अनामिक लेखकांचे लेख मायबोली वर स्वत:च्या नावाने प्रसिध्द करणे योग्य आहे का?

Submitted by वीरु on 2 August, 2020 - 10:45

गेल्या दिवसात मायबोली वर यापुर्वी अन्यत्र वाचलेले लेख पुन्हा वाचण्यात आले. संबंधित धागालेखकांना हे लेख त्यांचे नसल्याचा कोणताही उल्लेख करावासा वाटला नाही. याबद्दल प्रतिसादात विचारले असता 'मला आवडला म्हणुन मी तो मा.बो. वर प्रसिध्द केला.' अशी उत्तरे मिळाली. एका महाशयांनी थोडाफार फेरफार करुन प्रसिध्द केलेला लेख तर मायबोली वर आधीच प्रसिध्द झाला होता. त्यांना
हे सांगितल्यावर 'मी मायबोलीवरचे लेख वाचलेले नाहीत कारण माझ्याकडे माहितीचं
भांडार आहे.' हे भन्नाट उत्तर मिळालं.
हे योग्य आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु भारी ☺️

<<<वेमांनी कोणाचा धागा उडवला हे कळत नाही. त्यात प्रोफेसर त्यांचे सगळे लेख रद्द करत सारखे पहिल्या पानावर झळकत आहेत. त्यात ते काही खुलासाही करत नाहीत. त्यामुळे लोकांचा तेच हे असा गैरसमज झाला असावा.>>>
वेमांनी दोघांचे धागे उडवले होते. त्यात जे पहिले होते, त्यांनी कबूल केले की त्यांना माहीत नव्हते की असे कुठलेही आवडलेले लेख/कथा इकडे टाकायची नाही. म्हणून धागा उडाला त्याचा त्यांनी बाऊ केला नाही अन त्यांना कोणी काही बोलले ही नाही.
पण ह्या महाशयांनी तसे न करता, मीच बरोबर बाकी सगळे वाईट असे प्रकार चालू केले.

असो, आता कदाचित त्यांचे सगळे लिखाण उडले आहे वाटत, काहीच दिसत नाहीये.

पण ह्या महाशयांनी तसे न करता, मीच बरोबर बाकी सगळे वाईट असे प्रकार चालू केले.>>>> हा माबोवरचा लेटेस्ट ट्रेंड आहे.

अगदीच राहवत नाही म्हणून लिहीत आहे. संबंधीत लेखकांचे लेखन अगदीच बाळबोध वाटते, खुपदा त्यांनी काहीतरी लिहायचे आहे म्हणून लिहिले आहे असे वाटते, शुद्धलेखनाचे नियम मला जसे वाटले तसे लिहिणार हे संशोधक/प्राध्यापक व्यक्तीचे मत अपेक्षितच नाही (अर्थातच हे माझे व्यक्तिगत मत आहे, काहीना आवडते म्हणून सगळयांनाच आवडले पाहिजे आवश्यक नाही).

लेखक स्वतःला लहान मुलांचे संशोधक म्हणवतात, प्राध्यापक हे बिरूद लावतात आणि मोठ्या मोठ्या वाचनालयातील कामांचा अनुभव सांगतात त्यांना एवढे हि कळू नये की कोणालाच दुसर्या व्यक्तीचा लेख (अगदी स्वतःच्या आप्तसकीयांचा असला तरी) त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय शिवाय पुन्हा स्वतःच्या नावाने प्रकाशित करता येत नाही. जर एखादा लेख आवडला आणि त्यात आपल्याला स्वतःचेही म्हणणे घालून प्रकाशित करायचा असला तर मूळ लेखाचा संदर्भ द्यावाच लागतो. विशेषतः जेव्हा संशोधनपर लेख एखाद्या नियतकालिकातला प्रकाशनासाठी पाठवला जातो तेव्हा त्यांना हा मूळ लेख असून हा इतरत्र कुठेही प्रकाशित केला किंवा पाठवला नाही असे घोषणापत्र सर्व लेखकांच्या संमत्तीने जमा करावे लागते (Letter of declaration). त्यानंतर त्या लेखातील वाङमयचौर्य (plagiarism) तपासले जाते. नियतकालीकांच्या मानकानुसार असल्यास पुढील परीक्षण (review) साठी पाठवल्या जातो, अन्यथा लेखकाला लेखनात फेरबदल करून पुन्हा जमा करण्यास सुचवले जाते.

