पाककृति स्पर्धा क्रमांक ३ - मटार-पनीर चंपाकळी
Submitted by सहेली on 1 September, 2020 - 11:51
साहित्य –
सारण - पनीर, मटार, धने-जिरे पूड, मीठ, लिंबू, लाल मिरची पावडर, कोथिंबीर
पारीसाठी - मैदा, मीठ, दोन चमचे तेल, ओवा, मिरेपूड, पाणी.
तळण्यासाठी तेल
एक वाटी मैद्यात मीठ, मिरेपूड, ओवा आणि दोन चमचे गरम तेल घालून घट्ट भिजवून घ्या. कमीत कमी अर्धा तास भिजवून ठेवा.
मटारचे दाणे किंचित मीठ घालून उकडून घ्या. मऊ झालेले दाणे हाताने कुस्करून त्यात पनीर, मीठ, कोथिंबीर, धने-जिरे पूड, लिंबू, लाल तिखट, घालून नीट मिसळून जरासं मळून घ्या. चव बघा. जरा जास्त स्ट्राँग असू द्या. पारीबरोबर खाताना चविष्ट लागलं पाहिजे.