अनामिक लेखकांचे लेख मायबोली वर स्वत:च्या नावाने प्रसिध्द करणे योग्य आहे का?

Submitted by वीरु on 2 August, 2020 - 10:45

गेल्या दिवसात मायबोली वर यापुर्वी अन्यत्र वाचलेले लेख पुन्हा वाचण्यात आले. संबंधित धागालेखकांना हे लेख त्यांचे नसल्याचा कोणताही उल्लेख करावासा वाटला नाही. याबद्दल प्रतिसादात विचारले असता 'मला आवडला म्हणुन मी तो मा.बो. वर प्रसिध्द केला.' अशी उत्तरे मिळाली. एका महाशयांनी थोडाफार फेरफार करुन प्रसिध्द केलेला लेख तर मायबोली वर आधीच प्रसिध्द झाला होता. त्यांना
हे सांगितल्यावर 'मी मायबोलीवरचे लेख वाचलेले नाहीत कारण माझ्याकडे माहितीचं
भांडार आहे.' हे भन्नाट उत्तर मिळालं.
हे योग्य आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आणि स्वतः लिहिलेली एखादी कथा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे.<<
पेटंट (घेतलेलं असेल तर) च्या व्याप्तीवर अवलंबुन आहे. पेटंट मधे लूपहोल्स काढता येत नसते तर अ‍ॅंन्ड्रॉय्ड जन्मालाच आली नसती... Wink

>>“माझ्या नाकाचा नायगरा फाॅल झाला”<<
तुम्हि "माझ्या नाकाचा गिरसप्पा किंवा जोग झाला" असं लिहा. पुल, मंत्री इ. प्र्भृतींनी तेच केलं... Proud

>>“माझ्या नाकाचा नायगरा फाॅल झाला”<<
तुम्हि "माझ्या नाकाचा गिरसप्पा किंवा जोग झाला" असं लिहा. पुल, मंत्री इ. प्र्भृतींनी तेच केलं... >>> आणि नायगरा फाॅल बद्दल लिहिताना जर मी लिहिलं “थंडीत एखाद्याचं नाक वाहावं तसा हा वर्षभर वाहातच असतो“ तर? इथेही नाक व नायगरा हे मला सुचलेले काॅंबिनेशन नाहीए फक्त वेगळ्या पद्धतीने मांडलंय.

अनु +१
अभि_नव तुम्ही ओपन सोर्स, लायसंसिंग इ. जाणता तरी असं लिहाल असं वाटलं नाही.

इथेही नाक व नायगरा हे मला सुचलेले काॅंबिनेशन नाहीए फक्त वेगळ्या पद्धतीने मांडलंय.
>>>

याला इन्स्पिरेशन बोलतात. चोरी नाही.

वर काही लोकांनी अनुमोदन लिहिलेय.
त्यासाठी +१ असे लिहायचा शोध कोणीतरी लावला.
मी त्यावरून ईन्स्पायर होत माझ्या स्टाईलने +७८६ लिहू लागलो.
माझे पाहून काही जण असे लिहू लागले. अर्थात याला चोरी न म्हणता स्टाईल कॉपी करणे बोलू शकतो
पण मला मात्र ७८६ हा नंबर अमिताभने या आधी दिवारमध्ये वापरलेला म्हणून साहित्यचोरीचा आरोप सहन करावा लागलेला.

शेवटी पकडला जाईल तो चोर बाकी सारे राजा मंत्री शिपाई हेच खरे !

बरेचदा असेही होते, वा होत असावे की लिहीताना आपल्याला एखादे छानसे वाक्य सुचते. पण प्रत्यक्षात ते ओरीजिनली आपल्या डोक्यातून आलेले नसून कुठेतरी वाचलेले असते त्यावरूनच सुचलेले असते. फक्त आपल्याला ते कळत नाही. कारण विस्मृतीच्या कप्प्यातून अचानक बाहेर आलेले असते.

यावरून असेही म्हणू शकतो की ज्या माणसाचे वाचन अफाट अस्स्ते त्यासाठी ओरिजिनल लिहीणे तितकेच अवघड होत जाते.

