अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.
- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.
रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.
अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.
- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला
गेले दोन तीन दिवस बातम्याच
गेले दोन तीन दिवस बातम्याच नाहीत बच्चन परीवाराच्या...
आशा करतो सुखरूप असतील.
स्पेशली अमिताभ
अजून बरेच बघायचे आहे त्याला मोठ्या पडद्यावर.. पुन्हा एकदा शाहरूख अमिताभ जुगलबंदी अनुभवायची आहे. परंपरा प्रतिष्ठा अनुशासन .. हाईंय
गेले दोन तीन दिवस बातम्याच
गेले दोन तीन दिवस बातम्याच नाहीत बच्चन परीवाराच्या>>>>
किती ते अधःपतन
चॅनेल वाल्यानं संगायला पाहिजे
बाबांनो दाखवत जा बातम्या बच्चन च्या
आज देशाला त्याची गरज आहे नैतर लोकांचा जीव जाईल।अशाने
बाकी काहीही नाही दाखवलं तरी चालेल
आज देशाला त्याची गरज आहे नैतर
आज देशाला त्याची गरज आहे नैतर लोकांचा जीव जाईल।अशाने
बाकी काहीही नाही दाखवलं तरी चालेल
काही लोकात वेडे पणाची लक्षण दिसायला लागली अमिताभ दिसला नाही म्हणून.
चार दिवस फक्त शिळ मटण रस्सा खायला लागली लोक त्यांना ताज काय आणि शीळ काय ह्या मधील फरक च समजेना
उडाला काय तो धागा बेस्ट झालं
उडाला काय तो धागा
बेस्ट झालं
बोकलत तुम्ही नानावटीमध्ये भूत
बोकलत तुम्ही नानावटीमध्ये भूत बनून गेले होतात का
तो धागा उडाला पण वाचकांच्या
तो धागा उडाला पण वाचकांच्या मनात आठवणी ठेऊन गेला. चार धाग्यांवर त्याबद्दल चर्चा ऐकली
असो,
आज देशाला त्याची गरज आहे नैतर लोकांचा जीव जाईल।अशाने >>>>>>> असे मी कुठेच म्हटले नाही.
थोडक्यात दोन हाणा पण पाटील
थोडक्यात दोन हाणा पण पाटील म्हणा
शिव्या द्या, टीका करा, तुझे समर्थन करणारेही वैतागून म्हणाले की यापुढे तुझा धागा वाचणार नाही
त्याचेही काही नाही
सिरियसली इतका निगरगट्ट आणि आत्मकेंद्री मनुष्य बघण्यात आला नाही आजवर
बोकलत तुम्ही नानावटीमध्ये भूत
बोकलत तुम्ही नानावटीमध्ये भूत बनून गेले होतात का>>> नाही हो. बायकोच्या हॉस्पिटलमध्ये चर्चा सुरू होती.
मूर्ख कुठचा
मूर्ख कुठचा
आशुचॅम्प
आशुचॅम्प
जेव्हा मी स्वत:च्या नजरेत उतरतो तेव्हा मला वाईट वाटते.
जेव्हा मी स्वत:च्या नजरेत ऊंचावतो तेव्हा मला आनंद होतो.
ईतर कोणाचे माझ्याबद्दल चांगले मत असेल तर त्याचा आनंद आहे. कोणाचे वाईट मत असेल तर त्याचा आदर आहे.
पण ईतरांच्या मतानुसार मी स्वत:चे मूल्यमापन करणे योग्य समजत नाही. कारण एखाद्या परिस्थितीत मी अमुकतमुक का वागतो याचे कारण माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणे शक्य नाही.
उदाहरणार्थ तुम्ही ईथे शाहरूखवर वैयक्तिक लेव्हलला जाऊन टिका केली आहे. प्रत्यक्षात तुम्हाला काय माहीत आहे त्याबद्दल. किती वेळा प्रत्यक्ष पाहिले आहे. ईंटरॲक्शन झाले आहे. त्याच्या सहवासाचा काही अनुभव, कदाचित शून्य...
तरीही आपण त्याच्याबद्दल अमुकतमुक मत बनवून मोकळेही झालात आणि ते बिनधास्त सोशलसाईटवर मांडतही आहात.
अर्थात यात काही गैर नाही.
हे हुमायुन नेचरच आहे.
एखाद्या व्यक्तीबद्दल उपलब्ध माहितीनुसार त्याबद्दल मत बनवणे. हे सारेच करतात. तुम्हीच असे नाही मी सुद्धा हे करतोच.
पण ज्याच्याबद्दल आपण मत बनवतो त्याने काय करावे असे तुम्हाला वाटते.
