अमिताभ आणि कोरोना

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 20:14

अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.

रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.

अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.

- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाईदवे हे वरची पंगत खालची पंगत काय लावलं आहे? करोना वरच्या पंगतीच्या लोकांसोबतच विमानात बसून आला आहे. सुरवातीला त्याची उठबस वरच्या पंगतीतच सुरु होती. कनीका कपूरला विसरलात का? हॉलिवूडच्या पण अनेक सेलिब्रिटीजना झालाय याआधी. भारतात येऊन आता कुठे तो खालच्या पंगतीत शिरला आहे. बिचारे!

असलं काही ते वाचत नसतात हो
त्यांना 8 लाख लोकांना कोरोना झाला या पेक्षा अमिताभ ला झाला या बातमीने धडकी भरते
शरूख ला झाला असता तर काय केलं असतं देव जाणे
मन्नात समोर जाऊन गडबडा लोळले असते कदाचित

आणि हो अमिताभ इथे मायबोली वर नसताना त्याच्या सौ किंवा होऊ घातल्या सौ यांच्या बद्दल बोलू नये असा नियम आहे
ते आल्यावर मग बोला काय ते
त्यांच्या अनुपस्थितीत नको
Happy

अमिताभ बच्चन यांना Myasthenia gravis हा आजार झाल्याचे समजल्यावर तीन दशकांपूर्वी अशीच सहानुभूतीची लाट जनतेमधे उसळली होती. अनेकांनी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना, यज्ञ, मंदिरांमधे पूजा वगैरे धर्मकृत्ये आरंभली होती. कूली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या पोटाला मार बसला तेव्हाही असेच घडले होते. त्यांचा डमी पुनीत इस्सार की कोण त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. आम जनता अशीच असते.
जाता जाता: अमिताभ यांना दम्याचा विकार आहे असे वाचनात येत असते. तसे असेल तर आणि त्यांचे वय पाहून त्यांचे हॉस्पिटलमधे राहाणे योग्य ठरते.

मन्नात समोर जाऊन गडबडा लोळले असते कदाचित>> ते कसले मन्नतसमोर लोळायला जातात. एखादा धागा काढुन इथच दंगा करत बसले असते.

एखाद्याला अमिताभ बाबत असे झाल्यावर धागा काढावासा वाटूच नये का? Wink

Submitted by बेफ़िकीर on 13 July, 2020 - 21:09

>>>>

सकाळी मी अगदी याच आशयाची पोस्ट ड्राफ्ट केली होती.
त्यात देव न करो पण मोदी गांधी शहा ठाकरे आदी कुटुंबियांना कोरोना झाला असता तर त्यांच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी माबोवर धुरळा उडवला नसता का यावर प्रश्नही विचारला होता.

पण मग विचार केला की हे त्या लोकांना स्वताहून हे लक्षात येऊ दे
किंवा मग एका त्रयस्थ व्यक्तीने सांगू दे.
आणि पोस्ट केले नाही

आता आपण हे सांगितले त्याबद्दल धन्यवाद Happy

कॉमेंटमध्ये सुशांत राजपूतला न्याय मिळायची मागणी होती.
लॉजिकल>> कारण ज्याने तो video बनवलाय तो सुशांत साठी CBI inquiry व्हावी म्हणून campaigning करतोय सातत्याने.

>>>>

हे तर आणखी गंमतीशीर आहे
एक सिलिब्रेटीच्या आत्महत्येचा पाठपुरावा करतोय जगात ईतके आत्महत्या होत असताना
त्याचवेळी एका सेलिब्रेटीला कोरोना झाला तर त्याला एवढे महत्व का देतात म्हणून विडिओही बनवतोय.

थोडक्यात त्याचे स्वताचे आवडते नावडते सेलिब्रेटी आहेत त्यानुसार त्याची मते बदलत आहेत किंवा विडिओजना टीआरपी खेचत आहे.

अमिताभ घरात बसून होता हे कोणी सांगितले तुला?
त्याने गेल्या 10 दिवसात मला भेटलेल्या लोकांनी स्वतः कडे लक्ष ठेवा म्हटलंय, म्हणजेच गेल्या 10 15 दिवसात तो भरपूर लोकांना भेटत असणार.
Submitted by सिम्बा on 13 July, 2020 - 22:12

>>>>>>>

काही मोजक्या लोकांना भेटला असेल. ते तर मलाही भेटावे लागतेय. जीवनावश्यक गोष्टी मलाही कोणी आयते हातात आणून देत नाहीये.

