वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालिफेट कधीच बघितली होती. पण मन इतके खिन्न झाले की काही लिहावेसे वाटले नाही. किती मुर्खासारख्या मुली अडकतात यात.
फार रडायला येते बघतांना... Sad

Lior Raz या अभिनेत्याने डोरोनची भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. त्याचप्रमाणे कॅप्टन गॅबी अय्युब झालेला Itzik Cohen, मिकी मोरेनो (Yuval Segal), डॉ. शिरीन (Laëtitia Eïdo), बोयाझ (Tomer Kapon), नुरीत (Rona-Lee Shim'on) या सर्वांची कामेही अगदी समर्पक झालेली आहेत.>>>>>>>>
माझी फौदा च्या तीन हि सीरिज ची परायने करून झाली आणि मी फौ दा चा फ्यान झालो .
माझ्या मित्रांना लिंक पाठवल्या ( teligram ) नंतर ते सुद्धा अक्षरशः वेडे झाले .
खरंच उत्कृष्ट कथा , उत्कृष्ट मांडणी असल्या मुळे भाषेची अडचण येवून सुद्धा आपण खिळून जातो . इतर ठिकाणी subtitles वाचण्याचा त्रास फौडा बघताना जाणवत नाही इतक्या ओघवत्या सीरिज आहेत .

<हस-या खेळकर हलक्या फुलक्या मालिका कोणत्या आहेत? सद्ध्या आधीच इतका ताण आहे की नवा ताण नको वाटतो.>

अमेझॉन प्राईम:

द ऑफिस
पार्क्स ॲंड रिक्रिएशन
बिग बॅंग थियरी
कम्युनिटी(बहुतेक प्राईमवर आहे.)
लाखो मे एक

नेटफ्लिक्स:
द गुड प्लेस
ब्रुकलिन नाईन नाईन
ये मेरी फॅमिली
आयटी क्राउड

ह्यातल्या ऑफिस, पार्क्स ॲंड रिक्रिएशन व ब्रुकलिन नाईन नाईन माझ्या सार्वकालिक आवडत्या मालिका आहेत.

काल prime वर अफसोस पाहिली.
खूनखराबा आहे पण चांगला टाईमपास झाला.
इतके फटाफट खून होतात पण पोलिस काही तपास वगैरे करत नाहीत , संबंधित व्यक्तीना कळवतही नाही.

अफसोसचे नाव वाचले तरी हसायला येते. आत्महत्या करणार्यांना मदत करणारी टोळी आणि पोलिसांना काहीच माहित नाही. ती मॅड बाई तर मारल्याशिवाय थांबतच नाही. आत्महत्या करताना विचार बदलला समोरच्याचा तरी मारून टाकते की तू आमच्याकडे आलासच का मदत मागायला. खूप दिवस झाले बघून.

पुंबा - बिंग बँग प्राइमवर दिसली नाही. एचबीओ मॅक्स वर आहे. प्राइम वर कदाचित सीबीएसच्या सर्विसच्या मार्फत मिळेल.

मेधावि - प्राइम असेल तर डाउनटन अ‍ॅबी ही एक चांगली आहे. विनोदी नाही पण फार टेन्स वगैरेही नाही.

बाकी सूट्स, बर्न नोटिस, बॉस्टन लीगल वगैरे सुद्धा फार टेन्स नाहीत. नेफि व प्राइम पैकी एकावर या आहेत.

>>जेव्हा एखादे कार्य किंवा कामगिरी पार पाडताना मोठी समस्या किंवा धोका उत्पन्न होतो तेव्हा फौदा शब्दाचा वापर केला जातो.<<
मुंबईत एक मस्त चपखल श्ब्द वापरला जातो या करता - खिचाट. अजुन एक आहे पण तो इथे लिहिण्याजोगा नाहि... Happy

एनिवे, फौदा ग्रिपिंग आहे स्टोरीलाइन मुळे. पण ते स्पेशल टाक्स फोर्सचे कमांडोज मोहिमांवर बुलेटप्रुफ वेस्ट घालुन का जात नाहि हे कळलं नाहि. सार्वजनिक ठिकाणी एकवेळ ठिक आहे, ओळख लपवायला पण धाडी घालताना सुद्धा? असो...

फौदा आवडली असेल तर याच पार्श्वभुमीवर "अवर बॉय्ज" हि सिरिज देखील बघा. फौदा मधल्या जॉनी अर्बिद (अल-कर्मी) ने साकारलेला बाप अतिशय परिणामकारक आहे. अवर बॉय्जची स्टोरी लाइन थोडि वेगळी आहे, पण मूळ गाभा तोच आहे. धर्मांधतेने आंधळे, दिशाहिन झालेल्या तरुणांची कथा. एचबिओवर आहे...

https://www.thehindu.com/entertainment/the-delights-of-turkish-tv/articl...

Over-indulging in rich Turkish soap operas seems to have become quite the lockdown thing to do
Is it possible to become besotted with a whole country? Or with a way of life that exists only in the warm bubbles of Turkish soaps that flit across my screen? Every evening I levitate on Turkish serials on Netflix and, depending on my mood, land in Istanbul or Cappadocia, the Anatolian region of central Turkey.

Turkish soaps are addictive. They are sweet and sticky, dusted with fantasy, like the powdered sugar that coats the pink and white cubes of rose-scented sweetmeats called Turkish delight that are best had between sips of tea served in gold-rimmed glasses shaped like tulips, placed on matching glass saucers. Turkish delights tend to stick in your teeth when you chew them, just like the serials do.

