अमिताभ आणि कोरोना

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 20:14

अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.

रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.

अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.

- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

बोकलत, यांना कोण मोठं करतं? आपणच ना? मायबोलीवर सिनेमाचे किती धागे आहेत? गेल्या वीस वर्षात मी आणी माझ्या नवर्‍याने फक्त २ सिनेमे चित्रपट गृहात जाऊन पाहीले, जंगलबुक व तान्हाजी. या चित्रपटामागे हे स्टार किती मानधन घेतात माहीत आहे ना? शाहरुख, सलमान यांच्यावर किती धागे आहेत?

आमदारांना गाड्या घेण्यासाठी ३० लाखाचे कर्ज मंजूर झालेय. व्याजाचे काय? व्याज नाहीये म्हणे ! ( ही कायप्पा बातमी नाही बरं का! ) नाहीतर शिक्के मारायला काही हिरो धावत येतील.

शेतकरी, सामान्य माणुस यांना कर्ज कसे मिळते? त्यातले मधले कोण हडपते?

मी तर वर्षभरात फक्त तान्हाजी थेटरात जाऊन पाहिला.
>>
+७८६
तो सुद्धा जराही ईच्छा नव्हती आणि जाऊनही जराही नाही आवडला
फक्त स्त्री हट्टाला बळी पडलो.

मी गेल्या सहा सात वर्षात एकूणच १५-२० चित्रपट पाहिलेले.
त्यातील ७-८ थिएटरला, उरलेले मोबाईलवर
त्या ७-८ मध्येही निम्मे मराठीच

कलाकार मंडळी ना योग्य तो सन्मान दिला पाहिजे हे मान्य आहे.
काही सिनेमे सामाजिक प्रश्न योग्य रित्या मांडतात आणि त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर होतो.
काही सिनेमे विज्ञान मुळे पुढील जग कसे असेल मानवाचे भवितव्य कसे असेल ह्या वर भाष्य करतात तर काही मनोरंजन करून काही वेळा साठी मना वरील तान कमी करतात.
हे खूप मोठे कार्य कलाकार करतात .
त्यांचा आदर करा .
पण मूर्ख सारखे प्रेम व्यक्त करू नका .
त्यांच्या बंगल्या समोर मूर्ख सारखे दिवस भर उभे राहणे.
त्यांना बघण्यासाठी गर्दी करणे.
त्यांना काही तरी वेगळे समजणे.
प्रेम व्यक्त करण्याची रीत काही लोकांची अतिशय मूर्ख पणाची असते.
ती सुद्धा माणसे आहेत पडद्या वर आणि खऱ्या आयुष्यात ते पूर्णतः वेगळे असतात.
सिनेमात समाज कार्य करत असती तर खऱ्या आयुष्यात समाज विघातक कृत्य ते करत असतात तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवून देणे हे पण आपलेच काम आहे.

पण मूर्ख सारखे प्रेम व्यक्त करू नका .
त्यांच्या बंगल्या समोर मूर्ख सारखे दिवस भर उभे राहणे.
त्यांना बघण्यासाठी गर्दी करणे.
त्यांना काही तरी वेगळे समजणे.

>>>

हे आपल्या देशात क्रिकेटर्स बाबतही होते

ज्यांना कोरोना झाला आहे अश्यांवर कसे हे विनोद सुचू शकतात आणि लोकं कसे ते एंजॉय करू शकतात अनाकलनीय आहे.
पण एकूणच हल्ली लोकांची संवेदनशीलता कमी झालेली आढळते.

कोणी मेला तरी त्याचे विचार जात पात राजकीय कल यावरून ते न पटणारे असल्यास लोकं टिंगल करताना आढळणे हे सुद्धा हल्ली फार कॉमन झालेय.

जोक करोना झालेल्यांवर नाहीएत, तर सेलिब्रिटींच्या हमुची बातमी देणाऱ्या आणि त्यांच्यावर धागे विणणाऱ्यांवर आहे. (
जसं काय हे माहीतच नाही.)
वेपांपेगे तरी आम्ही वेडगावला पोचवूच.

आणखी एक प्रतिसाद वाढला म्हणून खुष ना?

