वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@डीविनिता माझ्या इथल्या लिंक्स चे मेसेजेस डिलीट झालेत :0
मला वाटल बंदी आहे म्हणून कोणीतरी काढून टाकलेत
धन्यवाद उत्तरा बद्दल...

हो का
मग काही कल्पना नाही
पण असा नियम धागाकर्त्याने लिहिल्याचे आठवत नाही

डार्कचा 3 रा सिजन पाहून सम्पवला मागे. केवळ केवळ अफाट, अतर्क्य आणि अचाट सिरीज.  पात्रांमधली गुंतागुंत , संवाद, बॅकग्राउंड स्कोर, अभिनय सगळं एकदम अफाट.  शेवट पण भारी केलाय. 

स्ट्रेंजर थिंग्ज चा पण 4 था सिजन असाच उत्तम असो. आणि क्राउन चे पण पुढले दोन्ही सिजन भारी असू देत..

नेटफ्लिक्स वर ८ भागांची ‘कॅलिफेट’ पाहिली.
सिरियातल्या स्त्रियांच्या गंभीर समस्यांबद्दल, स्विडनहून लहान वयातल्या मुलींची ब्रेनवॉश करूनं सिरीयाला होणारी निर्यात, टेररिझम आणि एस्केप फ्रॉम सिरीयाचा मोठा स्ट्रगल अशा गोष्टी हातळल्या आहेत , जरुर बघा , सत्यघटनांवर आधारीत आहे.
ही सिरीज मुख्य्तः ४ बायकांवर आहे पण ओव्हरॉल अनेक गोष्टी सुन्न करतात !
(मुळ सिरीज स्विडिश आहे, ऑप्शन्स मधे इंग्लिश सिलेक्ट करावे लागेल.)

Submitted by दीपांजली on 25 June, 2020 - 02:37 >> हुश्श कोणीतरी बघितली ही सिरिज.

ब्रिथ ऑप्शनला टाकण्यात येईल मग Proud कारण स्लो सिरीज असेल तर नाहीच आवडत.

इथे वाचून द फायनल कॉल बघत आहे झी ५वर . ६ एपि झाले. त्यात पण मधे मधे बोर झाले किती वेळ अर्जुन रामपालचा विमान चालवण्याचा आणि पॅसेंजरच्या गोंगाटचा सिन संपतच नव्हता. ८ च एपि आहेत त्यामुळे पुढे ढकलत ढकलत बघणे चालू आहे.

हॉरर आवडत असेल तर JU - ON - origins बघा नेटफ्लिक्सवर ... जपानी सिरीज आहे इंग्लिश मध्ये dubbed.. based on true story

असुर बघितली जबरदस्त शेवट पर्यंत खिळवून ठेवते....कोणी जर विचारल असुर की ब्रेध अभिषेकवाली तर नक्कीच असुर सांगेन

"टेलिग्राम वर कश्या बघता?" ----> @बब्बन टेलिग्राम वरति काही पायरेटेड (480पी टू फुल एच.डी) सिनेमे लिक कारणार्‍या वेब्साईट चे चॅनल्स आहेत.
मोव्हिज फॉर मी आणि स्टार मोव्हीज अशी दोन चॅनल्स मला माहीत आहेत. टेलिग्राम वरच्या सर्च बार मध्ये या चॅनल्स ची नावे टाईप करा. मग ती चॅनल्स जॉईन करा. आणि त्यात पुन्हा सर्च बार मध्ये वर हव्या त्या मुव्ही च नाव टाईप करा.... मुव्ही अपलोडेड असेल तर नक्की दिसेल.
मी तुम्हाला लिंक्स दिल्या असत्या पण दुर्दैवाने/सुदैवाने माझ टेलिग्राम गेले तीन महिने बंद आहे. काही खासगी कारणास्तव!!
():

"कुठे आहे हि" ---> वूट वाल्यान ची आहे.
तुम्ही वूट ऑफिशिअल प्रेफर करणार की दुसर्‍या वेब्साइट्स Happy
सन्देस्ग्शात लिहिल तरी चालेल , लिंक्स आहेत माझ्याकडे

झॉम्बी हॉररची आवड असेल तर नेटफ्लिक्सवर "किंगडम'' ही कोरियन सिरीज आहे. एवढी भारी सिरीज असुनबी फार कमी लोकांनी पाहिलीय . कोरियन भाषा असल्याने असेल बहुतेक. दोन सीजन झालेत, तिसरा येईल का नाही माहीत नाय.
https://www.imdb.com/title/tt6611916/

फौदा
इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षावर आधारित फौदा (Fauda) नावाची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. फौदा हा अरबी शब्द असून याचा मराठी अर्थ अनागोंदी असा होतो. परंतु इस्राईली दहशतवाद विरोधी पथकामध्ये वापरला जातो, जेव्हा एखादे कार्य किंवा कामगिरी पार पाडताना मोठी समस्या किंवा धोका उत्पन्न होतो तेव्हा फौदा शब्दाचा वापर केला जातो.

डोरोन कॅविलीओ हा निवृत्त सैनिक असून त्याला १८ महिन्यानंतर Israel Defense Force (IDF) मधे परत बोलवण्यात येते. त्याच्याकडून मारला गेलेला आतंकवादी अबू (तौफिक) अहमद उर्फ पँथर हा जीवंत असून त्याच्या भावाच्या लग्नात येणार आहे अशी माहिती मिळते. आणि अबू अहमदला पकडण्यासाठी डोरोन आणि त्याची टीम कामगिरीवर निघते, आणि सुरु होतो एक न संपणारा प्रवास.

