वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पॉयलर अलर्ट
ज्यांना सिरीज बघायची आहे त्यांनी वाचू नका

मलाही हाच प्रश्न पडलाय
इतकी वर्षे ते एकत्र आहेत तिला जराही शंका येत नाही की नवरा वेगळा वागतो अधून मधून

इथे इंडियन मॅचमेकिंग नाही का बघितली कोणी? बरेच वाद चालू आहेत त्यावरून. कैच्या कै आहे पण खूपच टाईमपास आहे. ह्याच बाईंची अ सुटेबल गर्लपण आहे नेफ्लिवर.

निरपराध लोकांचे खून बघायचे असतील, बघवत असतील, तर बघा >>> ओहह असं आहे त्यात.

गिरीश ओक मठाधिपती असतो आणि कर्मठ असतो, त्या सीरियल मधली सून >>> रेशम प्रशांत, चांगला अभिनय करते, दिसायलाही सुंदर, मला आवडते. त्यामानाने फार दिसत नाही, अंजली मध्ये हि होती युवाच्या.

स्पॉयलर अलर्ट breath :

तो शेवटी शर्लीकडे चिटोर्यावर कसला नंबर असतो. कळलं। नाही.

तो शेवटी शर्लीकडे चिटोर्यावर कसला नंबर असतो. कळलं। नाही. >> मला वाटतं, त्याच्या रुमचा किंवा भेटायच्या जागेचा नंबर असतो.

नेफी वर The Spy करून एक सिरीज सध्या बघते आहे मोसाद च्या एका secret agent वर आहे...शब्द नाहीयेत कौतुक करायला, story, direction acting ,casting
इथे आधी कोणी लिहिलं असेल तर सॉरी मी धागा वाचला नाहीये पूर्ण

इन्डियन मॅचमेकींग खूप बोअर...
चार तास वाया गेले. सीमा आंटी डोक्यात गेली. लग्न तर सोडा कुणाला नवीन नाते सुद्धा नको होते. वेबसिरीज साठी डेटिंग होते. डेटिंग साठी वेबसिरीज नाही असं वाटलं. पण मुलांसोबत पहाता येते.
Thanks dodo14. The spy आवडेल असे वाटते.

इंडीयन मॅच मेकिंग इट्स सो बॅड इट्स गुड कॅटेगरी आहे. Happy.
+ १
एक बात यात मला आवडली की रियलिटी सेरीझ मध्ये जे खुप अनरियल दाखवतात तसे नाही यात.
उगाच खुप बॅक स्टॅबिन्ग. लफडी, रिबेल दाखवले नाहित.
अर्थात ज्यांची लग्न जुळवणे कठीण आहे असेच लोक निवडलेत पण ते एकदम मॉडेल्स नाहित तर आपल्या आजु बाजुला दिसणारे वाटतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे फॅमिली बरोबर पहाता येइल अशा सेरिझ आज काल फार राहिल्या नाहित.
आमच्या ऑफिस मध्ये तर खुप अमेरिकन्स बघतायेत आवडीने, काहींना अशी सिस्टीम इथे पण असावी असे वाटते.

मला वाटतं, त्याच्या रुमचा किंवा भेटायच्या जागेचा नंबर असतो. ~~ येस.. बरोबर. जे अजूनही आहे गेला नाही.. अविनाश वर पकड कायम आहे.. असं आहे ते शेवटी.

नेफी वर The Spy करून एक सिरीज सध्या बघते आहे मोसाद च्या एका secret agent वर आहे...शब्द नाहीयेत कौतुक करायला, story, direction acting ,casting~~~ अगदी dodo14 .. मागच्या वर्षी पाहिली होती ही सिरीज. अप्रतिम आहे

इंडियन मॅच मेकिंगचा बोनस एपिसोड आलाय नेटफ्लिक्स इंडिया युट्युअब चॅनलवर.

https://youtu.be/FB_nr_x5Xbc

ती अपर्णा सोडून इतर सगळे बिघडलेली इमेज रिबिल्डिंग करायचा प्रयत्न करत आहेत असे वाटले, अपर्णा खूप प्रामाणिक आणि क्लिअर आहे तिच्या आपेक्षां मधे. व्यासर, नादिया हे पण नॉर्मल होते.
एक मात्र नक्की , कि सोशल मिडियाच्या हेट्रेडबद्दल सगळ्यांना कल्पना आली आहे.

