रोस्टेड चिकन अँड बिअर

Submitted by jui.k on 5 October, 2020 - 10:36

मी बनवलेल्या मिनिएचर्स मधले हे सर्वात खरे खुरे वाटणारे मिनिएचर.. हे बनवताना वाटले नव्हते इतके सुंदर होईल असे.. मुळात मी शुद्ध शाकाहारी आहे त्यामुळे हे बघून तोंडाला पाणी सुटण्याएव्हढे खरे खुरे झाले आहे की नाही माहिती नाही.. Proud
रोस्टेड चिकन विथ बीअर
PicsArt_10-03-10.02.38.jpgPicsArt_10-05-07.53.37.jpg

ही बिअर आणि व्हिस्की..
व्हिस्की चा रंग थोडा डार्क हवा होता असं नंतर वाटलं Happy
बिअर चे बबल्स आणि रंग परफेक्ट जमल्यावर आनंदाने नाचणेच बाकी होते Proud कारण या आधी एकदा बिअर बनवण्याचा प्रयत्न फसलेला..
PicsArt_10-05-07.33.33.jpg
.
हे माझे इंस्टा क्राफ्ट अकाऊंट. माझे आर्टवर्क आवडले तर फॉलो करा नक्की. Happy
https://www.instagram.com/crafting_around28/
(परवानगी शिवाय फोटो इतरत्र कुठेही कॉपी/फॉरवर्ड करू नयेत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.
माझा तर पोपटच झाला. शीर्षक वाचून वाटलेले, पाककृती च आहे आणि आम्ही तर शाकाहारी, म्हणून ओलांडून पुढे गेले होते काल. आज शीर्षकाखाली "इतर कला "पाहिले, म्हणून उघडून पाहिले. मग खूप हसले स्वतः च्या फजितीवर.

कसलं सुंदर.
बीअर अशी बनवली?
फेस राहतो की जातो थोड्या वेळाने?

व्वाह ! सो परफेक्ट.... खाली वाचले नाही तोवर हे खरे आहे असेच वाटले होते. "कांदा इतका शिळा का" असे वाटत असताना खालचे "मिनिएचर" शब्द वाचले. केवळ नी केवळ लाजवाब.