Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अननसाचा मुरंबा करा.
अननसाचा मुरंबा करा.
पायनॅपल पाय, मुरंबा, मिक्सवर
पायनॅपल पाय, मुरंबा, मिक्सवर न गाळता ज्यूस, काप ग्रिल करुन... तिखट मध्ये फक्त थाय करी मध्ये आठवतोय. ती जमत असेल तर अत्यंत भारी लागते.
अननसाचा साऊथ इंडीअन हॉटेल मध्ये मिळणारा शिरा ही भन्नाट लागतो. #तिरुपतीभीमानॉस्टेल्जिआ!
अननसाचे तुकडे फ्रीझरमधे ठेवा.
अननसाचे तुकडे फ्रीझरमधे ठेवा. पाहिजे तेंव्हा थोडे थोडे काढून स्मुदी करता येईल
अननसाची जिलबी
अननसाची जिलबी
अननसाची जिलबी
अननसाची जिलबी
पायनॅपल फ्राईड राईस, भन्नाट
पायनॅपल फ्राईड राईस, भन्नाट लागतो.
अनारशांचे पीठ थोडे सैल झाले
अनारशांचे पीठ थोडे सैल झाले आहे, नीट थापता येत नाहीयेत. नीट होण्यासाठी काय करू ?
पिठी (तांदळाची) घाल व
पिठी (तांदळाची) घाल व थोड्यावेळ मुरु दे..
ओके, करून पाहते. धन्यवाद
ओके, करून पाहते. धन्यवाद मंजूताई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Morde chocolate compund bars
Morde chocolate compund bars पुण्यात कोथरूड च्या आसपास कुठे मिळतील?
Morde chocolate compund bars>
Morde chocolate compund bars>>गोयल डेअरी कर्वे रोड, नळ स्टॉप जवळ
मोर्डॅ बहुतेक नूतन टी डेपो
मोर्डॅ बहुतेक नूतन टी डेपो मण्डई रोड ला पण मिळेल.
थॅंक्स punekarp, mi_anu
थॅंक्स punekarp, mi_anu
Morde chocolate compund bars>
Morde chocolate compund bars>> गरवारे फूडस, पौड रोड
Online मिळते की ऍमेझॉनवर.
Online मिळते की ऍमेझॉनवर.
नाचणी सत्व आणले आहे
नाचणी सत्व आणले आहे,बिनसाखरेचे बाळासाठी..
ते कसे द्यावे?
काही पाकृ असतात का सोप्या?
की सरळ दुधातून द्यावे?
बाळ 9 महिन्याचे झाले आहे
किल्ली..नाचणी सत्व काय असते?
किल्ली..नाचणी सत्व काय असते?
मी मुलीसाठी नाचणी भाजून दळुन आणली आहे.
दोन चमचे नाचणी चे पीठ ,जरा मीठ पाण्यात कालवून शिजवते..आणि भरवते..सहा महिन्यांची असताना सुरू केले होते... अजूनही खाते ती.
नाचणी सत्व वेगळे असते का?
दोन चमचे नाचणी चे पीठ ,जरा
दोन चमचे नाचणी चे पीठ ,जरा मीठ पाण्यात कालवून शिजवते...
तिला अन्न सुरू केले तेव्हा मीही असंच दिलं होतं.
पण कुठेतरी वाचलं आणि ते नाचणी सत्व घेऊन आले, बहुतेक ते हलकं असतं पचायला
मलाही विकतचे नाचणी सत्व कसे
मलाही विकतचे नाचणी सत्व कसे बनवायचे माहीत नाही पण मी नाचणी भिजत घालून तिला मोड आणवुन नंतर मिक्सर मध्ये फरवून दूध काढून घ्यायचे,त्यात थोडा गुळ किंवा साखर घालून शिजवायचे ,घट्टसर झाले की भरावयाचे
असेच मी गव्हाचे पण दूध काढून करायचे
किल्ली/ आदू मी नाचणी रात्री
किल्ली/ आदू मी नाचणी रात्री भिजत घालते , सकाळी मिक्सर मध्ये कमीत कमी पाण्यात वाटते आणि गाळणी ने गाळून चोथा काढून टाकते . मग गाळलेले सत्व दुधात घालून शिजवते , थोडी खारीक पावडर घालते. साखर नाही घातली तरी चालते. खारीक पावडर घालायची नसल्यास साखर घाला.
जास्त प्रमाणात करून ठेवायचे असल्यास सत्व ताटात पसरून वर पातळ कपडा बांधून उन्हात सुकत ठेवावे. पूर्ण सुकल्यावर मग मिक्सर मध्ये फिरवून पावडर करून डब्यात भरून ठेवावी.
गरवारे फूडस, पौड रोड >>थॅंक्स
गरवारे फूडस, पौड रोड >>थॅंक्स वैष्णवीका मिळाले..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Online मिळते की ऍमेझॉनवर>>साधना.. हो पाहिले आहे... delivery charges खूप जास्त आहेत किमतीच्या तुलनेत...
