तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही हॉस्टेल ला अशा चखना चोरांना रात्र झाली की डोक्यावर चादर टाकून चांगली पडी द्यायचो त्याची आठवण झाली >>> हे कॉमन आहे. पण माझ्या गोड गोंडस चेहरा आणि निरागस स्वाभावामुळे माझ्याशी असे व्हायचे नाही Happy

परत ऋन्मेष ? ऋन्मेष तू पहाटेपर्यंत माबोवर असतोस, मग कटप्पा बनुन यु एस टाईमलाईन मॅच करणे सोपे नाही का?
>>>>>>>
ऑर्कुटची आठवण झाली
तिथे मला एक अमिरीकेतले फेक प्रोफाईल काढायचे होते. तर मी त्याचा पासवर्ड अमिरीकेतल्या एका मैत्रीणीलाही दिलेला. आणि तिला त्यावरून भारतातल्या रात्री उगाच जोक विनोद गाणी अश्या पोस्ट टाकायला लावायचो, झाल्यास अमेरीकेचे दोनचार फोटोही टाकायची ती.
काही दिवस असे केल्यानंतर मग ते प्रोफाईल भारतात आल्यासारखे दाखवले आणि मग मी चालू झालो Happy

गोड गोंडस चेहरा आणि निरागस स्वाभावामुळे माझ्याशी असे व्हायचे नाही>>>
अशांना तर जास्तीच फटके पडायचे कारण हे गोंडस चेहरा आणि निरागस वगैरे आव आणणारे सगळ्यात कळलावे आणि उपद्रवी असतात
आणि वर पुन्हा साळसूदपणाचा आव
त्यामुळे सगळ्याच पोरांना अश्या सो कॉल्ड निरागस गोंडस चेहऱ्यांना धोपटून काढायची संधी हवी असे

अश्या एका "गोड" रूममेटला आधी रूम मधून आणि नंतर हॉस्टेल मधून हाकलून लावला होता आम्ही. नारदाच्या वर कळलाव्या होता फुकणीचा.. वर आम्ही पोरांनी काही दंगा केला, तर हे रेक्टर समोर जाऊन पातळ *गायचं. आणि काही झकास प्लॅन केला कि त्यावर याच्यामुळे विरजण पडायचं..

तर मी त्याचा पासवर्ड अमिरीकेतल्या एका मैत्रीणीलाही दिलेला.>>
किती थापा मारतो हा मानुस.

"किती थापा मारतो हा मानुस." ---> मी विचारणारच होतो ती अमेरीकेतली मैत्रिण भेटली तरी कुठे Lol
ऑर्कुट वर अमेरिकन मुली पण असतात?
आम्ही टेलिग्राम च्या पुढे नाही गेलो बुवा

किल्ली तुम्ही हा धागा काढला.. आता लोकांना भेटावायच्या कामावर लागा प्लिज... आम्ही फार आशेने नावे दिली आहेत...

मिपावरच्या राही ह्याच मायबोलीवरच्या हिरा असतील(लेखन प्रतिसादावरून तसे वाटते बाकी) तर त्यांना भेटायला आवडेल

भरत, आशूचॅम्प, सिंबा, हर्पेन हे तर आहेतच लिस्टीत.

>>>>मिपावरच्या राही ह्याच मायबोलीवरच्या हिरा असतील(लेखन प्रतिसादावरून तसे वाटते बाकी) तर त्यांना भेटायला आवडेल>>>> अगदी अगदी. हाच प्रश्न मी त्यांना विपु की खरडीत विचारला होता. मलाही त्यांना भेटायला आवडेल. Happy

पूर्वीची पध्हत अशी की ज्या सेलिब्रि टी माबोकर / करणीस भेटायचे आहे त्याच्या सोयी नुसार, प्रवा साच्या स्केजुल नुसार गटग ची तारीख ठरव तात मग त्याचा बाफ काढतात. उदा " झक्की गटग पुणे २० ऑगस्ट . " मग तिथे कोण कोण कसे कसे येणार वगैरे फिक्स करून गटग पूर्ण करता त. इतके नवे काही नाही. फार छान गॅदरिन्ग व्हायचे पूर्वी. व नव्या सदस्या ला गटग चा वृत्तांत लिहा वयास सांगतात. मी हैद्राबादेस राहात होते तेव्हा एक पुण्यातील गटग आयोजित केले गेले होते तिथे फारच मजा आली व एक वेगळा अनुभव असतो. मी अगदीच अमराठी माहौल अ मध्ये राहात असल्याने मला फारच अपरूप आहे त्या गटगचे. लोक दुरून व फुल डे ऑफिस करून आले होते.
लोक काही खाउ छोट्या गिफ्ट पुस्तकांचे बियांचे एक्स्चेंज पण अशा ठिकाणी करतात.

एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमून आधी किंवा नंतर पण असे गटग करता येते. आता करोना काळात मात्र सरकारचे नियम पाळून्च अश्या भेटी करा.

किती थापा मारतो हा मानुस.
>>>>>

ज्याने आयुष्यात कधीही कुठलीही थाप मारली नाही असा माणूस मायबोलीवर असल्यास भेटायला आवडेल मला Happy

अन्जू, तुझी लुडबुड Wink ;तुझ्या पोस्ट्सच मला खूप आवडतात. आणि एवढ्या कणखरपणे तू सगळं हँडल करतेस सो हॅट्स ऑफ . नक्की भेटूया Happy :
बोकलत आप तो हमारे नजदीक ही मंडरा रहे हो Light 1 . अमावस्येला दर्शनयोग आहे का बघते Wink Wink
मानव Proud Proud :

हा मेसेज मी मागे टाकला होता तेंव्हापासून कोणाला भेटायचे मधे माझे नाव सगळेच घेत आहेत... Wink>>>chrmp चे प्रतिसाद भारीच असतात हल्ली, पहिले पण ते मराठी टायपिंग च्या चुका करायचे तेव्हा पण खूप हसू यायचं ते वाचताना

ज्याने आयुष्यात कधीही कुठलीही थाप मारली नाही असा माणूस मायबोलीवर असल्यास भेटायला आवडेल मला>>
मायबोलीवरच्या सर्वात मोठ्या थापाड्याला भेटायला आवडेल. फक्त त्याला तोच मोठा थापाड्या असल्याचं सिध्द करावं लागेल.

मग मला भेटा.
मी सर्वात मोठा थापाड्या आहे.
.
.
.
ही सर्वात मोठी थाप आहे.

Pages