श्रावणधारा - भाग ३

Submitted by 'सिद्धि' on 14 July, 2020 - 03:45

(भाग १ - https://www.maayboli.com/node/75516)
(भाग २ - https://www.maayboli.com/node/75524)
पुढे चालू...

-----------------------------------------------------------------------

"मीरा कॉफी?"

"हो! नक्कीच." बाल्कनीत टाकलेल्या मॅटवर बसल्या-बसल्या मीराने कॉफीसाठी हात पुढे केला.

"पाय ठीक आहे का? हे घे." कॉफी बरोबर दुसर्या हाताने एक बॉन्डेज तिच्या समोर ठेवत राघव ही त्या मैफिलीत सामील झाला.

"होय ठीक आहे, आणि थॅन्क्स."

"एवढ्या रात्री कॉफी म्हणजे मी आधी विचार करत होतो, तुला चालेल की नाही? पण खूपच भिजली होती म्हणून शेवटी घेऊन आलो."

"कॉफी छान करता. त्यामुळे नाही म्हणूच शकत नाही. आणि भिजण्याच म्हणाल तर आपल्याकडे सुद्ध्या आता श्रावण सुरु आहे. मस्त पाऊस असतो. अश्या श्रावणधारा सुरु झाल्या की मग भिजल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे मला तरी सवय आहे याची."

"पण एवढं भिजत का कोणी? त्यामुळे तुझ्या बोटाला बर्यापैकी लागलं... लाव ते बॉन्डेज नाहीतर जखम चिघळेल."

"मी आधीच सांगितलं ना तुम्हाला, माझी सॅन्डल तुटली त्यामुळे भिजले, जवळपास टॅक्सी वगैरे काही सुद्धा न्हवते."

"मीरा... मीरा.... होय. समजलं." जे समजायच ते तर राघव केव्हाच समजला होता. दीर्घ श्वास घेत तो मिश्किल हसला स्वतःच्याच असहाय्यतेवर.

"काय झालं? का हसताय?" मीरा त्याच्याकडेच बघत आच्छर्याने उदगारली, एकीकडे तिची पायाला बॉन्डेज लावण्याची धडपड चालू होती.

“नथिंग, दे लावतो!" म्हणत हो ना ची प्रतीक्षाही न करता, तिच्या हातून बॉन्डेज घेऊन ते लावण्यासाठी तो सरळ शेजारी बसला होता.

"थॅक्स." म्हणत मीराने त्या बॉन्डेज लावलेल्या बोटाकडे क्षणभर पाहिले, मग मागच्या भिंतीचा आधार घेत ती ही टेकून बसली. एव्हाना कॉफी संपवून राघवही तिथेच मॅटवर सरळ-सरळ आडवा झाला होता.

चिंब भिजून बरसणारे काळेभोर आभाळ, सोबतीला बर्यापैकी अंधारलेली शांत रात्र... लॉपटॉपला वाजणाऱ्या 'रिमझिम गिरे सावन' गाण्याची धून ऐकत, एकही शब्द न बोलता दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. आयुष्यात काही क्षण असतातच एवढे सुंदर की, काहीही न बोलता आपल्या माणसाबरोबर अगदी शांततेत घालवलेले दोन क्षण देखील आयुष्यात कधीही न मिळालेले सुख-समाधान मिळवून देतात.
*****

दोन चेअरच्या मधोमध एक छोटस गोलाकार काचेच टेबल आणि त्यावर तिचा आवडता मिक्स फ्रुटस केकवर "हॅपी मेरीज ऍनिव्हर्सरी" चा संदेश... बाजूलाच एक पिंक गुलाबाची छोटीशी कळी... अगदी तिच्या एवढी गोड आणि स्वतःमधेच गुंतलेली. आजूबाजूला अस्ताव्यस्त पसरलेले शंभरएक कलर-कलर चे बलून्स त्या छोट्याश्या टेरेसची शोभा अजूनच वाढवत होते. हे सार टेरेसच्या दारातून पाहणारी मीरा त्या बलून्स मधून वाट काढत टेबला पर्यंत पोहोचली. तिच्यासाठी हे अनपेक्षित पण सुख:दच... 'म्हणजे याला लक्षात आहे तर, आपल्या लग्नाचा आज पहिला बाढदिवस. एक वर्ष सरले आज.' तिने बाजूची एक कँडल उभी करून त्यावर माचिसची एक जळती काढी टेकवली. त्या मंद प्रकाशात अगदी समोरच्या भिंतीला टेकून तिच्याकडेच पाहत उभा असलेला राघव तिच्या नजरेतून सुटला नाही.

