कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक युगं आधी मी एक इंडियन स्टाईल ब्लॉग फीड फॉलो करायचे त्यात अनु दिवान नामक एक सोशलाईट बाईबद्दल नेहमी स्टोरी असायच्या. तिच्या Hermes birkin बॅग्स जबरी असायच्या. या अर्थात खूप महाग असायच्या व त्याला वेटिंग पण खूप असतं म्हणे. बाकी पण सगळे अमेरिकन युरोपियन डिझायनर ब्रँड्स असायचे.
आता परत या अनु काकू न्यूज मध्ये आहेत कारण यांच्या नवऱ्याने पीएमसी बँकेत मोठा घोटाळा करून नवरा आणि सासरा बहुधा आता जेलमध्ये आहेत. करोडोंच्या Hermes घ्यायला पैसा कुठून आला ते लक्षात आल्यावर शिसारीच आली एकदम.

मी msn लाइफस्टाइल बघते.
फॅशन पोलीस ला ऍडीकटेड होते एकदम.सर्व फोटो वरीनदर चावला चे असतात.जनरली आपल्याला छान वाटणारी बाई फॅशन पोलीस वाल्याना 'वी आर नॉट फॅन ऑफ द औटफिट' आणि आपल्याला वेडीबागडी मॅचिंग केलेली बाई यांना 'स्टनिंग अँड ऍडींग द उंफ फॅक्टर' वाटत असतेय. शिवाय काळा सूट घातलेली सगळी माणसं 'डॅपर' दिसत असतात.

ईईईईईईईईई लायब्ररी कशाला? इतर बायांनी नेसलेल्या साड्या आपण का नेसायच्या???>>> ड्रायक्लीन करुन ठेवायच्या ना! आणि दृष्टीआड सृष्टी! उलट अजून एक आयडिया! करिना कपूर किंवा तत्सम सौंदर्य सम्राज्ञींशी एखाद्या वामा कलेक्शन वाल्यांनी टाय अप करायच. आमचे कडे करिना कपूर ने स्पर्ष केलेल्या साड्या मिळतील. एकदा नेसलेली साडी परत नेसायची नाही याला जी सौंदर्यप्रतिष्ठा आहे ती पण मिळेल व्हराईटपरी व्हरायटी मिळेल. शिवाय बार्गेनिंगचा लिलाव ठेवायचा. म्हणजे जास्त किंमत देउन साडी घेणारीला ऐश्वर्यावती पुरस्कार अशी काहीतरी टूम काढायची

तिथे रेंटल ब्रायडल गाऊन ची सोय पण असेलच.>>>>> आपल्याकडेही असावी.माझ्या वसईच्या कलीगने, रेंटवर ब्रायडल गाऊन तिच्या लग्नात घातला होता.कारण हेच की महागाचा ड्रेस नंतर पडून रहातो.अंदाजे १५- १६ वर्षे जुनी गोष्ट आहे ही.

मलाही दुसऱ्याचे कपडे वापरायला आवडत नाहीत. पण रेंटल वेडिंग गाऊन वाचून वाटलं की हिंदू लग्नात सुद्धा रेंटल शालू का बरं घेऊ नये? लग्नाच्या रिलेटेड गोष्टींशी आपण उगीच भावना अडकवून हळवे होत राहतो, मग नंतर 15-20 हजार रुपयांची साडी वॉर्डरोब मध्ये लटकत रहाते. लग्नाच्या पहिल्या वर्षात दिवाळी किंवा अगदीच सख्ख्या भावाबहिणीचं लग्न सोडल्यास इतकी हेवी साडी दुसऱ्याच्या फ़ंक्शन्सना वापरता येत नाही.

माझी साडी टिपिकल ब्राह्मणी शालूचे रंग असतात तशी नव्हती. गुजराथी लग्नात असणारं मोतीया आणि मरून कॉम्बिनेशन होतं, त्यामुळे मी लग्नानंतर दोन वर्षात सरळ फाडून इंडो वेस्टर्न फ्युजन असलेला पार्टी वेअर बनवून घेतला. त्यानंतर तो चिक्कार वापरता आला. ज्या बुटीकने ड्रेस बनवला त्यांनी त्यांच्या ऍडसाठी, दिवाळीच्या सुमारास त्या ड्रेसवर माझं एक फोटो शूट ठेवला आहे. तो झाला की फोटो टाकेन (चेहरा उडवून Wink ). कोणाला आपल्या लग्नाच्या साडीला कात्री लावायची हिंमत हवी असेल तर तेवढाच माझ्याकडून थोडा पुश. Proud

