अमिताभ आणि कोरोना

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 20:14

अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.

रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.

अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.

- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्थ समथान बरा झाला हो. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला).
टीप - हा नक्की कोण ते मला माहीत नाही.
>>>>

मलाही माहीत नाही
पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय.
यांना कोरोना झालेला. बरा झाला. काहीच माहीत नाही.

शाखामृग शब्द खटकला या प्रामाणिकपणाबद्दल धन्यवाद.

@ आशुचॅम्प आता आपण यापुढे शाहरूखचा उल्लेख करताना काळजी घेणार की पुढेही असाच उल्लेख करत राहणार?

@ प्रमोद महाजन vs बच्चन परीवार
तर यात अन्याय वगैरे काही नाही
यातून हेच सिद्ध होते की कलाकारांच्या चाहत्यांपेक्षा राजकीय नेत्यांचे भक्त जास्त उत्सुक असतात. त्यामुळे न्यूज चॅनेल टीआरपीवर लक्ष ठेवत डिमांड तसा सप्लाय करतात

सुंदर हरणासारखे डोळे असलेला शाखामृग म्हणजे त्याचं कौतुकच केलाय की
Happy

>>>>>>

छे भरत
यांनी मारली कोलांटी उडी
गेला तुमचा आक्षेप वाया Happy

तुझी काडी वाया गेली बेंबट्या
Happy

अजून प्रयत्न करा, स्वतः सुधारू नकोच
दिवसेंदिवस पातळी घसरत चालली आहे
समर्थक सोडून चालले।आहेत आता त्यामुळे सैरभैर झाला आहेस हे दिसतंय

तुझा तो पाळीव आयडी कुठं गायब झालाय
मिस करतोय त्याला

आला रे आला
Submitted by आशुचँप
>> हे म्हणजे अल्लादीनच्या दिव्यासारखं झालं. दिवा घासला की राक्षस बाहेर.

शाहरूखचा उल्लेख करताना काळजी घेणार की पुढेही असाच उल्लेख करत राहणार?
Submitted by ऋन्मेऽऽष>>
तुम्हाला नेमकी काळजी कोणाची आहे? दवाखान्यातल्या अमिताभची की शारुखचा उल्लेख कोण कसा करतो याची?

तुम्हाला नेमकी काळजी कोणाची आहे? दवाखान्यातल्या अमिताभची की शारुखचा उल्लेख कोण कसा करतो याची?
>>>

मी फक्त आरसा दाखवत होतो Happy

थोडक्यात कोणी आक्षेप घेतला म्हणून ते शाहरूखचा असा अपमानास्पद उल्लेख करायचे सोडणार नाही हे त्यांना मी दाखवून दिले Happy

आणि भरत यांनाही दाखवून दिले की तुमचा आक्षेपाला मनावर न घेणारा ईथे मी एकटाच नाही तर आशूचॅम्पही असे करत आहेत Happy

पण मी अपमान कुठं केलाय? उगाच काय भलतंच?
उद्या शाखामृगला शाहरुख म्हणालात तर त्याचा अपमान होईल एकवेळ
Happy
पण ते मायबोली वाचत नाहीत
शाहरुख सारखे इकडे पडीक राहणं परवडत नसणार

मी फक्त आरसा दाखवत होतो>> कसले आरसे दाखवता तुम्ही लोकांना. धाग्याचा विषय काय तुम्ही बोलता काय. काही खरं नाही राव. हा तुमचाच धागा आहे, हे तरी आठवतं का? अमिताभच्या आजारपणावर धागा काढता आणि तिथेही ओढुन ताणुन शारुखला आणता.

शाखामृगाबद्दल बर्‍याच दिवसांत काही बातमी नाही.
नाही कशी? त्याने त्याच्या बंगल्याला प्लास्टिकचे आच्छादन घातल्याची बात मी पाहिली ना! याबद्दल मायबोलीवर कोणी लिहीत का नाही?

