Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋन्मेऽऽष,,,,मटण आणि घावणे
ऋन्मेऽऽष,,,,मटण आणि घावणे खावुन मुक्ती मिळत नसेल तर, ह्या भाकरीसोबत मटण खावुन मिळते काय बघा....(बोकडाला हं)....
सगळ्यांचे पदार्थ भारी .
सगळ्यांचे पदार्थ भारी . मोबाईलमधून चव घेता येईल अशी सोय हवी होती
सन्मित ,वड्या छानच, पण मला
सन्मित ,वड्या छानच, पण मला जमतच नाहीत
मटण काय जबरी दिसतेय...
मटण काय जबरी दिसतेय...
**सुरळीच्या वड्या**
**सुरळीच्या वड्या**
*१वा.बेसन,१वा.ताक,१वा.पाणी ,१च.मीठ,१च.तेल,१/२च.हळद गुठळ्या होऊ न देता एकत्रित करणे.
*सर्व मिश्रण जाड बुडाच्या भांड्यामध्ये शिजत ठेवा.सतत हलवत रहावे .मिश्र घट्ट झाले की झाकून मंद आचेवर १min शिजवा आणि गॕस बंद करा.
*गरम असतानाच मिश्रण ताटावर पातळ पसरावे (४/५ताटे)
*५/६च.तेल गरम करुन त्यामध्ये २च.मोहरी आणि १/२च. हिंगाची फोडणी करावी.
*१ च.हिरवी मिरची ठेचलेली,१वा.ओलानारळाचा चव,किंचित मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करावी.
*आता थंड झालेल्या ताटातील बेसनवर आधी १च.फोडणीचे तेल आणि थोडे खोबरेचे मिश्रण पसरावे.
*नंतर १" च्या पट्टया कापून गुंडाळून घ्यावे.याप्रमाणेच इतरही ताटांच्या सुरळी वडी बनवाव्यात.
*बेसन ताजे आणि बारीक दळलेले हवे.जाड/जुने असेल तर चिकटपणा कमी झाल्यामुळे ताटावर नीट पसरत नाही.
Hi ghya recipe
Hi ghya recipe
मी अश्याच पदतीने करतो ,
मी अश्याच पदतीने करतो , कुठेतरी मिळाली हि रेसिपी
धन्यवाद सन्मित
धन्यवाद सन्मित
सन्मित, लैच भारी.
सन्मित,
लैच भारी.
एकदा घावण्यांसोबत बोकडाला
एकदा घावण्यांसोबत बोकडाला मुक्ती मिळाली तर मग चपात्यांसोबत खाण्यास हरकत नसते.
सन्मित , लावण्या पक्वानै
सन्मित , लावण्या पक्वानै बनविण्यात हातखंडा दिसतोय तुमचा..
खूप छान जिन्नस बनविले आहेत.
ऋन्मेषजी.. मटण आणि पांढरेशुभ्र घावणे लाजवाब...
अश्विनी११ - लाडू आणि पुरणपोळी
अश्विनी११ - लाडू आणि पुरणपोळी भारीच...
मटण आणि घावन कधी खाल्लं नाही,
मटण आणि घावन कधी खाल्लं नाही, पण छान लागेल. मस्त जाळी पडलेली घावनाला. भाकरी मस्त लावण्या. मी जेमतेम ४ भाकरी त्या पण लहान लहान करते. किती छान झाल्या गेल्यात. बाकी भाकरी म्हटली कि पुडिंग आठवतं म्हळसाचं.
सन्मित सुरळीच्या वड्या छान तुकतुकीत दिसताहेत
साऊथ मध्ये रेल्वेत चिकन घावणे
साऊथ मध्ये रेल्वेत चिकन घावणे नाश्त्याला देतात म्हणे
बाकी भाकरी म्हटली कि पुडिंग
बाकी भाकरी म्हटली कि पुडिंग आठवतं म्हळसाचं.>> धनुडी.. पुडींगला शंभर वर्ष आयुष्य.. कालच माझ्या खऱया सासूने भारतीय पुडींग अर्थात खरवस बनवून खाऊ घातला पण फोटो काढायला विसरले
कांदा भजी आणि बटाटा नाही बरं
कांदा भजी आणि बटाटा नाही बरं बनाना भजी आहेत....
म्हाळसा ,,,भाकरी पाठवते जरा
म्हाळसा ,,,भाकरी पाठवते जरा रेसिपी नुसार पुडिंग करून पाठवा....मला भाकरी करताना तुमच्या पुडिंगची फार आठवण येते ......
Mrunali पाउस पडतोय ,तुम्ही
Mrunali पाउस पडतोय ,तुम्ही भजीचे फोटो टाकून त्रास देताय...
तुम्ही भाकरीचे फोटो टाकून
लावण्या, तुम्ही भाकरीचे फोटो टाकून त्रास देताय त्याचे काही नाही इतक्या छान भाकरी या जन्मी तरी जमणार नाहीत मला....
घावने आणि भाकऱ्या लाजवाब!
घावने आणि भाकऱ्या लाजवाब!
Mrunali तुम्ही त्या हसणारी
Mrunali तुम्ही हसणारी बाहुली कशी टाकता, मदत कराल का?
लावण्या मला दो-तीनच बाहुल्या
लावण्या मला दो-तीनच बाहुल्या माहिती आहेत....ते डिटेल्स चे पेज पण डिलीट झालंय माझे..
कुणाला माहिती असेल तर द्या न- हसणार्या , थोडे हसणार्या, खूप हसणार्या, विचार करणार्या, अजून बर्याच प्रकारच्या बाहुल्या.....
(No subject)
बनाना भजीची रेस्पि टाका.
बनाना भजीची रेस्पि टाका.
प्लस कंटाळवाणे ओट्स चविष्ट कसे बनवायचे ते ही सांगा
कशाला खायचे ओट्स?
कशाला खायचे ओट्स?
त्या पेक्षा किन्वा छान लागतो.
किन्वा महाग आहे . परवडत नाही
किन्वा महाग आहे . परवडत नाही
https://youtu.be/mcRWiGOVxTw
https://youtu.be/mcRWiGOVxTw मी ही रेसिपी फॉलो करते ओटस साठी. छान होतात.
जाई
जाई
मी ओटचे धिरडे करते जाई , मिक्सरमध्ये फिरवून त्यात दोन वाटी पावडर असेल एक अंडे , मिरच्या , आलं , कांदा , कोथिंबीर घालून पळीवाढे करून उत्तपम सारखे करते.
दह्यातल्या दाण्याच्या चटणी सोबत गट्टम करतो. बघं असे करून. अंड्याशिवायही होतात, केलेत , पोटभरीचा brunch आहे.
शुभदा, अस्मिता धन्यवाद . करून
शुभदा, अस्मिता धन्यवाद . करून पाहते.
जाई,
जाई,
इकडे रेडिमेड पीठ मिळते.. बज्जी बोंडा मिक्स..त्यात बेसन,राईसफ्लॉर,तिखट, मिठ सगळंच असते.. कच्च्या केळ्याचे काप करून त्या पीठात बुडवून तळायचे फक्त... बहुतेक मॉलमध्ये मिळत असावे.....
इतर भाज्यांचे ही करू शकता...
Pages