हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिनेशदा, धागा सुरू केल्याबद्धल...

चित्रपट : तेरे मेरे सपने
गीत : गोपालदास "नीरज"
संगीत : एस डी बर्मन
गायक : लता मंगेशकर आणि किशोर कुमार

ए मैने कसम ली...

अत्यंत साधे, टिपीकल मध्यमवर्गीय बाजातले पण अतिशय रोमँटिक, a timeless classic

पाके कभी खोया तुझे, खोके कभी पाया..
जनम जनम तेरे लिये, बदली हमने काया...

क्या बात है!

http://www.youtube.com/watch?v=iK-47NF7cTU

माये नि माये मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा..
हम आपके है कौन

माधुरी, रामलक्ष्मण, बडजात्या.......
पिलू रागाचा सुंदर भाव...
कर्णमधुर की नेत्रसुखद हा वाद अजून मिटत नाही...

अपलम चपमम

चित्रपटः आझाद
संगितः सी. रामचंद्र
गायिका: लता, उषा

अप्रतिम नृत्य केलय त्या दोघी बहिणींनी पडद्यावर. गाणार्‍या बहिणी तर बिनतोडच आहेत. Happy

सिलसिला मधलं "ये कहां आ गए हम.."
मुकद्दर का सिकंदर मधलं "सलामे इश्क"
माधुरीची जवळपास सगळीच!
या गाण्यांमध्ये अभिनय करणारे कलाकार उत्तम की त्यांना उत्तमच अभिनय करायला लावणारं संगीत, गायन उत्तम याचा निवाडा आपण करुच शकत नाही! नरोवाकुंजरोवा! Happy

ऋषी कपूर, झीनत अमान यान्च्यावर चित्रित झालेले "हम किसीसे कम नही" (१९७७) चित्रपटाचे शिर्षक गीत.
अर्थपुर्ण शब्दरचना
मधुर स्वरः मो. रफी व आशा भोसले
सुरेख अदाकारी: ऋषी कपूर, झीनत अमान

ओ हसीना जुल्फोंवाली

चित्रपटः तिसरी मंझील
संगितः आर.डी.बर्मन
गायकः रफी, आशा

शम्मी कपूर आणि हेलनची अप्रतिम अदाकारी.

दहक चित्रपटातलं "सावन बरसे तरसे दिल, क्यों ना घरसे निकले हम.." हे सोनाली बेंद्रे आणि अक्षय खन्ना वर चित्रित केलेलं ऐकायला सामान्य असं गाणं असामान्य रित्या चित्रित केलं आहे. त्यातला पाऊस हा खोटा पाऊस वाटतंच नाही... (कदाचित खराही असेल) पण इतकं सगळं गाणं एका अटेम्प्ट मध्ये चित्रित करणं थोडं अशक्य वाटतंय.
दुसरं ही पावसातलंच असामान्य गाणं... ताल मधलं 'दिल ये बेचैन वे, रस्ते पे नैन वे...' कॅमेर्‍यात टिपलेली जास्तीत जास्त हिरवळ आणि पाणि, नुसतं पाहूनच थंड वाटतं. Happy

अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना

चित्रपटः कालापानी
संगितः एस.डी.बर्मन
गायकः रफी, आशा

मधुबालाचं ते वेडावुन दाखवणे वेड लावणारे आहे. देवानंदनेही त्याचा तो 'बुजगावणं डान्स' केलेला नाही म्हणून तो पण चांगला वाटला आहे.

पावसावरून गाणं आठवलं.... आस्तित्व... तब्बु.... चल चल मेरे संग चल........... आस्तित्व ची शीडी बाजारात मिळते का? मी टी व्ही त्युनर कार्डवरून पिक्चर रेकॉर्ड केला होता... नंतर डिलिट केला फोर्मॅटिंगमध्ये.. Sad

ऑल टाईम फेव्ह-

'दिलका भँवर करे पुकार'- जिन्यावर असलं प्रेक्षणीय गाणं चित्रित करणं फक्त विजय आनंदच करू शकतो. नूतनचं सौंदर्य, देवचा रोमान्स, रफीचा मधाळ स्वर .. वाह! नूतन गात नाही, केवळ एक्स्प्रेशन्स असे, की बघऽऽत रहावे!

दक्षिणा, तालकरता १०१ मोदक.

आईये मेहेरबां बैठीये जानेजॉं

चित्रपटः हावडा ब्रीज
संगितः ओ.पी.नय्यर
गायिका: आशा

मधुबाला, मधुबाला आणि फक्त मधुबाला!!

'दिलका भँवर करे पुकार'>>>> हेच लिहायला आले होते. माझंही अत्यंत आवडतं गाणं. गाण्याच्या लयीनुसार नूतन-देव जिना चढतात्-उतरतात ते बघायला मस्त वाटते.

चित्रपट : हम दोनो
गीत : साहीर
संगीत : जयदेव
गायक : मोहम्मद रफी आणि आशा भोसले

अभी ना जाओ छोडकर...

कुठेही उगाच धावपळ, अंगाचा धसमुसळेपणा न करताही चित्रपटात प्रणय अगदी उत्कटतेने सादर करता येतो याचे उत्तम उदाहरण. साधना काही मोजक्या चित्रपटात सुंदर दिसली आहे (डोळ्यांच्या ऑपरेशन पुर्वी); हा त्यापैकी एक. देवसाबका तो जवाब हि नही!

http://www.youtube.com/watch?v=rbuI0ycwsZg&feature=PlayList&p=27236DCCDD...