यावरून असेही म्हणू शकतो की ज्या माणसाचे वाचन अफाट अस्स्ते त्यासाठी ओरिजिनल लिहीणे तितकेच अवघड होत जाते.>> पूर्णपणे सहमत

यावरून असेही म्हणू शकतो की ज्या माणसाचे वाचन अफाट अस्स्ते त्यासाठी ओरिजिनल लिहीणे तितकेच अवघड होत जाते
>>> म्हणूनच मी लिहत नाही... उगाच साहित्यचोरीचा आरोप नकोच...

बायदवे ज्ञानपीठ Dnyanpith किंवा ग्यानपीठ Gyanpith असा शब्द असताना त्याचे स्पेलिंग Jnanpith [ज्नानपीठ - जनपथ - जनपीठ - जनपीथ] असे प्रथम कुणी केले असेल? >> मोठा विषय आहे. ज्ञ ह्याचा मराठी (द्+न्+य), हिंदीत (ग्+य), कन्नडात (ग्+न) वेगवेगळा उच्चार केला जातो. मराठीत तर त्याला आपण मुळाक्षराचा दर्जा दिला आहे. परंतु मूळ संस्कृतात ते एक जोडाक्षर असून ते ज्+ञ यांपासून बनते. त्याचा मूळ उच्चार देखील तसाच आहे, जो वेगवेगळ्या भाषिक लोकांनी वेगवेगळा बदलून घेतला. त्यामुळेच ज्ञा ह्या धातूपासून जानाति असे रूप बनते, ज्यापासून जाणणे हा शब्द आला आहे. आता इंग्रजी/रोमन लिपीत ञ, ङ, ण,.न ह्या सानुनासिक अक्षरांसाठी पर्यायी अक्षरच नसल्यामुळे सर्वांसाठी n हेच वापरले जाते. त्यामुळे 'ज्ञान' साठी 'ज्+ञ्+आ न्+अ' = Jnana हेच सर्वात योग्य आहे.

अ आ ई ओपन सोर्स आहे.क्रिएटर ने रिडिस्त्रीब्युशन परवानगी दिलेली आहे.
नवीन Submitted by mi_anu on 4 August, 2020 - 21:21
>>
क्रियेटर ही एकच व्यक्ती होती याबद्दल खात्री आहे का?
ही परवानगी कोणत्या स्वरुपात व कधी दिली? ती कुठे वाचायला मिळेल?
अ, आ हे स्वर नैसर्गीक असतील, पण "अ" कसा लिहायचा हे ज्याने ठरवले / शोधले त्याची परवानगी कुठे आहे? आधीच कोणीतरी "अ" कसा लिहायचा ते शोधले होते, त्याला फक्त एक काना दिला की त्याला "आ" म्हणुया हे ज्याने शोधले/ठरवले त्याची परवानगी कुठे आहे?
या दोघांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला का? की आज ते त्यांची बाजु मांडायला हयात नाही म्हणुन आपण त्यांची बौद्धीक संपत्ती फुकटात त्यांना ग्रुहीत धरुन कशीही वापरायची?

अभि_नव तुम्ही ओपन सोर्स, लायसंसिंग इ. जाणता तरी असं लिहाल असं वाटलं नाही.
Submitted by अमितव on 4 August, 2020 - 21:44
>>
मी दिलेला +१ बाराखडी संदर्भातला आहे. सद्ध्याच्या काळातल्या इतर लेखकांच्या लेखनातील ओळी/पॅरा कोट करण्याबद्दल नाही.
ते कोट करताना, लेखकाचा व पुस्तकाचा उल्लेख करुन एखादा पॅरा/ओळ कोट करायला हरकत नाही.

अ आ ई च्या मुद्याबाबत,
बारखडी शोधणा-या व्यक्तीची रेकॉर्डेड लिखित परवानगी दाखवा मग मी माझे स्तेटमेन्ट मागे घेतो.
केवळ काळाच्या ओघात कोणताही रेकॉर्ड ठेवता न आल्यामुळे बाराखडी, देवनागरी लिपी यांचे संशोधन्कर्ते आपल्याला माहित नाहीत. नाहीतर त्यांचे योग्य ते मानधन देऊनच त्यांच्या परवानगीनेच लिपी वापरावी लागली असती. आजही अनेक नवे डीझायनर फॉन्ट तयार होतात त्याचे लायसन्स घ्यावे लागते.