मिडीयावर असला तरी त्यात बच्चन परीवाराचेच संदर्भ वापरून जोक्स झाले न सारे.
बेबी खना खाया क्या वगैरे पर्सनल.. आणि.. मुलीचा उल्लेख.. सगळे हे विनोद निर्मितीसाठी करावे लागत असेल तर अश्या विनोदाच्या दर्ज्याबद्दल न बोललेलेच बरे

जमल्यास प्रत्येकाने स्वताला अमिताभ अभिषेक ऐश्वर्याच्या जागी ठेऊन बघावे
ते आता काय परीस्थितीत आणि काय टेंशनमध्ये असतील.. परीवारात चार जणांना कोरोना आहे.. ल्हान मुलीलाही आहे.. काय विचार असतील अश्यावेळी डोक्यात..
त्यांनी हे पाहिले त्यांच्या नातलगांनी पाहिले तर त्यांना हे कसे वाटेल?

की श्रीमंत आहेत तर टेंशन न्सतेच
की कळवळा फक्त गोरगरीबांचाच करायचा
सेलिब्रेटी हे माण्से नसतातच...
त्यांनी कश्याही परिस्थितीत त्यांचे विनोद निर्मीतीसाठी झालेले उल्लेख झेलायचेच?

ते कामधंदे वाले लोक आहेत
फावला वेळ मायबोलीवर किंवा सोशल मिडीयावर घालवत नाहीत
अनेकदा त्यांचे सोशल अकाउंट मॅनेजर तत्सम चालवतात
त्यांची काळजी करायचा ढोंगी कळवळा सोडून द्या
पुण्यात एका निवृत्त शास्त्रज्ञाला वेळीच बेड मिळू शकला नाही म्हणून मृत्यू झाला
पण अमिताभ च्या काळजीत इतके बुडून गेला आहात की असल्या बातम्या वाचत पण नसाल
आणि वर लोकांना नैतिकतेचे डोस पाजयाची दांडगी खाज

मी तर वर्षभरात फक्त तान्हाजी थेटरात जाऊन पाहिला.>>>> बोकलत, तुम्ही माझ्या प्रश्नाला सरळ साधे उत्तर दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद. Happy

पुण्यात एका निवृत्त शास्त्रज्ञाला वेळीच बेड मिळू शकला नाही म्हणून मृत्यू झाला
पण अमिताभ च्या काळजीत इतके बुडून गेला आहात की असल्या बातम्या वाचत पण नसाल
>>>>>

पुन्हा सोयीचा निष्कर्श
म्हणजे मी अमिताभची काळजी करतो तर आता उर्वरीत जा मेले तरी मला हरकत नाही हे हे तुम्हीच माझ्यासाठी का ठरवत आहात?

अशा व्यक्तींना भारत रत्न का मिळत नाही
रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला तर त्याला कधी कमी लेखू नका कदाचित त्या दानशूर वृद्धाचे नाव कल्याणसुंदरम असेल, ज्याने बक्षीस म्हणून मिळालेले तब्बल 30 कोटी रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दान केले।
हजारो कोटींची कमाई करून समाजासाठी कधी 1-2 कोटीही खर्च न करणाऱ्या सिने अभिनेत्यांची, क्रिकेट पटूची नावे आपल्याला तोंड पाठ असतात, पण समाजासाठी 30 कोटी दान करणाऱ्या कल्याण सुंदरमचे नाव मात्र देशातील 1 टक्का लोकांनाही माहित नसते।
1962 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून देशाला सढळ हाताने मदत करायचं आवाहन केलं। विशीतील कल्याण सुंदरम त्या भाषणाने इतका प्रेरित झाला कि तडक जाऊन मुख्यमंत्री कामराजना भेटला। त्याने आपल्या गळ्यातली सोन्याची चेन मदत म्हणून दिली। नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचा सत्कार केला। पुढे तो मुलगा खूप शिकला। एम.ए. झाला। लायब्ररी सायन्स मद्धे सुवर्ण पदक विजेता ठरला।
कॉलेजमद्धे लायब्ररीयन म्हणून तब्बल 35 वर्षें नोकरी करूनही कल्याण सुंदरमने एकदाही स्वतःसाठी पगार घेतला नाही। आपला पगार तो परस्पर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा। 1998 मद्धे 35 वर्षे सेवा करून कल्याण सुंदरम निवृत्त झाले। मिळालेली 10 लाख रुपये पेन्शनही त्यांनी दान केली। त्यानंतरही ते हॉटेल मध्ये वेटरचं काम करून पैसे मिळवतच राहिले- मुलांच्या मदतीसाठी म्हणून।
इतका अफाट त्याग करणाऱ्या कल्याण सुंदरमच्या कार्याची दखल कधीच कुठल्या सरकारने घेतली नाही। पण अमेरिका आणि युनोने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना " Man of the Millenium ' उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। त्यांना अमेरिकेतील एका संस्थेने तब्बल 30 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले। त्यांनी ती प्रचंड रक्कमही दान करून टाकली।
आजही कल्याण सुंदरम सामाजिक कार्यात गुंतलेले आहेत। लोकांकडून कधी रद्दी तर कधी जुने कपडे गोळा करून गरजूना वाटतात। दुर्दैवाने आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नाही हे देशाचे दुर्दैव

वॉट्स अ‍ॅप साभार : हा मेसेज नक्कीच वाईट नाही.

