'धावत्या मनाची थोडी मजा घेण्याची एक टेक्निक आहे.'
'ते असू दे... पण हे मन वगैरे म्हणजे जरा जास्तच झालं..!'
'उगाच फाटे फोडू नकोस.. माझा सांगायचा मूड झालाय.. ऐक चूपचाप..'
'हम्म.. सांग आता न् मग काय ..!'
तर तुझ्या डोक्यात तुझ्या नकळत, सतत काही ना काही 'विचार' चाललेले असतात, ते विचार म्हणजेच तुझं मन वगैरे आहे, असं समजून चालूया थोडा वेळ..
एरव्ही रूटीनमध्ये गळ्यापर्यंत बुडून गेलेला असतोस,
तेव्हा हे विचार ऐकू येत नाहीत, कारण त्यावेळी तू त्यांना काही भाव देण्याच्या मूडमध्ये, स्थितीमध्ये नसतोस.
पण 'विचार' असले म्हणून काय झालं..!
त्यांनाही स्वत:ची काही इज्जत असते की नाही..!
म्हणून मग तू कधी निवांत पडलेला, स्वस्थ बसलेला असतोस तेव्हा ते बदला घेण्यासाठी येतात.
अगदी थव्याथव्याने चौफेरून घेरून येतात आणि..
'माझ्याकडे लक्ष दे, हे एकदम अर्जंट आहे'
'त्या अमक्याला असं कशाला बोललास'
'काय नुसता बसून राहीलाय वेड्यासारखा?'
'तरी मी त्याला सांगत होते कीss आपण तसं स्पष्ट सांगूया वन्संनाss '
'अय्या..! कित्ती बारीक झालीयेस गं.!'
ह्या टाईपची काहीतरी असंबद्ध वर्दळ उडवून देतात नुसती..
कधी घोषा लावतात.. कधी टोचण देतात.. कधी फूस लावतात...!
आणि तू जन्मजात गंडलेला असल्यामुळे नेहमीसारखाच चिकटतो एखाद्या इंटरेस्टिंग वगैरे विचाराला..
मग एकावरून दुसरा... मग तो आवडायचा बंद झाला की तिसरा.. मग चौथा.. अशा उड्या मारत मारत त्यातून एक साखळी तयार होत जाते...
पण मध्येच कधीतरी तुझ्या लक्षात येतं की 'अरेच्चा.! आपण तर विचार बघायला बसलो होतो आणि हे इकडं कुठं, कधी आणि कसं आलो..!
तर ह्या 'लक्षात येण्याच्या' प्रत्येक क्षणी स्वत:ला भाग्यवान समज..
कारण इतर वेळी विचारांच्या मागे तू फाफलत गेलेला असतोस, हे कधी लक्षातही आलेलं नसतं तुझ्या.. मग ते सगळं तिथंच सोडायचं.. आणि पुन्हा चिकाटीने ऐकायला
सुरूवात करायची..
बरं, हे विचार नेमके कसले आहेत, हे जर नीट ऐकलंस तर लक्षात येईल की त्यांत 'जग हलवून टाकणारं', किंवा 'मानवजातीच्या मूलभूत समस्यांची जादूई उकल करणारं' असलं काही नसतं ..
त्याच त्याच रोजच्या कटकटींसंबंधातले दबलेले, फुसके
बुडबुडे असतात त्यात बरेचसे..
मग तू काय करायचंस ?? तर हे विचारांचे बुडबुडे ऐकत, बघत रहायचं फक्त..
थोडा पेशन्स ठेऊन 'बसायची' सवय केलीस,
तर, ह्या विचारांची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत चाललेली लक्षात येईल..
'विचार' किती जोर करणार करून करून..!
निवळतातच आपोआप कधी ना कधी..!
मग कधीतरी दोन विचारांच्यामध्ये,
आकाशासारखा निरभ्र, निरव आणि स्तब्ध क्षण तुला सापडेल..!
सेकंदभराचाच असेल..
पण तेवढा एखादा क्षणसुद्धा तुला दिवसभर पुरेल एवढी अपार शांतता आणि ऊर्जा देऊन जाईल..!
गटांगळ्या खाता खाता अचानक डोकं पाण्याबाहेर आल्यावर कसं वाटतं, तसलंच काहीसं सुंदर फिलींग असतं ते..
आणि जसजसा तू डेली बेसिसवर हे खेळून पाहशील,
तसतसे हे 'मौन क्षण' येण्याचं प्रमाणही वाढत जाईल.
पण ह्या प्रोसेसमध्ये हावरेपणा किंवा भिकारीपणा करून चालत नाही..(हाव-या भिका-याची गोष्ट माहितीये ना?? होय.. तीच... 'शेवटी भिका-याची झोळी फाटते ती' वाली.)
आणि म्हणूनच 'अजून कसे हे विचार शांत होत नाहीत',
'काल तर मज्जा आली होती,आजच काय प्रोब्लेम होतोय' असले काही वेडे चाळे अजिबात करायचे नाहीस..!
कारण ह्या गेममध्ये पेशन्स फार फार महत्त्वाचा..!
तुझं काम फक्त बसायचं आणि ऐकत रहायचं..!
येतायत विचार तर येऊ द्यायचे.. जातायत तर जाऊ द्यायचे..
तू फक्त ऐकणारा, बघणारा.!
मग कधीतरी आपसूकच ते शांततेचं दान पदरात पडतं..
तेवढं कृतज्ञ होऊन घ्यायचं..