जेव्हा आपण जाहीरपणे कबूल करतोय की दुसर्या व्यक्तीचा लेख मला आवडला म्हणून तो जरा विस्तार करून लिहिलंय तर माफी मागून पुढे जाण्यात शहाणपणा आहे. तुम्ही माझ्या इतर लेखांवरही संशय घेतला म्हणून आरोप - प्रत्यारोप करण्यात काहीही अर्थ नाही. असे बोलून तुम्ही स्वत:वरच संशयाची सुई फिरवत आहात. त्यांच्या एका प्रतिसादात वाचले की त्यांना अश्रू आले वैगेरे (मला तर वाचून चक्क हसू आल). एखाद्या लेखकाला वाङमयचौर्य वरून टीका होते किंवा त्यांचा लेख नियतकालिकाकडून फेरबदलांसाठी वापस केला जातो, तेव्हा त्याचे दु:ख समजू शकतो. पण त्यासाठी उमेद न हरता, अश्रू न ढळता सुचवलेले बदल करून जमा करणे अपेक्षित असते. तो बदल लिखाणाचा दर्जा उंचावण्यासाठीच असतो ही सकारत्मकता असणे आवश्यक आहे. नियतकालिकही त्यांनी सुचवलेले फेरबदल तुम्ही स्वीकारावेच असी जबरदस्ती करत नाहीत. तुम्हीही आपल्या बचावात्मक मुद्दे मांडून खंडन करू शकता, प्रकाशकाचे समाधान झाले आणि त्यांनी मान्य केले तर ते फेरबदलविनाही लेख स्वीकारतात. तेव्हा तुम्ही माझ्या इतर प्रकाशित लेखांवरही वाङमयचौर्याचा आरोप लावत आहात हा बचावात्मक मुद्दा घेऊच शकत नाही.

प्राध्यापक आहेत म्हणजे नक्की PhD असणार आणि त्यांना ही माहिती असणे अपेक्षीतच आहे. आणि समजा PhD नसतील तर मग प्राध्यापक हे बिरूद लावणेही अत्यंत चुकीचे आहे. UGC च्या नियमावलीनुसार मुळात समजा एखादा PhD/MBBS/BDS/BAMS/BHMS/MD/MS/DM/DNB ई. पैकी पदवीधारक व्यक्ती Assistant Professor/Lecturer/Tutor/Reader/Associate Professor असेल तर त्याला Dr हेच बिरूद लावता येत, तो जर Professor म्हणून कार्यरत असेल तरच त्याला नावाआधी Prof (प्राध्यापक) लावून मिरवता येते (अर्थातच हा तांत्रिक मुद्दा आहे). वाचनालयात प्राध्यापक काम करतात हे ऐकिवात नाही. आमच्या Institute चे प्रमुख ग्रंथपाल (Chief Librarian) हे स्वत: PhD होते आणि त्यांची Library Science ह्या विषयात अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना प्राध्यापकाचा दर्जा प्राप्त होता (ते मागील महिन्यातच निवृत्त झाले), त्यांची छायांकित प्रतींवर attestation साठी स्वाक्षरी चालत असे, पण त्यांनीही कधीही स्वत:च्या नावाआधी प्राध्यापक (Professor) लिहीत नव्हते.

अरे बापरे (मी हुशार वगैरे नाही.असेच उदाहरण आठवले म्हणून दिले.)
रेल्वे मध्ये सूचना असते की बिना तिकीट पकडलं गेल्यावर 'तुम्हाला नियम माहिती नव्हता' हा दंड माफ होण्यासाठीचा एक्स्क्यूज ठरू शकत नाही.पण गंमत अशी की दुसऱ्याचं लिखाण बिनधास्त नाव उडवून किंवा 'आवडलं म्हणून' नाव लपवून किंवा 'नाव माहिती नव्हतं म्हणून स्वतःच्या नावाने लिहिलं' स्वतःच्या नावाने पब्लिश करताना पब्लिक ला ही पण प्रॉपर्टी आहे ही जाणीव होत नाही.(माझ्या टिप्पणी प्रोफेसर महाशयांबद्दल नसून जनरल आहेत.मुळात हा लेख त्या केस बद्दल आहे हे इथे वाचूनच कळलंय.)

लेखन पुनर्लेखन व प्रसिद्धी मध्ये अनेक पायर्‍या असतात. पहिला ड्राफ्ट दुसरा तिसरा कितवाही मग पक्के लेखन. मग एडिटिन्ग प्रूफिन्ग व मग फायनल रिलीज. असे असते. आज काल इथे नवे लेखक मनात विचार येइ तो तो लेखनात उत रवून पार प्रसिद्ध करून मोकळे होतात. व मग साध्या चुका , ज्या कोणीही लेखनातल्या कामाचा अनुभव असलेला व्यक्ती सहजच दुरुस्त करू शकेल , दाखवल्या की इतके हर्ट होतात/ रागवतात की विचारू नका. मी चीफ कॉपिरायटर म्हणून व फ्री लान्स लेखिका म्हणू न इंग्रजीतून काम केले आहे. एकेक शब्दाला आपण व आपला व्यावसायिक वजूद पणाला लावलेला असतो. अचूक लेखन हा एक अभिमानाचा भाग आहे. मग तो सातबाराचा उतारा असो की गोड प्रेम कथा की गहन वैचारिक लेख. एक वाक्य सुद्धा नेहमी शुद्ध लिहावे. तितके प्रयत्न करावेत व मेहनत घ्यावी कारण आपले नाव त्याला जबाबदार असते.

