![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2020/10/10/IMG_20201010_094416.jpg)
लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.
सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते
असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.
*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका
मस्तच धागा. सोलापूर रोडवर
मस्तच धागा. सोलापूर रोडवर यवतला जय मल्हार गाडीवरचा वडा पाव. खूप भूक लागली होती, म्हणून खाल्ला, अप्रतिम चव. आता जेव्हा जेव्हा त्या बाजूला जातो, तो वडापाव नक्की असतो. तिथे भुलेश्वर आमचं आवडतं ठिकाण आहे, आणि हा वडापाव.
हो मी त्यबद्दलच बोलतोय.
हो मी त्यबद्दलच बोलतोय. कृष्णकुंज नसेल, कुंजविहारीच आहे बहुतेक.
बोकलत...
राज ठाक्रेंच्या घरावर कब्जा करायला हडळ बिडळ नाही ना पाठवलीनीत. तिला समजवताना कृष्णकुंज राहिले असावे लक्षात.
कल्याणचा सुप्रसिद्ध खिडकी वडा
कल्याणचा सुप्रसिद्ध खिडकी वडा. कल्याणच्या लोकांचा अत्यंत आवडता..
आता पुण्यातही मिळतो. त्यामुळे कल्याणहून पुण्यात आलेल्या माझ्यासारख्या लोकांची सोय झाली.
भाऊ आणायचा खिडकी वडा, तो
भाऊ आणायचा खिडकी वडा, तो बिर्ला कॉलेजला जायचा. मागे डोंबिवलीत स्टेशनजवळ आउटलेट उघडले होतं, तेव्हा नवरा आणायचा येताना, आता ते शिफ्ट झालं.
भाऊ आणायचा तेव्हा आम्ही आयरे रोड एरियात राहायचो, त्यामुळे त्यापेक्षा जो मी उल्लेख केला तो बाईचा वडाच भारी वाटायचा मला. अजुनही इतक्या वड्यात त्या वड्याची चव नंबर वन. खिडकी वडा छान पण बाईचा वडा उत्तम असं वाटायचं.
साधारणपणे लहानपणी खाल्लं असेल
साधारणपणे लहानपणी खाल्लं असेल, ती चव डोक्यात पक्की असते. तीच आवडते.
ह्म्म्म. लहानपणापासून लग्न
ह्म्म्म. लहानपणापासून लग्न होईपर्यंत आणि नंतर माहेर आयरे रोडवर होत तिथपर्यंत नशिबात होते ते वडे. नंतर, कधी माहेरी आल्यावर त्या भागात गेलो तर आणायचो.
Pages