काहींही हं श्री(बिथोवन!)

Submitted by बिथोवन on 6 July, 2020 - 23:34

मायबोली वर लिहिणे हा माझ्या मते एक अभिमानाचा विषय आहे. इंग्रजीत त्याला आपण प्रेस्टीजियस असे म्हणू. मराठी ही देव नगरी या लिपीत लिहिली जाते. देवनगरी म्हणजे देवांच्या नगरीत जी लिहिली आणि बोलली जाते ती. म्हणजे विचार करा की ही भाषा आणि लिखाण किती पवित्र असेल. मायबोली वर मराठी लिहिणाऱ्या समस्त मंडळींना आपण दंडवत का घालावे याचं हे एकच कारण पुरेसे नाही का?अशी लिपी आपण लिहितो आणि असे लिखाण आपल्याला कळते ही भाग्याची गोष्ट नाही काय?
इतर लीपिंची नावं ऐकली आणि देवनागरी लीपिशी तुलना केली तरी त्यातला फरक लक्षात येतो.

१)इंग्रजीची रोमन. एक जुना चित्रपट होता लाजवंती नावाचा. त्यात आशाबाईंचं एक मस्त गाणं आहे. गा मेरे मन गा... गाण्याच्या उलट रडणे. त्या धर्तीवर रो मेरे मन रो.. रोमन. रडणारे मन. किती पेसिमिस्टिक लिपी असावी रोमन! रे मन सुर में गा असं म्हणून सावरून घ्यावे लागते मग.

२)उर्दू घ्या. उरदू. मार दू, फेक दू, गाड दू, फाड दू अशा पद्धतीचं काहीतरी घातक असावं असं वाटतं ना...? पाकिस्तानी भाषा. अतिरेक्यांची भाषा. शिवाय लिखाण उजवीकडून डावीकडे. म्हणजे वाममार्गाला लावणारे आणि तिथेच पूर्ण विराम घेणारे. या लीपिला नास्तलिक असे म्हणतात. पाहा. नकारात्मक 'ना' नी सुरुवात होणारी लिपी. नास्तलिक असा उच्चार करताना नास्तिक असं काहीतरी वाटत राहतं आपल्याला. आओ तुम्हें मै प्यार 'सीखा दूं' हा जरा अपवाद.

३)कानडी आणि तेलगू. ह्या द्राविडी प्राणायाम करवणाऱ्या भाषांची लिपी कदंबा नावाची आहे. कदंबा ह्या शब्दाशी यमक जुळवायचा असेल तर कुठला शब्द पटकन लक्षात येतो? हिडिंबा. विठ्ठल शेवटी कर्नाटकातल्या कृष्णदेवरायाच्या हंपी मधून पंढरपुरात येऊन थांबला म्हणून कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु, किंवा कानडा राजा पंढरीचा... म्हणून थोडी कानडीशी आत्मीयता वाटते.

४)तमिळ भाषा. पल्लव लिपी वापरणारी ही भाषा. शब्दात 'लव' असले तरीही अशोक वनात सीतेला त्रास देणाऱ्या राक्षसी, हिडिंबाच्या भगिनी असण्याची दाट शक्यता आहे. त्यातही त्रिजटा नावाची राक्षसी सीतेची विशेष काळजी घेत असे म्हणे. तिन्ही त्रिकाळ सीता त्या राक्षसीला कशी बघत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. मी साधी बाहुली बघितली "द कोंजुरिंग" मधली तर चार दिवस ( रात्री) सगळया खोलीतले लाईट लावून झोपत होतो. असो. सगळे श्रीलंकन हीच लिपी वापरतात. पण मला रेडिओ सिलोन बद्दल खूप आपुलकी होती. तेंव्हा मनोहर महाजन, पद्मिनी परेरा, ज्योती परमार, विमला, कामिनी, विजय किशोर दुबे, गोपाल शर्मा असे निवेदक होते त्यांची नावे पण अजूनही लक्षात आहेत. अमीन सायानीला कोण विसरेल? " पच्चीस और इकतालीस मीटर बैंड पर ये श्रीलंका ब्रॉड कास्टिंग कॉर्पोरेशन का विदेश विभाग है" असं म्हणत ह्या प्रत्येक निवेदकानी जुनी हिंदी सिनेमाची गाणी लावून कान तृप्त केले होते.

५) मलयालम भाषा- वट्टेलट्टू लिपी. कोण कधी कोणावर किती वेळा लट्टू होईल काहीच कळणार नाही. उदा. शशी थरूर लट्टू ऑन तिलोत्तमा मुखर्जी, नंतर क्रिस्ता गाईल्स, नंतर सुनंदा पुष्कर आणि मध्येच लट्टू ऑन मिस मेहेर तरार ऑफ पाकिस्तान! मलयालम. उलट सुलट कसं ही वाचा. सेम. देव नगरीत वाचलं तरी आणि रोमन मध्ये वाचलं तरी. Malayalam! बस ये आलम है इस जुबान का!दक्षिण भारत सोडला तर इतर भारतीय भाषेची नाळ देवनागरीशी जुळलेली आहे त्या मुळे उत्तर भारतीय भाषा ऐकायला बरी वाटते.

