।।विहीर तुडुंब।। (अलक कथा)

Submitted by mi manasi on 22 August, 2020 - 13:24

।।विहीर तुडुंब।।
(अलक कथा)

भुकेली, तहानेली
ती त्या अनोळखी गावांत आली.
जवळंच तिला एक जुनी विहीर दिसली.
पाणी पहाण्यासाठी ती आंत डोकावली.
आणि पडली ती तिथेच राहीली.
आता ती विहीर बाराही महिने...
तुडुंब भरलेली असते.
लोक म्हणतात "देव पावला!"

मी मानसी...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे रे।छान मांडलीये, कमी शब्दांत.

Mrunal samad
Cuty
धन्यवाद! हो! रूपकच आहे.

च्रप्स...
विहीर तुडुंब- स्वप्नपूर्ती

ती- संसाराची स्वप्न मनांत घेऊन दुसऱ्या, अनोळखी घरी जाणारी मुलगी.
किंवा एखाद्याचे भविष्य घडवावे या ध्येयाने प्रेरीत होऊन एखाद्याला मदत करणाऱ्या संस्था/पूर्णपणे अनोळखी व्यक्ती.

नावारुपाला आलेल्या व्यक्तीबद्यल बोलतांना लोक त्याच्या कर्तृत्वाला आणि प्रसंगी नशीबालाही त्याचे श्रेय देतात..
नशीब काढलं शेवटी!... म्हणतात.
वर सांगितलेल्या व्यक्तींचा त्याग प्रकाशात येत नाही.

Urmila Mhatre धन्यवाद!
हसणारी बाहुली
(कशी टाकायची माहीत नाही)

रूपक कथा
अस असता ना कि कुणाचा तरी बळी दिल्या शिवाय पाणी लागत नाही ना.
हे मा वै म

केशवकुल धन्यवाद!
मी फक्त त्यामागची मानसिकता विचारात घेऊन हे रूपक मांडलंय इतकच !