कॉपीराईट हा अनंत काळापर्यंत नसतो. भारतामध्ये लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षे कॉपीराईट टिकतो. त्यानंतर ते लेखन, संगीत, चित्र(पट) प्रताधिकारमुक्त होते (public domain).
ओपन सोर्स आणि पब्लिक डोमेन यात फरक आहे.ओपन सोर्स मध्ये प्रताधिकाराच्या मालकाने काही अटी घालून वापर करण्यास परवानगी दिली असते. त्या अटी पाळणे बंधनकारक आहे. पण पब्लिक डोमेन मधल्या कलाकृतींचा कोणीही कसाही कशासाठीही वापर करू शकतो.
बाराखडी ओपन सोर्स नाही तर पब्लिक डोमेन आहे.

बाराखडी ओपन सोर्स नाही तर पब्लिक डोमेन आहे.
नवीन Submitted by व्यत्यय on 5 August, 2020 - 07:57
>>
हे तुम्ही कशाच्या अधारावर ठरवले? पुरावा काय?
हे आर्ग्युमेंट केवळ या पायावर उभे आहे की आज बाराखडीचे खरे जनत हयात नाहीत, त्यांची बाजु मांडु शकत नाहीत काही बोलु शकत नाहीत व ही बौद्धीक संपदा तयार करुन हजारो वर्षांचा काळ लोटला आहे. एकप्रकारे दृष्टीआड सृष्टी. जगात एवढे सगळॅ वाईट होत असते पण ते दुस-या देशात होते आपल्याला त्याचे काय - असेच झाले ते.
या पायाला कोणताही नैतीक आधार नाही. तर केवळ सोय आहे.

हल्लीच दुस-या एका धाग्यामधे कोणीतरी अशी कमेंट केली होती की आजपासुन १००० वर्षानंतरचा माणुस हा जास्त मानवीय, सहिष्णु, दयाळु, मैत्री भावना असलेला व नैतीक असेल. त्या दिशेने पहिले पाऊल टाकुन, एका ख-या नैतीक जगामधे -utopia - बाराखडी बनवणा-या व्यक्तीच्या वंशजांना शोधुन योग्य ते मानधन देऊ केले पाहिजे.

कॉपीराईट हा अनंत काळापर्यंत नसतो. भारतामध्ये लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षे कॉपीराईट टिकतो.
>>
ठिक आहे मग त्या साठ वर्षांचे तरी मानधन द्या? ३०००-५००० वर्षांचे व्याजही पकडा त्यात.
आणि जरी लेखकाची परवानगी घेण्याची गरज साठ वर्षांनंतर संपत असली तरी मुळ कर्त्याचे नाव तर तसेच राहते ना? की नाव पुसता येते? नामोल्लेख तर करावाच लागेल ना?

अभिनव यांच्याशी सहमत

आपले आपणच ठरवले आहे की हे फुकटात वापरले तर चालते.
६० वर्षांच्या कॉपीराईटचा नियमही त्यानंतर बनला असेल. म्हणजे तो बनवून बाराखडीला लावणेही आपल्या सोयीचेच आपण बघितलेय.

अर्थात आता कोणाची परवानगी घेणार वा कोणाला मोबदला देणार हा प्रश्नच असेल.. पण निदान त्याचे समर्थन तरी करू नये.

मला जे म्हणायचंय ते व्यवस्थित लिहिलंय. समजून घ्यायचं की नाही तो तुमचा प्रश्न.

'आपले आपणच ठरवणे' आणि 'त्या काळात कॉपीराईट/पब्लिक डोमेन/ओपन सोर्स चे योग्य नियम कागदावर आणि कायद्यात बनलेले असणे' यात फरक आहे.'त्याकाळी चालले' म्हणून आता चालवून घेतले पाहिजे, आता ते बरोबर आहे असे नाही.आणि वारसांना मोबदला द्यायला हरकत नाही.

बाराखडी शेकडो (हजारो?) वर्षांपासून अस्तित्वात असल्याने, सध्याच्या कायद्यानुसार पब्लिक डोमेन आहे.
तुमचा या कायद्याच्या स्वरूपालाच आक्षेप असेल तर सनदशीर मार्गाने विरोध करून कायद्यात बदल करून घेऊ शकता. तोपर्यंत सध्याच्या कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे.
कायदा आणि नैतिकता या भिन्न बाबी आहेत.

Pages