अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर वाटतं आता राजेंनी आणि शुभ्राने लग्न करुन निजो - डबड्याला त्यंच्या हालांवर एकटं सोडुन आपापला मार्ग निर्धोक करण्यात शहाणपण आहे.
+100

Please don't insult dogs they are way better in character than this spoilt brat. He should be sent to army training

Please don't insult dogs they are way better in character than this spoilt brat. He should be sent to army training +१२३

Please don't insult dogs they are way better in character than this spoilt brat. He should be sent to army training>>>>> army training ला असली शेळपट कार्टी उपयोगाची नसतील हो. कर्तृत्वशून्य बबड्याला राजेंनी त्यांच्या रेस्टॉरंटमधे कपबशा विसळायला ठेवला तरी जास्तच होईल ते त्याच्या अकलेप्रमाणे.
बादवे आसाचा चष्मा बदलू शकतो, पोराबाबतचा दृष्टीकोन नाही.

आसा अल्टिमेट कॅर् न आहे इमोशनली मॅनिप्युले टीव गोड गोड बोलुन त्या मुलाचा गुळाचा गणपती करून ठेवला आहे. अश्या आया फार डेंजरस असतात. पण निजो च्या चेहर्‍यावरचे बोटॉक्स त्या वयस्कर शेफला काय गोड वाट्ते? ही बाई संसाराने काचलेली पैशाचा त्रास असलेली विधवा गरीब स्वभावाची अशी कधीच दिसलेली नाही. एक सुरकुती नाही की पांढरा केस नाही. आणि रोज उठून चुलीला हळ्द तिखट सॉरी कुंकू लावण्या पलि कडे काय करते ती? जरीच्या साड्या पाठ दाखवे ब्लाउज दाखवून मिरवते फक्त. नक्की ह्यांच्य कडे काय व कोण स्वयंपाक करते का अभिज किच्चन मधू न मागवतात?!

इमोजी कसे टाकायचे, कुणी सांगेल का?>>>
माझ्यापुरता screenshot काढून ठेवलाय. लिंक देता येत नाही मला.

IMG_20200805_155659.jpg

विसर्गानंतर आणि आधीही स्पेस द्यायची नाही.

Light 1
दिच्या आधी आणि वाच्या नंतर रिकामी जागा नको आहे.

इकडे रत्नागिरीलाही तसंच वातावरण आहे श्रवु. ढगफुटी झाल्यागत पाऊस आणि वादळी वारा. आमच्याकडे दोन दिवसांनी लाईट आलेय.

Pages