वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाताल लोक पाहून संपवली. आवडली. पाहायला सुरवात केली तेव्हा एवढी वाटली नाही पण नंतर इतकी गुंतत गेले की एक दिवसात बघून सोडविली. जवळ जवळ सर्व problamatic issues यात येऊन जातात. त्यात २/३ सीन्स एकदम चर्रर्र करतात व अस्वस्थ ही. हनी बद्दल खूप वाईट वाटते.
actually सर्व गुन्हेगारांबद्दल सहानुभूती निर्माण करण्यात पाताल लोक यशस्वी झाली आहे.

डॉली सारख्या व्यक्ती आजूबाजूला असतात व त्यांना सपोर्ट ची गरज असते. तिचे character सिरीज मध्ये खूप इम्पॉर्टन्ट आहे. अनुष्का शर्माने जॅकपॉट जिंकला आहे. सिरीज हिट आहे.

संजीव मेहरा ला नेटफ्लिक्स वर ताज महाल मध्ये प्रोफेसर चा रोल मध्ये बघा. शेरो शायरी ची आवड असलेला आणि बायको घटस्फोट देतेय हे कळल्यावर रडणारा आणि हनिमून (दुसरा) नंतर घटस्फोट दे असं म्हणणारा प्रोफेसर मस्त उभा केलाय.

डॉली सारख्या बायका डोक्यात जातात. उपयोग तर काहीच नाही (आधाराच्या दृष्टीने) पण उपद्रव मूल्य भारी >>> ह्म्म्म्म . सुरुवातीला असचं वाटतं पण नंतर डॉली आवाडायला लागते . विक्रमच्या पार्टीत तिच्याबद्दल वाईट वाटायला लागतं Sad . she needs a help

नक्की काढा.
पाताल लोक ओटाफे झालीये माझी.

उशीरा काढला धागा सान्वी.

सर्वांनी जमलं तर पाताललोक प्रतिसाद हलवा तिथे.

डॉलीला खरंच मेहराची आतून काळजी असेल तर तिने पार्टीतला सीन चांगला केलाय, उत्तम अभिनय. आपल्याला जेव्हा एखाद्याची काळजी असते तेव्हा अशीच घालमेल होते, अस्वस्थता येते. पुढचे पाच बघायचेत अजून.

नीरज काबीला अजून कुठे बघितलं आहे, मला जरा जुन्या सिरीयलमधे बघितल्यासारखं वाटतंय. यंग होता खुप.

एनिवे मला मेहरा बाबत डॉलीचा जसा संशय आला, तसा साराचा येतोय आणि ते एजेड कलाकार पार्टीत वाद होतो ते मास्टरजी वाटतायेत Lol

आज बघेन.

नीरज काबी आणी शेफाली शहा चा पण एक पिक्चर आहे.... नाव आठवत नाही... त्यात पण मस्त काम केलय >>>>>>>>>>>>>>>> हा आठवल्..... वन्स अगेन.... मस्त आहे.... बघा नक्की नसेल बघीतला तर..

उशीरा काढला धागा सान्वी. >> मला लवकर काढायचा होता अंजु, पण मी विचार केला की अजून जास्त लोकांना बघू देत म्हणजे चर्चा करायला मजा येईल आणि स्पोईलर पण टाकता येतील.

हा एक लेख दिसला आज , इथे बर्‍याच वेब सीरीज ची लिस्ट आणि लिंका आहेतः >>>>> वा वा मै, ही लिंक शेअर केल्याबद्दल तुझ्यासारख्या मराठी मुलीला एकतरी लाईक बनतोच !!

ह्यातलं मी ते ऑपरेशन एमबीबीएस पाहीलं आहे. टाईमपास आहे एकदम.

मला वाटलं 'नेव्हर आय हॅव एव्हर' मध्ये उल्लेख झालेलं रिव्हरडेल हे काल्पनिक नाव आहे. डीजेने रिव्हरडेलबद्दल लिहिलं तेव्हा कळलं की ती खरीच सिरीज आहे. काल रिव्हरडेलची सुरूवात पाहीली. हे स्मॉल टाऊन ड्रामा बघायला छान वाटतात. शिवाय मिस्टरी पण आहे. एकंदरीत हायस्कूल हे जरा भारी प्रकरण आहे असं वाटायला लागलं आहे आता.

पराग Lol
अरे लहानपणी आर्ची कॉमिक्स नाही वाचलीस का तू? हे आर्ची जगहेड, बेटी, वेरॉनिका फ्येमस कॅरेक्टर्स होते आमच्या कॉन्वेन्ट मैत्रिणींमधे. आम्ही त्यांच्याकडून ऐकून शिकलो होतो ते वाचायला Happy
त्या लेखातल्या लिस्ट पैकी बॅचलर्स ही सीरीज थोडी पाहिली. मजेशीर आहे . त्याच TVF यूट्यूब चॅनल्स च्या आणखी काही लहान लहान सीरीज दिसल्या त्याही मस्त टिपी आहेत.

अरे लहानपणी आर्ची कॉमिक्स नाही वाचलीस का तू? हे आर्ची जगहेड, बेटी, वेरॉनिका फ्येमस कॅरेक्टर्स होते आमच्या कॉन्वेन्ट मैत्रिणींमधे. >>>> नाही. आम्ही किंवा आमचे मित्र मैत्रिणी कॉन्व्हेंटात नव्हते ना.. आम्ही आपली चंपक ठकठक वाचायचो लहानपणी.. Proud

आर्ची कॉमिक्स वाचून मी पण बघायला घेतली.. पण त्यांचे जे काही चालले आहे, त्याचा आर्ची कॉमिक्स शी काहीही संबंध नाही. कंटाळा आला...

Window Birding नावाची शॉर्ट फिल्म/documentary बघितली का कोणी?
खूप सुंदर आहे. पक्षी/ निसर्ग आवडत असल्यास नक्की बघा.

Window Birding नावाची शॉर्ट फिल्म/documentary बघितली का कोणी?>> हो आजच पाहिली. मस्तच आहे.

Window Birding नावाची शॉर्ट फिल्म/documentary हिट आहे. कायप्पा वर खुप ठिकानाहुन आली आहे.

Amazon Prime वर Upload म्हणून नवीन सीरिज आहे . खूप नवीन कल्पना आणि विचारप्रवर्तक थीम आहे . जरूर बघा

कोणी brave and beautiful turkish series पाहत आहे का?? Mxplayer aahe hindi dubbed.... आता पर्यंत 52 episodes पाहिलेत ... थोडी slow आहे ... But content twist storyline mastch

Pages