मृदुला जी, तुम्ही सदस्याबद्दलच्या माहितीत स्त्री असल्याचं नोंदवल्या आणि फॅन झालो असं लिहिलीत.
म्हणून विचारलं हो.

दुसरी, ज्युनिअर बच्चन ची
सगळ्यात मस्त काम त्याच्या बायकोने केले।आहे
नित्या मेनन, काय जबरा एक्सप्रेशन दिल्या आहेत
त्यामानाने अभिषेक एकच चेहरा घेऊन वावरतो आणि थोडा फार बदल घडवल्यासारखा दाखवतो
कबीर ठीक ठाक, मेघना नंतर अती करते असं वाटू लागतं,
हृषीकेश जोशी धमाल आणि सोबतच दुसरा पोलीस पण
ती झेबा बळच व्हिलन केलीये, पाय ओढणे इथवर ठीक आहे, तिला म्हणजे पार राजकारणात स्कोप असल्यासारखा दाखवला आहे
बाकी अनेक पात्रे का आहेत हे शेवटपर्यंत कळलं नाही

मला पहिली संथ वाटली होती... दुसरी त्यामानाने ग्रीपपिंग वाटली... मला सर्वात उत्तम ऍक्टिंग त्या सेकंड व्हिक्टिम ची
वाटली- नताशा...
अभिषेक बद्धल सहमत...

ब्रीथ २ ...
लूपहोल फार आहेत असे वाटले. नित्या मेननचा चेहरा आवडला नाही. फार वेळ बघवत नाही. किडनॅप झालेली मेडीकल स्टुडंट आवडली.
ऋषिकेश जोशी व जे पी झालेल्याचे काम आवडले. कबीर ह्या सिझनला चांगला वाटला Happy
शर्ली मस्त दिसलीये, काम पण छान Happy

ब्रीद दोन्ही स्लो आहेत का, बघावं की बघू नये हा प्रश्न पडलाय इथे वाचून. काहीजण for मध्ये आहेत, काहीजण विरोधात.

एकही बघितली नाहीये.

ब्रीद दोन्ही स्लो आहेत का, बघावं की बघू नये हा प्रश्न पडलाय इथे वाचून. काहीजण for मध्ये आहेत, काहीजण विरोधात. >> निरपराध लोकांचे खून बघायचे असतील, बघवत असतील, तर बघा

मृदुला जी, तुम्ही सदस्याबद्दलच्या माहितीत स्त्री असल्याचं नोंदवल्या आणि फॅन झालो असं लिहिलीत.
म्हणून विचारलं हो. >>>>
भरत भाऊ !
तुम्ही फारच जास्त हवल दार की करता !
अगदी ट्रम्प ला ही लाजवेल Happy

नित्या मेननचा चेहरा आवडला नाही. फार वेळ बघवत नाही. >>>> जरा गुटगुटीत बालिका आहे, पण चेहरा किती क्युट आहे. आवडली मला.
किडनॅप झालेली मेडीकल स्टुडंट आवडली.>>> मलाही तिचं काम आवडलं म्हणून थोडं गुगल केलं तर झी मराठीच्या सिरियलची मुलगी निघाली. अगदी लीड रोलमध्ये होती. (गिरीश ओक मठाधिपती असतो आणि कर्मठ असतो, त्या सीरियल मधली सून)

गिरीश ओक मठाधिपती असतो आणि कर्मठ असतो, त्या सीरियल मधली सून >>> अच्छा , तरीच ती एवढी ओळखीची वाटत होती.

लूपहोल फार आहेत असे वाटले.ऋषिकेश जोशी व जे पी झालेल्याचे काम आवडले. कबीर ह्या सिझनला चांगला वाटला + 1000.
मला AB आवडला .

कुणी spoiler /end सांगता का , आठव्या एपिसोड पर्यंत पाहिले आहे (फारच स्लो आहे ) prime membership संपली आहे... पंचायत पुन्हा आल्यावर घेईन (फारच आवडली)...
ब्रीद २ चौथ्या एपिसोड ला कळले होते की काय असेल... Predictable आहे.....मला जे चौथ्या एपिसोडला कळले ते वर्षानुवर्षे त्याच्या बायकोला(नित्या मेनन) का नाही कळले काय माहिती !!
अमित सध चे काम आवडले, शर्ली, मेघना ,ऋषीकेश जोशीची रेस्टॉरंट मधली मैत्रीण का आहेत कळले नाही...
नित्या मेनन फारच क्यूट वाटते.
गायत्री/मेडिकल स्टुडन्ट आवडली.

मला जे चौथ्या एपिसोडला कळले ते वर्षानुवर्षे त्याच्या बायकोला(नित्या मेनन) का नाही कळले काय माहिती !! >>>> त्यांना न समजल्याचा अभिनय करायचे पैसे मिळतात; जितके उशीरा कळेल तितके एपिसोड... आपण आपले वेळ पैसे खर्च केलेले असतात त्यामुळे ते वाया गेलेले बघून खरी प्रतिक्रिया देतो.

ते तर आहेच कारवी ...पण प्रेक्षकांना थोडे तरी आव्हान द्यावे / वेगळे प्रश्न पडावेत असे ...थोडी इंटेलिजन्ट करमणूक असावी ही अपेक्षा पूर्ण होत नाही ...
Regardless of genre ,
मला प्रेक्षक म्हणून शिव्या, रक्तपात, ऐक्सेसिव्ह सेक्स बघवत नाही... आणि ते टाळून as if there is nothing new or intelligent to watch होते .
अगंबाई सासूबाई आणि मिर्झापुर या मोठ्या रेंजमध्ये सुवर्णमध्य शोधणारा प्रेक्षक आहे मी Happy !

Pages