आमच्या टेरेस गार्डन मध्यल्या जास्वंदी

Submitted by नादिशा on 3 October, 2020 - 12:22
जास्वंदी च्या फुलांची विविधता

गणपतीबाप्पाचे आवडते फूल म्हटले, की नजरेसमोर येते जास्वदीं. आमच्या टेरेस गार्डन मध्ये आम्ही हौसेने वेगवेगळ्या रंगाच्या जास्वंदी लावलेल्या आहेत. छान फुले येतात त्यांना . सकाळी सकाळी अशी फुललेली झाडे पहिली , की मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
पण या झाडाला कीड खुप लवकर लावते. पांढऱ्या रंगाचा मावा पडला, की पाहतापाहता चांगले फुललेले झाड डोळ्यांदेखत मरून जाते. हा मावा एकदम चिकट आणि चिवट असल्याचा आमचा अनुभव आहे. खूप प्रयत्न केले, तरी मावा पूर्णपणे घालवू न शकल्याने खूपदा आमची चांगली झाडे गेली. तरीही मोह आवरत नाही. पुन्हा आम्ही वेगळ्या रंगाची जास्वदीं दिसली, की जाणतोच.
पण यावर्षी मात्र आमचा गेल्या 8 वर्षांचा अनुभव वरचढ ठरला आहे त्या माव्याला. झाडें पण Healthy राहिलीत आणि फुलेही सुंदर आलीत.

१) IMG_20170711_133419.jpg

२) IMG_20170712_114717.jpg

३) IMG_20170711_133410.jpg

४) IMG_20170723_185642.jpg

५) 45ae06b8-12d8-47e2-9136-068f40c1d449.jpg

६) IMG_20170723_185619.jpg

७) IMG_20161021_104532.jpg

८) IMG_20170723_181619.jpg

९) IMG_20191003_113606.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकसे एक सुंदर रंग आहेत. खूपच सुंदर बाग आहे.

यावर्षी मात्र आमचा गेल्या 8 वर्षांचा अनुभव वरचढ ठरला आहे त्या माव्याला. >>> म्हणजे नक्की काय केलं, ते प्लिज सांगा ना. मी त्या पांढऱ्या चिकट किडीला कंटाळले आहे. सुरुवात जास्वंद करते आणि मग बाकी रोपांवर पसरते. मी कित्येकदा पूर्ण बाग उपटून नवीन रोपं लावली, पण परत तीच कथा.

खुप सुंदर.. माझ्याकडे पण जास्वंद चांगली वाढली पण पांढरा चिकट मावा.. अगदी दमवून सोडले. डेटॉल चा फवारा, पाण्याचा फवारा, surfexcel फवारा. मग एकदा जास्त झालेले पाने काढून टाकली. काही दिवसांनी सगळी पाने काढली. फक्त जाड मेन फांदी ठेवली. ती फुटली. पण थोडी वाढल्यावर पुन्हा तेच. मग काढूनच टाकली. आता त्या कुंडीत दुसरं रोप लावावा काय? कारण मातीत ही मावा पडला होता. साध्या माती खालीवर करून उन्हात वाळवून घेत आहे. तुळस लावेल शक्यतो.

तुम्ही काय उपाय केला सांगा.

खूपच छान...
वेगवेगळ्या रंगांची जास्वंदीची फुले खूप सुंदर दिसतायेत.

घरात जवळ किटकनाशक च दुकान आहे का बघा. त्यांना सांगितला प्रोब्लेम कि ते योग्य औषध देतात. घरगुती उपाय फारसे लागू पडत नाहीत