एक मात्र नक्की , कि सोशल मिडियाच्या हेट्रेडबद्दल सगळ्यांना कल्पना आली आहे.>>> म्हणजे?
मला अक्षय च्या आई चे आणि त्याचे हसु येत होते, ये देखो मेर बीपी, फ्रेम करो लॉल... आणि मुलाचे वय काय तर २५ !!

अपर्णा खूप प्रामाणिक आणि क्लिअर आहे तिच्या आपेक्षां मधे. >> मला अपर्णा खूप रिजीड आणि गर्विश्ठ वाटली.

एक मात्र नक्की , कि सोशल मिडियाच्या हेट्रेडबद्दल सगळ्यांना कल्पना आली आहे.>>> म्हणजे?
<<
सोशल मिडियावर मिलियन्स ऑफ युझर्सनी व्हरच्युअल जोडे मारले आहेत शो ला, त्यात अक्शय अँड फॅमिलीला सर्वात जास्तं हेट्रेड.
अर्थात नेटफ्लिक्सला फरक पडत नाही, उलट फायदाच .. कुठ्ल्याना कुठल्या कारणाने मोस्ट टॉल्क्ड अबाउट शो !

मला अपर्णा खूप रिजीड आणि गर्विश्ठ वाटली>> सिरियसली. कशाचीच क्लॅरिटी नाही आयुष्यात. म्हणजे तिला स्वतःचा जॉब, प्रोफेशन आवडत नाही आणि अशा प्रोफेशन मध्ये 24/7 अडकून पडली आहे. टोटली कन्फ्युज्ड. अशीच एक कलिग, सिंधीच. लॉ फर्मच.. परदेशी मास्टर्स डिग्री. बक्कळ पगार. आणि काय पाहिजे त्याबद्दल कन्फ्युजन.

पंचायतचे 5 एपिसोड पाहिले , छान आहे .. आधी नावावरून साऊथ इंडियन पिक्चर मधल्या गावातलं राजकारण किंवा खाप पंचायत टाईप काहीतरी प्रकरण असेल असं वाटलं होतं म्हणून पहायची टाळत होते पण तसं काहीच नाही ... खूप सुरेख , हलकंफुलकं आहे कथानक , पात्रं सगळंच ..

प्राईम वर 'बंदिश बँडिट्स' चं ट्रेलर पाहिलं . राजस्थानी लोकेशन्स, कपडे , सेट्स पाहून भन्साळी सिनेमा ची आठवण झाली, शंकर एहसान लॉय चं संगीत आहे.

नेट फ्लिक्स वर इन ह्युमन रिसोर्सेस म्हणून आहे छान आहे. कॉर्पोरेट सेट अप मध्ये वरच्या लेव्हल ला काय चालते. व एक पन्नाशी उलटलेला जॉबलेस एच आर मॅनेजर ते कसे हँडल करतो ते अशी कथा आहे. मुळात फ्रेंच आहे. पण इंग्रजी सब टायटल्स आहेत. पन्नाशी उलटलेल्या लोकांची घुसमट चांगली व्यक्त केली आहे. पण थ्रिलर शो आहे. मोठ्ठ्या कंपनीला चुना कसा लावायचा !!! ते आहे. मजेशीर. सहा भाग आहेत.

