अनामिक लेखकांचे लेख मायबोली वर स्वत:च्या नावाने प्रसिध्द करणे योग्य आहे का?

Submitted by वीरु on 2 August, 2020 - 10:45

गेल्या दिवसात मायबोली वर यापुर्वी अन्यत्र वाचलेले लेख पुन्हा वाचण्यात आले. संबंधित धागालेखकांना हे लेख त्यांचे नसल्याचा कोणताही उल्लेख करावासा वाटला नाही. याबद्दल प्रतिसादात विचारले असता 'मला आवडला म्हणुन मी तो मा.बो. वर प्रसिध्द केला.' अशी उत्तरे मिळाली. एका महाशयांनी थोडाफार फेरफार करुन प्रसिध्द केलेला लेख तर मायबोली वर आधीच प्रसिध्द झाला होता. त्यांना
हे सांगितल्यावर 'मी मायबोलीवरचे लेख वाचलेले नाहीत कारण माझ्याकडे माहितीचं
भांडार आहे.' हे भन्नाट उत्तर मिळालं.
हे योग्य आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे योग्य नाही आणि मायबोलीच्या धोरणातही बसत नाही. तुम्ही कुठल्या पानावर हे लेख आहेत ते सांगैतले तर काहीतरी करता येईल.
मायबोलीवर तुमचे स्वतःचे लेखन करणे अपेक्षित आहे.
https://www.maayboli.com/terms#content

मायबोलीवर तुमचे स्वतःचे लेखन करणे अपेक्षित आहे.>>
धन्यवाद सर. आपल्या विचारपुसमध्ये संबंधित धाग्यांची लिंक दिली आहे.

एका महाशयांनी थोडाफार फेरफार करुन प्रसिध्द केलेला लेख तर मायबोली वर आधीच प्रसिध्द झाला होता. त्यांना
हे सांगितल्यावर 'मी मायबोलीवरचे लेख वाचलेले नाहीत कारण माझ्याकडे माहितीचं
भांडार आहे.' हे भन्नाट उत्तर मिळालं.>>>>>>>

हे कोण ते सांगू शकाल का? भारीच मनोरंजक प्रकरण दिसतंय हे

कारण माझ्याकडे माहितीचं
भांडार आहे.' हे भन्नाट उत्तर मिळालं
>>>>

हो हे फारच मनोरंजक उत्तर होते : Proud

धन्यवाद सर. आपल्या विचारपुसमध्ये संबंधित धाग्यांची लिंक दिली आहे.
>>> इथेच द्या ना.. लोकांचा वेमाच्या विपु मध्ये जाण्याचा त्रास वाचेल...

इथेच द्या ना.. लोकांचा वेमाच्या विपु मध्ये जाण्याचा त्रास वाचेल...>> Lol वेमांनी उडवले ते धागे.
पण माबो वर काही चांगलं वाचायला यावं तर हे उचलेगिरी केलेले लिखाण पाहिले तर हिरमुड होतो हो. किमान या लोकांनी तसा काही उल्लेख तरी करावा.

हे कोण ते सांगू शकाल का? भारीच मनोरंजक प्रकरण दिसतंय >>>>

कथित लेखक लहान मुलांचे संशोधक आहेत. आय थिंक इतकी हिंट पुरेशी आहे ..

Arrrrrr गाईज ते लेखक महोदय त्यांच सगळं माबो वरचं लिखाण क्लीअर करायला लागलेत Sad

सोडून चाललेत का?

बोकलत राव काय हे Lol
माणसे निघायला लागेपर्यंत टॉर्चर > मी कधीच कोणाला टॉर्चर करत नाही. त्यांना मी फक्त एक साधा प्रश्न विचारला तर त्यांनीच निबंध लिहायला सुरुवात केली. मग मी त्यांना माझ्या एका मित्रासोबत घडलेली घटना सांगितली. बस्स एव्हढच.

हे कुठं सुरू आहे नक्की? >>>> प्रिय ताई / बाई लेख वाचा.
म्हणजे लेख नकाच वाचू, पण इथल्या चर्चेच्या रेफरन्स साठी प्रतिसाद वाचा.

अरे काय चालू आहे लोकहो सगळीकडे. सगळ्या धाग्यांवर हाच वाद.

जर एखादा लेख कॉपीपेस्ट असेल तर त्यांना फक्त नियम सांगा की ईथे असे चालत नाही.

त्यांचा तो लेख देतानाचा हेतू जर आपल्याकडील लेख माहिती शेअर करणे असेल तर त्यात काही गैर नाही

अश्यात त्यांच्यावर लेखन चोरीचा आरोप केल्याने ते बिथरले जे साहजिक प्रतिक्रिया असूच शकते.

@ वेबमास्टर..
एक शंका आहे.
ईथे नवीन आलेल्या सभासदाला हा नियम कळतो का?
म्हणजे सदस्यत्व घेताना ईथे फक्त आपलेच लेखन शेअर करावे अश्या चौकटील टिकमार्क केल्यावरच सभासदत्व मिळते का?

