Submitted by स्वाती२ on 12 February, 2020 - 10:34
फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरु झालाय तेव्हा या वर्षीच्या बागकामाबद्दल गप्पा मारण्यासाठी धागा सुरु करत आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मधुमालतीला मात्र ५ वर्षात
मधुमालतीला मात्र ५ वर्षात एकदाही फुलं न आल्यानं त्याला घातलं आहे मिरॅकल ग्रो पण ते अजून फुलायचं मनावर घेत नाही. >> बहुतेक फुल झाडांना Phosphorus अधिक मात्रेत घातले तर खंडी भर फुले येतात असे अनुभवले आहे. अगदी अर्ली क्लीमॅटीस सुद्धा भर उन्हाळ्यामधे ह्या मात्रेने पर एकदा फुलली. हा प्रयोग वरचेवर केल्यास झाडांवर टोल घेतला जातो हा त्याच्या पुढचा अनुभव.
असामी, गीता कालच वाचून झाली
असामी, गीता कालच वाचून झाली की एन पी के धाग्यावर. मधुमालतीचे सगळे लाड, हाल करून झाले, फुलं येत नाहीत. आताही मिरॅकल ग्रोचे Phosphorus जास्त असलेलेच खत आणले आहे. आता मांत्रिक बोलवून झाड सोडवून घेणार आहे
माझ्या मिर्चीला आत्तापर्यंत ४
माझ्या मिर्चीला आत्तापर्यंत ४ मिरच्या आल्या मोजून. मिरच्यांचं ठीक आहे खंडीभर लागत नाहीत. पण भेंड्या वगैरे ४-५ आल्या तर त्याचा काय फायदा? भाजी करण्या इअतपत माल तयार होइतो आधीच्या फ्रीजमध्ये राहाणार आणि मग ताजी भाजी नाहीच मिळणार. म्हणजे भेंडीची १०-१२ रोपच लावायला हवीत. असो.
सध्या माझी औकात फक्त कढीपत्ता आणि पुदीन्याची आणि मिरच्यांची आहे.
ते अंड्याची टर्फलं, कांद्याच्या सालीचं पाणी आणि केळ्याची साल हे उद्योग करून बघीन आता.
एन पी के धाग्यावर >> हे काय
एन पी के धाग्यावर >>
हे काय आहे ग? सापडला.आता मांत्रिक बोलवून झाड सोडवून घेणार आहे >> तू चुकीच्या झोनमधे असशील झाडासाठी असा विचार करून पुढच्या अॅक्श्न्स घेउन बघ
लाल माठ आणि घेवडा सातत्याने
लाल माठ आणि घेवडा सातत्याने वाढताहेत. कोथिंबीर मस्त झाली आहे. मेथीला खूपच छोटी पाने आली आणि मग वाढेना, म्हणून काढली.
कांद्याला नुसतीच पात आली भरपूर. ती पडायला लागली आणि सुकली तेव्हा काढून बघितलं तर खाली कांदेच नाहीत. काय बिघडलं असेल?
टोमॅटो उशीरा लावला होता, त्याला आत्ताशी फुले आली. तरी चेरी टोमॅटोच आहे.
काकडीला फुले आली, छोट्या काकड्या धरल्यापण. पण मोठ्या होत नाहीत. Manual polination पण करून बघितलं. इथे एकाच आठवड्यात रात्रीचे तापमान ९-१५ मध्ये बदलतंय. त्यामुळे असेल का? की अजून काही?
भेंडी एकच आली. त्याला कळ्या येताहेत पण लहान असतानाच पिवळ्या पडताहेत.
मागे ज्या झाडाचा फोटो दिला होता, ते नुसतं वाढतं आहे. त्याला ना फळ, ना फूल.
सगळी झाडे कुंडीत आहेत. व्हेजिटेबल soil आहे आणि कांदा - केळी पाणी.
काकडी आणि भेंडीचा नाद सोडून द्यावा का? काकडी balcony मध्ये आहे पण भेंडी घरात.
आमच्याकडे पहिल्यांदा भेंडीची
आमच्याकडे पहिल्यांदा भेंडीची ६-७ रोपं आली आहेत. रविवारी जवळपास २०-२५ भेंड्या मिळाल्या. या आधी १-२ झाडंच उगवत होती. त्यामुळे भेंडी फक्त कापं, कढी किंवा सांबार यातच वापरत होतो.
मायाळू आणि अंबाडीची पाने
मायाळू आणि अंबाडीची पाने चिरुन, शिजवून, गार करून झिपलॉक बॅग मधे घालून फ्रीझ करता येतात अशी टिप मिळाली मागच्या आठवड्यात. त्यानुसार एक वेळची भाजी होइल एवढी पाने शिजवून फ्रीझ करणे चालू आहे.
यावेळेस लावलेले टॉमेटो मोठाले आहेत ( ४५०-५०० ग्रॅम ) . त्यांचे घरगुती पास्ता सॉस करत आहे पण कॅनिंग वगैरे नाही . फ्रिजमधे ठेवून ४-६ दिवसात वापरायचे असा प्लॅन आहे सध्यातरी.
कार्ली, दुधी, दोडके, आणि काकड्या शेजारपाजारी वाटणे चालू. फॉल सीझनचे मुळे आणि सॅलबार्बिया लावल्या आहेत लॉंग वीकेंडला.
काल कढिपत्ता , मोगरा, जास्वंद , अबोली सगळे घरात आणले - इथे रात्रीचं तापमान ४१-४२ होतं.
Pages