आली ही सर पहिल्या पावसाची,
याच सरींनी घडविली भेट गगन-भूमीची,
भिजवुनी ही काळी माती
सुगंध उधळला आसमंताती,
दोघांच्या या भेटीने सारी सृष्टीच जणू भारली
पुन्हा नव्या चैतन्यात नटन्याची तयारीच करु लागली!
कोसळल्या मग सरींवर सरी
अंगणातला सुगंध गेला नदीच्या तीरी,
घरा घरात बागडू लागल्या मग बायका पोरी,
धांदल उडाली बघ मळेराणावरी
धान्याची झाकाझुक करू लागला शेतकरी,
स्वप्न पाहु लागला तो नव्या पेरणीची
उत्साही सर आली पहिल्या पावसाची.
आली ही सर पहिल्या पावसाची,
धुळ धुवून काढलीतीने शहरी हवेची
सुुखावला हर-एक कष्टकरी झळ केली कमी उष्माची,
मग शहरातल्या त्या बोळांन मधुनी
निघू लागल्या छोट्या जहाजी सावरत स्वप्न उद्याची,
आली ही सर पहिल्या पावसाची,
घेऊन अनेक आठवणी गाठोड्याशी
हळूच उलगडत गाठ त्याची,
वारा दवडला दारोदारी घेऊनी चाहुल श्रावणाची,
पक्षी उधळले चैाहिदिशी
घालत सांगड अनोख्या मिलनाची,
अश्या कितीही सरी घेतल्या अंगावरी
तरी पहिलीच सर असते सगळ्यांना प्यारी!!
कवयत्री - जान्हवी जोरी.
खूप छान लिहिल आहेस
खूप छान लिहिल आहेस
धन्यवाद!
धन्यवाद!
खूपच मस्त कविता केली आहे
खूपच मस्त कविता केली आहे तुम्ही
"वाडा दवडला दारोदारी" --> खूपच सुंदर कल्पना!
"पुलेशु"
धन्यवाद!
धन्यवाद!