खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व.. (यूट्युब आणि इंन्स्टा)

Submitted by अ'निरु'द्ध on 19 May, 2020 - 23:43

खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व..
(यूट्युब आणि इंन्स्टा)

आमच्या टारझन बोक्यावर "टारझन द वंडर कॅट" हा पहिला भाग लिहिला आणि बऱ्यापैकी मांजरप्रेमींची ओळख झाली.
नंतर अमेरिकेत कुत्रा किंवा मांजर पाळण्यावर धागा आला आणि त्यावरही मांजरांबद्दल बऱ्यापैकी माहिती आली आणि प्रश्नही आले.
आमचा टारझन घरी येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही मांजरांची वेडी असलेली माझी लेक त्यांचे व्हिडिओज् युट्युब आणि इंन्स्टा वर बघायची मला पाठवायची.
मांजरप्रेमी मायबोलीकरांनी हे व्हिडिओज् पहावेत हा मुख्य उद्देश आणि बहुतेक असा धागा मायबोलीवर नाही हे पाहून हा सबकुछ मांजरांसाठी असलेला धागा काढतोय.

मांजरप्रेमींनी यात वेळोवेळी भर घालावी ही विनंती.
यात युट्युब, इंन्स्टाच्या लिंक द्यायलाही हरकत नाही आणि घरच्या मांजरांचे व्हिडिओ, फोटोज् असतील तर फारच उत्तम..
पाळणाऱ्यांनी त्यांच्या काही आठवणी दिल्या आणि जाणकारांनी माहिती दिली की फावल्या वेळी कधीही इथे येऊन रमायला हरकत नाही.
हा धागा मांजरप्रेमीना तर आवडावाच पण इतरांसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून उपयोगी पडेल असं वाटतं कारण मांजरं विशेषतः त्यांची पिल्लं हा एकंदरीतच भयंकर क्यूट प्रकार आहे..

सुरुवातीला धाग्यामधेच काही छान व्हिडिओजच्या लिंक्स देतोय..

https://youtu.be/bw5WtZmU-i0

https://youtu.be/MLhesmKn4Cs

https://youtu.be/okOVxfuSYPk

https://youtu.be/bhpP8jEm5ic

बाकीच्या प्रतिसादात येतीलच...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजरांसंबंधी वेबसाईट चाळताना मिळालेली माहिती..

Indian colony Cat Breed may get International recognition as :
"Indian Billi" भारतीय बिल्ली...

Indian Cat Federation (ICF) is working to get our indigenous cats recognized internationally thus raising its chances to get adopted by cat lovers with a promise of a better life. These felines up till now haven’t been lavished with the right treatment and acceptance among people or existing cat owners. There is a natural drift towards adopting foreign breeds like the Persian cat, Siberian, Bengal or British. (Chairman Meow Motif by Obey the Kitty)

ICF has underlined major physical traits of our native cat as follows:

Long tail that reaches the shoulder.
Oval shaped paws.
Legs are of medium length.
Rectangular frame.
Medium build, Strong muscles and Bones.
Shoulders and Hips are of even length.
Female cats are smaller and more graceful than the male cat.

माझ्या लहानपणी कुत्रा पाळलेला होता. हम आपके है कोण मधला टफि असतो तसा. त्याला कोणीतरी पळवून नेलं .
त्या दिवसापासून कुत्रा मांजर काहीही पाळल नाही . कुत्रे वगैरे पासून मी जरा भीतीने लांबच असते . (१४ इंजेक्शने भीती)

हा बाफ मस्त आहे .मजा येते वाचायला.

नेटवर भटकत असताना ही लिंक मिळाली . मांजराचे प्रकार पहिल्यांदाच बघितले

https://m.facebook.com/story.php?story_fbid=220622776049597&id=105979840...

पाच सहा दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीच्या सुपरवायझरने तुम्ही मांजरांना खाउ घालो नका. असे सांगितले त्यामुळे खायला घालणे थांबववे लागले पण काळजी वाट्तेच. आज पाहिले तर अगदी छोटी दोन पिल्ले व त्यांची आई ग्राउंड फ्लोअर ला होती.

>>>पाच सहा दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीच्या सुपरवायझरने तुम्ही मांजरांना खाउ घालो नका. असे सांगितले त्यामुळे खायला घालणे थांबववे लागले पण काळजी वाट्तेच. <<<

अरेरे..

>> सोसायटीच्या सुपरवायझरने तुम्ही मांजरांना खाउ घालो नका. असे सांगितले

असा प्रतिबंध करणे चुकीचे आहे. माणसांनी दिलेल्या खाण्यावर प्राणी अवलंबून असतील तर खाणे असे बंद केल्यास भुकेने कासावीस होऊन त्यांचे प्रचंड हाल होतात. मुक्या प्राण्यांना खायला घालण्यापासून प्रतिबंध करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. ते असे करू शकत नाहीत. सहज गुगल करून पहिले असता ते बेकायदा आहे असेही दिसून येईल. त्यांना हे वाचायला द्या.