उदाहरणार्थ,
समजा तुमचे मत कोणीतरी शाहरूखपर्यंत पोहोचवले. तर मग त्याने ते मनावर घेऊन लगेच तुमचे मत कसे बदलता येईल या कामाला लागावे की तो जसा आजवर जगतोय तसे त्याने जगत राहावे?
म्हणजे तू निगरगट्ट, निर्लज्ज
म्हणजे तू निगरगट्ट, निर्लज्ज आणि असाच त्रासदायक राहणार
बरं यातून साध्य काय करणार? मायबोलीवर तुला मिळणारे प्रतिसाद?
धाग्यावर धागे आणि त्यावर भारंभर चर्चा
शिव्या खाऊनही इतकं करायला एक उद्देश लागतो आणि तो जर मायबोली सारख्या एका संकेतस्थळावर मिळणारे प्रतिसाद असतील तर मग आनंद आहे
एकेकाळी चांगलं लिहिणारा व्यक्ती मला आता तुम्ही शिव्याच द्या अशा अट्टाहासाने वागू लागतो तेव्हा कळत नाही काय बोलावे
मी मागेही म्हणलं होत आणि आताही म्हणतोय
हा तुला झालेला मानसिक आजार आहे आणि यातून जितका लवकर बरा होशील तितके चांगले तुझ्यासाठी
गेट वेल सून
तुझ्या त्या शिवराळ आयडीलाही हाच निरोप दे
येईलच लवकर तो आता इथे
बरं यातून साध्य काय करणार?
बरं यातून साध्य काय करणार?
>>>
आयुष्यात आपण जे काही करतो ते सगळे काहीतरी साध्य करायलाच केले पाहिजे हा अट्टाहास का? किंवा ते करताना हा विचार डोक्यात असलाच पाहिजे हे जरूरी का? फक्त जगण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून आपण जगू शकत नाही का?
बाहेर छान पाऊस पडतोय. वाटले भिजावेसे. यावे भिजून. या भिजण्यातून आपण काय साध्य करणार आहोत त्यापेक्षा घरी थांबावे, पुस्तक वाचावे, त्यातून ज्ञान मिळवावे, किंवा काहीतरी काम करावे, चार पैसे मिळवावेत, भिजण्यात काय ठेवलेय...
सॉरी, पण मला नाही जमत असला विचार. ज्यांना जमतो ते कदाचित बरोबरही असतील. मला त्यांना चूक ठरवायची ईच्छा नाही.
लोकांना वैतागायला लावून,
लोकांना वैतागायला लावून, चांगले धागे भरकटवून आणि शिव्या खाऊन मिळणारा आनंद आणि पावसात भिजण्यातला आनंद सारखाच?
यालाच मी आजारपण म्हणतोय
लोकांना चिडायला लावून आनंद घेणे याला विकृती म्हणतात
तोच तुझा आनंद असेल तर तुलाच लखलाभ असो
लोकांना चिडायला लावून आनंद
लोकांना चिडायला लावून आनंद घेणे याला विकृती म्हणतात
>>
नक्कीच म्हणा
पण मला यातून आनंद मिळतो हे आपले गृहीतक झाले.
आता तुम्ही शाहरूखवर चिडता.
त्याचे काहीतरी वागणे तुम्हाला आवडत नसेल.
तर शाहरूख तुम्ही चिडावे आणि त्यातून त्याला आनंद मिळावा म्हणून तसा वागतो का?
ऋन्मेशजी तुम्ही चांगले लेखक
ऋन्मेशजी तुम्ही चांगले लेखक आहात. मग हे सारखं शारुख-शारुख करणं, शीळा रस्सा कसा संपवावा यासारखे धागे काढणं यामागचं प्रयोजन काय? काही सुचक नसेल तर काही काळ चिंतन करा आणि मग नव्याने लिहिते व्हा.
बाकी तुमची मर्जी.
प्रशासनाने नुकताच एक धागा
प्रशासनाने नुकताच एक धागा उडवला. त्याबद्दल काही माहिती कोणी सांगू शकेल का?
मी धागा उघडला नव्हता. पण विशिष्ट व्यक्तीचा धागा प्रशासक अधूनमधून उडवू लागले आहेत हे चित्र आशादायी आहे.
धागा अमिताभचा आहे
धागा अमिताभचा आहे
म्हणून उदाहरणही अमिताभचेच देतो
ज्याला महानायक आणि सुपर्रस्टार ऑफ द मिलेनियम म्हटले जाते
त्याचेही कित्येक फ्लॉप चित्रपट आहेत. पण त्याने कधी चित्रपटात काम करणे नाही सोडले.