"हॅपी मॅरिज ऍनिव्हर्सरी." म्हणत तो ही टेबलापाशी पोहोचला होता.

"हॅपी ऍनिव्हर्सरी. अँड नाईस डेकोरेशन. " तिने वरती न पाहताच विश केले.

"ऐक्च्युअली बाहेर जायच प्लानिंग करणार होतो, बट डाउट होता, तू येशील की नाही."

"हं. ते एक बर केलं." कट केलेला केकचा एक बाइट राघवच्या समोर धरत आपल्या थंडगार नजरेने मीराने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला. कधी नाही एवढी खोल आणि मनाचा ठाव घेणारी ती नजर पाहून तो ही क्षणभर स्तिमित झाला होता.

"हॅपी मॅरिज ऍनिव्हर्सरी वन्स अगेन, अ‍ॅन्ड सो लकी ना? बीकॉज वी आर सेलिब्रेटिंग आवर फर्स्ट अण्ड लास्ट मॅरिज अ‍ॅनिव्हर्सरी टुगेदर."
तिच्या त्या शब्दांबरोबर एखादी धारदार सूरी कोणीतरी काळजात खुपसावी अशी राघवाची अवस्था होती.

"शटअप मीरा प्लिज." तो जवळ जवळ ओरडलाच.

"नो. आय एम सिरिअस आणि या सगळ्यासाठी थॅन्क्स. वन्स अगेन." म्हणत ती तिथून उठणारच होती, एवढ्यात राघवने तिला आडवले होते.

"मीरा थोडं बोलायच होत. थोडा वेळ आहे कि लगेचच झोपणार आहेस?"

"हं, पुन्हा केव्हातरी. उद्या मला निघायच आहे, सकाळची फ्लाईट आहे ना. सो लवकर झोपते."

"उद्या. एवढ्या लवकर?" राघव आच्छर्याने चक्क उठूनच उभा राहिला.

"होय. उद्या निघते मी. तिकीट बुक आहे."

"थोडे दिवस थांबू शकतेस का? किंवा कायमचंच. तसही तिथे आता कोणीही नाहीय."
अक्षरषा केविलवाणा चेहरा करत राघवने तिचा डावा हात आपल्या हातात घेतला होता. उजव्या हाताने तिच्या गालाला ओझरता स्पर्श करत तो कसेबसे चाकपडत दोनच शब्द पुटपुटला. "एक्सट्रीमली सॉरी मीरा." इतके दिवस गोळा करून ठेवलेले शब्द-शब्द आणि वाक्य यातले काही आठ्वेना झाले. बर्याच गोष्टी बोलायच्या होत्या. तिला अपेक्षित असलेली आणि नसलेली अशी बरीच स्पष्टीकरण द्यायची बाकी होती. पण सॉरी च्या पलीकडे तो जाऊच शकला नाही. तिच्याही नकळत दोन्ही हातानी अलगद मिठीत घेत त्याने आपले ओठ तिच्या डोक्यावर टेकवले होते आणि उभ्या उभ्या डोळ्यातून ओघळलेले काही थेंब तिच्या केसातून घरंगळत खाली उतरले.

"आय एम सॉरी राघव. खरच नाही थांबू शकत... माझी एक्झाम जवळ आली आहे, आणि खरं सांगायच तर आता या गोष्टीला काहीच अर्थ नाही. असं समजा मी इथे आलेच नाही, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच आयुष्य जगा आधीप्रमाणे... मी माझी माझी ठीक आहे. तसही बाबांच्या इच्छेसाठी आणि त्यांच्या आग्रहाखातर, त्यांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करून तुम्ही आधीच तुमच्या आयुष्याच एक वर्ष वेस्ट केलंत. आता बाबाही हयात नाहीत. त्यामुळे अजून हा दोर ताणण्यात काही अर्थ नाही."
काही ओझरत्या मिनिटाचा तो क्षण सरतो न सरतो तोच मीरा त्याच्या हातातील आपला हात सोडवत दोन पावले मागे घेत तिथून निघाली देखील. तिचे शब्द मात्र त्याला बाणासारखे छेदून गेले.

"मीरा तुला वाटत तस खरंच नाही, आणि बाबांच्या आग्रहाखातर असले तरी यात माझी सुद्धा इच्छा होतीच ना. खरच मनापासून आवडली होतीस तू मला... त्यांची देखभाल करण्यासाठी मी तुझी फसवणूक केली असं वाटतं तुला? तुला खूप काही सांगायचं देखील आहे, आणि मुख्य म्हणजे जगायच राहून गेलय, तुझ्या सोबतीने... सुरुवात करूया पुन्हा एकदा. चूक माझी आहे, मान्य आहे, पण मी कुठेतरी बांधील होतो. यापुढे खरंच मी काहीही एक्सप्लेन नाही करू शकत. ट्राय टु अण्डस्टॅण्ड मीरा प्लिज."