लग्नानंतर दोन वर्षात सरळ फाडून इंडो वेस्टर्न फ्युजन असलेला पार्टी वेअर बनवून घेतला.-- कल्पना चांगली आहे, फक्त ती साडी फाडायची हिंमत एकवटता यायला हवी.. त्या फोटोची वाट पाहतेय.. Happy
माझी ती टिपीकल हेवी साडी नाहीये, रंग decent (अबोली) असल्यामुळे मी इतरांच्या लग्नात बिनधास्त वापरू शकते

आमचे कडे करिना कपूर ने स्पर्ष केलेल्या साड्या मिळतील. >>> प्रघा, हे खरंच असं असतं. मी फेसबुकवर अशा auctions च्या जहिराती आणि बातम्या पाहिल्या आहेत. मला वाटतं तो ड्रेस डिझाइन करणारी एजन्सीच बऱ्याच वेळा तो ड्रेस विकत असावी. आणि इथे मात्र depreciation value पाहत नाही, तर उलट सेलेब्रिटीने वापरलेला ड्रेस म्हणून चढी किंमत.

माझा शालू मी खूप लग्नात वापरून झाला.
सर्वात गंमत पुरुषांची होते.भयंकर हेवी शेरवानी किंवा ते हल्ली वर खाली फॅशन चे कुर्ते आणि खाली तंग सुरवार असते ते लग्नात घेतलेले असतात.ते नंतर कुठेही घालायला या लोकांना लाज वाटते.आपलंच लग्न आहे असं वाटून.
फोटोशूट चा मुंडकं न उडवता फोटो झालाच पाहिजे!!!

माझा शालु माझ्या लग्नानंतर फक्त १५ दिवसानी झालेल्या नणंदेच्या लग्नात नेसला. १५ वर्ष बॅगेत आहे. मागच्या वर्षी लेकीला घागरा शिवाय्चा विचार करुन बॅगेतुन काढला पण फाडुन घागरा शिवायचा धीर झाला नाही. Sad
मीरा पार्टी वेअरचा फोटो नक्की टाक. आयडीया मिळेल.

सर्वात गंमत पुरुषांची होते.भयंकर हेवी शेरवानी किंवा ते हल्ली वर खाली फॅशन चे कुर्ते आणि खाली तंग सुरवार असते ते लग्नात घेतलेले असतात.ते नंतर कुठेही घालायला या लोकांना लाज वाटते.आपलंच लग्न आहे असं वाटून.+111

मीरा, त्या बुटिकचा पत्ता आणि फोन देणार का? आणि फोटोतर हवेतच. Happy
मला एका हेवी साडीचा ड्रेस करायचा आहे. शालू आकाशी असल्याने खूप वापरला जातो.

ऑनलाइन पैठणी खरेदी बद्दल कुणाला काही अनुभव आहे का ?

मुंबईमध्ये ऑनलाइन पैठणी कुठून मागवता येईल?

मला नको आहे पण माहिती करून ठेवतेय, गिफ्ट द्यायचे आहे ,सध्याच्या काळात शॉपिंग करणे महाकठीण आहे

मेघा, मायबोली आयडी मामी आणि वेल कडे चौकशी करा.
त्यांना याबाबत बरीच माहिती आहे आणि बिझनेस करतात.
https://www.maayboli.com/user/45395
मामी आयडी लिझिकीचे जग धाग्यावर मिळेल.

माझी लग्नातली साडी भरलेली आणि मरून कलरची आहे. अगदी हिंदी फिल्ममधे दाखवताय तशी. लग्नानंतर पंधराच दिवसांनी एका जवळच्या लग्नात वापरली त्यानंतर दहा वर्षे तशीच पडून आहे. इतकी भरलेली साडी दुसर्याच्या लग्नकार्यात वापरता येतच नव्हती. सूरूवातीला वाटले, आपल्याला नाही वापरता आली तर मुलगी झाल्यावर तिला छानसा ड्रेस शिवून टाकू. आता दोन्ही मुलेच आहेत. आता त्या साडीला कात्री लावून मलाच वापरावी लागेल. पुण्यात किंवा पिंचिं मधे असे एखादे बुटिक कुणी सुचवेल काय?

