Submitted by स्वाती२ on 12 February, 2020 - 10:34
फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरु झालाय तेव्हा या वर्षीच्या बागकामाबद्दल गप्पा मारण्यासाठी धागा सुरु करत आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यंदाच्या बागकामाची सुरुवात
यंदाच्या बागकामाची सुरुवात झाली. 6 बॅग माती, 2 बॅग Scott turf builder with weed and feed, 6 छोट्या कुंड्यातली फुलं (मधमाशा येण्यासाठी) आणि 2 मोठ्या कुंड्या फुलं घराच्या पुढे लावण्यासाठी अशी खरेदी झाली. बर्ड फीडर मध्ये घालायचे खाद्य विसरलो.खारी ते खाऊन टाकतात, म्हणून रॉडला WD-40 मारतो किंवा व्हॅसलीन लावतो, तेव्हा आठवले. वाफे बऱ्यापैकी तयार झाले आहेत. 2 दिवस रेन गटर्स साफ करण्यात गेले, त्यामुळे बाकी काम नंतर.
काल शेलिंग पीज ( म्हणजे आपले
काल शेलिंग पीज ( म्हणजे आपले हिरवे वाटाणे / मटार ) , अरुगुला आणि मुळ्याच्या बिया वाफ्यामधे पेरल्या. आज घरात टॉमेटो मिर्च्या, वांगी, दुधी, दोडकी आणि कार्ली यांच्या बिया ट्रे मधे लावल्या आहेत.
संध्याकाळी पालक, चार्ड, लेट्य्स आणि क्रेस ( अळीव) यांच्या बिया पेरायच्या आहेत.
मेधा, क्रेसच काय करता?
मेधा, क्रेसच काय करता? माझ्याकडे अळीव आहेत जुने. पेरुन बघीन.
आभा ,
आभा ,
पहिल्यांदाच लावलेत अळीव. मायक्रो ग्रीन्स बद्दल वाचताना त्यात अळीव पण उगवतात असे वाचले होते. एका मैत्रिणीकडे हॉट पॉटमधे क्रेस खाल्ले होते इतक्यात . ते घरच्या सर्वांना आवडले म्हणून थोडेसे लावलेत. काही नाही तर निदान पीठ पेरुन भाजी तरी करता येईल असा विचार आहे.
यावेळी मिरच्यांची रोपं तयार
यावेळी मिरच्यांची रोपं तयार होतात. घरातल्या एका कुंडीत बिया पडल्या असाव्यात. सध्या सेपरेट करून घरातच ठेवायला मैत्रिणीने सांगितले आहे. बघू काय होतंय. आजवर माझा बाहेरून मिर्चीचं रोप घेतलं तरी दोन- चार मिरच्या फक्त येतात. शिवाय त्या विशेष तिखट नसतात (ते मला चालेल)
अजून काही दिवसांनी वाटाणा आणि ग्रीन बेीन्स बिया पेरून पाहीन. इथे प्राॅपर जमिनीत लावायला तसाही मे पण उजाडेल.
लॉकडाऊनमुळे एकंदरीतच
लॉकडाऊनमुळे एकंदरीतच लँडस्केपिंग कागदावर रहाणार असे दिसतयं , त्यामुळे जमेल तसे कंटेनर गार्डन. काल विंडो बॉक्स टाईप कुंड्यांमधे पालक आणि लेट्यूस लावले. माझ्याकडे ग्रो बॅग्ज आहेत अर्धा गॅलनच्या आणि प्लॅस्टिकच्या बकेट्स आहेत. एका बकेटमधे दोन ग्रो बॅग्ज रहातात त्यात लाल मूळा आणि ग्रीन ओनियन्सचे बी लावेन. माझ्याकडचे सगळेच बी जुने आहे त्यामुळे कितपत रुजेल कुणास ठावूक.
लॉकडाऊनमुळे एकंदरीतच
लॉकडाऊनमुळे एकंदरीतच लँडस्केपिंग कागदावर रहाणार असे दिसतयं , >> मलाही तसंच वाटत होतं.
आमच्या इथल्या बर्याच नर्सरी फोनवर ऑर्डर घेउन कर्बसाइड डिलिव्हरी करत आहेत. काही काही नर्सरी २०-२५ मैल परिघात घरपोच डिलिव्हरी देत आहेत. छोटे ग्रीनहाउसवाले लोक ड्राइव्हवेच्या टोकाला कार्ट लाउन - पे पॅल - फोन करून पिकअप अपॉइंट्मेंट - सेल्फ सर्व्हिस असे पण करत आहेत.
