
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
अरे वा, चुकून पण जमले काही
अरे वा, चुकून पण जमले काही तरी मला
Thank you all.
आदिश्री आणि पिकू, तुमच्या
आदिश्री आणि पिकू, तुमच्या बर्फी (की बर्फया) खूपच भारी दिसताहेत....
मलाही आश्चर्यच वाटते , फसता
मलाही आश्चर्यच वाटते , फसता फसता राहिले हे प्रकरण !!
साखर पण योग्य प्रमाणात कंट्रोल करता येते.
मुलांना तर फार आवडल्या. आमच्याकडे भारतीय मिठाया मिळत नाहीत विशेष ज्या मिळतात त्या मिल्क पावडरची चव असलेल्या. आता मी घरीच करणार
पिकू मस्त दिसते आहे बर्फी .
धन्यवाद साधनाताई.
ते रवाळ टेक्चर नाही आलं ब्वॉ
ते रवाळ टेक्चर नाही आलं ब्वॉ काय माहित.. पिकूच्या फोटोत दिसतंय तसलं
थँक्स सगळयांना!!
थँक्स सगळयांना!!
मी पनीर पण टाकलय ना यात. त्यामुळे आलं असेल रवाळ टेक्श्चर.
परवा काही कारणाने मोठ्या
परवा काही कारणाने मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ बनवायचा होता. सद्य परिस्थितीत जे उपलब्ध होते ते वापरून धीर करून या रेसिपी ने मब बनवली. काही बॅचेस केशर बर्फी तर काही आंबा मावा घालून आंबा बर्फी बनवली. सगळ्यांना खूप आवडली.
Malai Barfi rocks!!!
आज केली कृष्णाच्या नावाने
आज केली कृष्णाच्या नावाने आम्हाला खायला
मस्त झाली.
छान दिसतेय, रवाळ वगैरे, अगदी
छान दिसतेय, रवाळ वगैरे, अगदी मस्त.
थांकू
थांकू
वा, मस्त दिसतेय.
वा, मस्त दिसतेय.
भारतातल्यांनी पुढील प्रमाण
भारतातल्यांनी पुढील प्रमाण निश्चित करायला हरकत नाही -
एक कप मिल्क पावडर
पाव कप कन्डेन्स्ड मिल्क
अर्धा कप दूध
दोन टेबलस्पून पातळ केलेले तूप
ह्या प्रमाणात फोटोतल्यासारख्या साधारण २ सेंमी x २ सेंमी आकाराच्या २०-२२ बर्फ्या झाल्या.
मायक्रोवेवच्या आपापल्या हाय सेटींगप्रमाणे किती वेळ ठेवायचं वगैरे ठरवा. किंवा सरळ सगळं मिश्रण एकजीव करून गॅसवर आटवा. गोळा फिरायला लागला की थापा. >>>>>> पान 7 वरून.
धन्यवाद मंजुडी प्रमाणासाठी. आज अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने बनवली.
धन्यवाद सायो. अक्षरशः 15 मिनिटात बनली.
जरा आणखी थोडा वेळ गरम करायला हवं होतं. थापताना वाटत होतं , 5star बनतयं की काय .पण नाही. .Consistency मावा पेढ्यासारखी झाली , रवाळ नाही. पण चव फक्कड.
नवीन Submitted by अंजली_१२ on
नवीन Submitted by अंजली_१२ on 11 August, 2020 - 11:39>> मस्त रवाळ दिसत आहे.
२२ मे ला रवाळ टेक्शर आले नव्हते. आता असे काय केले बरे?
लेक दहावी पास झाली.
लेक दहावी पास झाली. लॉकडाऊनमुळे मिठाई मिळेना कुठे. मग पटकन् मब केली. एकूण सहा घाणे काढले. दोन वेळा आंबा मावा मिक्स करून आंबा मब, दोन वेळा केशर घालून केशर मब आणि दोन वेळा वेलचीपूड आणि बदाम पावडर घालून मब केली.
सर्वांना खूप आवडली. जास्त कटकट आणि पसारा न करता पटकन् काम झाले म्हणून मी खुश.
एकच शंका आहे, माझी बर्फी रवाळच होते, मिल्क केक किंवा कलाकंद असतो तशी. स्मुथ होण्यासाठी काय करावे लागेल?