ड्रेस शिवला तरी इतका वर्क असलेला ड्रेस तुम्ही 1दाच वापराल फार तर दोनदा त्यावर नाही
मग परत इतका खर्च करून काय उपयोग?
कमी खर्चात ड्रेस शिवून मिळत असेल तर ठीक ,
नऊवारी पण शक्य असेल तर शिवू शकता,
ती तुम्हाला स्वतः ला आणि जवळच्या मैत्रीण शी ही आलटून पालटून वापरता येईल

दुसऱ्याच्या लग्नकार्यात बिनधास्त वापरा.सर्वांच्या साड्या दागिने भपका असतात त्यात अजून एक.
मुलगी मोठी झाल्यावर फॅशन म्हणून ट्रॅडिशनल डेज ना वापरेल साडी.
डिझायनर गाऊन्स बनवणारी खूप चांगली बुटीक पुण्यात आहेत.पण 'साडीचा शिवलाय' हे कितीही भारी वाला छान शिवला तरी कळतं.
मध्ये एकदा वसई च्या डिझायनर च्या फेसबुकवर फार सुंदर पॅटर्न पाहिले होते.अजिबात साडीचा गाऊन आहे असं वाटणार नाही असे.
1-2 पत्ते शोधून देते.

साडी चा गाउन चांगला शिवला तर अजिबात खराब दिसत नाही.
एलीगंट pattern शिवायचा.
साडी आपली वापरली जात नाही जास्त. आणि हल्ली च्या साडया अगदी अजुन 25 वर्ष चालतील इतक्या चांगल्या क्वालिटी च्या ही नसतात.
तुम्हाला गाउन शिवणे हा बेस्ट ऑप्शन आहे किवा लेहेंगा वापरत असाल तर लेहेंगा.
लेहेंगा ही सारखा वापरला नाही च जात पण लेहेंगा च ब्लाउज कधी दुसऱ्या साडी वर मिक्स match करून किवा लेहेंगा एखाद्या भारी क़ुर्त्या सोबत स्टाइल करू शकता.
हे फार सुंदर दिसते.
तुमची साडी कशी आहे फ़ोटो टाकू शकाल का???
काठपदर साडी च्या ड्रेस वर दागिने वगेरे आपण घालु शकतो ,
वर्क, एम्ब्रॉयडरी वगेरे वाल्या साडी च्या गाउन वर मिनिम्लिस्ट किवा नो दागिने ही चलतात.
माझा शालू फ़क़त 9 वर्ष जूना आहे पानेरी मधून घेतलेला पण त्याची नीट निगा राखुन ही त्यावर बट्टे आहेत त्याचे काळे डाग पडलेत.
म्हणून मी हल्ली च्या साडया टिकतील यावर विश्वास च ठेवत नाही

माझा शालू चांगला टिकलाय, बहुतेक चंदेरी जर असल्याने टीकला असावा.फार हेवी नाही.भरपूर लग्न, नव्या ऑफिस चे उद्घाटन, घरातले गौरी गणपती दिवाळी पिदडून झाला.अजूनही संधी मिळेल तेव्हा नेसते.
पुण्यात साडी बुटीक वाल्या या काही मिळाल्या. यांचे डिझाइन्स आवडले.
https://m.facebook.com/shilpiguptakumar/
https://m.facebook.com/sapna.gandhi.710?lst=100002536568091%3A1000014141...
https://m.facebook.com/Sayuridesignstudio/

लोकाग्रहास्तव वर काढतेय हा धागा...

>>Ultimate Gray
The Pantone Colors of the Year for 2021 are Ultimate Gray and Illuminating. The Pantone Colors of the Year for 2021: Ultimate Gray and Illuminating

यंदा इंड्यातल्या लग्नसराईत मॅचिंग मास्कची चलती आहे असं नेटकरी म्हणताहेत Wink शुभेच्छा Happy

The Pantone Colors of the Year for 2021 are Ultimate Gray and Illuminating. The Pantone Colors of the Year for 2021: Ultimate Gray and Illuminating
<<
अरेवा, माझा आवडता रंग , त्या निमित्ताने माझी रिक्षा !
मी अलिकडेच सुरु केलेल्या फॅशन्/स्टायलिंग रिलेटेड युट्युब चॅनलवर एक बेसिक ग्रे कुर्ता स्टाइल करायच्या १० पध्दती दाखवल्या आहेत, ज्यांनी ऑलरेडी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की बघा आणि सबस्क्राइबही करा !
https://youtu.be/gJG2ihXMTkw

जुन्या सिल्क साड्या ( फारशी निगा न राखलेल्या , काठाला सुरकुतलेल्या ) , जरा बर्‍या दिसण्यासाठी (साड्या ) काही टिप्स आहेत का. ड्राय्क्लीन वगैरे करुन पहिले आहे, फर्सा उपयोग होत नाहीये. ( शांपू वापरून अलगद धुवून वाळत टाका आणि वर कापड ठेवोन इस्त्री करा असे नेट वर वाचले पण ते एकुणातच सिल्क साड्यन्साठी आहे बहुतेक.

Pages