असो विषयावर बोलूया का?
ईथे बरेच जण असतील ज्यांना बच्चन परीवाराबाबत जाणून घेण्यात रस असेल
कोणाकडे काही लेटेस्ट अपडेट असतील तर प्लीज शेअर करा...
<यालाच मी आजारपण म्हणतोय
<यालाच मी आजारपण म्हणतोय
लोकांना चिडायला लावून आनंद घेणे याला विकृती म्हणतात >+१.
इंग्रजी शब्द मुद्दाम चुकीचे लिहिणे हेही इतरांना वैताग आणण्याचे हत्यार म्हणूनच वापरले जाते. हुमायून नेचर, जोक्स द अपार्ट..... जिथे शक्य होईल तिथे ठरवून चुकीचे लिहिणे.
आपण चुकीचे वागतोय हे धडधडीत दिसत असूनही ते बरोबर आहे हे दाखवायला नव्या नव्या कोलांट्या मारणे.
वीज बिलाचा धागा. उडालेला धागा शीर्षक बदलून ललित लेख म्हणून खपवणे.
+ प्रत्येक गोष्टीत स्वतःला आणणे. -
नीधप यांचा तिचा आणि त्याचा पोशाख असा एक लेख आहे. त्यावर या महाशयांनी तोडलेले तारे बघा. तिथेही स्वतःमागे १० प्रतिसाद मिळावेत म्हणून धडपड. ही विकृती नाही तर काय?
ही विकृती पोसायला "हा न चिडता , शांतपणे कशी उत्तरे देतो, " असे कौतुक करणारेही जबाबदार आहेत. डेडिकेटेड फॅन क्लब आहेच.
कधीकाळी याच्या बाजूने उभा राहिलो होतो याचा पश्चात्ताप होतोय.
काही लोकात वेडे पणाची लक्षण
काही लोकात वेडे पणाची लक्षण दिसायला लागली अमिताभ दिसला नाही म्हणून.
चार दिवस फक्त शिळ मटण रस्सा खायला लागली लोक त्यांना ताज काय आणि शीळ काय ह्या मधील फरक च समजेना<<<
हे कशाबद्दल आहे? काय भन्नाट लिहिता हो तुम्ही!
इंग्रजी शब्द मुद्दाम चुकीचे
इंग्रजी शब्द मुद्दाम चुकीचे लिहिणे हेही इतरांना वैताग आणण्याचे हत्यार म्हणूनच वापरले जाते. हुमायून नेचर, जोक्स द अपार्ट....
>>>>>
कमॉन
स्टाईल आहे ती माझी
जसे काही लोकं BTW ला रच्याकने बोलतात तसे मी बाई दवे बोलतो. तुम्ही त्या लोकांशी कधी भाण्डायला गेला नाहीत. की गेलात? लिंक मिळेल का त्याची?
नावडतीचे मीठ अळणी असे तर होत नाहीये ना तुमचे?
अमिताभच्या जागी देव न करो पण एखाद्या आवडत्या राजकीय नेत्याला कोरोना झाला असता तर कदाचित तुमचा स्टॅन्ड वेगळा असता.
कोणाकडे काही लेटेस्ट अपडेट
कोणाकडे काही लेटेस्ट अपडेट असतील तर प्लीज शेअर करा>>>>Hi, found this cool topic on Dailyhunt app. Let's join the conversation
http://m.dailyhunt.in/news/india/marathi/Amitabh+Bachchan+Hospitalised-t...
Source : "बच्चन कुटुंबाला कोरोना" via Dailyhunt
अॅप डाउनलोड करा
http://dhunt.in/DWND
तू इथुन घे अपडेट,पण सारखा हा धागा नका वर काढू कुणी
सेलिब्रिटी कोणी ही असू ध्या.
सेलिब्रिटी कोणी ही असू ध्या.
अभिनेता,अभिनेत्री,उद्योगपती,नेते.
त्यांची काळजी घेणारी खूप हॉस्पिटल आहेत .
त्या मुळे त्यांच्या आजाराचे गोडवे गाण्यात कोणाला रस नाही.
आणि लोकांनी काळजी तरी का करावी ह्या लोकांची.