माझी जास्वंदने,कधीच त्रास दिला नाही.
कॉफी घाला मातीत दालचिनी मिक्स करून. कॉफीच्या वासाने , आणि दालचिनी ही किडानाशक व मूळाला पोषक असल्याने फायदा होतो
आणि पानांवर सुर्योदयाच्या वेळीच का? तर, नींब तेल, दालचिनी भुकटी, कापूराचे पाणी मिक्स करून मारा.
आता, सुर्योदयाच्या वेळी, अळ्या प्रसव पावतात पण त्याच वेळी पाणी मारले तर, जवळपास सर्वच पिलावळ मरते. नुकतीच घातलेली अंडी कमजोर होतात. आठ्व्वड्यातून दोनदा असे करा फक्त फवारणी. आणि पुढचे तीन आठवडे. हमखास उपाय जो माझे आजोबा करत गावी.
त्यांच्याकडे सर्व रंगाच्या जास्वंदी, कुठुन कुठुन आणलेल्या होत्या.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
Shitalkrishna आणि मीरा, खरेच खूप त्रासदायक असतो हा मावा. आणि तुमचे निरीक्षण बरोबर आहे, सुरुवात जास्वंदीपासून होते आणि हळूहळू सर्व झाडांवर त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे जास्वंदीची झाडें आपल्या इतर झाडांपासून थोडी लांब च ठेवायची.
आम्ही आजवर केलेले उपाय -
1) राख झाडाच्या मुळांशी आणि पानांवर टाकली.
2) पाण्याने एकन एक फांदी, पाने चोळून मावा धुवून टाकला.
3) 1 लिटर पाणी +20 मिली व्हिनेगर mix करून spray करणे.
4)तंबाखूचे पाणी spray केले.
5) निमतेल फवारले.
6) 50 मिली गोमूत्र +1.5 लिटर पाणी - spray ने फवारले.
7) शाम्पू पाउच पाण्यात mix करून फवारणी केली.
8) ketoconazole soap 1 शेंगदाण्याएवढा तुकडा + चिमूटभर तुरटी + 1 लिटर पाणी - फवारणी केली.
9) कीटकनाशकाच्या दुकानदाराला विचारून त्याने सांगितलेली औषधे वापरून पहिली.

कुणी काहीही उपाय सांगितले, ते वरीलप्रमाणे केले पण हे वरील सर्व उपाय फारसे फायदेशीर ठरले नाहीत. परतपरत मावा पडतच राहिला आणि सर्व झाडें मरुन गेली.
यावर्षी मात्र एक रामबाण उपाय मिळाला आहे. एका ओळखीच्या कृषी अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी केल्या -
1) दर 15 दिवसांनी जीवामृत पाण्यात mix करून झाडांना घालणे. थोडे झाडावर छान फवारायचे . यामुळे झाडें healthy झाली. त्यांचे म्हणणे असे होते, की झाडें मुळात एवढी strong हवीत, की कोणत्याही किडीशी fighting करू शकतील. त्यांच्याकडे स्वतः कडेच तेवढी ताकद हवी. मग किडी जास्त त्रास देऊ शकत नाहीत.
जीवामृतामुळे खरेच तसे झाले. झाडाची पाने इतकी टवटवीत आणि मोठी झाली, की अगदी नजर लागावी. जे फूल पहिल्यांदा वाटीएवढ्या आकाराचे येत होते, ते चक्क डिश एवढया आकाराचे, एवढे मोठे आणि टपोरे आले.
Dhanuka कंपनी चे Arewa हे औषध आणले. (Thiamethoxam 25% w/o) ते 2 मिली औषध + 500मिली पाणी असे mix करून त्याची संध्याकाळी फवारणी केली. आम्ही फारसे पॉझिटीव्ह नव्हतो. कारण यापूर्वी खूप औषधे वापरून झाली होती. पण आम्हाला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सगळा मावा गेलेला होता. तेव्हापासून दर 15 दिवसांना फवारतो. आणि फक्त जास्वंदीचाच नव्हे, तर वेलवर्गीय भाज्यांचा, फळझाडांची सुद्धा मावा गेलेला आहे. त्यामुळे मावा पडल्याने यंदा आमचे एकही झाड गेलेले नाही.
(आम्ही खत असो किंवा औषधं फवारणी, संध्याकाळी च करतो. कारण आजवर आम्हाला सर्व जाणकारांनी असेच सांगितले, की पहाटे किंवा सूर्यास्तानंतर च या गोष्टी करायच्या, तेही अगोदर झाडांना भरपूर पाणी दिल्यानंतर. कारण सूर्याच्या उष्णतेने आणि औषधं /खते गरम असल्याने एरवीच्या वेळी झाडें मरू शकतात. झाडांना पाणी सुद्धा याच वेळांमध्ये घालावे, असे आम्हाला सांगण्यात आलेले आहे.
सकाळीसकाळी इतर कामांसाठी घड्याळाशी झटापट चालू असते. त्यामुळे आम्ही संध्याकाळचा वेळ यासाठी fix केलेला आहे. )

किशोर मुंढे +१
चांगली माहिती दिलीत माव्यावरच्या उपायांची. धन्यवाद! जास्वंदी सुंदरच.