मजिद माजीदीचा मुहम्मद सिनेमा आणि त्यावर येवू घातलेली बंदी
(पाल्ह्याळीक पोस्ट...)

2015* मध्ये रिलीज झालेला मजीद माजिदीचा मुहम्मद हा सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येतोय, तर त्यावर बंदी घालावी अशी मागणी रझा अकॅडमीने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केली, आणि गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला तातडीने पत्र लिहीत या सिनेमाच्या ऑनलाईन प्रदर्शनावावर बंदी घालावी अशी विनंती केली आहे.

त्याचवेळी हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार होता, तेव्हा दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. दुसरी गोष्ट म्हणजे, या सिनेमाला पार्श्वसंगीत दिले म्हणून रझा अकॅडमीने रहमान विरुद्ध फतवा काढला. (रहमानने त्याविरुद्ध जे पत्र प्रसिद्ध केले ते वाचण्यासारखे आहे.)

या रझा अकॅडमीने काही वर्षांपूर्वी आझाद मैदानात प्रदर्शन केले होते. त्यानंतर तिथे जमलेल्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सर्वसामान्य मुस्लिम व्यक्तीला आजही मान खाली घालावी लागते.

रझा अकॅडमीची पार्श्वभूमी ही अशी आहे. ती गृहमंत्र्यांना माहीत नाही काय? या अशा संघटनेला पॅट्रोनाइज का करावे वाटते पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकारला?

अशा संघटना मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करतात असा समज समाजाने आणि शासनाने करून घेतला असेल तर तो वस्तुस्थितीला धरून नाही. समाजाने याविषयी व्यक्त व्हावे. तुमच्या राजकीय- सामाजिक प्रश्नांवर कायम यांच्या धार्मिक प्रश्नांनी कडी केली आहे. जोवर ही मुल्ला मौलवी तुमच्या अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व करत असतील, तोवर तुम्हाला मला भविष्य नाही हे लक्षात घ्या. यावर व्यक्त व्हा.

आता मूलभूत मुद्याकडे येतो. इस्लाममधील काही पंथांमध्ये पैगंबर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे चित्रण आज निषिद्ध मानले जाते. (आज शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण या सर्वांचे चित्रण केलेली अनेक चित्रं मुस्लिम कलाकारांनी काढली आहेत मध्ययुगात. ती सर्व ऑनलाईन उपलब्ध आहेत.)

मजिद माजीदीच्या प्रतिभेविषयी आणि त्याच्या चित्रपटाविषयी विस्तारभयामुळे लिहिणं टाळतोय. त्याने हा सिनेमा बनवला कारण त्याला मुहम्मद पैगंबराचे पॉप कल्चर मध्ये होत असलेले विकृतीकरण थांबवायचे होते, त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करायचे होते. त्यातूनच अतिशय कष्टाने त्याने हा सिनेमा बनवला. चित्रपटाला संगीत देण्यामागेही रेहमानची भूमिकाही अशीच होती. सिनेमाला इराण सरकारकडून बऱ्यापैकी सहकार्य मिळाले. मुहम्मद Trilogy तील हा पहिला सिनेमा आहे, आणखी दोन यायचे आहेत. (या भागात पैगंबरांच्या जन्मापर्यंतचे अरबी जीवन दाखवले आहे फक्त.)

इराण शिया बहुल देश. शिया पंथीय पैगंबर आणि त्यांचे सहकारी (विशेषतः अली) यांच्या चित्रणाविषयी काही अंशी लिबरल आहेत.

भारतात सुन्नी बहुसंख्य आहेत, जवळपास 80-85 टक्के. सिनेमा आला तेव्हा किंवा आत्ताही या सिनेमविरोधात त्यांनी काही आक्रीत केल्याचे ऐकिवात नाही. असे असूनही रझा ऍकॅडमी सारख्या संस्थेच्या मागणीवर प्रोऍक्टिव्ह व प्रॉम्प्ट भूमिका घेणाऱ्या शासनाचा विरोध व्हायला हवा तो अशा संघटनांचे प्रतिनिधित्व समाजाच्या माथी मारण्यासाठी.

