![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2020/10/10/IMG_20201010_094416.jpg)
लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.
सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते
असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.
*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका
गणित विषय माझ्या नावडीचा
गणित विषय माझ्या नावडीचा
वडापाव माझ्या आवडीचा
कधीही कुठेही कसाही खाऊ शकतो
पण पुण्यातल्या गार्डन वडापावचा खास चाहता.
साहिल वडापाव: आबाचा ढाबा
साहिल वडापाव: आबाचा ढाबा हॉटेल बाहेर, पिंपळे सौदागर
श्रीकृष्ण वडापाव: सारंग सोसायटी सहकारनगर पुणे
श्रीकृष्ण वडापाव: कोंढवा रोड पुणे
रोहित वडेवाले: मनपा बस स्टॉप ला जाणारा रस्ता
श्रीराम वडा: पुणे सातारा रोडवर महाबळेश्वर फाटा आधी.
साहिल चा खायला पाहिजे एकदा ,
साहिल चा खायला पाहिजे एकदा , बाकी वर लिहिलेले सगळे आवडीचे
वसंत टॉकीज समोर, तपकीर गल्ली चा गाडगीळांच्या वडापाव , दुकानाचं नाव अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर , आता शनिवार पेठेत पण सुरु झालाय - उच्च वडापाव आणि महा कुचके मालक , श्रीकृष्ण वाल्याना टफ कॉम्पेटिशन
प्रभा विश्रांती चा वडा, केळकर रोड - कायम संपलेला , रविवारी बंद , संध्याकाळी बंद , गणपतीचे १० दिवस बंद
बालगंधर्व समोरच जोशी वडेवाले
गार्डन वडापाव J M रोड ला पण चालू झालाय
वडापाव खास आवडता असा नाही, पण
वडापाव खास आवडता असा नाही, पण चांगला लागतो.
बरेचदा दुसरा चांगला पर्याय नसतो म्हणुन खाल्ल्या जायचा.
हैद्राबादला मिळतो आता पण खाववत नाही, काहीतरीच मिळतो.
मला आता पुण्यातला कुठलाही
मला आता पुण्यातला कुठलाही वडापाव आवडतो
पण एकदा इथून कारने पुण्याला जाताना हायवेवरच्या कुठल्यातरी बारीकशा टपरीवर खाल्लेला वडापाव अप्रतिम होता.
तिथेच बाहेर एक चहा करणारा माणूस असायचा, त्याचा चहा मात्र मस्त असायचा!! पुढे मग शेजारीच हिंदुस्थान बेकरी सुरू झाली आणि आमची मोठीच सोय झाली
तिथले पॅटीस आणि वर शेजारचा चहा.
पुण्याला रहात असताना खास असा कुठला आवडता वडापाव असल्याचं आठवत नाही.
जोशी वडेवाले जे नव्या पेठेत होते/ आहेत, त्यांच्याकडे काहीच चांगलं मिळायचं नाही. वडे खास नसायचे, एकदा इडली घेतली ती इतकी कडक, की चमच्याने तुटेना.
नक्की अप्रतिम म्हणजे कसा?
नक्की अप्रतिम वडा म्हणजे कसा?
कारण, मराठी पद्धतीने केलेला वडापाव( चटणी शिवाय) कितपत वेगळा असू शकतो, ते सुद्धा लिहा ना..
मला, मराठी पद्धतीने केलेला, हिरव्या मिरचीचा ठेचा,आलं आणि लसूण ठेचून केलेला ,मीठ, किंचित जीरंपूड-धणापूड व वरून हिंगाची फोडणीच्या भाजीचा जरासाच आकाराने चपटा आणि भाजीतला बटाटा किंचितसाच कुस्करलेलाच वडा आवडतो, जो नुसता खावून सुद्धा जीभ भाजली पाहिजे जरातरी आतील भाजीतलं हिरवी मि- ल - आलं खावून. पारी हलकी जाळीदार, किंचीत जाड हवी. हाच खरा वडा.
काही मराठी बडापाववाले, गिचगोळा झालेली भाजी, व अति पातळ चपटा वडा बनवतात, खास वाटत नाही...
चटणी व पाव कसा हवा ह्यावर नंतर..
पण,सौदिंडियन , गुजराती आणि पंजाबी पद्धतीने केलेल्या भाजीचा वडा असु शकत नाही असे मत आहे माझे. त्यांनी करूच नये. असल्या हाटलात खालेल्ला वडा मूड खराब करतो.