मीरा ,माझा नवरा आधुनिक पण सेंद्रिय पध्दतीने शेती करतो,
त्यामुळे जीवामृत मोठी टाकी भरुन बनवले जाते ,पण त्यासाठी गायीचे शेण ,मुत्र , पेंड ,गुळ हे सगळं प्रमाणात घेऊन उष्ण ठिकाणी बनवले जाते.त्याचा वास फारच उग्र येतो, पण परिणाम चांगला होतो. आमची सगळी पिके आणि बागेतील झाडे यांना नेहमी फळं, फुलं उत्तम दर्जाची असतात. कोणत्याही प्रकारची किड असली तरीही झाडावर परिणाम होत नाही .....
अमेझॉनवर तयार जीवामृत ची छोटी डबी मिळते, पाण्यात टाकून बनवता येते ,..... बनवलेले जीवामृत विरजणाप्रमाणे पुन्हा तयार करण्यासाठी वापरता येते त्यामुळे वरचे साहित्य एकदा वापरून तयार केले तर कायमचे होते..

धन्यवाद किशोर, वावे. अहो, आम्ही ठेचा खाऊन जे शहाणपण मिळवलंय, त्याचा इतरांना फायदा व्हावा, त्यांचा ट्रायल अँड एरर मध्ये वेळ जाऊ नये, असे मनापासून वाटते आम्हाला. त्यामुळे आमच्या इथेही कुणीही सल्ला विचारला, तर आम्ही आनंदाने आम्हाला असलेली सर्व माहिती देतो त्यांना, संपूर्ण मार्गदर्शन करतो बगिचाबद्दल.

मीरा, जीवामृत घरीही बनवता येते. यू ट्यूब वर बरेच व्हिडीओ आहेत. पण आम्हाला तेवढा वेळ नाही उपलब्ध, त्यामुळे आम्ही विकतच आणतो. सुरुवातीला कृषी प्रदर्शनामधून घेतले होते. पण नंतर एका नर्सरी ची माहिती मिळाली, त्यांच्याकडे फळझाडांसहित सर्व झाडें असल्याने मोठे मोठे बॅरल त्यांनी स्वतः बनवलेले असतात जीवामृत चे. 20/- प्रति लिटर विकतात ते. ते 1 लिटर जीवामृत 20लिटर पाण्यात mix करून मग वापरायला सांगितले होते आम्हाला. (पण dilution चे प्रमाण प्रत्येकाचे वेगवेगळे असते. आपण जिथून घेतो, त्यांना विचारून तसेच वापरावे. )तेव्हापासून तिथूनच आणतो आम्ही संपले की.

बरोबर आहे लावण्या. जीवामृत मोठ्या प्रमाणातच बनवले जाते आणि खूप फायदेशीर ठरते.
अमेझॉन वर मिळते, हे नव्हते माहिती. तुम्ही म्हणताय तशी छोटी डबी आम्ही bio decomposer ची घेतली आहे. ती पाण्यात टाकून बनवायची, ते बनवलेले पुन्हा dilute करून वापरायचे आहे. पण अजून आम्ही वापरलेले नाही. त्यामुळे त्याविषयी जास्त सांगू नाही शकणार.

"अगं, आम्ही राहिलो, आम्ही राहिलो ", असे म्हणत असल्यासारखी आज 2 जास्वंदीच्या झाडांना फुले आलीत. दोन्ही पांढरीच, पण एक गावठी (स्थानिक प्रकार ), एक कलमी.

IMG-20201005-WA0022.jpg

हे देशी. एकदा झाड बहरात आले, की रोज 5-6 फुले नक्की देणार !

IMG-20201005-WA0023.jpg

थँक्स तेजो. Shubhdap, अहो, एखादी फांदी आणून लावली ना कुठूनही तुम्ही या जास्वंदीची, तरी 15 दिवसांत फुटते. ही पांढरी, गणपतीला आवडणारी लाल आणि एक गुलाबी, अशा या 3 देशी जास्वंदी आहेत माझ्या माहितीनुसार. तिन्हींनाही भरपूर फुले येतात.

माव्यासाठी गवर्‍यांची राख चांगला उपाय आहे. पण आठवडाभर तरी रोज पसरावी लागते. मावा समूळ नष्ट होतो.

फुले खूप छान्,,,तो ६ नंबरचा माझा आवडता रंग!