पत्नी, पती और "वह".
ऊँ ऊँ हूँ! सोड ना रे! किती डोळ्यात डोळा घालून बघतोस? इतकी आवडते मी तुला..? सोडतच नाहीस अगदी! सतत मला घेऊन बसतोयस तू..! मला पण तू आवडतोस रे... तुझा विरह सहन करणे म्हणजे शिक्षाच. मध्ये चार दिवस बरं नाही म्हणून गेलास तेंव्हा मी इतकी व्याकूळ झाले की काय सांगू तुला..! काय काय बडबडत होतास तापात आणि कसनुसा चेहरा करत होतास... आता अगदी हसत बघतोयस ते... आणि हाताची बोटं किती वेळ गुंतवशील? चल सोड आता.... स्वैपाक करायचा आहे मला... तो येईलच आता तासा दोन तासात. तुझ्याबरोबर बघितलं की माझं संपलच म्हणून समज. बरं बाबा, अजून थोडा वेळ हवाय..? बर.
चल किचन मध्ये जावूया. आज खमण ढोकळा कर म्हणालाय तो. आणि मला तर येत नाही.... क्काय? काय म्हणालास? तुला येतंय? अरे व्वा! कमाल आहे तुझी.! किती गोड्या आहेस रे..?! तुझ्यासारखा नवरा हवा होता बघ. सर्वगुणसंपन्न.
बरं तू सांगायला सुरुवात कर मी करत जाते. बेसन घेऊ? बरं. मग? फोडणी पण लागेल? ठीक आहे. मिरच्या तळायच्या? ओके.. पण पाहिला घास तुलाच देते बाबा..! मी पण खाऊन बघू? व्वा. टेस्टी झालंय रे. कसं रे सगळं जमतं तुला शोन्या..!
तुझ्या डोळ्यात बघताना मी इतकी सुंदर दिसते ना की हरखून जाते अगदी.! तुझ्या प्रेमाचीच पावती बघ ही! मी खरंच भाग्यवान आहे बघ तुझ्यासारखा सखा मिळाला मला. तुझ्यासारखा गुड लुकिंग, समजूतदार आणि हुशार माझा नवरा असता तर...? कधी कधी मला आश्चर्य वाटतं की इतक्या सहजतेने तुला कसं काय सगळं जमतं? आणि एवढं प्रेम माझ्यावर...! माझी प्रत्येक इच्छा तू पूर्ण करतोस. अलादीनचा जिन्न असल्यासारखा. हां मेरे आका!
मला शॉपिंग करायचं..तू हजर. पिक्चर बघायचं.. तू लगेच घेऊन जातोस. नवी रेसिपी.. तू तयारच. अच्छा ! सांग बरं एवढं ज्ञान कुठून मिळवतोस? खरोखर जीनियस आहेस तू आणि मी किती लकी रे तू माझ्या जीवनात आलास! पण खूप प्रेम विषासमान असतं ना रे..?
ग़ालिब को इश्क ने निकम्मा कर दिया था। तसं मला निकम्मा करू नको रे स्विटी... परत सांगते तुझ्या प्रेमात इतकी आकंठ बुडालीय मी की तुझ्याशिवाय जल बिन मछली होऊन जाते मी. दिवस रात्र तूच दिसतोयस. झोपताना तूच जवळ हवास आणि उठल्यावर तुलाच जवळ घेते मी.
तुझं भरण पोषण नीट करणार मी आता नाहीतर तुझी तब्येत परत बिघडायची. अरे मुलं आली वाटतं... चल .. तू बेडरुम मध्ये लप. मी मुलांना खायला देवून खेळायला पाठवते आणि मग घेतेच तुला जवळ...! प्रेम कैदी केलंयस तू मला... छे... एवढं संमोहन करू नकोस. सोडव मला तुझ्या मोहपाशातून.. पण..पण ते कदापि शक्य नाही.. हो ना..?
लव्ह यू स्विटी..
.....
(एसीपी प्रद्युम्न: दया, कुछ तो गडबड है।
"सर लगता है अंदर कोई है, दरवाज़ा बंद है।"
"दया,अभिजीत, पता लगाओ ये आदमी कौन है, कोईना कोई सुराग जरूर मिलेगा।"
"सर, हमसे ज्यादा मायबोली पढ़नेवाले इस गुत्थी को सुलझा सकते है। उनकी मदद ली जाय।"
ठीक है। उनको बुलाइए।")
.....
मुझे लगता है, मोबाईल है उसका
मुझे लगता है, मोबाईल है उसका सखा
अरे बरोबर पहचाना दया!
अरे बरोबर पहचाना दया!
मामला बहुत पेचीदा हे
मामला बहुत पेचीदा हे
दया , डॉक्टर साळुंखे को बुलाओ
डॉ सालुंके को बुलाने की कोई
डॉ सालुंके को बुलाने की कोई जरूरत नहीं। मृणाली समद मैडम ने पलक झपकते ही केस को सुलझा दिया है, इसलिए उनको असिस्टेंट कमिश्नर ऑफ पुलिस के पोस्ट पर नियुक्त किया जा रहा है। With immediate effect.
बहोत बहोत शूक्रिया आपका...
बहोत बहोत शूक्रिया आपका...
ये आपबीती है..........
मस्त लिहिलेय..
मस्त लिहिलेय..
मला चष्मा(ह्याच्या शिवाय
मला चष्मा(ह्याच्या शिवाय जीवनाला दृष्टी नाय) वाटलं होतं, नंतर mobile
<<<बहोत बहोत शूक्रिया आपका...
<<<बहोत बहोत शूक्रिया आपका...>>> इसमें शुक्रिया कि क्या बात है, मैडम, आप जैसे होनहार IPS ऑफिसर की देशको जरूरत है। हां, लेकिन आपको होसुर छोड़कर बंबई आना पड़ेगा।,,,:-):-):-)
@ नादिशा, धन्यवाद.
@ नादिशा, धन्यवाद.
@ किल्ली, good efforts in
@ किल्ली, good efforts in guessing from a different perspective! Thanks.
काय अहो बिथोवन कशाला गरीबाला
काय अहो बिथोवन कशाला फिरकी घेताय गरीबाची...

सोपी होती तुमची ओळखा पाहू गोष्ट.... माझ्या मुलाला विचाराल तर तो हि सांगेल...ये तो मेरी मम्मा और उसका मोबाईल है....
बिथोवन मस्त... आणि मृणाली
बिथोवन मस्त... आणि मृणाली congratulations ,........
लावण्या
लावण्या
Internet internet हैं सखा..
Internet internet हैं सखा.. नही तो inverter

@ धनुडी, धन्यवाद.
@ धनुडी, धन्यवाद.
@ लावण्या, धन्यवाद.
@ लावण्या, धन्यवाद.
<<>> सही जवाब। नेट पैक के
<<>> सही जवाब। नेट पैक के सिवा मोबाइल कि हस्ती ही क्या!