किल्ली,
किल्ली,
तयार नाचणी सत्व दुधात घालून दहा मिनिटे शिजवून घ्यायचे. गॅसवर ठेवायच्या आधी पावडर विरघळवून घे आणि बारीक फ्लेम वर सतत ढवळत रहा नाहीतर गुठळ्या होतील.
तयार सत्वात साखर असते त्यामुळे इतर काही टाकायची जरुरी नसते तरीही हवे असल्यास बदाम ची बारीक पूड घालू शकतेस.
तसेच सुरवातीला एक दोन चमचे सत्व घे आणि बनव. कारण मिश्रण भरपूर होते पण लगेच आळते. आणि रमाला आवडते की नाही तेही कळेल.
बिनसाखरेचे आहे ते निल्स न
बिनसाखरेचे आहे ते निल्स न
थँक्स
करून पाहते
किल्ली, त्या नाचणी सत्वात
किल्ली, त्या नाचणी सत्वात थोडे पाणी घालुन पेस्ट बनव. मग कढईत थोडे पाणी उकळायला ठेव. त्या पाण्यात थोडे मीठ व हिंग घाल. मग सत्वाची पेस्ट घालुन ढवळुन घे. गुठळ्या होऊ देऊ नकोस. वर झाकण ठेऊन एक दोन वाफा दे. पातळसरच ठेव. ज्या बाळांना गोड आवडत नाही ( माझ्या मुलीला खीर अजीबात अवडत नव्हती, ती हे मात्र खायची. ) त्यांना हा पर्याय आहे.
लोकसत्तेत एका डॉनी मुलांच्या
लोकसत्तेत एका डॉनी मुलांच्या घन आहारावर लेख लिहीला होता. त्यांनी म्हटले की वर्षाचे होईपर्यंत गूळ साखर तिखट मीठ या कृत्रिम चवी लावू नयेत. शिजवलेली अन्न धान्ये फळे भाज्या मूळ चवीत (ब्लान्ड) द्यावेत.
जर बाळाला गोडाची चव लावली नसेल तर तसेच द्या दूध पाण्यात शिजवून. नाहीतर साखर वरून घालता येईल.
दूध पाण्यात शिजवून, गॅस वरून उतरून, कडकडीत गरम असताना गूळ विरघळवून घेता येईल किंवा
दूध पाण्यात शिजवून, थोडे निवल्यावर, खाताना मध मिसळून देता येईल (मध गरम करत / शिजवत नाहीत)
ती आवडीने खाते + नीट पचवते --- हे कळले की मग खारीक / बदाम / अक्रोडाची पूड + तत्सम पौष्टीक घालता येईल.
आधी प्रयोग नकोत. बाळ खात नाही. आईला सुकामेवा दिसत रहातो त्यात घातलेला. फेकवत नाही मग स्वतः खाऊन वजन वाढते.
दिनेश. यांचा धागा आहे / होता बाळांच्या घन आहाराबद्दल. तोही बघता येईल.
साखर गुळ अजून introduceकेले
साखर गुळ अजून introduceकेले नाही
फळे खाते ती रस किंवा बारीक मऊ फोडी करून बोटाने मॅश करून दिल्या तर, एकच दात आहे ना
किंचित मीठ देते इतर पदार्थात, पण ते नसले तरी चालते तिला,
छान प्रतिसाद सर्वांचे, दिनेश
छान प्रतिसाद सर्वांचे, दिनेश दांच्या धाग्याची लिंक द्याल का
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/18473?page=2
ही एक मिळाली
https://www.maayboli.com/node/28243
ही दिनेश यांची
किल्ली, नाचणी सत्व 3 कपाला 3
किल्ली, नाचणी सत्व 3 कपाला 3 चमचे अस दुधात शिजवून द्यायचं. गोड आवडत असेल बाळाला तर खजुराने गोडवा येतो. साखर मीठ वगैरे ची चव दिलीच नसेल तर असंच नुसतं दुधात शिजवून खायला घाल.
फळ खात असेल तर केळं स्मॅश करून घालता येईल (शिजल्या नंतर)
सेरेलॅक पण देऊ शकतेस आता. साधारण वर्षांची झाली की साखर मीठ नक्की दे.
माझा दीड वर्षाचा मुलगा प्रचंड प्रमाणात तिखट खातो आणि पचवतो देखील त्यामुळे कोणाकडे गेलं की त्याचा वेगळा स्वयंपाक करावा लागत नाही.
घरात खुप अमुलचं क्रीम आणुन
घरात खुप अमुलचं क्रीम आणुन ठेवलेय आईस्क्रीमसाठी. उद्या दसर्यासाठी ते वापरून काही मिष्टान्न बनवता येईल का? प्रसिद्ध मलईबर्फी नको. कारण अलिकडे ३-४ वेळा बनवलीय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोपी पाककृती सुचवणार्या व्यक्तीस बोनस पाॅईंट
Pages