अमा, तुमचे अनुभव लिहा
या प्रोफाइल चे आणि सध्याच्याही(जर कंपनी धोरणात बसत असेल तर)

लेखन पुनर्लेखन व प्रसिद्धी मध्ये अनेक पायर्‍या असतात. पहिला ड्राफ्ट दुसरा तिसरा कितवाही मग पक्के लेखन. मग एडिटिन्ग प्रूफिन्ग व मग फायनल रिलीज. असे असते. आज काल इथे नवे लेखक मनात विचार येइ तो तो लेखनात उत रवून पार प्रसिद्ध करून मोकळे होतात. व मग साध्या चुका , ज्या कोणीही लेखनातल्या कामाचा अनुभव असलेला व्यक्ती सहजच दुरुस्त करू शकेल , दाखवल्या की इतके हर्ट होतात/ रागवतात की विचारू नका. मी चीफ कॉपिरायटर म्हणून व फ्री लान्स लेखिका म्हणू न इंग्रजीतून काम केले आहे. एकेक शब्दाला आपण व आपला व्यावसायिक वजूद पणाला लावलेला असतो. अचूक लेखन हा एक अभिमानाचा भाग आहे. मग तो सातबाराचा उतारा असो की गोड प्रेम कथा की गहन वैचारिक लेख. एक वाक्य सुद्धा नेहमी शुद्ध लिहावे. तितके प्रयत्न करावेत व मेहनत घ्यावी कारण आपले नाव त्याला जबाबदार असते.---------------------------------------------------- पूर्णपणे सहमत.

माझे जे काही मोजके संशोधनपर लेखक प्रकाशित झाले आहेत, त्यांचे मी किती कच्चे मसुदे तयार केले असतील त्यानंतर सहलेखकांनी कितीतरी त्यात बदल केले असतील ह्याचा हिशोब नाही. शेवटी professional English writer कडून editing व proof reading करूनच नियतकालिकाला जमा केले आहेत.

अनेकदा मायबोलीवरच्या बर्याच लेखकांना सूचना करावीशी वाटते कि तुम्ही आपले लिखाण तपासून बघा. किमान दोन तीनदा स्वतःच जोरजोरात वाचा, चूक दिसल्यास दुरुस्त करा. आधी कच्चे मसुदे तयार करा. जवळच्या व्यक्तीस वाचायला द्या, त्याला योग्य वाटल्यानंतरच आंतरजालावर प्रकाशित करा. कित्येकदा लेखक उगीचच randomly लिहितो आहे असे जाणवते. शुद्धलेखनबद्दल तर विचारही करू नये. समजा त्यांना कुणी चूक दाखवली की मान्यच करत नाहीत, किंवा विनाकारण वाद घालतात. काही स्वयंघोषित व तथाकथित लेखक तर आपल्या ब्लोगवरच्या कथा इकडे देतात, त्यांना अनुकूल प्रतिसाद दिला तर ते उत्तर देतात. कित्येकदा काही निवडक लोकांच्याच प्रतीक्रीयेंची वाट बघत असतात. अन्यथा ढुंकूनही बघत नाहीत. ते जसे जगतात तसेच त्यांच्या कथेतील पात्रांनी जगावे हेच गृहीत धरून चालतात. काही लेखक तर आपल्या ब्लॉगवरून मायबोलीवर लेख टाकल्यावर फिरकुनही बघत नाहीत, वाचकांच्या प्रतिक्रियाही जाणून घेत नाहीत. काहीतर नवोदित लेखक ब्लॉगवरच्या लेखांचा सपाटाच लावतात आणि एखाद्या धूमकेतूसारखे अंतर्धान पावतात.

>>आज काल (=हल्ली) इथे नवे लेखक मनात विचार येइ तो तो लेखनात उतरवून पार प्रसिद्ध करून मोकळे होतात. >>>
फेसबुकातून लेखक झालो. म्हणजे लिहू लागलो. नैतर कुठे लिहून प्रसिद्ध करणार किंचिंत लेखक? पेपरवाल्यांकडे एवढे नामी लेख येत असतात ते कशाला ढुंकून पाहतील अनामिकांना?
आताचा विषय उचलणे आहे.

