फिनिश भाषा

Submitted by BLACKCAT on 24 September, 2020 - 08:05

Finland मध्ये डॉकटर हवे आहेत
पण त्यांची भाषा कम्पलसरी लागते

मुंबईत ही भाषा कोण शिकवते का ?

अजून काही ऑप्शन ?

IMG_20200924_173328.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुक आणि लिंक्डइन वर हेरंब कुलकर्णी म्हणून सापडतील. ते अनेक वर्षे फिनलंड मध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

आणि मुख्य म्हणजे तो व्हायकिंग्स लोकांचा प्रदेश आहे. खूपच क्रूर लोक्स असतात ते. मी बघितले त्यांची वेब सिरीज. रॅगनर लॉथब्रूक जरा बरा आहे त्यातल्या त्यात.

Lol Lol काही नाही हो मी अशीच चेष्टा करत होतो. जा, चांगले आहेत लोक्स तिकडे. मी ज्या वेब सिरीजबद्दल बोलतोय ती आठव्या नवव्या शकतात घडलेली गोष्ट आहे.

फिनलंड मध्ये कुठल्या शहरामध्ये जाणार आहेत हे सांगितले नाही. कारण, हेलसिंकी मध्ये बरेच इंग्लिश बोलणारे लोक सापडतील. इथे भाषा शिकून जाण्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन युनिव्हर्सिटी च्या कोर्स मध्ये खूप चांगले शिकू शकता, दुसरा फायदा असा कि तुम्हाला सराव करायला तिथे खूप जण भेटतील. गुगल ट्रान्सलेटर आता बराच सुधारला आहे. तिथे बरेच भारतीय आहेत, महाराष्ट्रातून गेलेले बरेच लोक आहेत स्थायिक झालेले.

काही मदत हवी असल्यास नक्की सांगा, जमेल तशी मदत करेन.

महाराष्ट्र मंडळ पण आहे . मला आता तीन वर्ष होतील येउन पण मी पण अजून नाही शिकलो. Sad अवघड आहे आणि नरेन म्हणतात तसे युनिव्हर्सिटी च्या कोर्स मध्ये खूप चांगले शिकू शकता.

मेडिकल लायसन मिळायला फिनिश भाषा येणे व त्याचीही युनिव्हर्सिटी परीक्षा पास होणे कम्पलसरी आहे

पूर्ण मेडिसिन ची केस फिनिश भाषेत लेखी व तोंडी द्यावी लागते

तिकडे जाऊनही शिकता येईल

पण थोडे इकडे जमवून मग तिकडे गेले तर सोपे जाईल , नैतर अगदीच त्या श्रीदेवीगत व्हायला नको

फिनिश भाषा हंगेरीयन भाषेची चुलत बहीण आहे म्हणे. या दोन्ही भाषा इंडो जर्मन भाषा समूहबाहेरील आहेत. त्यामुळे कदाचित आपल्याला शिकायला अवघड जाते.