बरंचसं पाल्हाळ

विचार, निर्विचार वगैरे..

Submitted by पाचपाटील on 1 July, 2020 - 15:36

'धावत्या मनाची थोडी मजा घेण्याची एक टेक्निक आहे.'
'ते असू दे... पण हे मन वगैरे म्हणजे जरा जास्तच झालं..!'
'उगाच फाटे फोडू नकोस.. माझा सांगायचा मूड झालाय.. ऐक चूपचाप..'
'हम्म.. सांग आता न् मग काय ..!'

तर तुझ्या डोक्यात तुझ्या नकळत, सतत काही ना काही 'विचार' चाललेले असतात, ते विचार म्हणजेच तुझं मन वगैरे आहे, असं समजून चालूया थोडा वेळ..

एरव्ही रूटीनमध्ये गळ्यापर्यंत बुडून गेलेला असतोस,
तेव्हा हे विचार ऐकू येत नाहीत, कारण त्यावेळी तू त्यांना काही भाव देण्याच्या मूडमध्ये, स्थितीमध्ये नसतोस.

Subscribe to RSS - बरंचसं पाल्हाळ