तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी लिस्ट.

ऋन्मेष.
हायझेनबर्ग
बेफिकीर
मधुरा कुलकर्णी
किल्ली.
मी अनु
बिपीन सांगळे.
प्रगल्भ
मिरींडा.
अजय चव्हाण
पाथफाईंडर.
मानव पृथ्वीकर
बोकलत.

बोकलत यांना
त्यांच्या पोस्ट वाचताना खुप हसू येते

@ऋनिल सर भेटूच Lol

फिदी फिदी साठी काय वापरायचं?
लाईक खिदळण्यासाठी :डी वापरायच
एखाद लेटर आहे का कोणत?

आशु जी आरशातच बघून विचारा की>>> आम्ही दोन वेगवेगळी माणसं आहोत रे. धागे वाचून फोटो वैगरे बघून पण डू आयडी कसे वाटतो आम्ही. Lol

बोकलत आणि मी ड्युआयडी

Happy Happy

बोकलत तुम्ही भुतांसोबत आता आयडी पण झपाटून टाकायला लागला का काय Happy

दोघे पुरुष आहेत हे सोडलं तर काय साम्य सापडलं देव जाणे

अमानवीय धागा वाटतं

थोडक्यात नवीन वेताळ आलाय हा माझा तर्क खरा ठरला तर Happy

थोडक्यात नवीन वेताळ आलाय हा माझा तर्क खरा ठरला तर

हा हा हा आशुचँप सहीच :))

वरचं वाचुन आता मलापण संशय यायला लागलाय की मी आणी जेम्स बॉन्ड पण डुआयडी आहोत.

मलाही बोकलत यांना भेटायला आवडेल पण दिवसाउजेडी, संध्याकाळपासून पौर्णिमा असेल अशाच वारी. उगीच रिस्क नको. Happy Happy

खरं तर मी जिथे राहतो तो परिसर पिशच्चमुक्त होतो. मी ज्या एरियात राहतो तिथे मध्यरात्रीनंतर कितीतरी माणसं तुम्हाला बिनधास्तपणे फोनवर गप्पा मारत फिरताना दिसतील. मी सध्या जेथे राहतो ना तिथे रोज रात्री एक कुत्रा दीड दोनच्या सुमारास रडायचा. आजूबाजूची लोकं सांगतात त्याला दुष्ट शक्ती दिसत. मी आल्यापासून रोज रात्री तो माणसाच्या आवाजात हसत असतो. Lol Lol

असे काय जोक्स सांगितलेत त्याला? इथेहीं टाका>>> नका हो असले सल्ले देऊ, नाहीतर ते वाचून इकडचे कुत्र्यासारखे रडायला लागायचे

बोकलत तुम्हाला कुत्र्यांना शांत करण्याचा नवीन बिजनेस मिळु शकतो.>> हो.. प्रत्यक्श यायचीही गरज नाही..प्लॅंचेट थ्रूच बोलवायचं.. वोर्क फ्रोम होम करू शकतील ते Happy

"खरं तर मी जिथे राहतो तो परिसर पिशच्चमुक्त होतो"
प्रत्येक पिशाच्च आपापला एक एरिया ठरवून घेते काय? त्या मध्ये इतरांना मज्जाव?

असू शकत असेल, हद्दी हद्दी वरून मारामारी पण होत असेल
झोटिंग खविस वगैरे दादागिरी करत असणार
मुंजा वगैरे एखादं झाड धरून बसत असणार
हडळ मात्र सगळीकडे संचार करत असणार

Pages