Submitted by Janhavi jori on 7 August, 2020 - 14:09
विहंग
वाटले मज आज होऊनी विहंग
उधळावेत रंग आसमंतातले..
घेतली भरारी पसरूनी पंख
उमटलेत तरंग बघ पाण्यावरी...
मिटलेल्या गच्च पापण्यांनी घेतली मी खोल उडी
केल्या भंग आज मी माझ्याच खोट्या ह्रडी...
न्याहाळतीये हे विश्व होऊनी विहंग
मीच मज संग का उरलेली?
अर्थ लावत मी या जगण्याचा
गाठते सुरुंग मनाच्या अंताचा..
गवसले मज आज होते जे हरवले
बांधिला आता चंग नव्या उम्मेदीचा!
- जान्हवी जोरी.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान
खूप छान
छान !
छान !
सुंदर कविता
सुंदर कविता
सुंदर
सुंदर