मास्टर गार्डनर्स त्यांच्याकडे असलेल्या बिया किंवा रोपं सुद्धा मेल बॉक्स मधे ( किंवा बाजूला) अशी देवाण घेवाण करत आहेत.
दरवर्षी एस यु व्ही भरून अॅन्युअल्स खरेदी होत असे ती होणार नाही. पण काही पेरेनियल्स होम डिलीव्हरी मागवायचा विचार आहे.
आम्हाला कम्युनिटी गार्डनसाठी
आम्हाला कम्युनिटी गार्डनसाठी माती पण मिळेना. लहान गावातून लईच पहारा. आधीच माणसं कमी . त्यात सिजनल काम करणारी बरीच मंडळी ६०+ असल्याने अजूनच तुटवडा! आमच्या मास्टर गार्डनर ग्रूपमधे पण बहुसंख्य लोकं ५५+ . सगळे मुलांच्या धाकात गपचिप घरात बसून आहेत. लकीली दगडांची खरेदी फॉलमधे केली होती त्यामुळे तो प्रोजेक्ट, पुट्ठे टाकून गवत मारणे, पेरेनियल्स हलवणे वगैरे कामं होतील. १ मे पासून मोकळीक मिळतेय की अजून वाढवतायत त्यावर बाकीचे.
कुठे विचारावं कळत नाहीये.
कुठे विचारावं कळत नाहीये.
सहज म्हणून बिया टाकल्या तर झाडे उगवून आली आहेत. अर्थात बियांच्या पाकिटावर नाव वगैरे लिहायची भानगड केली नव्हती. पण बाकी बिया भाज्यांच्या होत्या. कारले, काकडी, दुधी, माठ इ.
तर हे नक्की कशाचे रोप आहे? आता १२-१६ सेमी झाले आहे तर दुसरीकडे लावावे लागेल. पण कुंडी, खत हे काहीच ठरवता येत नाहीये.
हे impatients/Balsam वाटतय
हे impatients/Balsam वाटतय मला.
आमच्याकडे गौरीची फुल म्हणतात. मी लावते दरवर्षी . आम्ही याचा गुच्छ करुन गौरी म्हणुन पुजतो. खड्यांबरोबर पुजतो.
सीमा, तुमच्या फोटोतले
सीमा, तुमच्या फोटोतले impatients वाटत नाही. मला वाटते मराठीत याला 'तेरडा' म्हणतात.
कारले, काकडी, दुधी, माठ इ. >>
कारले, काकडी, दुधी, माठ इ. >> यापैकी काही नक्कीच नाही. करडई च्या बिया होत्या का पाकीटात?
असा तेरडा असला तरी चालेल.
असा तेरडा असला तरी चालेल. सुंदर फुले आहेत.
करडई नव्हती आणली कधी.
बिया जोंधळ्याएवढ्या पण काळ्या होत्या.
चंद्रा , तुम्ही ज्याला तेरडा
चंद्रा , तुम्ही ज्याला तेरडा म्हणत आहात त्यालाच मी गौरीची फुल म्हणत आहे.
https://www.edenbrothers.com/store/Balsam_seeds.html
हो, ते लक्षात आलं माझ्या सीमा
हो, ते लक्षात आलं माझ्या सीमा. गौरीची फुलं म्हणजे impatiens याविषयी मात्र खात्री नव्हती ती तुम्ही दिलेल्या लिंकवरून झाली. धन्यवाद मला माहित असणारे impatiens जेमतेम १०-११ इंच वाढते आणि रोपाच्या शेंड्यांवर फुलते.
रोपे मोठी व्हायला लागली
रोपे मोठी व्हायला लागली म्हणून शनिवारी मिल्क carton मध्ये २-२ लावली.
पण,
लाल गोलातले छोटे पांढरे किडे आहेत तर निळ्या गोलातलें पानावरचे ठिपके आहेत.
हे काकडीच्या पानावरचे ठिपके.
तर हे किडे कोणते असावेत? गूगल केले तर thrips किंवा white flies म्हणते आहे. यासाठी सरळ रोपे काढून टाकावीत की औषध मारावे?
मागे spider mites झाले होते तेव्हा औषध मारले होते पण काही उपयोग झाला नाही. खूपच पसरले होते.
I think they are aphids. You
I think they are aphids. You can use neem oil for that. Sorry for English typing.
Aphids गूगल केलं तर किती
Aphids गूगल केलं तर किती त्रासदायक आहे ते.
लवकर जाऊ दे.