"मला खरच काही स्पष्टीकरण नको आहे. त्याची अपेक्षाच नाही. बाय द वे एवढी बांधीलकी कुठे आणि कुणाशी ? खूप दिवस विचारेन-विचारेन म्हणत होती. कोण आहे ती ?"
हताश होत त्याने जमेल तेवढे स्पष्टीकरण देण्याचा निष्फळ प्रयत्नही केला. पण फक्त तेवढे आज पुरेसे नव्हते की काय म्हणून मीराने खोचक प्रश्न केला.

"तस खरंच नाहीय. कोणीही 'ती' आपल्यामध्ये कधीच नाही. मी फक्त कोणाला तरी नकळत दिलेला शब्द पाळत होतो. दिला शब्द मोडणं माझ्यासाठी खरंच अशक्य होत. कारण नसताना तुला खूप काही सहन कराव लागल, मला देखील त्रास झाला, पण तेव्हा माझ्याकडे दुसरा पर्याय न्हवता. त्या वेळेस जे योग्य वाटलं ते ते मी करत गेलो आणि तीच माझी सर्वात मोठी चुक ठरली."

"जे झालं ते झालं. आता गोष्टी वेगळ्या आहेत, आणि मला माझं एक वेगळं जग सुद्ध्या आहे. तुम्ही दिलेल्या शब्दाला जागत राहिलात यात मी मात्र कायम दुय्यम स्थानी राहिले. म्हणून या वेळी मी मला आणि माझ्या भावनांना प्राधान्य द्यायच ठरवलंय. ज्याची कधी सुरुवात झालीच नाही ते नातं यापुढे असच आशेच्या झुल्यावर झुलवत ठेवण्यापेक्षा सार काही इथेच थांबवूया. आय होप, यु रिस्पेक्ट माय फीलिंग्स."
विषयाला कायमचा पूर्णविराम देत मीरा तिथून तडक हॉलच्या दिशेने निघाली. बोलण्यासारखं काहीही उरलं नाही. हताश आणि निराश आपल्याच एकटेपणाला गोंजारत राघवही उभ्या जागी खाली बसला. अगदी होपलेस आणि हैल्पलेस.

क्रमश
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन.
{https://siddhic.blogspot.com}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.
आयुष्यात काही क्षण असतातच एवढे सुंदर की, काहीही न बोलता आपल्या माणसाबरोबर अगदी शांततेत घालवलेले दोन क्षण देखील आयुष्यात कधीही न मिळालेले सुख-समाधान मिळवून देतात>>>>>>>> हे खूपच आवडलं.

मस्तच. अगदी फिल्मी गोडगोड शेवट नाही झाला ते छानच. मीराचा निर्णय योग्य आणि मॅच्युअर वाटला.

माऊमैया - वाक्य आवडल्याच आवर्जुन सांगितल्याबद्दल थॅन्क्स.

प्रि तम - प्रतिसादाबद्द्ल थॅन्क्स.

मी चिन्मयी - प्रतिसादासाठी थॅन्क्स, पण ही कथा अजुन क्रमश आहे. कन्फ्युजन नको म्हणुन ते जस्ट अपडेट केल.
शेवटचा एक भाग बाकी आहे, आणि खरी ट्विस्ट त्यातच आहे. गोडगोड म्हणण्यापेक्षा योग्य आणि समर्पक शेवट नक्कीच होईल याची मी पुरेपूर काळजी घेईन.

सिद्धी, आपल्या सगळ्या कथांचा समर्पक शेवट असतो, तसाच या कथेचा ही कराल ही अपेक्षा.
तुमच्या सगळ्याच कथा मनाला स्पर्शून जातात..
आपल्या लेखनास शुभेच्छा

पाथफाईंडर, मी चिन्मयी, रूपाली विशे - पाटील, शब्दसखी, Urmila -thx to all...
तुमच्या प्रतिक्रिया खरच खूप मोटीवेशनल असतात.

सिद्धी, आपल्या सगळ्या कथांचा समर्पक शेवट असतो, तसाच या कथेचा ही कराल ही अपेक्षा.
तुमच्या सगळ्याच कथा मनाला स्पर्शून जातात..
आपल्या लेखनास शुभेच्छा
Submitted by शब्दसखी on 14 July, 2020 - 23:28

- नक्कीच ! मनापासून आभार.

nice