कारण डोक्यासाठी बरं असतं ते..!
'अरेच्चा तू जागाच आहेस अजून..!! झोप आता चुपचाप.'
# ग्यानबिफोरगोईंगटूबेड
"मेंटल डायरीया ".... अति
"मेंटल डायरीया ".... अति विचाराने होतो तो दुसरे काय.... आणि तो स्तब्ध क्षण म्हणजे ध्यान . मौन क्षण जितके जास्त तितके ध्यानाचा वेळ जास्त. तुम्ही नकळतपणे ध्यान करत आहात.
# ध्यानबिफोरगोईंगटूबेड too.
स्वतःच्या विचारांशी पकडापकडी छान जमली आहे.
स्वतःच्या विचारांशी पकडापकडी
'मेंटल डायरिया'>> शब्द आवडला.. अगदी समर्पक...
स्वतःच्या विचारांशी पकडापकडी छान जमली आहे. >>>
धन्यवाद
जाम आवडले. माझ्या मनात असेच
जाम आवडले. माझ्या मनात असेच खेळ चालू असतात. जाम भरकटत जातो. वाचताना तर अस हमखास होत. मग अरे आपण या पानावर होतो. कि परत वाचन सुरु कि परत भरकटणे. पुस्तक वाचताना मस्त झोप वा गुंगी यायला लागते त्या जडत्वाचा आनंद देखील और असतो.
जाम आवडले >>> धन्यवाद
जाम आवडले >>> धन्यवाद
किती सोप्पी करुन सांगितलीत हो
किती सोप्पी करुन सांगितलीत हो तुम्ही ध्यानाची प्रक्रिया. धन्यवाद
आणि म्हणूनच 'अजून कसे हे
आणि म्हणूनच 'अजून कसे हे विचार शांत होत नाहीत',
'काल तर मज्जा आली होती,आजच काय प्रोब्लेम होतोय' असले काही वेडे चाळे अजिबात करायचे नाहीस..! +1
हे खुप महत्त्वाचे.
खुप आवडले.
छान लिहिलयं... लेखनशैली आवडली
छान लिहिलयं... लेखनशैली आवडली.
@ yashwant, @ sumitra, @
@ yashwant, @ sumitra, @ रूपाली विशे-पाटील.... सार्वांचे धन्यवाद..
सुंदर जमलंय लिखाण. आपण नक्कीच
सुंदर जमलंय लिखाण. आपण नक्कीच सजग ध्यान किंवा mindful meditation करीत असणार. साक्षीरूपाने मनाकडे, मनातल्या विचारांकडे आणि पर्यायाने स्वत:कडे पाहात येणं हा मोठा पल्ला गाठला आहे आपण.
@ हीरा.. होय..! ..
@ हीरा.. होय..! .. रजनीशांपासून सुरुवात करून व्हाया युजी कृष्णमूर्ती... विपश्यना...मूजी.. एकहार्ट टॉल.. करत करत सध्या माइंडफुलनेसच्या स्टेशनवर गाडी घुटमळते आहे...
ऐकत, वाचत आलोय ह्या सगळ्यांचं बरंचसं... बघतोय कसं कसं जमतंय ते... पण तरीही ह्या सगळ्याच प्रोसेसमध्ये मज्जा येण्यासारखा काहीतरी प्रकार आहे ह्याची झलक मात्र मिळून गेलेली आहे कधीकधी..
आणि आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!
त्याच त्याच रोजच्या
त्याच त्याच रोजच्या कटकटींसंबंधातले दबलेले, फुसके
बुडबुडे असतात त्यात बरेचसे..
मग तू काय करायचंस ?? तर हे विचारांचे बुडबुडे ऐकत, बघत रहायचं फक्त..
थोडा पेशन्स ठेऊन 'बसायची' सवय केलीस,
तर, ह्या विचारांची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत चाललेली लक्षात येईल..
'विचार' किती जोर करणार करून करून..!
निवळतातच आपोआप कधी ना कधी..!
मग कधीतरी दोन विचारांच्यामध्ये,
आकाशासारखा निरभ्र, निरव आणि स्तब्ध क्षण तुला सापडेल..!
सेकंदभराचाच असेल..
पण तेवढा एखादा क्षणसुद्धा तुला दिवसभर पुरेल एवढी अपार शांतता आणि ऊर्जा देऊन जाईल..!
गटांगळ्या खाता खाता अचानक डोकं पाण्याबाहेर आल्यावर कसं वाटतं, तसलंच काहीसं सुंदर फिलींग असतं ते..
आणि जसजसा तू डेली बेसिसवर हे खेळून पाहशील,
तसतसे हे 'मौन क्षण' येण्याचं प्रमाणही वाढत जाईल.
>>>>>>>>>
मस्त.. आपल्या विचारांच सतत निरिक्षण तटस्थपणे करत राहणं . या सारखा दुसरा आनंद देणारा ध्यानाचा प्रकार नाही.. मी सुद्धा बरेचदा करत असते.. पण मला तुमच्या सारखं सुंदर शब्दात व्यक्त व्हायला जमत नाही..
मस्त.. आपल्या विचारांच सतत
मस्त.. आपल्या विचारांच सतत निरिक्षण तटस्थपणे करत राहणं . या सारखा दुसरा आनंद देणारा ध्यानाचा प्रकार नाही.. मी सुद्धा बरेचदा करत असते.. पण मला तुमच्या सारखं शब्दात व्यक्त व्हायला जमत नाही>>>
@ मन्या.. धन्यवाद