डोंबिवली पूर्व ला कस्तुरी
डोंबिवली पूर्व ला कस्तुरी प्लाझा समोर गोरे वडापाव मिळतो. छोटासाच गाळा आहे. आतापर्यंत डोंबिवलीत खाल्लेला सगळ्यात चांगला वडापाव आहे तो.
श्रीकृष्ण वडापाव: सारंग
श्रीकृष्ण वडापाव: सारंग सोसायटी सहकारनगर पुणे
आणि
फडके हॉल , खजिना विहीर,सदाशिव पेठ, पुणे
दोनही ठिकाणी अस्सा झणझणीत असतो,
ना चटणी,ना मिरची ची गरज
पण,सौदिंडियन , गुजराती आणि
पण,सौदिंडियन , गुजराती आणि पंजाबी पद्धतीने केलेल्या भाजीचा वडा असु शकत नाही असे मत आहे माझे. त्यांनी करूच नये. असल्या हाटलात खालेल्ला वडा मूड खराब करतो.
नवीन Submitted by झंपी on 9 October, 2020 - 11:56
>>
+१११११११११११
मला कुठलाही वडापाव आवडतो.
मला कुठलाही वडापाव आवडतो. वडापाव आहे ना मग झालं तर
. त्यातल्या त्यात जास्त आवडलेला म्हणजे एक सिंहगड रोड चा अन्नपूर्णा आणि कोथरूडला वनाझ जवळ एक टपरी वरचा. गरम गरम आणि वरचं आवरण जरा बारीक. वड्याची अप्रतिम चव.
जम्बो वडापाव नामक एक महाभयानक
जम्बो वडापाव नामक एक महाभयानक प्रकार खाल्ला होता. वडापावाच्या नावावर सगळं चीज बर्गर पोटात गेलं असा फिल आला.
कीर्ती कॉलेजच्या इथे असलेला अशोक वडापाववाला फेमस आहे. त्याचा तो वडापावचा चुरा खायला गर्दी असते.
झंपी, वड्याच्या चवीचं
झंपी, वड्याच्या चवीचं रिव्हर्स इंजिनिअरिंग नाही केलं
मी एरवी करत नाही असं नाही, तेव्हा नाही केलं हे खरं. चटकदार होता, चविष्ट होता.
वडापाव खास आवडता असा नाही, पण
वडापाव खास आवडता असा नाही, पण चांगला लागतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरेचदा दुसरा चांगला पर्याय नसतो म्हणुन खाल्ल्या जायचा.
+11111
मनपा जवळ जोशी वडे वाले आहेत त्यांचा आवडायचा पूर्वी.. नंतर तोही साधारण वाटू लागला..
गार्डन चा भारिये
आता घरी लहर अली की नुसते बटाटेवडे आणि चिंचेची चटणी असं खातो , हे आवडते
घोटवडे फाट्यावर कॉर्नर वरचा
घोटवडे फाट्यावर कॉर्नर वरचा (पिरंगुट पुणे)"दिलखुष वडा -.पाव " आणि तळलेली मिरची ! आणि आजुबाजुला हिरवा निसर्ग... खतरनाक युती आहे ही.
ऑफिस मधल्या कुणामुळे बस थांबवावी लागली की या वड्याची पेनल्टी ठरलेली असते..
मला वडापाव पेक्षा झंपींनी
मला वडापाव पेक्षा झंपींनी वर्णन केलेला नुसता वडा चटणी सोबत खायला जास्त आवडतो.
डोंबिवली पूर्व ला कस्तुरी
डोंबिवली पूर्व ला कस्तुरी प्लाझा समोर गोरे वडापाव मिळतो. छोटासाच गाळा आहे. आतापर्यंत डोंबिवलीत खाल्लेला सगळ्यात चांगला वडापाव आहे तो.
Submitted by बोकलत on 9 October, 2020 - 02:25
धन्यवाद.. आज डोंबिवलीतच आहे.. ठाण्याला जाता जाता इथून वडापाव उचलायचा विचार आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला मिठाई वाल्यांच्या दुकानात
मला मिठाई वाल्यांच्या दुकानात मिळणारे वडापाव अजिबात आवडत नाहीत.फार फिके असतात.
बोकलत त्या गोरे वडापावला माझे
बोकलत त्या गोरे वडापावला माझे सासरे रताळी वडा म्हणायचे
छान असतो तो वडा
पाटकर शाळेजवळचा वडाही छान असतो एकदम टेस्टी (आता त्या वडेवाल्या मावशी स्वर्गात देवांना वडे तळून तृप्त करत असतील) आता कोण चालवतं माहिती नाही.