अभिनंदन प्राची , जमल्यास फोटो
अभिनंदन प्राची , जमल्यास फोटो टाका.
मिल्क पावडर कशी आहे त्यावर
मिल्क पावडर कशी आहे त्यावर टेक्श्चर अवलंबून आहे. माझीही मोस्टली रवाळच होते. समजा मिल्क पावडर ब्लेंडरमध्ये पटकन फिरवून घेतली तर?
ब्लेंडर फिरवून बघावा असं
ब्लेंडर फिरवून बघावा असं माझ्या पण डोक्यात आलं होतं. पुढच्या वेळी करून बघेन.
मी_अस्मिता, धन्यवाद
प्राची अभिनंदन.
प्राची अभिनंदन.
फोटो पण पाहिजेत..
प्राची अभिनंदन .
प्राची अभिनंदन .
. मबचा फील यायला
मला रवाळ बर्फी हवी होती
. माझी गुळगुळीत झालीय .
अभिनंदन प्राची.
अभिनंदन प्राची.
आता असे काय केले बरे? >>>>>>>
आता असे काय केले बरे? >>>>>>>>>> सायो म्हणतेय तसं या वेळी मी वेगळ्या ब्रँडची मिल्क पावडर आणली जी थोडी खरबरीत आहे त्यामुळे ते टेक्श्चर आलेय.
Ok
Ok
या शनिवारी , पुन्हा बनवली .
या शनिवारी , पुन्हा बनवली . घरी काही गोडाधोडाचे निमित्त होते ,.
.
त्यात माझी बहिण जवळ जवळ आठ महिन्यानी मला प्रत्याक्षात भेटणार होती , म्हटलं तिलाही माघारी काहीतरी डब्यात भरून द्यायला .
या वेळेला आत्मविश्वास एकदम वाढला , सरळ दुप्पट प्रमाण घेउन बर्फी केली .
केवळ जबरा झालेली चवीला
रात्री बहिणीने मेसेज करून पण कळवलं , "awesome taste !"
सायो परत एकदा धन्यवाद . असले प्रकार करायचा मी उभ्या आयुश्यात कधी प्रयत्न केला नसता . केवळ या रेसिपीमुळे करतेय
.
मी पण केली आता . पण बहुदा
मी पण केली आता . पण बहुदा माकाचु मध्ये जायला पाहीजे
मिल्क पावडर च्या निम्मी काजू
मिल्क पावडर च्या निम्मी काजू पावडर टाकली .
काय दिसतेयं , मस्तच !
काय दिसतेयं , मस्तच !
दोघींचीही !
ब्लेंडर फिरवून बघावा असं
ब्लेंडर फिरवून बघावा असं माझ्या पण डोक्यात आलं होतं. पुढच्या वेळी करून बघेन.
ब्लेंडरने पार्टिकल साईज ब्रेक होवुन ते अजुन स्मुथ होण्याचा संभव आहे मग रवाळ दिसणार नाही. (तुप काढण्यासाठी जे ब्लेंडर वापरता त्याबद्दल बोलताय नां ?)
एक आगाउ सल्ला, भजीसाठी भिजवलेले बेसन थोडे ब्लेंडरने मिक्स करा ४/५ सेकंदच परफेक्ट पोत मिळतो.
बादवे कुरियर सर्व्हिस चालु झाल्या असल्यास एक एक बॉक्स पाठवुन देण्याचे करावे.
आहा !! मस्त दिसतायत अनघा,
आहा !! मस्त दिसतायत अनघा, वैदेही, छान.
धन्यवाद अस्मिता, वर्णिता. मी
धन्यवाद अस्मिता, वर्णिता. मी प्रतिसादात सुचवलेले बदल ट्राय केले. पण जरा कोरडी झाली. पुढच्या वेळेस blender वापरेन.
धागा वर काढून ठेवत आहे.
धागा वर काढून ठेवत आहे.
यावर्षीसाठी धागा वर ६००!!!
यावर्षीसाठी धागा वर
६००!!!
परवा केली. खूप छान वड्या पडल्या यावेळी. चवही बेस्टच! पुढच्या वेळी थोडी बदाम पावडर घालून ट्राय करेन. असंच वेरिएशन.
परत एकदा थँक्यू सायो. अशाच सोप्या रेसिपी देत रहा
Pages