1. SECTION 503:- Indian Penal Code 1860, provides that intimidation is a criminal offence which is cognizable. ANYONE WHO THREATENS OR INTIMIDATES ANY PERSON TAKING CARE OF STREET ANIMALS IS LIABLE FOR CRIMINAL INTIMIDATION UNDER SECTION 503 OF INDIAN PENAL CODE AND CAN BE ARRESTED WITHOUT A WARRANT.

2. SECTION 506:- IT IS A CRIME TO THREATEN, ABUSE OR HARASS NEIGHBOURS WHO FEED ANIMALS.

संदर्भ:

https://www.quora.com/Can-someone-take-legal-action-against-me-for-feedi...

https://cupabangalore.org/wp-content/uploads/2018/04/Dealing-with-stray-...

१००

ते बेकायदा आहे ते माहीत आहे त्यामुळे सुपरवायझर शी पंगा घेतला नाही. पण संध्याकाळी फिरायला जातो तेव्हा एक क्विकी फिडींग स्टेल्थ मोड मध्ये करून टाकतो. व गायब होतो. वुमन फीडिन्ग स्ट्रे कॅट्स असे गूगल सर्च केल्यावर ब्रिटन मध्ये एका ७९ वर्शाच्या बाईला दहा दिवस जेल झली असे आले. त्यामुळे जरा टेन्शन मध्ये होते. पण लॉक डाउन मुळे कोणत्याच प्राणी पक्षी ह्यां ना अगदी टाक्लेले पण अन्न साठलेले पाणी मिळत नव्हते. एकदा फर्स्ट लॉक डाउन मध्ये दुपारी उन्हात एक अगदी ताहानलेला कुत्रा मला भेटला. त्याला माझ्या जवळचे सर्व पाणी पाजले
व त्याने मला जो लुक दिला तो मी जन्मात विसरणार नाही. त्याला अन्न नको होते. अश्या जीवांचे काय करायचे तुम्ही इग्नोअर करू शकत नाहे निदान मी तरी इतकी थिक स्किन्ड नाही. सो माझे मांजर फीडिन्ग ऑपरेशन अंडर ग्राउन्ड गेले आहे.

>> ते बेकायदा आहे ते माहीत आहे त्यामुळे सुपरवायझर शी पंगा घेतला नाही....
>> ... अश्या जीवांचे काय करायचे तुम्ही इग्नोअर करू शकत नाहे निदान मी तरी इतकी थिक स्किन्ड नाही.

मला वाटतेय काहीतरी गैरसमज होतोय (?). ब्रिटन चे माहित नाही. पण वर दिलेल्या लिंक मध्ये भारतीय कायद्यानुसार कोणीही तुम्हाला प्राण्यांना खायला घालण्यापासून रोखू शकत नाही. भलेही ते स्ट्रे कॅट्स असो. बेकायदा कृत्य सुपरवायझर करत आहे. आपण नाही. तुम्ही फारतर याबाबत जवळच्या प्राणी मित्र शी संपर्क करू शकता. ते त्या सुपरवायजरशी बोलतील.

खुपच मस्त
मस्त. असे आतून प्रेम करायला आले पाहिजे.>>>>> अगदी खरं देवकी.

मी आज सकाळी सहाच्या आसपास रस्त्याच्या कडेला मांजरीचे पिल्लू कुडकुडत होते म्हणून त्याला उचलून गाडीत घ्यायला गेलो तर ते मला चावून पळाले. आत्ताच टीटी आणि रेबीजवाले इंजेक्शन मारून आलोय. भूतदया दाखवताना थोडी काळजी घेत चला Sad

हो
मांजरांना स्वतः ला धोका आहे वाटलं की त्या चावतात.
रेबीज सर्व डोस नक्की पूर्ण करा.काळजी घ्या.

@अनु , धन्यवाद. इंजेक्शन्स सगळीच घ्यावी लागतील का ? आजचे एक आणि नंतरचे फक्त एक घ्यायचा विचार होता.

स्वतः ठरवू नका.रॅबीप्युर चे सामान्यतः 5 डोस सांगतात डॉ लोक.आणि दिवसांचं अंतर वाढत जातं.तेही त्यांनी सांगितलेल्या 2 डोसेस मधल्या गॅप नुसार घ्या.
रेबीज झाल्यावर त्याला औषध नाही.माणूस थेट फोटोत जातो लक्षणं दिसल्यावर 3-4 दिवसांनी असं ऐकून आहे.

तुमच्याकडून धोक्याची वाईब आली असेल....
आणि यापुढे मांजराला पाठीवरून स्किन चिमटीत धरून उचलत जा... त्यांना चावायला जमत नाही...

धन्यवाद निरु.
इथे फक्त मांजरांचेच व्हिडीओ द्यायचे आहेत का ?

<<इथे फक्त मांजरांचेच व्हिडीओ द्यायचे आहेत का ?>>

हो खरं तर. पण आता सर्वसमावेशक बनवायला हरकत नाही.
मात्र वेमा यांच्या अन्यत्र वाचलेल्या धोरणानुसार फक्त YouTube Link न देता त्या व्हिडीओ बद्दल काही माहिती, प्राण्यांबद्दल चर्चा, गमतीजमती सांगितल्या तर ते जास्त योग्य ठरावे.

Pages