तो डॉकटर लोकांना धन्यवाद देणारा व्हीडिओ अमिताभ यांनी केलाच नाहीये असे हॉस्पिटल का म्हणत आहेत
Submitted by आशुचँप on 13 July, 2020 - 22:27

>>>

एकदा काय ते लिंक द्या आणि संपवा हा विषय

बाईदवे हे वरची पंगत खालची पंगत काय लावलं आहे? करोना वरच्या पंगतीच्या लोकांसोबतच विमानात बसून आला आहे. सुरवातीला त्याची उठबस वरच्या पंगतीतच सुरु होती. कनीका कपूरला विसरलात का? हॉलिवूडच्या पण अनेक सेलिब्रिटीजना झालाय याआधी.

>>>>

सर तेव्हा सेलिब्रेटी असो वा सामान्य माणसे सारेच बेफिकीरपणे फिरत होते.
जेव्हा भारतात पसरला तेव्हा त्यापासून लोकांनी काळजे घ्ययला सुरुवात केली तेव्हा पासून कोणत्या पंगतीतले लोक सुरक्षित आहेत वा नाहीत हे तुम्हीच सांगा आता.

एखाद्याला अमिताभ बाबत असे झाल्यावर धागा काढावासा वाटूच नये का? Wink>>>>

रुन्मेष, लोकांचा आक्षेप नक्की कशाला आहे हे अजून कळले नाहीये का तुला? वरचा प्रतिसाद लिहिणार्याचे एक सोडून दे, त्यांचं असे होते कधी कधी, पण तू सुद्धा??

मायबोलीवरचे सर्व स्वयंघोषित तज्ञ, प्रतिसाद वाढवण्यास हातभार लावण्यात स्वारस्य नाही म्हणत प्रतिसाद देणारे, एका रुन्मेषसमोर हतबल झालेले बघून विनम्रतेने अहं कसा ठेचला जातो याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले>>>>>> Rofl सही !! Happy

रुन्मेष, लोकांचा आक्षेप नक्की कशाला आहे हे अजून कळले नाहीये का तुला?

>>>>

एक सुरुवातीची आक्षेपाची पोस्ट कॉपी पेस्ट करतो

..

<<< देशभरात 8 लाख लोकांना लागण, 22 हजार मृत्युमुखी
महाराष्ट्रात लाखभर लोकांना लागण त्याचे काही नाही
आणि अमिताभ ला झाला की धडकी भरते
घरात आलाय असे वाटते

या रोगट मानसिकतेची कीव येते
कसली लोचट आणि मानसिक गुलामगिरीची वृत्ती आहे ही
हिडीस
Sad

नवीन Submitted by आशुचँप on 12 July, 2020 - 12:47 >>>+१११११

अगदी अगदी हेच मनात आले होते जेव्हा काल रात्री बातमी वाचली अन आता माबोवर पण हेच Sad

Submitted by VB on 12 July, 2020 - 13:08

अवांतर - पुराव्यांसकट अत्यन्त गंभीर आरोपांखाली आत असलेला गुन्हेगार संजय दत्त जेलच्या आत कमी बाहेरच जास्त असायचा पण वरावरा राव सारख्या वयोवृद्धांना प्रकृती कितीही खालावली तरी जामीन काय मिळत नाही Sad
असल्या बातम्या अमिताभपुराणात दिसत नाही म्हणून इथेच टाकतोय मुद्दाम
https://indianexpress.com/article/cities/mumbai/elgaar-parishad-case-var...

अभिषेक बच्चन ची नवी सिरीज पहिली का कोणी?
मी दोन पार्ट पाहिले अगदीच अतिशयोक्ती आहे

अमिताभ मायबोली वर नसताना त्याच्या मुलाबद्दल बोलतोय पण आता काय नाईलाज आहे Happy

असल्या बातम्या अमिताभपुराणात दिसत नाही म्हणून इथेच टाकतोय मुद्दाम
>>>
यात दोष कोणाचा?
अमिताभचा, त्याच्या करोडो चहात्यांचा, मिडीयाचा, धागाकर्त्याचा? कोणाचा?

अमिताभ मायबोली वर नसताना त्याच्या मुलाबद्दल बोलतोय पण आता काय नाईलाज आहे Happy
>>>>>>
अभिषेक सेलेब्रेटी आहे. त्यालाही कोरोना झाला आहे. त्याच्याबद्दल ईथे बोलायला काही हरकत नाही.
शाहरूखच्या मुलांबद्दल बोललेले खटक्ले होते. आजही त्याला आक्षेप आहेच !

