Submitted by हरचंद पालव on 26 August, 2020 - 08:32
माझं हस्ताक्षर अजिबात चांगलं नाही. तरी वाटलं, उत्साहाच्या भरात आपणही भाग घ्यावा. निदान माझं अक्षर बघून एखाद्याचा न्यूनगंड पळून जाईल आणि भाग घेण्याची इच्छा होईल. तसे झाल्यास मी ही स्पर्धा इथेच जिंकलोय!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जमलंय.
जमलंय.
माझेही अक्षर खराब आहे पण मी लिहून पोस्ट करणार होतोच आज, उद्या. तुम्ही आधी नंबर लावलात.
तुमचं अक्षर आधी खूप छान असावे असे वाटतेय.
डाव्या हाताने लिहिले आहे का ?
.
निदान माझं अक्षर बघून
निदान माझं अक्षर बघून एखाद्याचा न्यूनगंड पळून जाईल आणि भाग घेण्याची इच्छा होईल. तसे झाल्यास मी ही स्पर्धा इथेच जिंकलोय! >>>
जिंकलात! उद्याच टाकतो माझी प्रवेशिका
स्पष्ट आहे. वाचता येत नीट.
स्पष्ट आहे. वाचता येत नीट. (थरथरतात का हात ?)
सद्हेतु सफल झाला.
वा मानव आणि हर्पेन, शुभेच्छा
वा मानव आणि हर्पेन, शुभेच्छा आणि धन्यवाद.
अस्मिता, धन्यवाद. खरंय, पूर्वी जरा बरं होतं अक्षर. सध्या हात नीट स्थिर राहत नाही (फक्त लिहिताना, सवय नसल्याने)
निदान माझं अक्षर बघून
निदान माझं अक्षर बघून एखाद्याचा न्यूनगंड पळून जाईल आणि भाग घेण्याची इच्छा होईल. तसे झाल्यास मी ही स्पर्धा इथेच जिंकलोय!>> छान विचार!
छान लिहिलं आहे. खरंच सवय
छान लिहिलं आहे. खरंच सवय सुटतेच हाताने लिहायची - मलाही जाणवलं लिहिताना.
पालव जी मस्त प्रयत्न
पालव जी
मस्त
प्रयत्न
चांगले लिहिलेय. स्पष आणि
चांगले लिहिलेय. स्पष्ट आणि कुठेही गिरवणे किंवा खाडाखोड नाही.
>> पूर्वी जरा बरं होतं अक्षर. सध्या हात नीट स्थिर राहत नाही (फक्त लिहिताना, सवय नसल्याने)
तसे असेल तर खूपच छान अक्षर म्हणेन मी.
स्पर्धा नाही. हा तर सुंदर हस्ताक्षरारांचा मेळाच भरलाय जणू.
हस्ताक्षर आवडले. त्यामागची
हस्ताक्षर आवडले. त्यामागची भावना तर खूपच.
अवांतर - आता उदाहरण देता येणार नाही पण आपले प्रतिसाद आवडतात. विनोदबुद्धी तीक्ष्ण आहे तुमची.
पालवजी>> तुम्ही डाव्या हाताने
पालवजी>> तुम्ही डाव्या हाताने लिहीलंय का ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हस्ताक्षर आवडले. त्यामागची
हस्ताक्षर आवडले. त्यामागची भावना तर खूपच. >>> मम.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हाळसा, हो मी डाव्या हातानेच लिहिले आहे. पण मी लेफ्टीस्टच आहे.
atuldpatil, स्पर्धेऐवजी मेळा
atuldpatil, स्पर्धेऐवजी मेळा हा शब्द आवडला.
प्रयत्न आणि त्यामागची भावना
प्रयत्न आणि त्यामागची भावना आवडली. हात थरथरत असावा लिहिताना. अक्षर खरोखर चांगले आहे. पण काटकुळे आहे. म्हणजे एकमितीय आहे. त्याला जाडी नाही. एक तर ज्या साधनाने लिहिले आहे त्याचे निब अथवा टोक thin असावे अथवा हातात ऊर्जा नसावी. लिहिताना कागदावर दाब देता आला नसावा. पण जर शाईचा फ्लो चांगला असेल तर वर वर लिहिले तरी ठळक उमटते. असो.
या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक हस्ताक्षरे "वाचायला" मिळाली. काही अंदाज, ठोकताळे बांधायला, अनुभवायला मिळाले. काही पडताळण्या मनाशीच करून बघता आल्या. माझीच काही प्रमेये दुरुस्त करता आली. त्यासाठी संयोजकांचे आभार.
हीरा, तुमचा प्रतिसाद अतिशय
हीरा, तुमचा प्रतिसाद अतिशय उद्बोधक आहे. तुमच्या मुद्द्यांचा विचार करून नक्कीच अक्षर सुधारायचा प्रयत्न करेन. धन्यवाद!
हीरा + १
हीरा + १
हस्ताक्षर आवडले. त्यामागची
हस्ताक्षर आवडले. त्यामागची भावना तर खूपच.>>>>>+१११
आणि इथले सगळ्यांचेच प्रतिसाद ही आवडले
धन्यवाद धनुडी
धन्यवाद धनुडी
चांगला प्रयत्न. शुभेच्छा.
चांगला प्रयत्न. शुभेच्छा.
छान आहे की.. मी वाचू शकतो.
छान आहे की.. मी वाचू शकतो. तुम्ही तिथे वाचायचे आमंत्रण दिलेत त्यामुळे मी अगदी गूढ काहीतरी वाचायला मिळेल या अपेक्षेने आलेलो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मेघना. आणि ऋन्मेऽऽष.
धन्यवाद मेघना. आणि ऋन्मेऽऽष.
ऋन्मेऽऽष, अगदी कोंबडीचे नाही, तरी करकोच्याचे आहेत की नाही पाय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हस्ताक्षर आवडले. त्यामागची
हस्ताक्षर आवडले. त्यामागची भावना तर खूपच.>>>>>+१११
माझा आवडता श्लोक आहे हा. मनातल्या मनात म्हणा, मोठयाने म्हणा, चुकून कानावर पडू द्या, ऐकलं की कसं प्रसन्न वाटतं.
छान आहे. सराव केला रोज तर
छान आहे. सराव केला रोज तर अजूनच सुधारेल.
हे डाव्या हाताने लिहिलेत का ?
हे डाव्या हाताने लिहिलेत का ? चांगला आहे प्रयत्न
ट्युलिप, मामी आणि जाई,
ट्युलिप, मामी आणि जाई, प्रतिसादाबद्दल आभार!
जाई, हो डाव्या हाताने लिहिलं आहे.
मजा म्हणून टाकतो आहे. नियमाचे
मजा म्हणून टाकतो आहे. नियमाचे उल्लंघन असल्यास काढून टाकेन.
हा हा हरचंद पालव!
हा हा हरचंद पालव!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
, तुमचा हजरजबाबीपणा फारच
माझ्या निवडक दहा मध्ये गेलं हे !
Pages