अ‍ॅप्पल टिव्हीवर Servant(मानसीक भयपट) बघायला सुरुवात केली आहे.
डोरोथी आणि शॉन हे दांपत्य त्यांच्या १३ महिन्यांच्या बाळाला संभाळण्यासाठी एक बाई(वय१८, एकदम धार्मिक) ठेवतात. मुळात ते बाळ काही आठवड्यांपुर्वी वारलेले असते व त्या धक्क्यातून डोरोथीला सावरण्यासाठी त्याजागी रिबॉर्न डॉल ठेवलेली असते. ज्याला डोरोथी आपले जिवंत मूल समजत असते.
पहिल्या दिवशी डोरोथी कामावर जाते आणि शॉन नॅनीला ती येईपर्यंत तू तुला हवा तसा वेळ घालव असे सांगतो. त्यावर ती म्हणते कि मी बाळाला फिरवून आणते. (त्यावेळी मला वाटले कि बाई, तिचे मुल वारले आहे पण आता तुझे काय??)
आता पुढे बर्‍याच घडामोडी होणार आहेत.... भयपट आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे स्नानगृहात ओल असलेली भिंत, sepia tone effect, गंभीर संगीत आहेच.

मी ब्रीद पाहिली नाहीए बहुतेक बघणारही नाही पण विकीपिडियावर ब्रीदच्या सिनॉप्सीस मध्ये एका ओळीत सगळं सांगून टाकलंय. यापेक्षा वेगळा काही सस्पेन्स असेल तर माहीत नाही पण जर हाच सस्पेन्स असेल तर असं लिहून टाकणं बिनडोकपणा आहे.

मी ब्रीद पाहिली नाहीए बहुतेक बघणारही नाही पण विकीपिडियावर ब्रीदच्या सिनॉप्सीस मध्ये एका ओळीत सगळं सांगून टाकलंय. यापेक्षा वेगळा काही सस्पेन्स असेल तर माहीत नाही पण जर हाच सस्पेन्स असेल तर असं लिहून टाकणं बिनडोकपणा आहे.

नेट फ्लिक्स वर इन ह्युमन रिसोर्सेस म्हणून आहे छान आहे. >> अमा, धन्यवाद. असले प्रकार आवडतात पाहायला. म्हणजे कंपन्यांना चुना लावायचे नाही पण कॉर्पोरेट ह्यूमर Happy (तो ही इण्टेन्शनल, झी मराठी वरचा नव्हे)

कॉर्पोरेट ह्यूमर Happy (तो ही इण्टेन्शनल, झी मराठी वरचा नव्हे) >>> फा Lol
सध्या Kim's Convenience हे कनेडियन सिटकॉम बघत आहे नेटफ्लिक्स वर. मस्त लाइट कॉमेडी.
https://www.imdb.com/title/tt5912064/
कॅनडा - टोरन्टो मधे एक लहानसे कन्विनियन्स स्टोर चालवणारा कोरियन इमिग्रन्ट असलेला मि. किम , त्याची बायको, आणि कॅनडात जन्माला आलेले तरुण मुलगा आणि मुलगी अशी फॅमिली. किम ला इमिग्रन्ट (आणि मनाने अजूनही ट्रॅडिशनल कोरियन) म्हणून येणारे मजेशीर अनुभव, मुले कॅनेडियन असल्यामुळे त्यांच्याशी होणारे टिपिकल डिफरन्सेस हे सगळे देशी पालक म्हणून सहज रीलेट करता येते.

मी तर इंडियन मॅचमेकिंगच अजून बघत आहे.
मज्जा आहे.
खरोखर हल्ली मॅचमेकिंग रियल लाईफमध्ये पण असंच आहे. त्यामुळे मला फार फेक वाटत नाहीये.

ऑफिस तुकड्यातुकड्यांत पाहिलेली आहे. अनेक भाग धमाल आहेत. पण सलग पाहिली नाही. जेव्हा ती पहिल्यांदा टीव्हीवर आली होती तेव्हा फारशी आवडली नव्हती.

Kim's Convenience >>> अनेकदा पास करून पुढे गेलो आहे. बघायला हवी.

Pages