बूकमार्क म्हणजे काय असते?
ज्या दिवशी हि स्पर्धा जाहीर झाली त्या दिवशीच मी हा प्रश्न फार निरागसपणे विचारला होता.
मला अॅक्चुअली बूकमार्क हा प्रकार माहीत नव्हता. किंवा कदाचित पाहिला होता, पण यालाच बूकमार्क ऐसे नाव हे माहीत नव्हते. एखाद्या ईटरनेटवरील साईटच्या लिंकला सेव्ह बूकमार्क करतात हे माहीत होते. पण ते बनवायची कशी काय स्पर्धा असू शकते याने आणखी गोंधळून गेलो होतो. मग कोणीतरी बूकमार्क काय असते हे मला समजावले. ते बघून मला ईतके साधे लक्षात आले नाही याचे स्वत:शीच हसायला आले. पण हा ऋन्मेष म्हणजे उगाच वेड पांघरूण पेडगावला जातो या ईमेजमुळे ईतर कोणी माझ्या या अज्ञानावर हसले नसावे.
असो, पाल्हाळ पुरे. माझ्याच लेकीचा धागा मी हायजॅक नाही करू शकत
तर योगायोगाने दोनच दिवसांनी माझ्या मुलीने, परीने मला हा खालील बूकमार्क दाखवला. मी पुन्हा गोंधळात.
आता हा असा कसा बूकमार्क?
तर तिने त्याचा वापरही कसा करायचा हे मला समजावले. तिने ते यूट्यूबवर पाहिले होते. स्मार्ट जनरेशन. मी कौतुकाने त्याचा फोटो काढला. जे नेहमीच करतो. स्पर्धेचा विचारही डोक्यात नव्हता.
प्रचि क्रमांक १
प्रचि क्रमांक २
सस्मित यांनी माझ्या लेखावर प्रतिसाद देताना लेकीला बूकमार्क स्पर्धेत भाग घ्यायला लाव असे सुचवले आणि पुन्हा हे स्ट्राईक झाले.
काल शनिवारचा सुट्टीचा मुहुर्त बघत लेकीला स्पर्धेची कल्पना न देता छान छान बूकमार्क बनवायला सांगितले. तर तिने आम्हा चौघांसाठी चार बूकमार्क बनवले. म्हणजे ती, मी, मम्मा आणि आज्जी आम्हा चौघांसाठी. कारण कुमार ऋन्मेष अजून शाळेत जात नसल्याने त्याला बूकमार्कची गरज नाही - ईति परी
प्रचि क्रमांक ३
माझे ईतक्याने समाधान झाले नाही. तिने आणखी काहीतरी चांगले बनवावे म्हणून म्हटले, हे काय लॉलीपॉप बनवलेत. काहीतरी हटके बनव.
तसे तिने हे "वारली बूकमार्क" बनवले.
गोल वगैरे व्यवस्थित मार्क करून कापता आले असते, पण तिला डायरेक्ट कात्रीच चालवायला आवडते
प्रचि क्रमांक ४
आणि आमची फॅमिली कम्प्लीट झाली
परी का सपना, सब के बूक मे बूकमार्क अपना..
प्रचि क्रमांक ५
पण पप्पांचे समाधान ईतक्यानेही होणार नव्हते
म्हणून मग मी तिला स्पर्धेबद्दल सांगितले आणि काहीतरी स्पेशल बनवायला सांगितले.
तर तिने खालील बूकमार्क बनवले. जे वापरानुसार पहिल्या बूकमार्कसारखेच होते.
प्रचि क्रमांक ६
मी म्हटले, यात काय स्पेशल आहे?
तसे तिने मला ते उलटे करायला लावले.
हे बूकमार्क "टू ईन वन" होते. याच्या मागे हेअरक्लिप जोडली असल्याने ते केसांतही माळता येणार होते
प्रचि क्रमांक ७
हेअर क्लिप अडचणीची तर होणार नाही ना हे चेक करायला मी त्याचा बूकमार्क म्हणून वापर करून पाहिला. आणि लक्षात आले की हेअरक्लिपमुळे ऊंचवटा तयार झाल्याने पान आणखी चटकन शोधता येतेय
प्रचि क्रमांक ८
प्रचि क्रमांक ९
आणि हे शेवटचे प्रकाशचित्र.
स्वतःचा फोटो आलाच पाहिजे, जी आमची परंपराच आहे
आर्ट अॅण्ड आर्टिस्ट
प्रचि क्रमांक १०
शेवटी चिमुकल्या जीवांसाठी प्रत्यक्ष स्पर्धेपेक्षा जास्त आनंददाय़क असतो तो त्यात भाग घेण्याचा प्रवास
- ईति ऋन्मेऽऽष
तळटीप - हे सर्व बूकमार्क बनवायला तिने माझी वा आमची शून्य मदत घेतली आहे. किंबहुना ती काही करताना आम्ही बघितलेलेही तिला आवडत नाही, कारण तिला आम्हाला सरप्राईज द्यायचे असते. आणि आम्हीही ती काय करतेय हे बघायला आणि तिला काही सांगायला जात नाही. कारण ती कोणाच्या बापाचेही ऐकत नाही
--------------------------------------
--------------------------------------
ही प्रवेशिका स्पर्धेतून मागे घेत आहे
आणि नवीन एंट्री देत आहे
बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे ६ - (न्यू एंट्री - विडिओसह)
https://www.maayboli.com/node/76508
धन्यवाद
मस्त ! छान प्रतिसाद आले..