जरासे साबणाचे पाणी( साबण कमी
जरासे साबणाचे पाणी( साबण कमी पण पाणी ज्यास्त), नीम तेल, निलगीरी तेलाचे थेंब मिक्स करून सकाळी फवारावे उन्हे यायच्या आधी. अंडीच मरतात व अळीसुद्धा.
मी कापराच्या काड्या सुद्धा पाण्यात घालते व मारते.
झाडाला इजा होत नाही अश्याने;केमिकल्स मारण्यापेक्षा.
तुम्हाला काय फायदा झाला ते अवश्य लिहा इथे, इतराण्ना फायदा होइल.
Safflower करडई. भाजी. पण याला
Safflower करडई. भाजी. पण याला छान फुलेही येतात.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
काल पाणी, साबण आणि नीम तेल फवारले.
आजतरी पाने ठीक दिसताहेत.
एका मैत्रिणीकडून कळाले की, पाणी आणि whipped cream मिक्स करून फवारतात. हेपण करून बघेन.
इथे कळवेन काय काय होते ते.
हेपण करून बघेन. >> एकच करा
हेपण करून बघेन. >> एकच करा होत्नाही तर रोग नको पण उपाय आवरा अवराझाडे म्हणतील. ) नीम नि साबणाची युक्ती नेहमीच चालत आली आहे. फक्त दर वेळी हे फ्रेश मिश्रण बनवत जा. पानांच्या खालून पण स्प्रे करा.
एकच करा होत्नाही तर रोग नको
एकच करा होत्नाही तर रोग नको पण उपाय आवरा अवराझाडे म्हणतील. >> खूप हसले हे वाचून.
चांगली सूचना आहे. फ्रेश मिश्रण करायचीपण. मी आधीचेच वापरते आहे.
मार्चमधे वाटाणे लावले होते
मार्चमधे वाटाणे लावले होते त्यांना आताशी फुलं आली आहेत. तेंव्हा लावलेले मुळे, अरुगुला इत्यादी हार्व्हेस्ट करुन झाले. खरे तर त्यानंतर १५-२० दिवसांनी अजून एक बॅच लावायचा विचार होता पण ते राहिलंच.
अळीव लावलेले त्याची कोवळी पानं अरुगुला बरोबर सॅलड मधे वापरली. आता फुलावर आली आहेत रोपं.
केल, लेट्य्स आणि एक दोन एशीयन ग्रीन्स सध्या एकदम पीक पिकिंग आहे. मायाळू जिथे लावला होता मागच्या वर्षी तिथे बिया पडलेल्या असाव्यात . त्या रुजून व्हॉलंटीयर रोपं आली आहेत दहा बारा. ऑफिसात जाणं झालं असतं तर तिथे वाटता आली असती रोपं
देशी ग्रोसरीमधून अळकुड्या आणून लावल्या आहेत. वांगी, भेंडी, मिरच्या या बिया मात्र रुजायला तयार नाहीत अजिबात. आता त्या मोकळ्या जागेत लाल माठाच्या बिया लावल्या आहेत.
आज इथेच लिहायचे म्हणून आले
आज इथेच लिहायचे म्हणून आले आणि हाच धागा समोर आला.
कांदा सणसणीत वाढतो आहे. आठवड्यातून एकदा तरी पात काढणे होते. घेवडा आणि हरभऱ्याला फुले आली. पालकालापण येत आहेत. तो काढला पाहिजे. १० तासापेक्षा कमी रात्र झाली की फुले येतात आणि चव उतरते असे ऐकले आहे. तिथे काय लावावं विचार करते आहे. बहुतेक घेवडाच. पटकन वाढेल. बिट लावावं का?
कारले काही रुजायचे नाव घेईना. आणि काकडी वाढायचे.
टोमॅटोचे काहीतरी बिघडलंय. काल एका फांदिने मान टाकली आणि एका फांदीवर नवीन आलेली पाने खूपच आतमध्ये वळलेली आहेत. आता या शनिवारी त्याची मशागत आणि खत देणे.
कोणी foliage fertilizer वापरले आहे का? मी यावर्षी प्रथम वापरेन.
साबण, नीम तेल आणि पाणी वापरून
साबण, नीम तेल आणि पाणी वापरून काकडीतरी बरी वाटते आहे. परत काही किडा दिसला नाही.
पण आधी पोस्ट केलेली रोपे आहेत त्यातल्या एकावर काल परत दिसला. खूप चांगली फूट आली आहे काहींना.
काल अजून एका रोपावर हे दिसलं. खरंतर हे रोप दुसऱ्या खिडकीत आहे. काही किडा दिसत नाही.