असे नसेल तर ज्या नवीन सभासदाला हा नियम माहीत नसेल वा लक्षातही आला नसेल त्यावर लेखनचोरीचा ठपका ठेवणे वा त्या टोनमध्ये चौकशी करणे हे मला अन्यायकारक वाटते.

एखादी बाई पार्टीत चोरीचा दागिना घालून मिरवतेय. दागिन्याचे खूप बायकांनी कौतुक केले.एकीला आठवले, अगंबाई, मागच्या वेळी आपल्या शेजारच्या कलावती ताईंच्या गळ्यात अगदी असाच्या असा पीस होता.म्हणून बाई या बाईंना विचारायला आल्या, तर बाईंनी काय उत्तर द्यावे?
"तिचा आहे म्हणून काय?मी घरी गेले होते.कपाटाला लॉक नव्हते.मी सहज उघडून पाहिले, मला हा पीस आवडला, मी घेतला. मी काय चोरी नव्हते करत.नंतर कलावती ताईंकडे परत गप्पा मारायला गेल्यावर कपाटात ठेवणार होतेच."
"मला माहिती नव्हते बै, कलावती बाईंना असा त्यांचा नेकलेस दुसरीने घातलेला आवडत नाही.फारच बै कोती मनोवृत्ती. मी पुढच्या वेळी मैनावती बाईंकडूनच घेईन.कटकटच नको."
"माझाच आहे तो.कलावती बाईंकडे असाच दुसरा असेल योगायोगाने."
"त्या चोंबडीनेच माझ्याकडून घेतला होता. माझ्याकडे पाच वर्षांपासून आहे.तिने पार्टीत आधी घातला म्हणून काय?"
"ओह सॉरी, या पार्टीत कलावती बाईंच्या ओळखीचे लोक आहेत माहीत नव्हते.पुढच्या वेळी वेगळ्या पार्टीत घालेन."

वेमांनी कोणाचा धागा उडवला हे कळत नाही. त्यात प्रोफेसर त्यांचे सगळे लेख रद्द करत सारखे पहिल्या पानावर झळकत आहेत. त्यात ते काही खुलासाही करत नाहीत. त्यामुळे लोकांचा तेच हे असा गैरसमज झाला असावा.

1000 गेस्ट लेक्चर चे लॉजिक जाणून घ्यायची मला फार उत्सुकता आहे... महिन्याला एक गेस्ट लेक्चर असेल तर 1000/12= 80 वर्षे लागतील 1000 व्हायला.. आठवड्याला एक असेल तर 1000/52= 19 वर्षे...

1000 शक्य असू शकते
आठवड्याला एक का अनेक असतात
मी एकदा गेस्ट लेक्चर दिलं होतं आणि ते दीड दोन तास चाललं आणि त्याचे मग त्यांनी 45 मिनिटांची एक असे दोन मोजून त्याप्रमाणे मानधन दिलं होतं
अर्थात 1000 लेक्चर मिळायला तेवढे ते त्यांच्या क्षेत्रात नावाजले असावेत हे गृहीत धरून

त्याचे मग त्यांनी 45 मिनिटांची एक असे दोन मोजून त्याप्रमाणे मानधन दिलं होतं
>>>>

तुमच्याकडे त्या ट्रानझॅक्शनचा काही पुरावा आहे का?

असे नसेल तर ज्या नवीन सभासदाला हा नियम माहीत नसेल वा लक्षातही आला नसेल त्यावर लेखनचोरीचा ठपका ठेवणे वा त्या टोनमध्ये चौकशी करणे हे मला अन्यायकारक वाटते. >> मला वाटतं चोरीचा ठपका तडक ठेवण्यात आलेला नव्हता. वरती वीरु यांनी म्हटल्याप्रमाणे आधी त्यांनी विचारणा केली/चूक लक्षात आणून दिली, त्यावर त्यांनी चूक मान्य करून क्षमायाचना केली असती तरी प्रकरण एवढे गंभीर झाले नसते. त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली व जणू काही चूकच नाही असा आविर्भाव आणून चुकीच्या गोष्टीवर ठाम राहिले म्हणून वीरुंनी मायबोलीच्या धोरणाबद्दल प्रश्न उपस्थित केला व त्यातून ही कारवाई झालेली दिसते.

मला वाटतं चोरीचा ठपका तडक ठेवण्यात आलेला नव्हता.
>>>>

मला या प्रकरणाचे मूळ माहीत नाही. फार कमी जणांना ठाऊक असेल. कारण हे नेमके कुठल्या धाग्यात लेखात सुरू झाले याचा अंदाज नाही. आणि मी वीरू यांच्या प्रतिसादाचाही संदर्भ दिला नाही. क्दाचित आणखी कोणी काही बोलले असेल वेगळ्या कुठल्या धाग्यावर. मी फक्त प्रकरणाची दुसरी बाजू असू शकते तिचा अंदाज लावायचा आणि ती समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.

Pages