मस्त ! छान प्रतिसाद आले.. सर्वांचे मनापासून धन्यवाद
तिला आज सकाळी मी हा धागा दाखवला आणि काल रात्रभर जागून मी ही मेहनत घेतली असे सांगितले तसे लाडाने माझ्या गळ्यात येऊन पडली. दोनचार पॉईण्ट्स कमावले
तसेच येथील प्रतिसाद देखील वाचून दाखवले. तेव्हा २३ होते. त्यानेही खूप खुश झाली. सकाळपासून जो भेटेल त्याला हे कौतुकाने सांगणे सुरू आहे की आज्जी, भाऊ, माऊ मला २३ कॉमेंटस आल्या
आजवर तिचे बरेच कौतुक फेसबूकला शेअर करून झालेय. याआधी कधी तिला असे फेसबूक वा कुठलेही तिच्या कौतुकाचे प्रतिसाद वाचून दाखवले नव्हते. मुद्दामच टाळायचो ते, कारण मुलांना जे जमत नाही त्याचा न्यूनगंडही यायला नको तसे काही जमले तर झालेल्या कौतुकाने डोक्यात हवाही जायला नको. म्हणून आज हे अप्रूप होते.
@ वावे, स्पर्धेचे आधी सांगितले नाही याचे कारण म्हणजे ती मुळात कॉम्पिटीटीव्ह नेचरची आहे. शाळेत स्पोर्टस होतात त्यात रनिंगच्या आधी स्टान्स असा घेते की त्यावरूनच समजते की हि पोरगी जिंकायलाच आलीय. पुढे गेल्यावरही धावता धावताच मागे वळून आपण जिंकतोय ना याची खात्री करते. तिला जिंकायला आवडते. (कोणाला नाही आवडत?).. पण हार अजून पचवता येत नाही. यावर पालक म्हणून आमचेही काम चालू आहेच. पण आर्ट आणि क्रिएटीव्हिटी या गोष्टी स्पर्धा न करता आनंद उचलत करता यायला हव्यात. ती कलाकृती पुर्ण झाल्यावर आपल्या मनाला मिळणारे समाधान आणि ईतरांच्या डोळ्यातील कौतुक पाहून मिळणारा आनंद हे मोटीवेशन पुरेसे असले पाहिजे. पहिला नंबर किंवा हजार रुपयांचे बक्षीस याची मोटीवेट करायला गरज भासू नये. म्हणूनच मग स्पर्धेचे नाही सांगितले. आणि आताही तिला या छान छान कॉमेंट याच रिवॉर्ड म्हणून दाखवल्या आहेत. त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. येथील प्रत्येक शब्द माझ्यासाठी किंमती आहे
गोड आहे परी आणि परीचे
गोड आहे परी आणि परीचे बुकमार्क सुद्धा..
मस्त आहेत बुकमार्क्स एकदम.
मस्त आहेत बुकमार्क्स एकदम. परी एकदम खट्याळ हसतीये.
रच्याकने, या लहान पोरांची स्पर्धा नका रे ठेऊ. सगळ्यांनीच इतके सुंदर सुंदर प्रकार केले आहेत सगळ्यांना बक्षिस देऊन टाका.
सकाळपासून जो भेटेल त्याला हे
सकाळपासून जो भेटेल त्याला हे कौतुकाने सांगणे सुरू आहे की आज्जी, भाऊ, माऊ मला २३ कॉमेंटस आल्या ...किती क्यूट !!
मामीशी सहमत.
काय क्रिएटिव्ह आहे परी! सगळेच
काय क्रिएटिव्ह आहे परी! सगळेच बुकमार्क्स छान, शाब्बास परी!!
परीच्या परीकथांची तर मी fan
परीच्या परीकथांची तर मी fan आहेच. तिची creativity पण खूप आवडली
>>>>रच्याकने, या लहान पोरांची
>>>>रच्याकने, या लहान पोरांची स्पर्धा नका रे ठेऊ. सगळ्यांनीच इतके सुंदर सुंदर प्रकार केले आहेत सगळ्यांना बक्षिस देऊन टाका.>>>> अगदी सौ टका बात!!!
+७८६ मामी
+७८६ मामी
सगळ्यांना सर्टिफिकेट द्यावेत आणि त्यावर लिहावे मायबोली गणेशोत्सवानिमित्त सुंदर बूकमार्क बनवल्याबद्दल अभिनंदन. झाल्यास धाग्यावर आलेल्या फोटोपैकी एक छानसा फोटोही लावावा. आपला वा आपल्या बूकमार्कचा फोटो आणि सोबत आपले नाव बघूनच मुले खुश होतील. पहिला दुसरा क्रमांक घेऊन काय करणार आहेत ती.
