लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.
सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते
असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.
*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका
जोशी वडेवाले ...सगळ्यांचं भल
जोशी वडेवाले ...सगळ्यांचं भल कर ..सगळ्यांचं रक्षण कर ..सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव .. वामनराव पैंच आहे माहिती नव्हत पण त्या दुकानात कायम ऐकलंय.
लहानशी टपरी असो कि थ्री स्टार
लहानशी टपरी असो कि थ्री स्टार रेस्टॉरंट, आचाऱ्यांच्या, वाढप्यांच्या, भांडी घासणाऱ्यांच्या, भाज्या, फळे पुरवणाऱ्यांच्या आचारावर विश्वास ठेवता येत नसतोच. दृष्टीआड सृष्टी असाच मामला. विश्वास ठेवता येत नसेल तर बाहेरचे खाणे सर्वथा टाळणे एवढाच एक उपाय करता येऊ शकतो. आपल्या देशात फूड सेक्टरमध्ये जो भयावह भ्रष्टाचार चालतो त्यावर सामान्य माणसाच्या हातातला एवढा एकच उपाय. एका स्वच्छतेचा टेंभा मिरवणाऱ्या मेसमधल्या काकूंचा स्वयंपाक करतानाचा अवतार बघितला आणि वाढतानाच्या स्वच्छतेवर अवलंबुन राहण्यातील वैय्यर्थ कळले.
मी बी , मी बी फॅन वडापावचा
मी बी , मी बी फॅन वडापावचा
मस्त चर्चा चालू आहे. वरच्या
मस्त चर्चा चालू आहे. वरच्या काही प्रतिसादांवरून कवी कुसुमाग्रज यांचा एक किस्सा आठवला. कवी मंगेश पाडगावकर यांनी तो सांगितलेला आहे. कुसुमाग्रज खाण्याचे खूप शौकीन होते. एकदा ते मंगेश पाडगावकर आणि त्यांच्या पत्नीसोबत नाशिकवरून मुंबईला येत होते. रस्त्यात कुठेकुठे कायकाय खायला चांगले मिळते, हे कुसुमाग्रजांना नेमके माहित होते. एका ठिकाणी गाडी थांबवून त्यांनी तेथल्या गाडावाल्याकडून भजी /वडापाव घेतले आणि ते चवीने खाऊ लागले. पाडगावकर आणि त्यांच्या पत्नीलाही खाण्याचा आग्रह करू लागले.
सौ. पाडगावकर म्हणाल्या, "अहो, तो बनवणारा पाहिलात का कसा आहे, किती घामेजलेला, किती कळकट त्याचे कपडे, सगळी भांडी पण तशीच आहेत. कसे काय खाऊ शकता तात्या (कुसुमाग्रजांना जवळचे सारे लोक तात्या म्हणत )तुम्ही हे एवढ्या चवीने? "
कुसुमाग्रज म्हणाले, "अहो वहिनी, महाभारतात नाही का, त्या सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाला पक्ष्याचा केवळ एक डोळा दिसत असतो, बाकी काही दिसत नाही ; तसे मलाही फक्त त्या चमचमीत पदार्थांची चव च दिसते, बाकी गोष्टींकडे लक्ष च जात नाही माझे. "
बाय द वे, आमच्याकडे साताऱ्यात पाटील वडापाव प्रसिद्ध आहे . MIDC मध्ये शंभू वडापाव मिळतो, तोही चविष्ट लागतो.
मला बालेवाडी फाटा वडापाव
मला बालेवाडी फाटा वडापाव आवडतो.
झुरळे आणि घुशी फिरत असतात पण वडापाव ची चव जगात भारी....
रस्त्यावरच्या गाड्या किंवा
रस्त्यावरच्या गाड्या किंवा ढाबाच काय अगदी महागड्या हॉटेल्सचे किचन बघीतले की जेवायची ईच्छा मरुन जाईल.
मी तर ऊपासाच्या दिवशी घरुन आणलेली सा खि किंवा चिप्स खाईल पण बाहेर फळे सोडुन दुसरे काही घेत नाही. काय माहित भज्या तळल्या अन त्यातच चिप्स , किंवा असेच वापरलेले तेल, भांडी वापरुन त्यात सा खि बनवली.
