत्त्यात कुटून देतो. असे कॉम्बो वज्रेश्र्वरी मंदिराबाहेर ही मिळायचे.
@निरूदा, बघा जमले तर आरण्यक ला जाताना वाकडी वाट करून.
खरेतर तासनतास उकळत असलेल्या
खरेतर तासनतास उकळत असलेल्या तेलामुळे वड्याला जी चव येते ती घरी केलेल्या वड्याला कधीच येत नाही.
आणी तो बाजुला टांगलेला वडिलोपार्जित कळकट्ट फडक्याला अधुन मधुन हात पुसुन मग वडे तळणे, बराच वेळ हाताला चिकटलेले बेसन, भांड्याच्या काठाला हात खरवडुन काढणे त्याबरोबरच हाताचे "मॅनिक्युअर" होवुन ते बेसनात मिक्स झाल्याशिवाय चवच लागत नाय बघा. (इथे सोनालीतैच्या बाहुलीच्या दुप्पट/तिप्पट/ चौपट वेगाने पळुन जाणारी बाहुली क्ल्पावी)
कधी एखाद्या वेळी खात असू तर
कधी एखाद्या वेळी खात असू तर मनसोक्त खावे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या मागच्या सत्याचा विचार करू नये.
मला इडली ऑर्किड मधली गोष्ट आठवली.त्या परदेशी मदतनीस माणसाला गरम मोतीचुर लाडू वळायला सांगितले आणि त्याला जमेचना.मग कामत च्या युक्ती ने हाताला व्हिस्की चोळून सर्व लाडू त्याने वळले आणि ते ज्यांना पुरवले त्यांना प्रचंड आवडले
आवडलेल्या बाहेरच्या पदार्थांची बॅकग्राऊंड जाणायच्या भानगडीत पडू नये.त्यातल्या त्यात ओळखीच्या, चांगल्या रिव्ह्यू असलेल्या आणि शक्य तितक्या स्वच्छ दिसणाऱ्या ठिकाणचे खावे.
भाईदास मधला वडा पाव आवडला
भाईदास मधला वडा पाव आवडला होता. मिठीबाई मधली शेव पुरी फार आवडायची.
भाईदास समोर ची खाऊ गल्ली मध्ये सुध्दा मस्त वडा पाव मिळत होतं. दिनानाथ समोर ही मस्त वडा पाव मिळत होती.
एका दारु च्या गुत्त्यावर गरमा गरम वडा मिळायची, दाल वडा ही करायचा. कधी ही जा गरम वडे मिळायचे. ०.७५ पैसे ला एक वडा, त्या ही पुर्वी दुसर्या एक ठिकाणी ०.५० पैसे ला मिळत होते. काय दिवस होते ते.
लालबागात लाडूसम्राट कडे वडा
लालबागात लाडूसम्राट कडे वडा चांगला असतो (लाल चटणी अति जहाल वाटते), मला श्री कृष्ण छबिलदास नंतर यांचाच वडा आवडतो . मी ब. वडे खाते पण जास्त वडा शौकीन नाही. पाव खूप कमी वेळी खाल्ला असेन तरीही आसपास च्या ठिकाणी हेच आवडीचे. तसेच धुपकर नावाचे दुकान आहे परेल मध्ये महाराणी साडीच्या शेजारी काही दुकान सोडून, तिथला वडा बरा असतो, समोसा खूप छान, पण खूप वेळ लागतो कारण आयत्या वेळी तळतात.
पहिल्या काही प्रतिसादात अमांनी लिहिलेय ते परेल मध्ये VIP showroom जवळ एका टपरीवर एकदा खाल्ले होते. ब्रेड स्लाइस चे १/४तुकड्याला एका बाजूस ब. वड्याची भाजी फासून बेसनात घोळवून तळून देतात, त्यास पेटिस असे बोलत होते.
मालवण मध्ये एका ठिकाणी (दुकान
मालवण मध्ये एका ठिकाणी (दुकान चे नांव क्षुधाशांती टाईप आहे बहुतेक- पुन्हा जाईन तेव्हा नक्की करेन)सारणाच्या भाजी त हि.मि. ऐवजी लाल तिखट घातलेला वडा मिळतो , त्यात बाकि मालमसालाही जास्त नसतो. पण भूक लागल्यावर तोही आवडल्याचे स्मरणात आहे
मला आमच्या कुडाळ चा जंबो वडा
मला आमच्या कुडाळ चा जंबो वडा पाव खूप आवडायचा. पण त्या मेल्याने माझा विश्वासघात केला. मी त्याला एके दिवशी नाकात संशोधन करताना पाहिले. तेव्हापासून बाहेर वडापाव अजिबात खात नाही. घरात मातीचा ओवन मध्ये पाव बनवते आणि वडा पण घरीच ..
वरच्या काही प्रतिसादातील थोडे
वरच्या काही प्रतिसादातील थोडे थोडे "पीठ" घेऊन एक "वडा प्रतिसाद" बनवला आहे:
---
खरेतर तासनतास उकळत असलेल्या तेलामुळे वड्याला जी चव येते ती घरी केलेल्या वड्याला कधीच येत नाही.
Submitted by sonalisl on 10 October, 2020 - 21:23
पहिला घाणा बोंबील तळून काढतात मग चवच चव!
