अनामिक लेखकांचे लेख मायबोली वर स्वत:च्या नावाने प्रसिध्द करणे योग्य आहे का?

Submitted by वीरु on 2 August, 2020 - 10:45

गेल्या दिवसात मायबोली वर यापुर्वी अन्यत्र वाचलेले लेख पुन्हा वाचण्यात आले. संबंधित धागालेखकांना हे लेख त्यांचे नसल्याचा कोणताही उल्लेख करावासा वाटला नाही. याबद्दल प्रतिसादात विचारले असता 'मला आवडला म्हणुन मी तो मा.बो. वर प्रसिध्द केला.' अशी उत्तरे मिळाली. एका महाशयांनी थोडाफार फेरफार करुन प्रसिध्द केलेला लेख तर मायबोली वर आधीच प्रसिध्द झाला होता. त्यांना
हे सांगितल्यावर 'मी मायबोलीवरचे लेख वाचलेले नाहीत कारण माझ्याकडे माहितीचं
भांडार आहे.' हे भन्नाट उत्तर मिळालं.
हे योग्य आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्भपात नैतिक की अनैतिक?
समलिंगी संबंध नैतिक की अनैतिक?
मांसाहार नैतिक की अनैतिक?
औषधांसाठी उत्पादन शुल्कापेक्षा शेकडो/हजारो पटीने जास्त किंमत आकारणे नैतिक की अनैतिक?
उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं वागणं हे नैतिक की अनैतिक?
नैतिकता सापेक्ष (subjective) असते का? असावी का?

"बाराखडीचे कॉपीराईट" अशी चर्चा काही प्रतिसादांत झाली आहे त्यावरून हि बातमी आठवली:

https://en.wikipedia.org/wiki/British_Telecommunications_plc_v._Prodigy

इंटरनेटवर एखाद्या वेबसाईट/वेबपेज वगैरेची लिंक हि कल्पना आजकाल खूप सामान्य झाली आहे. पण वीसेक वर्षांपूर्वी त्यावर ब्रिटीश टेलीकॉमने आपला हक्क सांगितला होता. इंटरनेट वापरकर्त्याच्या कोणत्याही हायपरलिंकवरच्या प्रत्येक क्लिक मागे इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून आपल्याला पैसे मिळावेत अशी त्यांची मागणी होती. पुढे न्यायालयात हा दावा टिकला नाही.

लेखांचा सपाटाच लावतात आणि एखाद्या धूमकेतूसारखे अंतर्धान पावतात >>> अविअप्पा आठवले मला
Submitted by प्रणवंत on 4 August, 2020 - 13:46


काय योगायोगाने आठवण काढलीत. ते ३० जुलैलाच गेले. मिपावर लेख आला आहे.

अरे देवा ! काल इथल्या कमेंट वाचुन उगाच त्यांचा धागा वर आणला. मी बाकी दुसऱ्या मराठी साईट्स वापरत नसल्याने मला काही कल्पना नव्हती त्यांच्याबद्दल. मलाही ते वयाबद्दल खोटंच वाटायचं. कमेंट डिलीट करायची सोय नसल्याने माझा नाईलाज आहे. अनवधानाने माझ्यामुळे त्यांच्या आप्तेष्टाना त्रास झाला असेल, त्यांची मी माफी मागतो _/\_ Sad

कायदा हा समाजाच्या त्यावेळच्या नैतिकतेचा अविभाज्य भाग असतो.
लंडनमधील समाजाच्या त्या वेळच्या नैतिकतेच्या कल्पनेनुसार, अ‍ॅलन ट्युरींग यांना शिक्षा झाली.
काही काळाने जेव्हा इंग्लिश समाजाच्या नैतिकतेच्या संकल्पना बदलल्या, सगळ्यांना सामावुन घेणाअ-या झाल्या तेव्हा ट्युरिंग यांना मरणोत्तर गुन्ह्यातुन मुक्त केले गेले. त्या अनुषंगाने अशाच इतर हजारो केसेस नव्याने मरणोत्तर निष्पाप म्हणून घोषीत केल्या गेल्या.
हे असे जगात सगळीकडे सर्व प्रकारच्या राज्यव्यवस्थेत पुर्वीपासुन होत आले आहे.

त्यामुळॅ कायदा व नैतिकता या दोन वेगळ्या अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी नाहीत. कायदा व नैतिकता संबंधीतच आहेत.
आजच्या आपल्या नैतिकतेने उद्याचा कायदा बनणार आहे, त्याची कक्षा रुंदावणार आहे.

आज रोजी आपली नैतिकता बदलुन, त्याची कक्षा रुंदावुन, काळाच्या ओघात हरवुन गेलेल्या या संशोधकांना आपण त्यांचा योग्य तो मान, नामोल्लेख व मोबदला देणार आहोत की नाही असा प्रश्न आहे.

अमेरीका, भारत व ईतर अनेक देशात,
जे सैनिक युद्धादरम्यान किंवा इतर मिशनवर असताना कायमचे देशासाठी कामी येतात, हरवतात, एखाद्या कारणामुळे कधीच परत येत नाहीत, शोध लागत नाही, ओळख पटु शकत नाही - अशा सर्व अनामिक सैनिक व गुप्तहेरांसाठी स्मारके उभारलेली आहेत. ते सैनिक नक्की कोण , किती, त्यांची नाव काय ईत्यादी सगळेच काळाच्या उदरात गडप झाले. पण तरीही आपण अशा अनामिक योद्ध्यांसाठी स्मारके उभारली. कारण असे करणे हे आपल्या आजच्या नैतिकतेच्या परिघात येते.