मोठ्यांचे मात्र जरूर नंबर काढावेत. त्यात टाईमपास होतो. प्रवेशिका कॉम्पिटीटीव्ह येतात आणि मतदान प्रक्रियेमुळे वाचकांचा सहभागही होतो
परी व परीने बनविलेले बुकमार्क
परी व परीने बनविलेले बुकमार्क दोन्ही क्युट आहेत.
बुकमार्क कम हेअरक्लिप !
बुकमार्क कम हेअरक्लिप ! कल्पना आवडलीच! डोकेबाज आणि गोड आहे परी! वाचून झाल्यावर बुकमार्क कुठे ठेवला म्हणून शोधायला नको. डोक्याला असेलच केसांना लावलेला. मॉडेल आणि प्रात्यक्षिक पण छान
कसली गोड आहे परी.
कसली गोड आहे परी.
बुकमार्क्स एकसे एक क्युट, शाब्बास परी.
मामीला मम.
धन्यवाद सुर्यगंगा चंद्रा
धन्यवाद सुर्यगंगा चंद्रा अंजू
वाचून झाल्यावर बुकमार्क कुठे ठेवला म्हणून शोधायला नको. डोक्याला असेलच केसांना लावलेला.>>> हो ॲक्चुअली
आर्ट आणि क्रिएटीव्हिटी या
आर्ट आणि क्रिएटीव्हिटी या गोष्टी स्पर्धा न करता आनंद उचलत करता यायला हव्यात >> खूप चांगला विचार
रच्याकने, या लहान पोरांची
रच्याकने, या लहान पोरांची स्पर्धा नका रे ठेऊ. सगळ्यांनीच इतके सुंदर सुंदर प्रकार केले आहेत सगळ्यांना बक्षिस देऊन टाका..........जोरदार +१.
खूपच क्यूट आहेत बुकमार्क
खूपच क्यूट आहेत बुकमार्क
परी एकदम गोड आहे. आणि
परी एकदम गोड आहे. आणि बुकमार्क पण सुंदर बनवलाय.
खूप मस्त बुकमार्क परी!
खूप मस्त बुकमार्क परी!
क्रियेटीव्ह आहे मुलगी
भारी झालेत सगळेच बुकमार्क.
भारी झालेत सगळेच बुकमार्क.
खूप गोड बुकमार्क आणि गोडुली
खूप गोड बुकमार्क आणि गोडुली परी
मस्त.. धन्यवाद सर्वांना.. परी
मस्त.. धन्यवाद सर्वांना.. परी खूप खूश होणार आहे ईतके सारे छान छान प्रतिसाद बघून
गोंडस आहे लेक आणि लेकीचे
गोंडस आहे लेक आणि लेकीचे कलाकाम पण मस्तच..
(परिचा पण घरी हेअरकट/फ्रंट
(परिचा पण घरी हेअरकट/फ्रंट बँग केलेत का?छान दिसतेय)
Submitted by mi_anu on 30 August, 2020 - 08:26
>>>>>
आता पुन्हा पोरीसोबत प्रतिसाद वाचताना पाहिले हा..
हो, तिचे आणि पोराचे घरीच कापले त्यांच्या आईने. माझा नेमका तेव्हाच ऑफिस कॉल आल्याने मला या सोहळ्याचे फोटो विडिओ शूट करायला मिळाले नाही म्हणून हळहळलो होतो
मागचे सहा महिने आमचेही घरीच
मागचे सहा महिने आमचेही घरीच सुरु आहे मुलांचे पार्लर,नवरा न्हावी.
मला वाटते सगळे मुलांचे घरीच केस कापत असावेत.
जस्ट कुतूहल, कुणी बाहेर नेतय का मुलांना हेयर कट साठी?
बाहेर नक्कीच नेत नसावेत
बाहेर नक्कीच नेत नसावेत
पण बाहेरचा घरी आणत असतील आता
छान आयडिया परी . मस्तच .
छान आयडिया परी . मस्तच .
खूप काळ माबोपासून लांब
खूप काळ माबोपासून लांब असल्यामुळे ऋन्मेष ला मुलं आहेत (तो फारच प्रौढ आहे) हे काय मला अजून झेपेना
बुकमार्क छान बनवले आहेत
मस्त आहे बुकमार्क. लेकही गोड
मस्त आहे बुकमार्क. लेकही गोड आहे.
मस्त बुकमार्क्स. शाब्बास!
मस्त बुकमार्क्स. शाब्बास!
धन्यवाद फोर एस - स्वस्ति,
धन्यवाद फोर एस - स्वस्ति, सिमंतिनी, स्वाती, संशोधक
@ संशोधक, बालविवाह होता. म्हणून गर्लफ्रेंडच्या नावाखाली लपवावा लागत होता. दाढी मिसरूड फुटले तसे उघड केले आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद
परी खूप छान आहे..परीचे डोळे..
परी खूप छान आहे..परीचे डोळे....वाह सुंदर .परीने बनविलेले बुकमार्क दोन्ही क्युट.मस्तच..
Pages