यांच्या मिस्ड प्रायोरिटीजचा भुर्दंड मात्र सामान्य मुस्लिमांना भोगावा लागतोय (या निमित्तानेही भोगावा लागेल) मुस्लिमांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक समस्यांवर भूमिका घेण्याऐवजी या असल्या मुल्ला मौलवींपुढे लोटांगण घालून मुस्लिम सुखावतील, आणि स्वस्तात काम होईल ही पूर्वापार चालत आलेली प्रथा या सरकारनेतरी बंद करावी, ती कशी बंद करायची याची जबाबदारी सुशिक्षित आणि तरुण मुस्लिमांची आहे, त्यांनी भूमिका घ्यायला हवी.

पैगंबरांचे चित्रण करणे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे, इतरांनी ते केले तर त्यावर यांनी आक्षेप घेणे अनैतिक आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजाने अशी जबरदस्ती धुडकावून लावायला हवी. (या सिनेमात पैगंबरांचा चेहरा वगैरे दाखवण्यात आलेला नाही, कारण सिनेमा जन्मापर्यंतच आहे. दोन भाग अजून येणार आहेत.)

सुन्नी मुस्लिमांच्या, मुल्ला मौलवींच्या भावना दुखावणार असतील तर त्यांनी सिनेमा बघू नये, त्यांच्यावर कुणीही जबरदस्ती केलेली नाही, तसा कोणता कायदाही नाही. सलमान खानच्या सिनेमाने माझा इंटलेक्ट दुखावला जातो, म्हणून तो इतर कुणीच बघू नये अशी मागणी मी माननीय गृहमंत्र्यांकडे केली तर ते तातडीने केंद्राला पत्र लिहिणार काय?
माझ्या भावना एखाद्या सिनेमामुळे दुखावतात म्हणून इतरांनीही तो बघू नये हा सांस्कृतिक दहशतवाद नाही काय?

हा सिनेमा मी पाहिला आहे, तो ऑनलाईन उपलब्ध आहे. (फेसबुकवरही आहे. muhammad majid majidi movie असं सर्च केलं फेसबुक सर्च बॉक्समध्ये, तरी मिळून जाईल, हार्डकोडेड इंग्लिश सबटाईटल्ससह) सरकारने ऑनलाईन रिलीजवर बंदी आणली तर मजीद माजिदी आणि रहमानच्या चाहत्यांना तो पाहता यावा याची सोय मी करेन. (कोरोना नसता तर सामूहिकपणे पाहिला असता) काळजी नसावी.

- हाजी समीर दिलावर शेख.

#MusingOfAMuslim

https://www.lokmat.com/mumbai/aishwarya-was-also-admitted-nanavati-hospi...

ऐश्वर्याला रात्री हलका ताप आल्याने आराध्यासह तिला नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे.

बरं झालं ही बातमी मला रात्री दिसली नाही, नाहीतर आराध्याच्या काळजीने झोपच आली नसती.

काल आराध्याला पिझ्झा खावासा वाटला म्हणून पि झ्झा मागवला होता म्हणे. यावरून काही प्रश्न पडले.

करोनाचा संसर्ग झाल्यावर पिझ्झा खाल्लेला चालतं का?

ज्या घरात करो ना संसर्गित व्यक्ती आहे किंवा सापडली आहे, अशा घराला कंटेनमेंट झोन जाहीर करून तिथे तसा फलकही लावतात. मराठीत प्रतिबंधित क्षेत्र. आजकाल कोणत्याही वस्तूची डिलिव्हरी किंवा एखादी सर्व्हिस घरी मागितली तर ती देणारे लोक "तुमचं घर प्रतिबंधित क्षेत्रात नाही ना?" असं विचारतात. तसं ऐश्वर्याला विचारलं नव्हतं का?

ऑनलाईन पेमेंट करून घराबाहेर ठेऊन जाऊ शकतात ना डिलीवरी करणारे? इथे तर बंगल्यापासुन दूर मुख्य गेट असणार तिथेच दिले असेल. म्हणजे एकुणच कोणत्याही इमारतीत जर पेशंट सापडला असेल व तिथे कोणी घरी खाणं मागवलं तर चालत नाहीये का? इमारतीच्या मुख्य गेटपाशी पण जाता येत नाही का?

बाकी बच्चन कुटुंबात करोना शिरला तेव्हा 'बापरे' झालं होतं पण नंतर टीव्हीवाल्यांनी त्याचं जे काय केलं त्याने त्यातली गंभीरताच निघुन गेली.