वेस्टला राणाप्रताप शाळे जवळ समोरच्या फुटपाथला एक वड्याचा गाळा आहे. तिथले वडेही मस्त असतात. त्याच्या बाजूची पाणीपुरीही बेस्ट
ठाण्याला जाता जाता इथून
ठाण्याला जाता जाता इथून वडापाव उचलायचा विचार आहे>>>नक्की ट्राय करा. आणि टेस्ट कशी आहे ते कळवा. कस्तुरी प्लाझाच्या अपोझिटला, रस्त्याच्या त्या साईडला आहे हा गाळा.लिहिलंय तिथे गोरे वडा. कस्तुरी प्लाझाच्या समोरच एक हातगाडी लागते तिथला नका घेऊ.
त्या गोरे वडापावला माझे सासरे रताळी वडा म्हणायचे Lol>>>
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>ठाण्याला जाता जाता इथून
>>ठाण्याला जाता जाता इथून वडापाव उचलायचा विचार आहे Happy<<
आम्हाला पार्सल आणा..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मिरजेत चौगुले हॉस्पिटलसमोर
मिरजेत चौगुले हॉस्पिटलसमोर पद्मश्री गाडी लागते. सगळे डॉक्टर नर्स तिथे गर्दी करतात सकाळच्या वेळी. तिथला वडापाव चांगला वाटला. पण मिरजेत मुंबईत मिळतात त्या चवीचे पाव सहजा सहजी मिळत नाहीत. त्यामुळे नुसता वडा खाल्ला होता.
भायखळा इस्टला स्टेशन समोर
भायखळा इस्टला स्टेशन समोर ग्रॅज्युएट वडापाव नावाचा स्टॉल आहे. वडा काही फार ग्रेट नाही वाटला जितकं कौतुक ऐकलं होतं त्यामानाने (कदाचित अपेक्षा जास्त ठेवल्या असतील मी किंवा शेवटचा लॉट आला असेल वाटेला :-D) पण त्याच नाव ग्रॅज्युएट वडापाव का हे जाणून घेण्यात जास्त रस आहे मला. विचारेन कधीतरी त्यांनाच
सिएसटीला बोराबझार गल्लीत सिएसटीजवळच्या एंडला एक इडली डोसा वडापावचा रस्त्यावर स्टॉल आहे. त्याच्याकडचा बटर वडापाव अफलातून असतो. सिएसटीला धावती गाडी पकडून सीट पकडणाऱ्या लोकांच्या पोटाचा घेर वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्या कर्जत च्या फेमस वडापाव च
त्या कर्जत च्या फेमस वडापाव च नाव आठवत नाहीये. मुंबई पुणे ट्रेन प्रवासात खाल्लाय .
कर्जत च्या फेमस वडापाव च नाव
कर्जत च्या फेमस वडापाव च नाव आठवत नाहीये. मुंबई पुणे ट्रेन प्रवासात खाल्लाय .>> दिवाकर वडा
यो .. करेक्ट थँक्स कविन
यो .. करेक्ट
थँक्स कविन
लोणावळ्याच्या एसटी स्टँडमधला
लोणावळ्याच्या एसटी स्टँडमधला वडापाववाला एक फेमस आहे बोलतात. मला एसटीत त्रास होतो त्यामुळे कधी खाणं झालं नाही.
>>दिवाकर वडा<<
>>दिवाकर वडा<<
अ हं. दिवाडकर..
घोटवडे फाट्यावर कॉर्नर वरचा
घोटवडे फाट्यावर कॉर्नर वरचा (पिरंगुट पुणे)"दिलखुष वडा -.पाव " आणि तळलेली मिरची ! आणि आजुबाजुला हिरवा निसर्ग... खतरनाक युती आहे ही. >>> +१
कर्जत च्या फेमस वडापाव च नाव आठवत नाहीये. मुंबई पुणे ट्रेन प्रवासात खाल्लाय .>> दिवाकर वडा >>>
दिवाकर का दिवाडकर
दिवाडकर एक दोन वेळा शिळा
दिवाडकर एक दोन वेळा शिळा वाटला
नंतर ऐकलं की मगनलाल सारखे दिवाडकर चे भरपूर क्लोन आहेत.
एकदा नीट खरा वाला दिवाडकर शोधून खायला हवा(माणूस नाही, वडा)
वडापाव म्हटले की फक्त नी फक्त
वडापाव म्हटले की फक्त नी फक्त कोल्हापूरचा. दुसरे पर्याय मनात येत नाहीत.
![CeaGiCBUAAAejf9.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u656/CeaGiCBUAAAejf9.jpg)
Pages