खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व..
(यूट्युब आणि इंन्स्टा)
आमच्या टारझन बोक्यावर "टारझन द वंडर कॅट" हा पहिला भाग लिहिला आणि बऱ्यापैकी मांजरप्रेमींची ओळख झाली.
नंतर अमेरिकेत कुत्रा किंवा मांजर पाळण्यावर धागा आला आणि त्यावरही मांजरांबद्दल बऱ्यापैकी माहिती आली आणि प्रश्नही आले.
आमचा टारझन घरी येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही मांजरांची वेडी असलेली माझी लेक त्यांचे व्हिडिओज् युट्युब आणि इंन्स्टा वर बघायची मला पाठवायची.
मांजरप्रेमी मायबोलीकरांनी हे व्हिडिओज् पहावेत हा मुख्य उद्देश आणि बहुतेक असा धागा मायबोलीवर नाही हे पाहून हा सबकुछ मांजरांसाठी असलेला धागा काढतोय.
मांजरप्रेमींनी यात वेळोवेळी भर घालावी ही विनंती.
यात युट्युब, इंन्स्टाच्या लिंक द्यायलाही हरकत नाही आणि घरच्या मांजरांचे व्हिडिओ, फोटोज् असतील तर फारच उत्तम..
पाळणाऱ्यांनी त्यांच्या काही आठवणी दिल्या आणि जाणकारांनी माहिती दिली की फावल्या वेळी कधीही इथे येऊन रमायला हरकत नाही.
हा धागा मांजरप्रेमीना तर आवडावाच पण इतरांसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून उपयोगी पडेल असं वाटतं कारण मांजरं विशेषतः त्यांची पिल्लं हा एकंदरीतच भयंकर क्यूट प्रकार आहे..
सुरुवातीला धाग्यामधेच काही छान व्हिडिओजच्या लिंक्स देतोय..
बाकीच्या प्रतिसादात येतीलच...
हत्तीचं खोडकर पिल्लूhttps:/
हत्तीचं खोडकर पिल्लू
https://youtu.be/gWxBEJGCaaw
शा मा, तुम्हाला पाणघोडा आणि
शा मा, तुम्हाला पाणघोडा आणि गेंड्याच्या गमतीजमती इथे टाकायच्या असणार!
Pages