पाफा तुम्हाला अनेक धन्यवाद. तुमच्या मुळे खायला मिळाले आम्हाला मोदक. तुम्ही एवढं सांगितलंत म्हणून केले ह्या वर्षी मोदक नाहीतर केले नसते मी. भरपूर अडचणी होत्या मोदक करण्यात आणि कोरोनामुळे उत्साह ही नव्हता पण केले शेवटी. त्यासाठी मायबोली आणि पाफा ना पुन्हा एकदा धन्यवाद.
माझ्याकडे वासाचे तांदूळ नव्हते पण बेडेकरांची मोदक पिठी होती घरात म्हणून त्याची उकड काढली आहे .
मोदक पात्रातली चाळणी ही नव्हती घरात . आणू या आणू या म्हणतेय तोवर लॉक डाऊनच सुरू झाला. त्यामुळे मी ह्या वर्षी किसणीवर वाफवले आहेत मोदक. किसणीच्या छिद्रातून छान मिळाली वाफ त्याना अगदी चाळणी सारखी आणि मस्त मऊ लुसलुशीत झाले मोदक.
मी सगळे मोदक फुलांचे करणार होते म्हणून केशरपाणी केले होते पण उशीर व्हायला लागला म्हणून एकच केला. ते केशरपाणी सगळ्या मोदकांवर शिंपडून टाकले.
हा एकच फोटो काढू शकले आहे पण मोदक मीच केलेले आहेत ह्याची खात्री बाळगावी. बसत नसेल नियमात तर नाही प्रवेशिका ग्राह्य नाही धरली चालेल. हा धागा खास पाफा ह्यांच्या साठी.
छान
छान
मला कधी जमणारं असे तोंपासू
मला कधी जमणारं असे तोंपासू उकडीचे लुसलुशीत मोदक...
खूप छान.
खूप छान.
मस्तच!
मस्तच!
काय दिसताएत मोदक! अप्रतिम!
काय दिसताएत मोदक! अप्रतिम!
सर्वांना धन्यवाद .
सर्वांना धन्यवाद .
पाफा, ह्या वर्षी बाहेरून प्रोत्साहन फारच गरजेचे होते कारण आतून वाटणारा उत्साह कमी पडतोय सध्या . म्हणून तुम्हाला स्पेशल थँक्स.
फुलाचा मोदक म्हणजे नॉर्मल मोदक करून घ्यायचा आणि मग कळीवर बोटाने हलकेच प्रेस करायचं की कळीची पाकळी होते. ☺️
एक लिहायचं विसरले उकड काढताना मी अर्ध दूध अर्ध पाणी घेते. त्यामुळे मोदक पांढरेशुभ्र आणि मऊ लुसलुशीत होतात असं मला वाटत. दुधामुळे पदार्थ मऊ, हलका आणि moist होतो . रोजची पोळ्यांची कणिक , उपमा ( गोड शिरा नाही त्यात तर दूध सगळेच घालतात ) , तांदळाचे घावन ह्यात ही मी थोडं दूध नेहमीच घालते.
सुंदर!
सुंदर!
एक नंबर, खुप छान बनवले आहेत
एक नंबर, खुप छान बनवले आहेत मोदक.
फोटो पाहून तोंपासु.
तुमचे उकडीच्या धाग्यावर
तुमचे उकडीच्या धाग्यावर दिलेले मोदक सुंदरच दिसतात. हे सुद्धा फारच छान.
सुंदर आणि सुबकही !!
सुंदर आणि सुबकही !!
छान झालेत. नेहमीप्रमाणेच.
छान झालेत. नेहमीप्रमाणेच.
आहाहा!! मोदक किती सुंदर दिसत
आहाहा!! मोदक किती सुंदर दिसत आहेत!!
अप्रतिम मोदक. अर्धे दूध
अप्रतिम मोदक. अर्धे दूध वापरायची युक्ती पुढच्या वेळी करताना वापरेन .
फार फार सुबक.
धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा
धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा
वर्णिता , हो, नक्की करून बघा उकड दूध घालून
अर्धे दूध अर्धे पाणी ही
अर्धे दूध अर्धे पाणी ही युक्ती वापरणेत येईल. त्यासाठी मोदकांचा घाट घालावा लागला तरी बेहत्तर.
सुरेख, सुबक झालेत मोदक.
सुरेख, सुबक झालेत मोदक.
दुधाच्या टिपेसाठी धन्यवाद .
दुधाच्या टिपेसाठी धन्यवाद . लगेच शनिवारी चतुर्थी आहे त्यामुळे मोदक करताना नक्की करून बघेन . नुसते पाणी घालून जमतात व्यवस्थित . दूध आणि पाणी घातले तर वाफ काढायला तेवढाच वेळ ठेवायचे का ?
अर्धे दूध अर्धे पाणी ही
अर्धे दूध अर्धे पाणी ही युक्ती वापरणेत येईल. त्यासाठी मोदकांचा घाट घालावा लागला तरी बेहत्तर. >हीरा ☺️
आशिका, धन्यवाद.
अश्विनी , नेहमी काढतेस तशीच काढ दूध घातलं तरी.
पण मोदक मीच केलेले आहेत
पण मोदक मीच केलेले आहेत ह्याची खात्री बाळगावी
>>>
छे छे.. साचा वापरला आहे
घरी बोलवा.. खाऊ घाला.. तरच विश्वास ठेऊ अश्या अदभुत प्रकरणावर
वा! ममोंचा धागा पाहिल्यावर
वा! ममोंचा धागा पाहिल्यावर लगेच इथे आले
फारच सुंदर मोदक! फिरत्या कळ्यांचे नाहि केले का?
सुंदर आणि सुबक झालेत मोदक
सुंदर आणि सुबक झालेत मोदक
अतिशय सुंदर मोदक!
अतिशय सुंदर मोदक!
आज तुमच्या पद्धतीने उकड काढून
आज तुमच्या पद्धतीने उकड काढून केले मोदक . दुधामुळे नक्कीच चव छान लागली. कोकणात गुहागर , रत्नागिरी ला खाल्ले होते तशी चव वाटली .मला फोटो टाकता येत नाही इथे . त्यामुळे फोटो टाकला नाही . परत एकदा धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा
धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा .
छे छे.. साचा वापरला आहे
घरी बोलवा.. खाऊ घाला.. तरच विश्वास ठेऊ अश्या अदभुत प्रकरणावर > कोरोना गेला की नक्की या.
फारच सुंदर मोदक! फिरत्या कळ्यांचे नाहि केले का? ह्या वर्षी खूप उशीर झालावता म्हणून पटापट साधेच केले.
दुधामुळे नक्कीच चव छान लागली. कोकणात गुहागर , रत्नागिरी ला खाल्ले होते तशी चव वाटली >> थॅंक्यु अश्विनी
मनीमोहोर, सुबक आणि देखणे मोदक
मनीमोहोर, सुबक आणि देखणे मोदक आहेत. तुम्ही जे काही करता ते नीटस करता.
करोनाचं संकट संपलं की मी तुमच्याकडे गव्हले आणि मोदक शिकायला येणार आहे. चालेल ना?
मनीमोहोर, सुबक आणि देखणे मोदक
मनीमोहोर, सुबक आणि देखणे मोदक आहेत. तुम्ही जे काही करता ते नीटस करता.
करोनाचं संकट संपलं की मी तुमच्याकडे गव्हले आणि मोदक शिकायला येणार आहे. चालेल ना?>>++११
छान कल्पना आहे, म.मो तुम्ही एक कार्यशाळाच घ्या ना! म्हणजे मलापण येता येईल!
निलाक्षी, अनया थॅंक्यु.
निलाक्षी, अनया थॅंक्यु.
गव्हले आणि मोदकांची कार्यशाळा घेण्याची कल्पना छान आहे. भाग घेतील त्याना माझ्याकडून एक गव्हल्याची पुडी भेट ☺️
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
Pages