ह्याच लॉजिकने जेव्हा नॉनव्हेज खायचे नसते तेव्हा प्युअर वेज हॉटेलच शोधते, कारण ईथेही भरवसा नसतो की भांडी, तेल मिक्स होत नसतील कश्यावरुन.
एकदा मटामधे वाचले होते, प्युअर व्हेज हॉटेलमध्ये नान बनवायला अंडे घातले होते त्यात, लॉजिक काय तर आमच्यामते अंडे व्हेज. अरे पण खाणार्याचे काय? ते मानतात का अंडे व्हेज.
@atulpatil म्हणजे वर एका
@atulpatil म्हणजे वर एका प्रतिक्रियेत मी राजाराम कॉलेजच्या मागे लिहिले आहे तोच म्हणताय का तुम्ही पण?>> येस तोच तो राजाराम कॉलेज वाला कृषी विद्यापीठ समोर .. मला वाटतंय कोल्हापूर मध्ये एकच श्याम वडापाव साठी फेमस असावा ...
किती मेसेजेस आलेत इथे .. मस्त मज्जा येतेय वाचायला एकेक गोष्टी !! आत्ताच्या आत्ता वडापाव खावा असंच वाटतं दरवेळी
कोण कोण होते राजाराम कॉलेजला?
कोण कोण होते राजाराम कॉलेजला?
माझ्या मावशीचे मिस्टर होते राजारामला शिकवायला!
वडापाव घरी केला तर, भाजी अगदी
वडापाव घरी केला तर, भाजी अगदी छान होते पण वरचं बेसनचं आवरण मात्र पातळ आणि थोडं लालसर रंगाचं होतं. कितीही छान लागलं तरी घरच्यांना ते बाहेरच्यासारखं वाटंत नाही. ही वडापाव विकणारी मंडळी त्या बेसनमधे अजून कोणते पीठ मिक्स करतात कोणाला माहित आहे का?
अजून कोणते पीठ मिक्स करतात
अजून कोणते पीठ मिक्स करतात कोणाला माहित आहे का? >>> वाटण्याचं पीठ मिक्स करतात बहुतेक. म्हणून ते जास्त खमंग होत असावेत. ते डाळीच्या पिठापेक्षा स्वस्त पण पडतं . शिवाय वर उल्लेखलेले सगळे प्रकार रुचकर बनवत असावेत वड्याला.
वाटण्याचं पीठ तर असतेच पण लाल
वाटण्याचं पीठ तर असतेच पण लाल न व्हायला बेकिंग पावडर घालतात असे तुनळी वर बघितलेले आठवतेय
बिना अंड्याचा नान बनवता येतो?
बिना अंड्याचा नान बनवता येतो? हे खरेच मला नवीन आहे...
नान म्हणजे अंडे असतेच त्यामुळे आम्ही तंदुरी रोटी मागवायचो एके काळी जेंव्हा मी पुअर व्हेज होतो...
दही घालतात craps, पण ते
दही घालतात craps, पण ते वेळखाऊ आहे अन तितके भारी नाही होत, फरक पडतो चवीत
बेसनचं आवरण मात्र पातळ आणि
बेसनचं आवरण मात्र पातळ आणि थोडं लालसर रंगाचं होतं>> वरच्या आवरणात सोडा घातला असेल तर हळद अजिबात घालायची नाही
हळद आणि सोड्याची रासायनिक प्रक्रिया होऊन रंग लाल होतो ...
पिवळे धम्मक हवे असतील वडे तर अज्जीबात हळद घालायची नाही..