६)फ़ारसी भाषा. मधला 'र' काढून टाकला तर..? अरेबिक लिपी असणारी ही भाषा, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भाषेतून आपण हिंदीत किती शब्द घेतले आहेत याची गणतीच नाही. त्या मुळे ती परकी वाटत नाही. उदा.जबर, जोर, जीन, जहर, जंग, माशा, राह, पलंग, दीवार, जान, चश्मा, गोला, किनारा, आफत, आवारा, कमरबंद, गल्ला, चिराग, जागीर, ताजा, नापसन्द, मादा, रोगन, रंग, बेरहम, नाव, तनख्वाह, जादू, चादर, गुम, किशमिश, आमदनी, आराम, अदा, कुश्ती, खूब, खुराक, गोश्त, गुल, ताक, तीर, तेज, दवा, दिल, दिलेर, बेहूदा, बहरा, बेवा, मरहम, मुर्गा, मीन, आतीशबाजी, आबरू, आबदार, अफसोस, कमीना, खुश, खरगोश, खामोश, गुलाब, गुलुबन्द, चाशनी, चेहरा, चूँकि, चरखा, तरकश, जोश, जिगर, जुर्माना, दंगल, दरबार, दुकान, देहात, पैमाना, मोर्चा, मुफ्त, पेशा, पारा, मलीदा, पुल, मजा, पलक, मुर्दा, मलाई, पैदावार, दस्तूर, शादी, वापिस, वर्ना, हजार, हफ्ता, सौदागर, सूद, सरकार, सरदार, लश्कर, सितार, सुर्ख, लगाम, लेकिन, सितारा, चापलूसी, गन्दगी, बर्फ, बीमार, नमूना, नमक, जमीँदार, अनार, बाग, जिन्दगी, जनाना, कारखाना, तख्त, बाजार, रोशनदान, चिलम, हुक्का, अमरूद, गवाह, जलेबी, किसमिस, कारीगर, पर्दा, कबूतर, चुगलखोर, शिकार, चापलूसी, चालाक, प्याला, रूमाल, आन, आबरू, आमदनी, अंजाम, अंजुमन, अन्दाज, अगर, अगरचे, अगल, बगल, आफत, आवाज, आईना, किनारा, गर्द, गीला, गिरह, नेहरा, तीन, नाजुक, नापाक, पाजी, परहेज, याद, बेरहम, तबाह, आजमाइश, जल्दी वगैरे.

७) जपानी भाषा: या भाषेच्या प्रेमात मी तेंव्हा पडलो जेंव्हा माझ्या जुन्या जावा मोटर सायकल चे नामकरण मी कावासाकी च्या धर्तीवर जावासाकी केले होते. यांची लिपी काताकाना आणि हीरागाना. हे शब्द उच्चारले कि ये रे घना, ये रे घना, गाणे आठवून काताकाना हीरागाना, न्हाऊ घाल माझ्या मना असं मी गुणगुणत असे. कांजी अश्या नावाची अजून एक जपानी लिपी आहे. मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथे टाईम ऑफिस मध्ये कानजी भाई नावाचा माझा सहकारी होता. કેમ છો કાનજીભાઈ, મજામાં છું ભાઈ, તમે કેમ છો? अशी वाक्यांची देवाण घेवाण होत असे. त्यामुळे कांजी शब्द मला आवडतो. कानजीभाई मी दहा पंधरा मिनिटे उशिरा गेलो तरी लाल रेघ मारत नसे. घरामध्ये नॅशनल पनासोनिक स्टिरीओ असल्याने जपानशी नाळ जुळलेली वाटायची आणि त्या काळी ले गयी दिल, गुडिया जपान की हे गाणे फार लोकप्रिय झाल्यामुळे जपान आवडत असे.

या लेखात कुठल्याच भाषेला कमी लेखण्याचा उद्देश नाही. फक्त विनोद निर्माण करण्यासाठी तसे लिहिले आहे. प्रत्येक भाषेची एक वेगळी संस्कृती आहे आणि प्रत्येक भाषेला एक गोडवा आहे. मोंगलांचे आक्रमण आणि ईस्ट इंडिया कंपनीचे आणि त्यानंतर फ्रेंच, डच, इत्यादी लोकांच्या आगमनाने आपली भाषा बरीच बदलली आणि समृद्ध ही झाली. उदा. हिंदीतले हे संकर शब्द –

• रेलगाड़ी (इंग्रजी+हिन्दी), बमवर्षा (इंग्रजी+संस्कृत), नमूनार्थ(फारसी+संस्कृत), सजाप्राप्त (फारसी+संस्कृत), रेलयात्रा(इंग्रजी+संस्कृत), जिलाधीश(अरबी+संस्कृत), जेबखर्च(पोर्तुगिज+फारसी),
रामदीन (संस्कृत+फारसी),
रामगुलाम (संस्कृत+फारसी),
हैड मुनीम (इंग्रजी+हिन्दी),
शादी ब्याह (फारसी+हिन्दी),
तिमाही (हिन्दी+फारसी)

मनाच्या कडेकपारीतून वेडीवाकडी वाहणारी कल्पना विलास नामक नदीतून वेचलेले दगड म्हणजे हे शब्द असे समजून माबो वरील वाचकांनी हा लेख फार गंभीर रित्या घेऊ नये. एक पकाऊ लेख म्हणून सोडून द्यावा. देव नगरीत लिहिण्याचा मोह आवरत नाही म्हणून केलेल्या उनाडक्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@ अमा, @ चिन्नू, अहो मी दक्षिण भारतीय, मराठी लिहिण्याचा जोमाने आणि नेटाने (नेट चा वेग कधी कधी कमी होतो) प्रयत्न करत आहे. चूक भूल क्षमस्व.

हिंदीत आलेले फारसी शब्द आणि इतर शब्द यांची माहिती ज्ञान वर्धक आहे. अजूनही असे शब्द आपल्याला माहिती असतील तर प्लीज लेख या सदरात लिहा. लेख विनोदी नाही असे जरी वाटतं असले तरीही मनोरंजक आहे. म्हाळसा म्हणतात त्या प्रमाणे स्वान्त सुखाय असायला काही हरकत नाही. लेख आवडला.