शाखामृगाने आपल्या घराला प्लास्टिकमध्ये लपेटल्यावर पावसाळा आल्याचे लक्षात आले. आपल्या घरात पाणी गळू लागलं तर प्लान ए , बी , सी काहीच तयार नाही. इ.इ.

<< आपल्या घरात पाणी गळू लागलं तर प्लान ए , बी , सी काहीच तयार नाही. इ.इ. >>
त्याच्यावर नवा धागा येणार आहे लवकरच. थोडा धीर धरा.

ऋन्मेष ज्या संयमाने तू इथल्या ट्रोलरना फाट्यावर मारून लिहितोस त्यासाठी सलाम. एकच म्हण आठवते. हाथी चले बझार कुत्ते भौके हजार.

ऋन्मेष ज्या संयमाने तू इथल्या ट्रोलरना फाट्यावर मारून लिहितोस त्यासाठी सलाम
एकच म्हण आठवते.>>>>>
मला तर हे वाचून आरशात बघून स्वतःची आरती करणारा नाना पाटेकर आठवतो Happy
ओ लाल मेरी Happy

त्याने त्याच्या बंगल्याला प्लास्टिकचे आच्छादन घातल्याची बात मी पाहिली ना
>>>

याबद्दल माहीत नाही काही
लिंक प्लीज

अरे कुठे नेऊन ठेवलाय धागा... जया भादूरी आहे म्हणे मायबोलीवर... ती चिडेल हा...
Submitted by च्रप्स on 27 July, 2020 - 09:25
>>>>>

भरत आणि आशूचॅम्प ईथे एण्जॉय करत आहेत.
पण ते कबूल नाही करणार. कारण त्याचे श्रेय मला जाईल हि भिती.

बाकी जया भादुरी ही स्वत:ही एक सेलिब्रेटी असल्याने ती स्वत: ट्रोलर्सना हॅंडल करायला सक्षम असेल. Happy

कोण अमिताभ?
असे म्हणून आपण अमिताभला भाव देण्यात नाही हे मुद्दाम का सांगावेसे वाटते ?

ऋन्मेषने खरे तर एखादे चॅनेल जॉईन करायला हवे. वागळेसारखा तो तिन्ही त्रिकाळ नवीन नवीन प्रश्न मांडत बसतो.

तुमचे आवडते कलाकार कोण विचारले तर जनरली मी अमिताभ वगैरेंची नावे घेते. पण याच अमिताभचा व इतर कलाकारांचा मला तेव्हा खूप राग आला होता, ज्यावेळेस ए के हनगल गेले. हनगल हे शेवटच्या अवस्थेत उपासमार, औषोधोपचार न मिळणे याने त्रस्त होते. कोणीही कलाकाराने यांना मदत केली नाही. हनगलच काय, ललिता पवार, आचला सचदेव हे पण उपासमारीनेच गेले. अरे ! इतके लोक क्रुर होऊ शकतात? तुम्ही लोक सिनेमा आणी जाहीरातीमधून करोडो कमावतात मग त्यातले थोडे देखील यांना देऊ शकत नाही? दोन वेळचे जेवण आणी डोक्यावर छप्पर याव्यतीरीक्त काय हवे असणार?

हे लोक पडद्यावर हिरो होतात पण प्रत्यक्ष आयुष्यात, पडद्यावर खलनायक ठरलेले सोनू सूद, प्राण हेच महान ठरतात.

ज्यावेळेस ए के हनगल गेले. हनगल हे शेवटच्या अवस्थेत उपासमार, औषोधोपचार न मिळणे याने त्रस्त होते. कोणीही कलाकाराने यांना मदत केली नाही.
>>>>

मग ईथे अमिताभचाच नाही तर एकूण एक कलाकाराचा राग करायला हवा.

मग ईथे अमिताभचाच नाही तर एकूण एक कलाकाराचा राग करायला हवा.>>
जे कलाकार समाजासाठी काहीतरी योगदान देत आहेत त्यांचाही राग करायचा का?

Pages