श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 26 August, 2020 - 08:32

माझं हस्ताक्षर अजिबात चांगलं नाही. तरी वाटलं, उत्साहाच्या भरात आपणही भाग घ्यावा. निदान माझं अक्षर बघून एखाद्याचा न्यूनगंड पळून जाईल आणि भाग घेण्याची इच्छा होईल. तसे झाल्यास मी ही स्पर्धा इथेच जिंकलोय!

hp.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ऑ काय हो हे Happy
हस्ताक्षरात शेवटून पहिल्या वर माझा हक्क आहे .

विजेत्याचे अभिनंदन करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार.

mi_anu, पुढच्या वेळी (स्पर्धा पुन्हा कधी झाल्यास) जोरदार प्रयत्न करा. बेस्ट लक! Happy

हरिचंद्रजी >> हे टोपणनाव जरा विशेष आहे! आवडलं Happy

काय हे पालव जी,
मागितले असते तर कोरे दिले असते की तुम्हाला.
Wink

देतो की,
कोरे चेक, कोरे स्टॅम्प, कोऱ्या नोटा काय मागाल ते देतो.
.
त्या आकाराचे कोरे कागद द्यायला माझे काय जातंय? Wink

अहो पालव...मला वाटलं होतं. खरं खरं तुमच्या प्रामाणिक अक्षराबद्दल तुम्हाला पारितोषिक मिळालंय.. म्हणून मी अभिनंदन केलं..तसं नाहीये का?हे तुम्हीच तुम्हाला दिलंय होय?
अरे देवा Lol

mrunali.samad, अहो भगवद्गीतेत म्हटलंच आहे 'उद्धरेदात्मनात्मानं'. स्वतःच स्वतःचा उद्धार करावा.

अहाहा पालव. शेवटून पहिले नाही परंतु उत्तेजनार्थ पारितोषिक तुम्हालाच मिळाले असते. अभिनंदन. मुद्दाम लिहिलेल्या खराब अक्षरात तुमचा प्रथम क्रमांक.

Pages