पाककृति स्पर्धा क्रमांक ३ - मटार-पनीर चंपाकळी

Submitted by सहेली on 1 September, 2020 - 11:51

साहित्य –

सारण - पनीर, मटार, धने-जिरे पूड, मीठ, लिंबू, लाल मिरची पावडर, कोथिंबीर

पारीसाठी - मैदा, मीठ, दोन चमचे तेल, ओवा, मिरेपूड, पाणी.

तळण्यासाठी तेल

एक वाटी मैद्यात मीठ, मिरेपूड, ओवा आणि दोन चमचे गरम तेल घालून घट्ट भिजवून घ्या. कमीत कमी अर्धा तास भिजवून ठेवा.

मटारचे दाणे किंचित मीठ घालून उकडून घ्या. मऊ झालेले दाणे हाताने कुस्करून त्यात पनीर, मीठ, कोथिंबीर, धने-जिरे पूड, लिंबू, लाल तिखट, घालून नीट मिसळून जरासं मळून घ्या. चव बघा. जरा जास्त स्ट्राँग असू द्या. पारीबरोबर खाताना चविष्ट लागलं पाहिजे.

IMG_20200901_181855-1.jpg

मैद्याचा एक छोटा गोळा घेउन लांबट आकारात लाटा. फोटोत दाखवल्याप्रमाणे त्याला सुरीने चिरा द्या. सारणाचा लांबट गोळा एका बाजूवर ठेवून चंपाकळी वळून घ्या.

व्यस्थित तापलेल्या तेलात हलक्या हाताने चंपाकळी तळून घ्या. सॉस अथवा आवडीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

IMG-20200901-WA0024.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतं तेल नीट तापलं असेल तर सारणात लिक होण्यापूर्वीच च्या वरच्या कड्या फुलून मधल्या गॅप कव्हर करतील.
एकदा प्रत्यक्ष करुन पाहिले पाहिजे.
याला बेक पण करता येईल बहुतेक.

जबरदस्त दिसतय,
(बटाटे परोठ्याचं सारण उरलय पण ते नक्कीच बाहेर येइल तेलात फसफसेल)
प्लेटींग पण मस्त केलय, सांगायचं राहिलं

ज्यांना अशा शंका आहेत त्यांनी १-२ करून पहावी आणि इथे सांगावे म्हणजे आमच्या सारख्यांना बरे. Light 1
बाकी हा प्रकार मस्त वाटतोय.

छान आहे प्रकार.
असं माशाचा आकार देऊन केलेलं पाहिलंय.

सुरेख पाकृ.

स्पर्धेत विजेत्या सहेलीचे अभिनंदन !!!

अभिनंदन !! पाकृ खरोखर कमाल आहे. शेयर केल्याबद्दल धन्यवाद. "सारण बाहेर येत नाही का" उत्तर द्या किंवा टिप असेल तर द्या एखादी म्हणजे करून बघायला थोडा कॉन्फिडन्स येईल. Happy

साधना, वर्षूदी, विनिता, सोनाली, अस्मिता, बोकलत, जाई, कविन, सामो, वर्णिता, शकुन, खूप धन्यवाद!

शकुन, सारण येत नाही बाहेर कारण दोनेक लेयर येतात त्याच्यावर.
हां, पण सारण जास्त ओलसर, मोकळं मोकळं असायला नको.

एकच नंबर पाककृती.
प्रेझेंटेशन आणि व्हिज्युलायझेशन खतरनाक.

वा मस्तच झालीय
आणि काहीही बाहेर आलं नाहीये Happy
मला पण करायचीय
मटार नाहीये फक्त घरी, आणायला हवी.

Pages

Back to top