Hi, found this cool topic on
Hi, found this cool topic on Dailyhunt app. Let's join the conversation
>>>
The page u r l lukin 4 no longer exist
धागा वरती काढणे हाच उद्देश
धागा वरती काढणे हाच उद्देश आहे हो
अमिताभ केवळ बहाणा आहे, त्याच्याशी धगकर्त्याला घेणे न देणे
येनकेनप्रकारेण स्वतःचे नाव फक्त आलं पाहिजे
आता तर थेट शाहरुख शी तुलना
बाळा तो कसाही असला तरी त्याला तसे वागायचे कोट्यवधी रुपयर मिळतात
तुझ्यासारखी फुकट फौजदारी नाही करत
याबद्दल तुला पैसे मिळत असते तर ठीक होते पण केवळ लोकांना त्रास देऊन आनंद घेणे आणि विकृती दाखवणे हेच तुझे मनोरंजन आहे हे अनेकदा सिद्ध झालं।आहे
तुझ्याच भल्यासाठी सांगतोय, आजार विकोपाला जायच्या आधी यातून बाहेर पड
अर्थात नाहीच पडणार तू कारण तुला व्यसन लागलं आहे हे त्यामुळे चालू द्या
सेलिब्रिटी कोणी ही असू ध्या.
सेलिब्रिटी कोणी ही असू ध्या.
अभिनेता,अभिनेत्री,उद्योगपती,नेते.
>>>>>
पण हा समान निकष कधी लागतो का?
कलाकार आणि खेळाडूंच्या चाहत्यांनाच नेहमी हा प्रश्न विचारला जातो.
एखाद्या राजकीय नेत्याचा उदो उदो करणारे आणि एखाद्या राजकीय पक्षाचा झेण्डा मिरवणारे जेव्हा हा मुद्दा उचलतात तेव्हा ते खरेच हास्यास्पद वाटते. आणि सहसा अश्या लोकांकडूनच हा मुद्दा उचलला जातो.
मुळात कलाकार मंडळी जे कमावतात ते आपल्या कलागुणांनी आणि मेहनतीने कमावतात. पण राजकीय नेत्यांकडे जो पैसा येतो तो कुठून येतो याची कल्पना सगळ्यांना असूनही तो नेता आपला लाडका असल्याने किंवा आपल्या लाडक्या पक्षाचा असल्याने त्याला ते माफ असते. त्याचा उदोउदो करण्यातही काही गैर नसते.
बाळा तो कसाही असला तरी त्याला
बाळा तो कसाही असला तरी त्याला तसे वागायचे कोट्यवधी रुपयर मिळतात
>>>>
तसे वागायचे म्हणजे कसे वागायचे?
जसा मी नायबोलीवर वागतो तसे वागायचे शाहरूखला कोट्यवधी मिळतात...
प्लीज एलाबोरेट.. कसे वागायचे कोट्यवधी मिळतात?
वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती पण
वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती पण मंद होत चालली आहे का निब्ब्या? तूच शाखामृगाबद्दल काय लिहल आहेस वरती ते वाच परत एकदा
शाखामृगाबद्दल>>>
शाखामृगाबद्दल>>>
तूच शाखामृगाबद्दल काय लिहल
तूच शाखामृगाबद्दल काय लिहल आहेस वरती ते वाच परत एकदा
>>>>>
शाहरूखला अश्या वागण्याचे म्हणजे कश्या वागण्याचे कोट्यवधी मिळतात का एवढाच प्रश्न आहे.
@ भरत -
आपल्याला हा शाखामृग शब्द खटकतो की मी ह्युमन नेचरला हुमायुन नेचर म्हटले तर तेवढेच खटकते.
आपण जर असे सिलेक्टीव्ह आक्षेप घेत असाल तर माफ करा मी आपले आक्षेप सिरीअसली का घ्यावेत?
आशुचँप, शाखामृग शब्द खटकला.
आशुचँप, शाखामृग शब्द आवडला
सेलिब्रिटी लोकांच्या करोना स्टेटसबदल त्यां च्या चाहत्यांसाठी अपडेट.
पार्थ समथान बरा झाला हो. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला).
टीप - हा नक्की कोण ते मला माहीत नाही.
आणखी सेलिब्रिटीम ध्ये अनुपम खेरच्या मातोशंनांना करोना झाला होता. त्या बर्या झाल्याने त्यांना इस्पितळातून सुट्टी मिळाली. त्याचा व्हिडियो अनुपम खेर यांनी लोकांत वाटलाय.
प्रमोद महाजन इस्पितळात होते तेव्हा मीडियावाले २४ तास इस्पितळाच्या बाहेर थांबून तासातासाच्या बातम्या देत होते. हॉस्पिटल वाले आणि त्यांचे पक्षसहकारीही अधिकृत अपडेट देत होते. तसं अमिताभबाबत आता होत नाहीए, इथे तर अमिताभ, अभि षेक, ऐश्वर्य आणि आराध्या असे चार सेलिब्रिटीज आहेत. हा त्यांच्या चाहत्यांवर अन्याय आहे.
Pages