या वेब सिरीजमधे विशेष सुरक्षा पथकातील सदस्यांची मानसिकता, परिवारातील ताणतणाव, दहशतवादी परिवारातील सदस्यांची घुसमट, मानसिकता योग्यरीत्या चित्रित केलीये. डोरोनची पत्नी गली आणि त्याचाच पथकातील दुसरा सदस्य नाओर यांचे विवाहबाह्य संबंध, ते समजल्यावर डोरोनची प्रतिक्रिया, आणि काही काळानंतर दोघेही एकाच मिशनवर एकत्रित काम करणे. त्याचबरोबर डोरोन आणि त्याचा किशोरवयीन मुलगा इडो यांच्यातील ताणले गेलेले संबंध, डोरोन आणि डॉक्टर शिरीन यांच्यातील प्रेमसंबंध.

एका कामगिरीवर असताना डोरोन बॉक्सिन्गचे प्रशिक्षण बशरला देत असतो, परंतु नंतर बशर दहशतवादी कारवाईत ओढल्या जातो आणि त्याला थांबविण्याची कामगिरी डोरोनवरच येते. बशरच्या बाबतीत डोरोनच्या मनात हळवा कप्पा असतो आणि तो त्याला यातून बाहेर यावा म्हणून त्याच्या परीने प्रयत्नरत असतो. डोरोनच्या संपर्कात येणाऱ्या वक्ती लवकर या जगातून निरोप घेतात त्यामुळे येणारी निराशा, हतबलता, उदासीनता Lior Raz या अभिनेत्याने बारकाईने साकारली आहे.

या सिरींजमधील काही प्रसंग अंगावर काटा आणतात अबू अहमद आणि त्याचे साथीदार बोयाझला अपहरण करून त्याचा शरीरात बॉम्ब लावतात, तेव्हा डोरोन आणि त्याची टीम, तौफिकचा सल्लागार शेख आवदल्ला याला आणि तौफिकची मुलगी यांना अपहरण करून अदलाबदली करायला येतात.
दुसऱ्या सीझनमध्ये शेखचा मुलगा डोरोनच्या वडिलांची आयसिस प्रमाणे हत्या करून आपला बदला घेतो. नंतर डोरोन आणि त्याचा मुलगा इडो यांचेही अपहरण करून त्यांना ठार करणार असतो. डोरोन आणि टीम काही दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जातात त्यावेळी त्यांच्या टीमवर दगडकेक होते. मला वाटलं होत कि हे फक्त काश्मीरमधे किंवा आझाद मैदानावरच होतं. परंतु ही वैश्विक क्रिया आहे. तसेच या टीममधील एकमेव महिला सदस्य नुरितवरही हल्ला केल्या जातो. (आझाद मैदानावर रजा अकादमीद्वारे आयोजित झालेलया मोर्च्यात महिला पोलिंसावर झालेला हल्ला).

Lior Raz या अभिनेत्याने डोरोनची भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. त्याचप्रमाणे कॅप्टन गॅबी अय्युब झालेला Itzik Cohen, मिकी मोरेनो (Yuval Segal), डॉ. शिरीन (Laëtitia Eïdo), बोयाझ (Tomer Kapon), नुरीत (Rona-Lee Shim'on) या सर्वांची कामेही अगदी समर्पक झालेली आहेत.

मर्झी एक नंबर बकवास वाटली.
अभिषेक बच्चनची ब्रीद बघितली का?
अमित साध आवडला नाही असं लिहिलंय का वर?
मी तर माधवनसाठी ब्रीद बघायला सुरु केली. पण अमित साध जास्त आवडला.
पाताललोक, बुलबुल, आर्या असं बरंच बघायचंय.

>>कोणी ट्राय केली का? <<
अजुन पर्यंत नाहि, पण हा प्रकार एचबिओ गो/नाउ --> एचबिओ मॅक्स सारखाच वाटतोय. पिकॉक म्हणजे एनबिसी (ओन्ड बाय कॉमकास्ट), त्यांचं एनबिसी नावांचंच स्ट्रिमिंग अ‍ॅप आहे, त्यालाच बंपप (विथ प्रिमियम कांटेंट) करुन पिकॉक लाँच केलेलं आहे. बेसिक कांटेंट फ्री आहे. एक्स्फिनिटि कॉमकास्टची सबसिडि असल्याने एक्स्फिनिटि सबस्क्रायबर्सना पिकॉक प्रिमियम फ्री आहे...

बाय्दवे, या महिन्यात स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म फॉर्मात आहे. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राइम वर एकुण ७ नविन चित्रपट रिलीज होत आहेत...

Peacock चुकीच्या टाईमला लॉन्च करत आहेत. सध्या मार्चपासून शूटिंग बंद आहेत सो नवीन कंटेंट त्यांना काही मिळणार नाहीये.

धन्यवाद राज. मी ब्राउज केले तर कॉण्टेण्ट काय उपलब्ध आहे नीट समजले नाही. गेल्या ३-४ वर्षातील केबल्/ब्रॉडकास्ट टीव्ही शोज बद्दल फारशी माहिती नाही त्यामुळेही रिलेट झाले नाही.

नवीन सर्विसेस पैकी डिस्ने चा भर खूप लौकर ओसरला. सुपर हीरो किंवा इतर फ्रॅण्चायजी मधे फार इण्टरेस्ट नसल्याने फार काही इण्टरेस्टिम्ग सापडत नाही.

त्यामानाने एचबीओ मॅक्स मस्त आहे: फ्रेण्ड्स, बिग बँग थिअरी, सिलिकॉन व्हॅली, गॉट, द वायर, अण्टुराज (Entourage), बॉलर्स, सक्सेशन, बिल मार, जॉन ऑलिव्हर - बराच इण्टरेस्टिंग कॉण्टेण्ट आहे. चित्रपटही बर्‍यापैकी आहेत.

Pages