परत साबणाच्या पाण्याने आंघोळ घालणं इ. सोपस्कार केले. पण हे काय आहे कळत नाही. परवराची रोपे आहेत.
(No subject)
ही आमची यावर्षीची कम्युनिटी गार्डन. हा हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीचा रिकामा लॉट होता. तो दोन वर्षांपूर्वी लिडरशिप ट्रेनिंगचा प्रोजेक्ट म्हणून एका ग्रुपने कम्युनिटी गार्डनसाठी उधार मिळवला. त्यांचा प्रोजेक्ट झाल्यावर तो गेल्यावर्षी आम्हाला उधार मिळाला. गावातील हा भाग फूड डेझर्ट म्हणून ओळखला जातो. तेथील रहिवाश्यांना भाजीपाला म्हणून काय हवे आहे ते विचारुन लागवड केली आहे. रेज्ड बेडमधे लिफी ग्रीन्स आणि हर्ब्ज लावलीत. बाकीच्या जागेत नेहमीच्या पद्धतीने टोमॅटो, टोमाटियो, मिरच्या, स्क्वाश वगैरे लावले आहे. आठवड्यातून एकदा फायर ट्रक येवून पाण्याची टाकी भरुन जातो.
स्वाती२, धाग्याला 'बागकाम'
स्वाती२, धाग्याला 'बागकाम' खूण अॅड करणार का?
मी मामीच्या धाग्यावरच्या लिंक्स बघून आणि एका मैत्रिणीचं बघून एकदम उत्साहात बरीच शोधाशोध केली आणि घरीच खत बनवलं आहे. एन-पी-के हे मुख्य घटक - अंड्याची टरफलं, चहा+ कॉफीचा चोथा आणि केळ्याची सालं- त्यात एक्सपायर झालेल्या मल्टिव्हिटॅमिन आणि एक आठवडाभराचा ओला कचरा पण उन्हात वाळवून अशी सगळ्याची बारीक पूड केली. पाण्यात ही पूड आणि इप्सम सॉल्ट मिसळून १०-१२ तास ठेवून मग झाडांना घातलं. काल आणि परवा असं मिळून सगळ्या भाज्यांना घातलय. रिझल्ट्स आले/नाही आले की लिहिनच (एका रात्रीत सगळी झाडं २ इंचानं वाढलीत असं माझं मन सांगतय :फिदी:) पण एवढी उठाठेव केलीच तर सोशल मिडियावर लिहिलं तर पाहिजेच.
महिनाभर झाला सिंडे खत
महिनाभर झाला सिंडे खत घालून. किती वेलू गगनावरी गेले ?
दोन प्रकारच्या काकड्यांच्या ( बुश बेबी आणि भारतीय पांढर्या) बिया लावल्या होत्या. त्यांच्यात चढाओढ असल्यागत काकड्या येत आहेत. ऑफिसात वाटणे शक्य नाही. आता क्रमाक्रमाने शेजार्यांना देत आहोत.
झुकिनी पण दोन रोपं लावली होती . त्यातल्या एकालाच आतापर्यंत ६-७ झुकिनी आल्यात.
मायाळू , अंबाडी दर आठवड्याला भाजी करण्याइतके वाढत आहेत.
फॉल मधे लावण्याकरता लसणीचे गड्डे ऑर्डर करायचे म्हणतेय.
वेल कायच्या काय वाढत आहेत पण
वेल कायच्या काय वाढत आहेत पण ते मध्ये २ आठवडे झालेल्या पावसामुळे पण असावेत. घरगुती खतं मी भाज्या आणि पेरेनियल्स आणि ट्रॉपिकल झाडांना घालतेय. कुंड्यांमध्ये अॅनुअल्स लावलेत त्यांना मिरॅकल ग्रो. तर रिझल्ट असा आहे की मिरॅकल ग्रो घातलेली झाडं कायमच फुललेली दिसतात या घरगुती खतानं माती सकस रहायला मदत होते म्हणे, मग तेच सुरू ठेवणार आहे. तसं या वर्षी अर्ली हार्वेस्ट मिळालं त्यात २ झुकिनी, १ समर स्क्वाश, टोपलीभर हिरव्या मिरच्या, मेथी २-३ जुड्या, ५-६ हरभरे एवढा माल मिळाला. आता मिरच्या वगळता सगळं ढिम्म आहे.
मधुमालतीला मात्र ५ वर्षात एकदाही फुलं न आल्यानं त्याला घातलं आहे मिरॅकल ग्रो पण ते अजून फुलायचं मनावर घेत नाही.
Pages