जाड आवरण हवे असेल तर पीठ थोडे दाट भिजवा .. २ -३ चमचे तांदूळ पीठ घालून बघा
>> येस तोच तो राजाराम कॉलेज
>> येस तोच तो राजाराम कॉलेज वाला कृषी विद्यापीठ समोर .. मला वाटतंय कोल्हापूर मध्ये एकच श्याम वडापाव साठी फेमस असावा ... Wink
>> Submitted by anjali_kool on 12 October, 2020 - 13:15
अरे वा! कारण, तसा तो फक्त राजाराम, पॉलीटेक्निक आणि कृषी ह्या महाविद्यालयांतच तो फेमस होता. शहरात वगैरे फेमस होता असे म्हणता येणार नाही. फारच niche customer base होता त्याचा. सो, तिथले कोणी इतक्या वर्षांनी भेटणे म्हणजे महादुर्मिळ योग आता अजून तो तिथे आहे का माहिती नाही. पण कैक वर्षापूर्वी गेलो होतो कोपू ला तेंव्हा आवर्जून तिकडून आलो होतो. तोच वडा तशीच चव
कोपू मध्ये सन्मान हॉटेल आहे ताराबाई रोडवर. बहुतेक कामतांचे असावे. आठवत नाही. तिथे सुद्धा अप्रतिम वडा मिळतो. म्हणजे वड्याच्या कोल्हापुरी व्याख्येनुसार. गोलगरगरीत खरपूस वडा, स्लाईस आणि चटणी. ओह्ह आठवणीनेच तोंपासू. (त्याच रोडवर पुढे "वडा आणि कोंबडा" नावाचे एक हॉटेल आहे. पण तिथे वडापाव वाला वडा नाही मिळत)
तसा तो फक्त राजाराम,
तसा तो फक्त राजाराम, पॉलीटेक्निक आणि कृषी ह्या महाविद्यालयांतच तो फेमस होता>> बरोबर .. आता अजून तो तिथे आहे का माहिती नाही.>> होय तर ! आहे म्हणजे? आहेच ! अर्थात आता करोना मुळे काय झालंय वगैरे मला माहित नाही ..
पण डिसेंबर ला भारतात गेलेलो तेव्हा होता.. (मी कोल्हापूर ची नाही .. सासर ओन्ली)
काही वर्षांपुर्वीची गोष्ट.
काही वर्षांपुर्वीची गोष्ट..एकदा पुण्याहुन नाशिकला जातांना बरोबरच्या नातलगांनी आम्हाला चवदार मिसळ खाऊ घालण्याचे आश्वासन दिले. पुणे सोडल्यावर त्यांचं मधुन मधुन मिसळची तारीफ करणे सुरुच होते त्यामुळे काहीतरी बढीया चीज खायला मिळेल अशी अपेक्षा होती.
नारायणगावच्या पुढे कुठेतरी 'कळकट मळकट छाप' हॉटेलसमोर गाडी थांबवली. बाहेरच त्यांनी हॉटेलच्या रुपावर जाऊ नका, मिसळची टेस्ट बघा असं ठणकाऊन सांगितलं. ऑर्डर केल्यानंतर हॉटेलीतल्या पोऱ्याने दोन्ही हातांचा पुरेपुर वापर करुन मिसळ सर्व्ह केली. खायला सुरुवात करणार तोच गल्ल्यावरच्या काकाने वाढणाऱ्याला "सकाळी का आला नव्हता" असा प्रश्न केला.
"पोट बिघडलं होतं. खुप त्रास झाला. चार पाच वेळा जाऊन आलो." पोऱ्याचं उत्तर.
"आता बराहेस का?" - काका.
"बरा आहे, पण कळ येते मधुन मधुन" - पोऱ्या.
त्यांचा हा सुखसंवाद ऐकुन मिसळशौकीन असुनही माझी त्याठिकाणी मिसळ खायची इच्छा झाली नाही.
वीरू
वीरू
वीरु
वीरु
अजून कोणते
पीठमिक्स करतात कोणाला माहित आहे का? >>>>> धुण्याचा सोडा! हाकानाकाश्रीराम वडे च्या बाहेर ते
श्रीराम वडे च्या बाहेर ते पार्किंग असिस्टन्स ला हात गेलेले काका आहेत ना?
त्यांना प्रोस्थेटिक लिंब द्यायला कोणी फंड काढत असेल तर मला सांगा.मीही हातभार लावेन.(हे सर्व स्वतः करण्या इतका वेळ,किंवा पूर्ण एकट्याने फंड करण्या इतका पैसा सध्या जवळ नाही.कोणी करत असेल तर बसल्या जागी काँट्रिब्युट करू शकेन) >>> +९९९९९ मी सुद्धा ..