बराच वेळ हाताला चिकटलेले बेसन, भांड्याच्या काठाला हात खरवडुन काढणे
Submitted by जेम्स बॉन्ड on 11 October, 2020 - 10:06
आमच्या कुडाळ चा जंबो वडा पाव खूप आवडायचा. पण त्या मेल्याने माझा विश्वासघात केला. मी त्याला एके दिवशी नाकात संशोधन करताना पाहिले.
Submitted by डी मृणालिनी on 11 October, 2020 - 16:26
आवडलेल्या बाहेरच्या पदार्थांची बॅकग्राऊंड जाणायच्या भानगडीत पडू नये.
Submitted by mi_anu on 11 October, 2020 - 10:14
---
खरं आहे!
खरं आहे!
कुर्ला इस्टला जिन्याजवळ जम्बो
कुर्ला इस्टला जिन्याजवळ जम्बो वडा पाव मिळतो
14 रु
मस्त असतो
मी त्याला एके दिवशी नाकात
मी त्याला एके दिवशी नाकात संशोधन करताना पाहिले.>>> बाहेर या गोष्टी सर्रास घडतात. मी एका हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बिल द्यायला गेलो. बिल द्यायच्या जागेवरून किचनमधलं सगळं दिसत होतं. बाहेर एकाने अंडा थाळी मागवली होती. वाढणारा ती घेऊन किचनमधून निघाला आणि त्याला शिंक आली. त्याने ती प्लेट दूर करणं सोडा साधी मान वळवायचीही तसदी घेतली नाही. सगळा फवारा त्या ताटात. आणि तेच ताट बाहेर नेऊन दिलं. एव्हडी घाण वाटली होती त्यावेळी. नन्तर कधी त्या हॉटेलमध्ये गेलो नाही. पण दुसरीकडे जिथे खातोय तिथे हे होत नसेल कशावरून हा विचार मनात यायचा.कालांतराने हे विचार मनातून काढण्यात यशस्वी झालो.
मुकपाद खाना व जेवणघर भिन्न
मुकपाद खाना व जेवणघर भिन्न असावे असे पुलं नि कुठेतरी लिहून ठेवले आहे
म्हणजे आचाऱयांचे आचार आतच लपून रहातात
मुकपाद >>
मुकपाद >>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
काय म्हणतात त्याला ?
काय म्हणतात त्याला ?
असेच काहीतरी नाव आहे
मुदपाकखाना
मुदपाकखाना
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A...
अरबी शब्द आहे
मुदपाकखाना
मुदपाकखाना
चाललेल्या चर्चेच्या संदर्भात
चाललेल्या चर्चेच्या संदर्भात मुकपाद हा शब्द चपखल बसला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नाकात संशोधन करताना पाहिले.>>
नाकात संशोधन करताना पाहिले.>>> पाव तर पायांनी तिंबतात ना?
श्रमिकांच्या घामाची चव असते त्या अन्नाला (लिटरली). त्याला नावे ठेवू नये.
मी खाल्ला आहे कुर्ला ईस्ट चा
मी खाल्ला आहे कुर्ला ईस्ट चा जम्बो वडा पाव .. मस्त झणझणीत असतो.. पण खूपच मोठा असतो.. त्यान्चा पंजाबी सामोसा पण जम्बो. लालबाग लाडूसम्राट चा बटाटावडा झणझणीत नाही पण खमंग असतो..
मुंबई - तस कुठेही खा मस्तच
मुंबई - तस कुठेही खा मस्तच लागतो. बहुतेक पाण्याची चव असावी. पण त्यातल्या त्यात लाडू सम्राट. लहानपणी दर रविवारी वडिलांसोबत जाऊन गणेशगल्लीतला लाडू सम्राट चा वडा खायचो. एकदम कातिल. आत्ताच पाहिलं गूगलवर. अजूनही तसाच नुसता वडा आणि खोबऱ्याची चटणी . यम्म
पुणे -
वासू वडापाव - चाफेकर चौक. पण आताशा बंद झालाय वाटतं.
एस कुमार चा पण ठीक आहे.
गार्डन वडापाव ओव्हर रेटेड.
रांजणगावला एसटी स्टॅन्ड जवळ एक गाडी लागते. पिठल्यासारखी चटणी देतो. एकदम मस्त.
चाकणला शाळेजवळ एक गाडी लागते तो हि मस्तच
सातारा - राजवाड्यावर सुपनेकर वडा आणि चटणी. विसाव्या नाक्याजवळ मारुती मंदिराजवळ आहे तोही मस्तच. साईबाबा मंदिराजवळ दोन गाड्या आहेत एकदम स्वस्तात. सात सात वडापाव खाऊन घरी जायचो आणि वर जेवण. हम्म गेले ते दिवस. श्रीराम हाइप झालाय आधीसारखी चव नाही
मोठ्या नावापेक्षा छोट्या गाड्यावर बिनधास्त ट्राय करावा. आणि एक महत्वाचं वडापाव कधी नाराज करत नाही.
तो वामनराव पै की अनिरुद्ध
तो वामनराव पै की अनिरुद्ध बापूं चे सुविचार दुकानात सगळीकडे लावलेले असतात ती वडापाव सेंटर्सची चेन कुठली?
त्यांचा वडापाव(हडपसर साईडला मगरपट्टा फ्लायओव्हर जवळचा) , वडे शिळे वाटावेत इतके ड्राय की जे घशाखाली उतरत नाहीत असा अनुभव आहे.
तेच ते जोशी वडेवाले हाब.
तेच ते जोशी वडेवाले हाब.
हे वामनराव पैंचं मी विसरलेच होते.
Pages