Submitted by प्रगल्भ on 29 June, 2020 - 05:51
जळीचा तवंंग
जाहला अभंग ।
मौनातील हुंदका
व्यर्थ जाण॥
वासनेच्या पोटी
आसवांना जन्म ।
कोणाचे रूप
कोण घेई॥
मेघांतले पाणि
सांडले भुवणि ।
तृष्णा विरहिणीची
कणव होई॥
ज्यासी मनीषा
आशा, मान ।
तो शून्यदेह
भोग जाण ॥
श्वासात शेवटच्या
जर्जर विश्वास ।
अग्रपुजा 'रामनामे'
साध्य केली ॥
गोंदावले निवासी गुरु भेटला, जाण ॥
पाहता गुरुमुख, उदय दासाचा होई ॥
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर शब्दरचना
सुंदर शब्दरचना
अप्रतिम.... सुंदर भावना दर्शन
अप्रतिम.... सुंदर भावना दर्शन
रूपाली ताई खरंच धन्यवाद...!
रूपाली ताई खरंच धन्यवाद...! खरं सांंगायच तर मी प्रेमकविता, विरह कविता करत होतो माझी लहान पणीची एक मैत्रिण आहे(होती/आहे काय म्हणावं खरच कळत नाही...एवढच खरं की मी तिच्याशी आता बोलत नाही...) तर तिच्याकडून दोनदा नकार आले(नुसतेच नकार नाही! प्रखर नकार!!) 12-13 कविता करून झाल्या होत्या तिच्यावर...कवितांच मोकळ्या मनाने आणि मोकळ्या हाताने माझा ऊर भरून येस्तोवर कौतूक करायची. पण जेव्हा दुसर्यांदा नकार आला...मी एक दीड महिना माणसांत असून नसल्यासारखा होतो. मग मनात एक विचार आला. देव मुर्तीत आहे, मुर्ती अबोल आहे...काहीच बोलत नाही...अगदी तटस्थ !! मग तो नक्कीच त्याच्यावरील आपलं प्रेम नाकारणार नाही. अर्थात होकारणार ही नाही कारण तो अबोल आहे...पण यालाच तर म्हणतात ना शेवटी "अज्ञानात सुख आहे!!!"
आभार!! तुषार दादा!! धन्यवाद .
आभार!! तुषार दादा!! धन्यवाद ... कृपा आहे त्याची म्हणून लिहिता येतं
तुम्हीदेखील गोंदवलेकर
तुम्हीदेखील गोंदवलेकर महाराजांचे भक्त का? छान वाटलं ऐकून.
कविता गूढ आहे कळली नाही. पण शब्दरचना आवडली.
प्रगल्भ, तुम्ही मला ताई
प्रगल्भ, तुम्ही मला ताई म्हणून तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या ह्याचं बरं वाटलं. पण एक सांगू का कुठल्याही नकाराने एवढे खचून जाऊ नका. प्रत्येकवेळी यश भेटेल अस नाही होणार. माणसाला नकार पचविण्याची पण ताकद ठेवायला पाहिजे. आपले आई- वडील हे आपल्या वर सर्वात जास्त प्रेम करतात असं मला वाटते. पुढे कधीही अपयश आलं तर त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येऊ द्या. मी काही तत्वज्ञानी नाही पण यापुढे अपयशाने खचू नका असं मात्र मी तुम्हांला नक्की सांगेन आणि अजून एक तुमच्या लिहिलेल्या कविता इथे पोस्ट करा. मी रसिकतेने वाचेन. अवांतर झालं असेल तर क्षमा असावी.
कविता खूप आवडली आणि रूपाली
कविता खूप आवडली आणि रूपाली यांचा वरचा प्रतिसादही !
सामो,
सामो,
हो आईच्य माहेर चे सगळे गोंदवलेकर महरजांच करतात. बाबा अक्कल्कोट निवासी स्वामींचे भक्त आहेत. पण पुण्यतिथी उत्सवामुळे लहान असल्यापासून दर वर्षी उत्सवात जातो गोंदावल्याला. तिथे फडणीस आहेत पालखी ची व्यवस्था बघणारे. त्यांतल्या थोरल्या फडणीसांच्या थोरल्या मुलीचा मी मुलगा. मी तसा अनुग्रह घेतलेला नहीए पण लहानपणापाअसून क्लोज झालोय. अक्कल्कोट ला जाणंं होतच नाही जवळ असूनही. पण एक खरय इच्छा त्यांचीच असते त्याशिवाय आपण पायरीही चढू शकत नाही त्यांच्या तिर्थस्थळाची!
रूपाली ताई खरच खूप धन्यवाद!
रूपाली ताई खरच खूप धन्यवाद! तुमचं काहिही चुकलं नाहीये. आनंद च आहे. मी 5-6 दिवसांपूर्वी वैभव जोशी यांंचा इंटरव्ह्यु पाहीला होता 'खजिना' नाअवाच्या स्पृहा जोशींच्या यूट्युब चॅनल वरती. आणि त्याने सांंगितलं की मायबोली वरतीच त्याने 1998 ला पहिली गझल टाकली होती. मला तो प्रचंड आवडतो. आणि तो मूळचा सोलापूरचाच आहे. माझी आई लग्नाआधी ज्या कॉम्पुटर इन्स्टिट्युट मधे प्रोग्रामिंग शिकवायची तिथेच तो ही नोकरीसाठी होता. त्याला फेसबुक वर पत्र पाठवलं आणि त्याला ते पत्र गेलेलं कळल्यावर सरळ फेसबुक डीअॅक्टीव्हेट करून आलो. "कधी तरी" नावाची त्याची 3 वर्षांपुर्वी गझल ऐकली आणि तो माझा कवी म्हणून देव होऊन बसला.
आणि तुम्हाला सगळंं बोलून गेलो कारण तुम्हीच पहिल्या होतात कमेंट करणार्या. आता मला इथेच लिहायचंं आहे. मी नवीन आहे. तुम्हां सगळ्यांंपेक्षा बराच लहान आहे.तरी तुम्ही कौतूक करून आपलसंं केलत. धन्यवाद रूपाली ताई, सामो ताई, तुषार दादा , अस्मिता ताई! नमस्कार!!
प्रगल्भ तुझं नाव खूप छान आहे
प्रगल्भ तुझं नाव खूप छान आहे आणि नावाप्रमाणे तुझे विचार सुद्धा. नियमित लेखन कर त्यातून तुला मानसिक समाधान मिळेल आणि माझ्या सारख्या वाचकांना आनंद. पुढील लेखनासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.