तसेच सर्व प्रकारचे संशोधक, विशेषतः या चर्चेच्या निमित्ताने बाराखडीचे संशोधकही आपल्या नैतिकतेच्या परिघात यावेत. तेव्हा उद्याचा कायदा जेव्हा बनेल तेव्हा तो त्यांना सामावुन घेईल.

इथे,
१. नामोल्लेख कराव की नाही
२. भरपाई द्यावी की नाही
३. कृतज्ञता व्यक्त करावी की नाही
४. न्याय करावा की नाही
५. भरपाई कोणी द्यावी
६. भरपाई कोणाला द्यावी
७. भरपाई किती व कशी द्यावी

हे सर्व सात मुद्दे हे वेगवेगळे टप्पे आहेत.
आपण आता फक्त पहिल्या, १-४ या टप्प्यांबद्दल बोलुया आज. उद्याची पिढी ५-७ चा विचार करेल.

"बाराखडीचे कॉपीराईट" अशी चर्चा काही प्रतिसादांत झाली आहे त्यावरून हि बातमी आठवली:
Submitted by atuldpatil on 5 August, 2020 - 13:22
>>
अतुल,
तांत्रीक बाबीतला कायदा नैतिकता व भाषा/कला ( लिपी, बाराखडी) या विषयातला कायदा व नैतिकता हे एकच कसे असतील? त्यामुळे हे उदाहरणे पुर्णपणे असंबंद्ध आहे.
त्या विकीपीडीया पेजवरचा पहिल्याच पॅरामधला हा उल्लेख तुम्ही नीट समजुन घेतला का:
On summary judgment, McMahon held that there were substantial differences between British Telecommunications' patent and the method of operation of the Internet

त्यांची केस यासाठी नाही नाकारली कारण तुम्ही म्हणताय तस बाराखडीच्य मागणीसारखे त्यांची मागणी योग्य नव्हती. त्यांचे पेटंट आणि इंटरनेट कसे काम करते या तांत्रिकदृष्ट्या भिन्न गोष्टी असल्यामुळॅ त्यांचे पेटंट इथे लागु होऊ शकत नाही म्हणुन ते नाकारले.

दोन्हीतला फरक समजुन घ्या.

>> तांत्रीक बाबीतला कायदा नैतिकता व भाषा/कला ( लिपी, बाराखडी) या विषयातला कायदा व नैतिकता हे एकच कसे असतील? त्यामुळे हे उदाहरणे पुर्णपणे असंबंद्ध आहे.

तसा संबंध आहे असे मी म्हणालो नाही. ते मला आठवले कारण ऑफिसमध्ये तेंव्हा हि चर्चा सुरु होती. ब्रिटीश टेलिकॉम ने त्यांचे पेटंट फाईल करून अनेक वर्षे झाली होती. त्या पेटंटचा हायपरलिंकशी थेट संबंध नव्हता (कोर्टाने सुद्धा याच आधारे दावा फेटाळला). पण तरीही ती जागरूकता त्यांनी दाखवली हे आम्हाला खूप विशेष वाटले. माझा इथला उल्लेख त्या संदर्भात होता.

>> उगाच गुगलमधे काही टाईप करुन दोन संबम्ध नसलेल्या विषयातल्या

मी "आठवले" असे स्पष्ट लिहिले आहे. गुगल करून सापडले असते तर तसा उल्लेख केला असता Happy असो.

ठिक आहे. पण तुमच्या आधीच्या प्रतिसादाचा अर्थ असा लागतोय की तुमचा बाराखडीच्या संशोधकांना नामोल्लेख / मानधन देणे याला विरोध आहे व तशीच एक अनाठायी केस म्हणुन तुम्ही हे उदा दिले. असो.

पण तरीही ती जागरूकता त्यांनी दाखवली हे आम्हाला खूप विशेष वाटले. माझा इथला उल्लेख त्या संदर्भात होता.
>>
ओके. सतत ही अशी जागरुकता दाखवत राहणे हेच काम असते मोठ्या कंपन्यांच्या वकिली टिमचे.

>> तुमच्या आधीच्या प्रतिसादाचा अर्थ असा लागतोय की तुमचा बाराखडीच्या संशोधकांना नामोल्लेख / मानधन देणे याला विरोध आहे

अशा अर्थाचे कोणतेही वाक्य माझ्या प्रतिसादात नाही.

>> सतत ही अशी जागरुकता दाखवत राहणे हेच काम असते मोठ्या कंपन्यांच्या वकिली टिमचे.

असते. पण याबाबत असे झालेले नाही. त्यांना ते पेटंट तसे अनायासेच सापडले.
एका बातमीत उल्लेख आहे: इतक्या वर्षांत अनेक पेटंट फाईल केली गेली होती. दुसऱ्या एका केस संदर्भात त्यांची छाननी केली जात असता हे सापडले. त्यावरून त्यांच्या लक्षात साधर्म्य आले व केस फाईल केली. तोवर इंटरनेट आणि हायपरलिंक दोन्हीचा वापर सुरु होऊन सुद्धा अनेक वर्षे उलटली होती.

कायदा आणि नैतिकता वरील चर्चा पाहून याची आठवण झाली.

कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!
https://www.maayboli.com/node/51663

झरूर वाचा हा धागा. ईथे यावर काही चांगली वाईट चर्चाही झाली आहे.

Pages