जामोप्या, तुमचं जिना चढ उतरण्याकडेच लक्ष बुआ Happy
माझं आवडतं,
कुछ तेरे दीलने कहां,
कुछ मेरे दीलने कहां,
अब हम क्या कहें क्या सुनें जब दिल बातें करने लगे!

गाण्यातील प्रिया गिलचा साधेपणा, चन्द्रचूडचा चम्यापणा, टकल्या मुलांचं निष्पापपणे इथे तिथे धावणं, सुंदर समुद्र किनारा, हरिहरनचा धिरगम्भीर आवाज सगळंच गोड आहे.

चित्रपट : परख
गीत : शैलेंद्र
संगीत : सलील चौधरी
गायीका : लता मंगेशकर

ओ सजना, बरखा बहार आइ...

बिमल रॉय यांचं अप्रतीम दिग्दर्शन आणि साधनाचा संयत अभिनय यामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली. आणि हो, साधना सुंदर दिसली या गाण्यात. Happy

http://www.youtube.com/watch?v=7hcUYuPvFUQ

राज, गाण्याचे शब्द पण लिहित जा. सगळ्यांना तुनळी बघता येत नाही त्यामुळे तुम्ही कोणत्या गाण्याबद्दल बोलता आहात ते कळणार नाही.

मला वाटते तुम्ही हम दोनो मधल्या 'अभी ना जाओ' आणि परख मधल्या 'ओ सजना बरखा बहार आयी' या गाण्यांबद्दल लिहिले असावे.

माधव, मी दिलेली लिन्क न पहाता तुम्ही दोन्ही गाणी अचूक ओळखलीत यातच त्या गाण्यांचं वेगळेपण जाणवतं. अर्थात तुमचंही कौतुक. Happy

तुमची सूचना अंमलात आणली आहे. धन्यवाद.

तेरा मेरा प्यार अमर
फिर क्यूँ मुझको लगता है डर

चित्रपट : असली नकली
गायिका : लतादिदी

या गाण्यात माझ्या मते साधना जेवढी सुंदर दिसलीय तेवढी क्वचितच आणखी काही चित्रपटात दिसली.

येत्या एक्-दोन वर्षांमधे "हम दोनो" सप्तरंगात रंगून आपल्याला दिसणार आहे...
त्याची एक झलक पहा...

नितांतसुंदर गाणं रंगीत स्वरूपात-

http://www.youtube.com/watch?v=P34FHfliFkg

ही छोटीशी झलक पाहून असंच म्हणावसं वाटतं... 'ये दिल अभी भरा नही'

अरे कोणी गाईड मधले वहिदाचे 'पिया तोसे नैना लागे रे........' बद्दल कसे लिहिले नाही???

माझे अतिशय आवडते गाणे.. हे गाणे फक्त ऐकू की फक्त पाहू असा गोंधळ होतो नेहमी.. पाहायला लागले की गाण्याच्या शब्दांकडे लक्ष कमी जाते आणि ऐकायला लागले की कधी एकदा पाहु असे होते Happy वहिदा अप्रतिम दिसलीय, नाचलीय आणि पिक्चरायझेशन तर ग्रेटच......

वो कौन थी - लग जा गले, के फिर ये हंसी रात हो ना हो
साधनाचा अप्रतिम अभिनय, तिच्या एक्सप्रेशन्सवरून खरंच असं वाटतं की 'शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो.....
त्याविरूद्ध मनोजच्या चेहर्‍यावर 'ही बाई गाणं गातेय तोवर करू काय'? Uhoh
असे भाव... Angry

त्याविरूद्ध मनोजच्या चेहर्‍यावर 'ही बाई गाणं गातेय तोवर करू काय'? >> Lol तसं नाही,
'ही बाई गाणं गातेय तोवर माझ्या नाका-डोक्यात झालेल्या सर्दीचं करू काय'? Proud

मोहे पनघट पे नंन्दलाल छेड गयो रे...

चित्रपट : मुघले आझम
गायिका : लतादिदी
अभिनेत्री: मधुबाला

अप्रतिम सुंदर मधुबाला, अप्रतिम सुंदर गाण, अप्रतिम सुंदर न्रुत्य दिग्दर्शन, अप्रतिम सुंदर आवाज... सगळच केवळ अप्रतिम

चलो दिलदार चलो चाँद के पार चलो

चित्रपटः पाकि़जा
संगितकारः गुलाम मोहम्मद
गायकः रफी, लता

तो चंद्र, त्याचे प्रतिबींब आणि तो शिकारा! खरेच सगळे चंद्राच्या पलिकडलेच वाटते - स्वप्न!

अंक्या मोदक रे..हम दोनो ची सगळीच गाणे लै भारी Happy

मला नूतन- देव आनंद हे गाणे जास्त आवडते

एक घर बनाउंगा, तेरे घर के सामने
दुनिया बसाउंगा तेरे घर के सामने..

पिक्चर तेरे घर के सामने.
रफी -लता

या गाण्यात विशेष म्हणजे, पेल्यामधे नूतन ला बोलताना जे दाखवले आहे.. ते special effects, timing लै भारी आहे.
http://www.youtube.com/watch?v=i8JvH7eO7f8

Pages