ही कथित श्रीमंत लोक हुशार असतातच असे काही नाही.
ऑनलाईन जेवण सर्रास मागवले जाते आणि sanitize करण्यासाठी नोकरांवर अवलंबून असतात.
ते काळजी घेतीलच असे काही नाही.
एकमेकांच्या घरी जाणे सर्रास चालते सरकार ह्यांच्या खिशात असल्या सारखे.
Corona Jhala म्हणजे ह्यांनी सरकारी सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली असणार.

पण त्यांनी असे करणे चुकीचे आहे
त्यांच्या या कृत्यामुळे माबोवर तथाकथीत नैतिक लोकांना धडकी भरते, घरात कोरोना आल्याचा फिल येतो
निदान याचा तरी विचार करावा
असं निष्काळजीपणे वागून कसं चालेलं
आदर्श लोकं आहेत ते, त्यांच्याकडून शिकतात लोकं

Bachhan purn family corona badhit aahe mag त्यांच्या घरात काम करणारे नोकर,ड्रायव्हर, सेक्युरिटी ह्या मधील कमीत कमी एक तरी बाधित झाला असेल ना ह्यांच्या मुळे .
त्या विषयी काहीच बातमी नाही.
त्यांना असेच त्यांच्या नशिबावर सोडून दिले असेल.
आणि कोणाला हा प्रश्न पडत पण नाही की नोकर चाकर सुद्धा बाधित झाले असतील.
मीडिया पण हा प्रश्न त्यांना विचारात नाही आणि लोक पण विचारात नाहीत.

त्या विषयी काहीच बातमी नाही.
त्यांना असेच त्यांच्या नशिबावर सोडून दिले असेल.
आणि कोणाला हा प्रश्न पडत पण नाही की नोकर चाकर सुद्धा बाधित झाले असतील.
>>>>>>

रेखाच्या कर्मचारयाला कोरोना झाल्याची बातमी आहेच की
अमिताभच्या नोकरांनाही झाला असता तर त्याचीही बातमी आली असती.
अमिताभने संपर्कात आलेल्या सर्वांना टेस्ट करून घ्यायला सांगितले तर संपर्कात आलेले नोकरांचीही टेस्ट झालीच असेल. निहेटीव्ह आले असतील तर बातमी नसेल.

आणि हो. तेच जर त्याच्या नोकरांची माहिती देत बसले असते तर लोकांनी असेही म्हटले असते की बघा अमिताभच्या नोकरांचीही न्यूज बनते...

आम्ही अल्मोस्ट रोजच बाहेरून जेवण मागवतो. खाण्यातून पसरत नाही कोरोना अशी माहिती होती... आता बदलले का ते ??

खाण्यातून पसरत नाही तसा, पण जर कूक, पॅक करणारी व्यक्ती, आणुन देणारी व्यक्ती, इतर कुणी ते हाताळणारी व्यक्ती बाधीत असेल तर?

Adjust करायची बिलकुल सवय नसणे.
ठराविक भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे मग ती कशी ही जिथे मिळेल तेथून खरेदी करणे .
तो भाजी delivery करणारा मुलगा सर्व काळजी घेण्या एवढं आर्थिक बाबतीत सक्षम नसतो
हात धुणे,मास्क हे त्याला शक्य नसते .
एकदाच ड्रायव्हर किंवा नोकराला पाठवून भाजी मागवत जावी आणि सारखे सारखे बाहेरच्या व्यक्ती चा संबंध टाळणे अपेक्षित असते .
आपण अमिताभ विषयी बोलतोय.
ही श्रीमंत लोक थोडी विचित्र असतात हॉटेल मधून आलेली 1000 रुपयाची डिश ह्यांना महाग वाटत नाही पण सामान्य भाजी वाल्या कडून घेतलेले 60 रुपये किलो चे टोमॅटो भयंकर महाग वाटत असतात .
नोकर चाकर ह्यांना योग्य सन्मान आणि वेतन न दिल्या मुळे ते पण बेफिकीर असतात.
ते कामात शॉर्ट कट शोधून काढतात .
मग corona sarkha virus sahaj प्रवेश करू शकतो.
अमेझॉन आणि बाकी ऍप ची सर्व्हिस चालू झाल्या बरोबर जीवन aavshakya वस्तू पेक्षा बाकी वस्तूच जास्त मागवल्या गेल्या.
त्या मधून सुद्धा व्हायरस नी श्रीमंत लोकात प्रवेश केला असू शकतो.

Pages