तुमच्याकडे त्या ट्रानझॅक्शनचा काही पुरावा आहे का?>>>
आहे की नसायला काय झालं
मी काही हवाला केला नाही
Submitted by आशुचँप on 4 August, 2020 - 11:58

>>>>

मग प्लीज शेअर कराल का?

See if you are creative you will write original stuff. If you are not then copy paste. And fake glory. They are not aiming for jnanpeeth ज्ञान पीठ पारितोषिक award. Just some validation from peers.

अविअप्पा आठवले मला
पण ते एकदा म्हणाले ना की माझं वय ८५ आहे. डिजिटल युगाचा उपयोग करत आहेत हेच विशेष वाटतं.

बायदवे ज्ञानपीठ Dnyanpith किंवा ग्यानपीठ Gyanpith असा शब्द असताना त्याचे स्पेलिंग Jnanpith [ज्नानपीठ - जनपथ - जनपीठ - जनपीथ] असे प्रथम कुणी केले असेल? नक्कीच कोणतरी इद्वान थेरडा असणार. म्हणून सगळ्यांनी त्याचे थेट चुकीचे स्पेलिंग स्विकारले. एखाद्या विद्यार्थ्याने असे स्पेलीन लिवले असते तर मात्र त्याला कानाखाली प्रसाद मिळाला असता.

srd, मला ते वयाचं खरं नाही वाटत. बाकी त्यांची ती सैतानाचा पुत्रजन्म का काय अशा नावाची कथा आहे ती मराठी कथालेखनातील मापदंड आहे. नव्या लेखकांनी आवर्जून वाचावी. Lol

दोन प्रश्न विचारायचे आहेत..
१.आपल्या वाचनात आलेल्या लेखांमधील एखादी ओळ आपल्याला फारंच आवडली असेल आणि जर ती आपण आपल्या लेखात वापरली तर ती देखिल साहित्य चोरीच समजली जाते का? उदाहरणार्थ - पूर्वी वाचलेली आणि आवडलेली एक सर्दी बद्दलची ओळ जी नेहमी आठवते “माझ्या नाकाचा नायगरा फाॅल झाला” .. आता ही ओळ जर मी कधी माझ्या लिखाणात लिहीली तर ती साहित्य चोरी समजली जाईल का?
२.विनोद निर्मितीसाठी काही वेळा म्हणी अथवा वाक्प्रचार मुद्दाम फेरबदल करून टाकण्यात येतात. पण ते तसं मुद्दाम केलंय हे पटवून देणंही कठीणच.. मग अशा गोष्टीही अशुद्ध लेखनातच मोडतात का?

म्हाळसा बँग ऑन पॉईंट वन...
चार ओळी, एक परिच्छेद जशाच्या तसा म्हणजे चोरी तर वाक्य देखील चोरीच असायला हवी..

असे असेल तर ज्या व्यक्तिने अ आ ई शोधले त्याच्या व्यतिरिक्त बाराखडीचा वापर करणारे सर्वच जण चोर ठरतील ना. हीच गोष्ट सर्व शब्द कोषातील सर्वच शब्द संगहासाठीसुद्धा लागू असेल. व्युत्पत्तिकारकाव्यतिरक्त सर्वच चोर !

अ आ ई ओपन सोर्स आहे.क्रिएटर ने रिडिस्त्रीब्युशन परवानगी दिलेली आहे.
आणि स्वतः लिहिलेली एखादी कथा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे.
बाकी आवडलेलं वाक्य म्हणाल तर 'कुठेतरी वाचलेलं आवडलं','पु लं म्हणतात' इत्यादी लिहून मग कोट करायला काहीच हरकत नाही.

आवडलेला परिच्छेद कोट करण्याबद्दल पण हेच.
आवडलेला पूर्ण लेख/पूर्ण कथा दुसऱ्याने तशीच्या तशी उतरवता येत नाही. कॉपीराईट कायद्या नुसार 'रेफरन्स' म्हणून नमूद करायचे असल्यास मूळ मजकुराच्या जास्तीत जास्त 10% आणि तोही गरजेचा असल्यास कोट करता येतो(म्हणजे मुद्दाम 10 लेख लिहून सगळे 10 10 टक्के कोट करावे असेही नाही.)

परत एकदा, हे सर्व एथिक्स आहेत.दंडक आहेत.
चोरीला 'तो अमका नेहमी चोरून वापरतो.मी का वापरायचे नाही?त्याने विकत घेतल्याची पावती दाखवत नाही ना तो, मग मी त्याच्या कपाटातून घेतलं तर काय गेलं,'त्याच्याकडे 10 आहेत.मी 2च घेतले.इतकं काय?' हे सर्व एक्स्क्यूजेस द्यावेसे वाटले तरी ते एथिकल नाहीत हे देणाऱ्यालाही कळावं.

Pages