यात दोष कोणाचा? >>> दोष कुणाचाच नाही पण यासाठी योग्य धागा न सापडल्याने ट्रेंडिंग धाग्याचा उपयोग करून घेऊ म्हटलं Happy

जिद्दु, ओके. अवांतर आता अपडेट केलेत. ते गरजेचे होते. नाहीतर ते सुद्धा धाग्याशीच संबंधित आहे समजून लोकं त्यावरूनही आपसात भिडायला सुरुवात झाली असती Happy

येनीवेज, कोणाकडे अमितजींचे लेटेस्ट अपडेट असतील तर शेअर करा.
व्हॉटसपवर अफवांना ऊत आलाय.
अमितजींनी मोदींना समर्थन देत थाळी वाजवली होती याचा रागही काही लोकांच्या मनातून अजून गेला नाहीये

मग जया रेखा बद्दल काय
तेही खटकलं होत बोलणं
आणि शाहरुख ची पोर अनि बायको सेलिब्रिटी नाहीत का

एखाद्या 'अ'आयडीने दुसऱ्या एखाद्या 'ब ' आयडीला उचकवून दाखवण्याची आणि ह्या ब आयडीने शांत राहण्याची विडासुपारी घेतली असेल तर त्यासाठी एखादा विशाल हॉल घेऊन तिथे हा पानसुपारी शेला शाल जोडी जोडा पागोटे समारंभ केला असता तर खूप रंगतदार ठरला असता. पण इथे मायबोलीच्या चार टकलयांसमोर खेळ काही पुरेसा रंगत नाहीय बुवा.

खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले
या वाक्याचा अर्थ असा लागतो की अमिताभ माझ्या वरच्या पंक्तीत आहे. त्यालाही होऊ शकतो तर माझ्यासारख्या त्याच्या खालच्या पंक्तीतील कोणालाही सहज होऊ शकतो.>>> भारि जोक मारता राव

आणि शाहरुख ची पोर अनि बायको सेलिब्रिटी नाहीत का
>>>
नाहीत

मग जया रेखा बद्दल काय
तेही खटकलं होत बोलणं
>>>
प्रसंग काय आणि आपण बोलतो काय म्हणून खट्कले होते. ईतर दिवशी खुशाल बोला ना.

इतर दिवशी कशाला अमिताभ ला डबा द्यावा लागेल
तो काय नानावटी मध्ये कामाला आहे का?

आणि गौरी आणि अब्राह्म का काय ते सेलिब्रिटी नसतील मग काय आहेत?
किती ते आंधळे प्रेम ?
म्हणजे एक सो कॉल्ड दैवत वगैरे आणि त्याच्या घरचे सेलिब्रिटी च्या पण लायकीचे नाहीत?

सर तेव्हा सेलिब्रेटी असो वा सामान्य माणसे सारेच बेफिकीरपणे फिरत होते.
जेव्हा भारतात पसरला तेव्हा त्यापासून लोकांनी काळजे घ्ययला सुरुवात केली तेव्हा पासून कोणत्या पंगतीतले लोक सुरक्षित आहेत वा नाहीत हे तुम्हीच सांगा आता.
Submitted by ऋन्मेऽऽष on 14 July, 2020 - 00:17

>>>

ज्यांनी काळजी घेतली नाही किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ते बळी पडलेत. अमेरिकेतला बळींचा आकडा बघा. त्यांना कोणत्या पंगतीत बसवणार?

ज्यांनी काळजी घेतली नाही>>>> परीचीत, इथेच गोम आहे. ज्याला करोना झालाय त्याला ती लक्षणे जाणवेपर्यंत तो १० जणांना ( कुटुंबासहीत ) भेटतो. सुरुवातीला सर्दी खोकल्याने त्रास होतोय समजून दुर्लक्ष केले जाते. मग तोपर्यंत घरचे लोक याच्या बरोबर बाधित होतात. घरचे लोक तोपर्यंत बाहेर आणखीन १०-२० लोकांना भेटतात. मग ही लिंक सुरु होते.

बर्‍याच वेळा एकत्र येऊ नका असे असे सरकार, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यांनी सांगुन देखील लग्न कार्ये केली गेली, त्यात ५०-१०० सामिल झाले, पार्ट्या केल्या गेल्या त्यात शे-पाचशे जमा झाले. आमच्या इथे ही उदाहरणे घडलीत. आणी हे करोनाचे भूत पार घरापर्यंत येऊन ठेपलेय अशी स्थिती प्रत्येका समोर आ वासुन उभी आहे. या रोगाला कोणी गांभिर्याने घेतच नाहीये. परवाच आमच्या जवळच्या मार्केट मध्ये मास्क न घातलेल्या आणी उगाच फिरणार्‍या लोकांना पोलीसांनी जाम हाणले. ही लिंक जर तुटली तरच हे सत्र थांबेल.

Pages