आ हा हा काय एकापेक्षा एक
आ हा हा काय एकापेक्षा एक वर्णन आणि फोटो आहेत. वडापाव ऑल टाइम फेव्हरेट.
काल महालक्षमी /दादर ला कामासाठी गेलो होतो. इकडची चर्चा वाचुन वाट वाकडी करून कीर्ती कॉलेज बाहेरचा वडापाव खाल्लाच.
मार्च पासून बाहेरचे खाणे पूर्ण बंद केले होते. गुरुकृपा च्या बाहेर ची गर्दी बघून इच्छा असूनही समोसे खायचा धीर झाला नाही.
पण काल मात्र वडापाव खाल्लाच आणि तृप्त झालो
सुख म्हणजे नक्की काय असत ........
बोरिवली चा मंगेश चा वडापाव पण छान असतो. राजमहल रेस्टोरंट च्या बाहेर .
वाशी फ्लाय ओव्हर च्या थोडे अलीकडे cidco exhibition centre च्या बाहेर एक मावशी आणि त्यांचा मुलगा वडापाव विकतात. त्याची पण चव छान असते. संध्याकाळी ६ नंतर गाडी लावतात. स्विफ्ट मधून सगळे सामान घेऊन येतात.
मीही रविवारी एक वडापाव
मीही रविवारी एक वडापाव खाल्लाच.
मीही रविवारी एक वडापाव
मीही रविवारी एक वडापाव खाल्लाच.>>>> एकच खाल्ला ?
दापोलीचा खिडकीवडा कोणी खाल्लाय का? फेमस आहे म्हणे. आम्ही गेलतो दापोलीला पण लक्षातच नाही राहिले शोध घ्यायचे.
मला कामतांचा वडा आवडतो. बाकी प्रतीसाद पण भारी .
डोंबिवली पूर्व ला स्टेशनजवळ
डोंबिवली पूर्व ला स्टेशनजवळ कृष्णकुंजचा वडापाव खल्लाय का कोणी?
एकच खाल्ला ? >>> हो बाहेर
एकच खाल्ला ? >>> हो बाहेर गाडीवर फेब्रुवारीनंतर पहील्यांदाच खाल्ला.
डोंबिवली पूर्व ला स्टेशनजवळ कृष्णकुंजचा वडापाव खल्लाय का कोणी? >>> कुठे आहे नक्की हे.
इथले वाचून फार इच्छा होत होती
इथले वाचून फार इच्छा होत होती पन घरी बेसन सापडले नाही. मग उकडलेल्या बटाट्यात वाटण घातले. दोन पावाचे सिलेस होते त्यात घालून सेंडविच बनवून खाल्ले. सीनीअर वडा पाव. फ्राइड खायची हिम्मत नाही.
@अन्जू, स्टेशनला उतरल्यावर
@अन्जू, स्टेशनला उतरल्यावर नेहरू रोडने ठाकुर्ली साईडला चालत गेल्यावर उजव्या बाजूला लगेच लागतं.
अच्छा, बघेन कधी तिकडे गेले तर
अच्छा, बघेन कधी तिकडे गेले तर. धन्यवाद.
कुंजविहारी डोंबिवली स्टेशनवरून ठाकुर्ली बाजूने उतरल्यावर थोडं पुढे तसं समोरंच उजव्या बाजुला आहे. डाव्या बाजुला कैलाश लस्सी वगैरे आहे. कुंजविहारी खाते मी कधी तिकडे गेले की. कृष्णकुंज आठवत नाहीये.
कुंजविहारी ठाकुर्ली बाजूने
कुंजविहारी ठाकुर्ली बाजूने उतरल्यावर थोडं पुढे तसं समोरंच उजव्या बाजुला आहे.>>> हो मी त्यबद्दलच बोलतोय. कृष्णकुंज नसेल, कुंजविहारीच आहे बहुतेक.
ओके ओके. त्याबद्दल मी लिहिलं
ओके ओके. त्याबद्दल मी लिहिलं होतं आधी. छान असतो, jumbo आणि नॉर्मल दोन्ही प्रकार मिळतात. पण मागे lockdown च्या महीनाभर आधी खाल्ला तेव्हा एवढा testy नव्हता. असं पहिल्यांदाच झालं मात्र.
Pages